Translate in Hindi / Marathi / English

Friday, 29 September 2023

बालपणात आपल्या अपत्यांना बिघडू देऊ नका | CHILD PSYCHOLOGY AND CULTURE | CHILDHOOD | RESPONSIBILITY | DEVELOPMENT OF CHILDREN | SPOILED CHILDREN | ROLE MODEL

बालमानास शास्त्र आणि संस्कार

 

बालपणात आपल्या अपत्यांना बिघडू देऊ नका

मुलांना व्यवहारकुशल बनविण्याची जबाबदारी पालकांचीच असते. बिघडलेली मुले मोठी होऊन अपयशी होतात. मुलांना योग्य मार्गदर्शन करा; तसेच त्यांना पुस्तके, खेळणी देऊन त्यांना वेळेचा योग्य वापर करण्यास शिकवा. तुझ्या चांगल्या कामांसाठी आम्ही तुला भेटवस्तू देऊ, असे मुलाला सांगा.

आजच्या व्यग्र जीवनात काम करणारे आई-वडील विशेषत: आपल्या मुलांसाठी वेळ काढू शकत नाहीत.  एकत्र कुटुंब पद्धती नसल्याने पाल्यांवर होणारे संस्कार कधी कधी बिघडतात.  मुलांच्या संपूर्ण विकासासाठी आई-वडिलांनी थोडा वेळ आपल्या मुलांसाठी निश्चितच द्यायला पाहिजे, असे बाल मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.

आई-वडील मुलांना वेळ देता त्यांच्या इच्छापूर्तीसाठी महाग सामान, कपडे, खेळणी आणि पैसेही देतात. अशा स्थितीत मुले बिघडतात. बिघडलेली मुले मोठी होऊन अपयशी आणि निराश प्रौढ होतात. अशी मुले जीवनात कधीही आनंदी राहू शकत नाहीत.

मुले बिघडल्याची लक्षणे:

मूल गरज आणि इच्छा यातील अंतर समजू शकत नाही.

मूल आपली मनमानी करते.

मूल प्रत्येक बाबतीत विरोध करू लागतो.

मूल खूप जास्त आणि निरर्थक बोलतो.

मूल त्याचे म्हणणे ऐकल्यास भडकून उठते.

मूल कोणत्याही नियमाचे पालन करत नाही.

मूल जिद्दी आणि चिडचिडा होते.

बिघडलेले प्रौढ

बिघडलेली मुले प्रौढ वयात जीवनातील अनेक रस्ते आणि ध्येयपूर्तीत अयशस्वी ठरतात.

जीवनात चूक-बरोबर याचा निर्णय घेऊ शकत नाहीत.

ते आपली जबाबदारी आणि कर्तव्यांना समजू शकत नाहीत.

त्यांचे विचित्र आणि अयोग्य वागणे असते.

ते अवघड परिस्थितीत सहज पराभव मान्य करतात.

ते दुसऱ्या लोकांबरोबर मिळून काम करण्यास असक्षम असतात.

उपाय: मुलांना बालपणातच सुशील आणि सभ्य बनवा

मुलांच्या वयानुसार त्यांच्यासाठी सीमा निश्चित करा. त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांवर बंधने आणा.

मुलांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करणे आवश्यक नाही. काही विशेष प्रसंगीच भेटवस्तू  द्या.

मुलांच्या ओरडण्याकडे आणि निरर्थक हट्टाकडे लक्ष देऊ नका. हट्ट सोडल्यानंतर त्यांच्यावर प्रेम करा. अगोदर ते कसे वागले, याची आठवण करून देऊ नका.

मुलांना सुरुवातीलाच बचतीची सवय लावा. घरातील कामांमध्ये मदत करणे; तसेच मोठ्यांना मदत करणे शिकवा.

मुलांना योग्य मार्गदर्शन करा. त्यांना पुस्तके, खेळणी इत्यादी देऊन त्यांना वेळेचा योग्य वापर करण्यास शिकवा. त्याबरोबरच खेळणी आणि वस्तू दुसऱ्यांबरोबर वाटून घेण्यास शिकवा.

तुमचे आवश्यक काम संपेपर्यंत त्याला वाट पाहणे शिकवा. अशाप्रकारे मुलांना सहनशील बनवा.

मुलाची तुलना त्याच्या किंवा तिच्या भाऊ-बहिणीशी किंवा इतर मुलांशी करू नका. चुकीच्या गोष्टी नाकारण्यास घाबरू नका.

सर्वांत आवश्यक म्हणजे आपल्या मुलांसाठी स्वत: आदर्श व्हा. त्यांच्याशी असे वागा, जशी अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडून करता.

आपल्या पाल्याबरोबर दिवसातील जास्तीत जास्त तास व्यतीत करा. त्याच्या गुणधर्मांचा विकास जवळून अभ्यासा . आपण त्याच्या वयोमानाप्रमाणे होणारे बदल जवळून पाहिल्याने पाल्याच्या व्यक्तिमत्वातील सुधृढ बदल होण्यास मदत होते.

या बाबींकडे लक्ष द्या:

दुकाने किंवा बाजारात मुलगा एखादे खेळणे मागत असेल, तर असे म्हणू नका की आत्ताच देऊ. त्याऐवजी असे म्हणा की, नंतर तुला देऊ.

मुलगा अभ्यास करत नसेल किंवा अभ्यासात लक्ष देत नसल्यास म्हणू नका की अभ्यास केला नाहीस तर शिक्षा मिळेल. उलट असे म्हणा की, तू अभ्यास सुरू कर. वेळेवर आम्ही तुला मदत करू.

तू चुकीचे काम केल्यास आम्ही तुझ्याशी बोलणार नाही, असे म्हणण्याऐवजी म्हणा की, तुला आपण जे केले त्याचा पश्चात्ताप व्हायला हवा. पुन्हा ही चूक होणार नाही, असा प्रयत्न कर.

हे काम करू नकोस, आम्ही तुला मिठाई देऊ, असे म्हणता, सांगा की, तुझ्या चांगल्या कामांसाठी आम्ही तुला भेट देऊ.

मुलांचे संगोपन करणे हे एक आव्हानात्मक पण फायद्याचे काम आहे. या टिपांचे अनुसरण करून, तुम्ही तुमच्या मुलांना आनंदी आणि व्यवस्थित प्रौढ बनण्यास मदत करू शकता.

सारांश

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की मुले लहान प्रौढ नाहीत. ते अजूनही विकसित होत आहेत आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल शिकत आहेत. त्यांना मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करणे महत्वाचे आहे, परंतु त्यांना चुका करू देणे आणि त्यांच्याकडून शिकण्याची परवानगी देणे देखील महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांना बालपणात खराब केल्याने दीर्घकाळात नकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे त्यांना हक्कदार आणि मागणी करणारे बनवू शकते. हे त्यांना कमी लवचिक आणि आव्हानांचा सामना करण्यास कमी सक्षम बनवू शकते.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know