Translate in Hindi / Marathi / English

Friday, 29 September 2023

सुटलेल्या पोटाची घेराबंदी घेणे आवश्यक | Care Must Be Taken to Prevent Obesity | ABDOMINAL | Stomach problems | Dietician | indigestion | abdominal exercises | Surya Namaskars

 

असंतुलित पोटाचा घेर

सुटलेल्या पोटाची घेराबंदी घेणे आवश्यक

स्त्री आणि पुरुषांमध्ये पोट सुटण्याची समस्या खूप सामान्य आहे. आज मोठ्या प्रमाणावर फिटनेसबाबत जागरूकता निर्माण झालेली दिसून येते त्यामुळे पोट सुटू नये म्हणून अनेकजण काळजी घेताना दिसून येतात. आपल्याला वाटतं की ज्यांचं पोट सुटलं आहे त्यांचा आहार खूप जास्त असेल मात्र प्रत्यक्षात चुकीच्या आहाराच्या पध्दतीमुळे अनेकांचं पोट सुटत असतं.

आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार अनेकदा आहारात असे काही खाद्यपदार्थ असतात ज्यांचं पचन करण्यासाठी आतड्यांना खूप काम करावं लागतं. अशा वेळेस पोटात गॅस निर्माण होतो ज्यामुळे पोट सुटू लागतं. पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. लाईफस्टाईल आणि नियमित व्यायाम आणि योग्य आहारपद्धती यामुळेही समस्या दूर करता येऊ शकते.

व्यायाम:

रात्रीच्या जेणानंतर जर पोट जड वाटत असेल किवा अस्वस्थ वाटत असेल तर दहा मिनिट वॉक घ्यायला हरकत नाही. त्यामुळे पचनास मदत होईल आणि झोपही शांत लागेल. असं जर केलं नाही तर तुमचा दुसरा सगळा दिवस आळसात जाईल. सकाळी किंवा संध्याकाळ, हवे तेव्हा चाला, कारण याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर खूप मदत होऊ शकते. चालण्याने कॅलरी बर्न होण्यास आणि निरोगी चयापचय राखण्यास मदत होते. पोटाची चरबी प्रभावीपणे कमी करण्यासाठी आणि तुमचा एकंदर तंदुरुस्ती वाढवण्यासाठी, इतर व्यायाम आणि जीवनशैलीच्या समायोजनासह चालणे फायद्याचे आहे. व्यायामात रोज १२ सूर्यनमस्कारांचा समावेश करा. याची सुरुवात दोन सूर्यनमस्कार घालून केलीत तरी चालेल.

 न्याहारी:

सकाळी न्याहारी करणंही खूप गरजेचं आहे. अनेकजण न्याहारी घेता दुपारचं जेवण घेतात यामुळे एकदम जास्त जेवण घेतलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोजची कामं करताना अनेकदा आपण दुःखी, नाराज किवा निराश असतो तेव्हा त्याचाही परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. मानसिकदृष्ट्या खंबीर आणि शांत राहण्यासाठी प्राणायाम तुम्हाला मदत करू शकेल.

पाणी:

पाण्याचे प्रमाण वाढवा. दिवसभरात भरपूर पाणी प्या. पाणी पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. गरम पाणी: पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगले परिणाम बघायला मिळतील.

आहार:

 आहारात पोळी भाजी, भातवरण, चटणी आणि कोशींबिरीचा समावेश असायलाच हवा. आहारात फायबर असेल तर पोटाच्या समस्या तुम्हाला भेडसावणार नाही परिणामी पोट सुटणार नाही. बाजारात आज पॅक फूड मिळतं शक्यतो त्याचा वापर करू नये. त्यात साठवणूकीसाठी जास्त प्रमाणात मीठ आणि तेलाचा वापर केलेला असतो. शीतपेयांतही मोठ्या प्रमाणावर साखर घातलेली असते त्यामुळे पोट सुटण्याची समस्या निर्माण होते.

अन्न खाण्याच्या सवयी:

अनेकदा खूप घाईघाईत आणि खाल्लं जातं त्यामुळे सुध्दा पोट सुटू शकतं. व्यवस्थित चावून खाल्ल्यामुळे पचन नीट होत नाही. अन्नपदार्थात मीठ कमी खाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. त्यामुळे पोट सुटणार नाही.

नौकासन:

योगाने शारीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.

अल्कोहोल आणि धूम्रपान टाळा:

अल्कोहोल आणि धुम्रपान लठ्ठपणा वाढवू शकते, म्हणून हे बंद केले पाहिजे.

पोट सुटू नये म्हणून काही घरगुती उपाय देखील केले जाऊ शकतात. या उपायांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

दही किंवा ताक प्या:

दही आणि ताकमध्ये चांगले जीवाणू असतात जे पोटातील पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

आले खा:

आलेमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे पोटदुखी आणि गॅस कमी करण्यास मदत करतात.

जेवणानंतर लिंबू पिण्याची सवय लावा:

लिंबूमध्ये असलेले ऍसिड पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते.

पोट सुटणे हे एक सामान्य आजार असले तरी, ते त्रासदायक असू शकते. पोट सुटू नये म्हणून वरील उपाययोजना केल्याने पोट सुटण्याची शक्यता कमी होऊ शकते.

एका आठवड्यात पोटाची चरबी कशी कमी करावी?

एका आठवड्यात पोटाची चरबी कमी करण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे दररोज कार्डिओ आणि ओटीपोटाचे व्यायाम करणे, निरोगी आहारासह (ज्यामध्ये कॅलरी, चरबी आणि शर्करा कमी आहे) हे पोटाची चरबी लवकर कमी करण्यासाठी एक कार्यक्षम धोरण आहे.

शतपावली

रात्रीच्या जेवणानंतर जर पोट जड वाटत असेल किवा अस्वस्थ वाटत असेल तर दहा मिनिट वॉक घ्यायला हरकत नाही. त्यामुळे पचनास मदत होईल आणि झोपही शांत लागेल. असं जर केलं नाही तर तुमचा दुसरा सगळा दिवस आळसात जाईल. सकाळी उठल्यावर ३० मिनिटे व्यायाम करावा. यामुळे भूक लागेल आणि रोजची कामं करण्यात तुम्हाला उत्साह निर्माण होईल.

आपले पोट सुटले आहे कि नाही हे कसे निश्चित कराल?

एक सुती धागा घ्या. त्याची लांबी आपल्या शीर्ष मस्तकापासून ते जमिनीपर्यंत असावी. थोडक्यात आपल्या उंचीएवढा धागा घ्या. तो बरोबर मध्यभागी मोडा. आता त्या धाग्याची बरोबर अर्धी लांबी झालेली असेल. ह्या अर्ध्या लांबीच्या धाग्याने आपल्या नाभी पासून पोटाला गोल विळखा घाला. जर त्या धाग्याची दोन्ही अग्रे एकमेकांना जोडली जात असतील तर आपण सुडौल आहेत. जर धाग्याची दोन्ही अग्रे पोटाला विळखा घालून शिल्लक राहत असतील तर आपण अशक्त आहात. आणि हि दोन्ही अग्रे एकमेकांना स्पर्श करत नसतील तर आपण लठ्ठ आहात.

कोणते पेय रात्रभर पोटाची चरबी जाळते?

एक ग्लास पाणी दालचिनीची काडी किंवा चिमूटभर दालचिनी पावडरने सुमारे 10 मिनिटे उकळवा. ते कोमट होईपर्यंत थोडा वेळ थंड होऊ द्या. त्यात मध घालून रिकाम्या पोटी प्या. तुम्ही ते जेवणाच्या दरम्यान आणि रात्री झोपण्यापूर्वी देखील घेऊ शकता जेणेकरून तुम्ही झोपत असतानाही तुमच्या शरीरात चरबी जाळली जाईल.

सारांश

बाहेरील खाद्यपदार्थांचे अन्न लेबल काळजीपूर्वक वाचा. सर्व्हिंग आकार आणि अन्नातील कॅलरी, चरबी, साखर आणि सोडियम याकडे लक्ष द्या. अस्वास्थ्यकर चरबी आणि साखर कमी असलेले पदार्थ निवडा. घरी जास्त जेवण शिजवा. यामुळे तुम्हाला तुमच्या अन्नातील घटकांवर अधिक नियंत्रण मिळते. तुमच्या कुटुंबाला सकस आहार आणि व्यायामामध्ये सहभागी करून घ्या. निरोगी जेवण खाणे आणि एकत्र व्यायाम केल्याने एक आश्वासक वातावरण तयार होण्यास मदत होते आणि निरोगी सवयींना चिकटून राहणे सोपे होते. लठ्ठपणा रोखणे हे एकूणच आरोग्य आणि आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. या टिप्सचे अनुसरण करून, आपण लठ्ठपणा आणि इतर संबंधित आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका कमी करू शकता.


कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.


No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know