Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 20 September 2023

स्त्री शक्ती: पारिवारिक व कार्यालयीन जवाबदारीचे संतुलन | NARI SHAKTI HOUSEWIFE TO WORKING WOMEN | FAMILY | OFFICE | RESPONSIBILITIES | MOTHERHOOD

नारी शक्ती: गृहिणी ते नोकरी

 

गृहिणींचे पारिवारिक कार्यालयीन जवाबदारीचे संतुलन

स्त्री ही शक्ती आहे. ती केवळ कुटुंबाचीच नाही तर समाजाचीही आधारस्तंभ आहे. स्त्रीने पारंपारिकपणे घरकाम आणि संसार सांभाळण्याची जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, आधुनिक काळात स्त्रिया घरकाम आणि नोकरी दोन्ही सांभाळत आहेत. याशिवाय काही स्त्रिया आपल्या आवडीनिवडीचे क्षेत्र निवडून त्यातही नाव कमावत आहेत.

काही स्त्रिया आपल्या नोकरीसोबतच आपल्या आवडीचे क्षेत्र जसे की क्रीडा, कला, संगीत इत्यादी क्षेत्रातही नाव कमावत आहेत. या स्त्रियांची कर्तृत्वाची गाथा सांगणारे अनेक किस्से आहेत. अशाच काही स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने तारेवरची कसरत केली आहे.

काळ बदलला त्याचबरोबर कुटुंबव्यवस्था बदलली. पूर्वीच्या एकत्रित कुटुंबाच्या तुलनेत आता आईवडील मुले अशी त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबे सगळी दिसतात. बहुतेक कुटुंबात तीन किंवा चारच सदस्य असतात. या सगळ्यात बदल झाला आहे तो आईच्या कामात आणि मुलांच्या संगोपनात.

आता स्त्री नोकरी करते, कुटुंबासाठी अर्थार्जन करते आणि त्याचबरोबर घरच्या जबाबदान्या, मुलांचे संगोपन अशी कामेही तितकेच मन लावून करते. अर्थात या सगळ्यात तिची धावपळ होते. ताण येतो. पण काही तडजोडी करत ती सगळ्या गोष्टी अंडजस्ट करत असते. सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते.

बालसंगोपनाच्या बाबतीत विचार करायचे तर मागच्याकाळातील स्त्रिया आणि आजच्या काळातील नोकरी करणारी स्त्री अशी तुलना करणे कठीण आहे. दोन्ही पिढ्यांना वेगवेगळ्या संघर्षाला सामोरे जावे लागले आहे, तसेच विविध गोष्टींची त्यांना बालसंगोपनात मदत झाली आहे.

) स्त्रीचे वय:

मुलांच्या जन्माच्या वेळी आईचे वय पूर्वी खूपच कमी असायचे. पुन्हा पूर्वी तीन-चार-पाच अपत्ये अगदी सहजपणे होत असत. पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी मागच्या पिढीतील आईच वय हे आताच्या पिढीतील आई पेक्षा कमी असायचं. त्यानंतर काही स्त्रीया नोकरी करू लागल्या पण कमी वयात जास्त जबाबदारी पेलणार नाही म्हणून बऱ्याच स्त्रीया नोकरी सोडून द्यायच्या. आता मुली जेव्हा पहिल्यांदा आई होतात तेव्हा त्या वयाने मोठ्या असल्याने समजदार झालेल्या असतात त्यामुळे बाळ आणि नोकरी या दुहेरी जबाबदाऱ्या त्या समर्थपणे पार पाडताना दिसतात.

) कामाचे स्वरूप:

कामाचं स्वरूपही मागील दोन-तीन पिढ्यांमध्ये वेगवेगळे होते. तीस-चाळीस वर्षांपूर्वी स्त्रीया साधारणपणे घर सांभाळणे ही प्रमुख आणि महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असत. त्यानंतर शिक्षणाची संधी मिळालेल्या स्त्रीया साधारणपणे ते अशी नोकरी करू लागल्या. जास्त महिला शिक्षिका म्हणून काम करत किंवा बँकेत, एलआयसीमध्ये, सरकारी खात्यातील नोकरी असायची. कामाच्या वेळा नक्की होत्या त्यामुळे घरी लक्ष देता येत असे. आजकाल मुली वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत, कामाच्या वेळा नक्की नाहीत, कामासाठी कधीही बोलवणं येतं आणि ऑफिसमध्ये जावं लागतं. अर्थात हे सगळे शिवधनुष्य मुली आपआपल्या परीने चांगल्या प्रकारे सांभाळताना दिसतात. कुटुंबाचा पाठिंबा असेल तर त्यांना करिअरमध्ये नव्या संधी स्वीकारता येतात.

) परत नोकरी मिळवणे:

 आधीच्या पिढीत जर प्रसूतीनंतर बाळ - वर्षांचं होईपर्यंत नोकरी सोडली आणि मग परत नोकरी शोधली तर नवीन नोकरी मिळणे खूप कठीण नव्हते. शिक्षकी पेशा मध्ये नोकरीत जास्त बदल झालेले नसायचे, अभ्यासक्रम सारखाच असायचा त्यामुळे पुर्वीच्या अनुभवामुळे नोकरी मिळत असे. आताच्या काळात रोज नव नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत, - वर्षात नोकरीत खूप बदल झालेले दिसतात आणि मग जुना अनुभव काही कामाचा उरत नाही. नवीन नोकरी मिळणे कठीण होते.

) घरकामासाठी गडी व मावशी:

आधी घरगडी, स्वयंपाकाला बाई, बाळासाठी आया असं ठेवायची पद्धत नव्हती आणि ते परवडत पण नव्हते. घरातलं सगळं करून मग नोकरीवर जाण म्हणजे फार दगदग. आता मात्र कामासाठी ठेवलेल्या मावशींमुळे घरकामची चिंता जरा कमी झाली आहे.

) पुरूषांचा वाढता सहभाग:

आता पुरूषांमध्ये बदलत्या काळानुसार प्रगल्भता येऊ लागलेली आहे. मागच्या पिढीत बालसंगोपनात नवरा (बाळाचे बाबा) काही जास्त सहभागी नसायचे. बालसंगोपनाची पुर्ण जबाबदारी आईची असायची त्यामुळे बाळ आणि नोकरी दोन्ही गोष्टींकडे लक्ष पुरवणे कठीण होते. आजच्या पिढीतील बाबा बालसंगोपनात खूप सक्रिय आहेत त्यामुळे आईचा भार थोडा हलका झाला आहे.

) एकत्र कुटुंब:

आधी एकत्र कुटुंब होतं, घरी मुलांनावर लक्ष ठेवायला कोणीतरी असायचं पण आता आई-वडील ऑफिसमध्ये आणि बाळ पाळणाघरात हा एकच उपाय समोर आहे. आधी आजी-आजोबा घरी देव धर्मात व्यस्त असायचे, अगदी सहज मुलांच्या कानावर भजन, श्लोक पडायचे. मनोरंजनाचे इतर साधन नव्हते त्यामुळे आजी-आजोबा मुलांना गोष्टी, कथा सांगायचे, चांगले संस्कार मुलांवर करायचे. आजकाल आजी-आजोबा सोबत रहात नाहीत, काही दिवसंकरता सोबत आले तर तेच लहान मुलांना टीव्हीवरील मालिका, मोबाईल फोनवर व्हिडिओ दाखवतात. फोन, टीव्ही याचं व्यसन लहान मुलांना फार लवकर लागत आहे. मुलांवर योग्य संस्कार कसे करावे हा मोठा प्रश्न आजच्या पालकांसमोर उभा आहे.

नोकरदार महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने विविध पावले उचलली आहेत. यापैकी काही प्रमुख पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत.

७) महिलांसाठी आरक्षण:

भारत सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण दिले आहे. या आरक्षणामुळे महिलांना नोकरी आणि शिक्षण घेणे सोपे जाते.

८) महिलांसाठी विशेष योजना:

भारत सरकारने महिलांसाठी अनेक विशेष योजना सुरू केल्या आहेत. या योजनांतर्गत महिलांना आर्थिक मदत आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

९) महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी कायदे:

भारत सरकारने महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी अनेक कायदे केले आहेत. या कायद्यांतर्गत महिलांना लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि कामाच्या ठिकाणी भेदभावापासून संरक्षण दिले जाते.

सारांश

भारत सरकारने नोकरदार महिलांसाठी ही पावले उचलली असूनही, भारतातील नोकरदार महिलांना अजूनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी समाजाने प्रयत्न करण्याची गरज आहे.


कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.



No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know