Translate in Hindi / Marathi / English

Monday, 18 September 2023

ज्येष्ठा गौरीचे व्रत आणि फलप्राप्ती | गणेशोत्सव | गौरीईला आवडणारा खास नैवेद्य | गौराईला मांसाहाराचा नैवेद्य

ज्येष्ठा गौरीचे व्रत आणि फलप्राप्ती

 

ज्येष्ठा गौरी आवाहन ज्येष्ठ गौरी पूजन ज्येष्ठ गौरी विसर्जन

गणेशोत्सव दरम्यान ज्येष्ठ गौरींचे आगमन होते. अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करण्यात येते. अष्टमीला ज्येष्ठ गौरी पूजन करण्यात येते. ज्येष्ठ नक्षत्रांवर गौरींना पूजले जाते म्हणूनच त्याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधले जाते. या व्रतामध्ये तीन मुख्य भाग म्हणजे:

ज्येष्ठा गौरी आवाहन, ज्येष्ठ गौरी पूजन आणि आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन. हा सण माहेरवाशीणींचा असल्यामुळे तिच्या आवडीचे पदार्थ करण्यात येतात.

गौरीचे व्रत काय आहे महत्त्व?

पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणिमात्रांचे दुःख नाहीसे केले. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात. गौरी हे माता पार्वतीचे दूसरे नाव आहे. जेष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे त्याला जेष्ठा गौरी पूजन म्हटले जाते. ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सणांपैकी एक महत्वाचा सण आहे.

गौरीईला आवडणारा खास नैवेद्य

गौरी-गणपतीचा सण निव्वळ आनंद. गणपतीच्या आगमनानंतर सर्वत्र गौरींच्या आगमनाची लगबग सुरू होते.

गणपतीसोबतच आता घरोघरी गौराईचं आगमन होणार आहे. घरोघरी गौराईचं आगमन होणार आहे. गौराईचं पूजन केलं जाईल. तीन दिवस गौराईची सेवा करून उत्सव साजरा केला जाईल. घरोघरी गौरी-गणपतीचा सण यंदा अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. आता गौरी पूजनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे गौराईचा आवडता नैवद्य कोणता हे देखील तुम्ही अवश्य जाणून घ्या. गौरी आवाहनाच्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. गवार- भोपळ्याची भाजी अथवा पालेभाजी करण्यात येते.

ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीला महानैवेद्य दाखविण्यात येतो. यात गोडाधोडाचे जेवण केले जाते. साधारणतः 16 पदार्थ बनविण्याची पद्धत असते. परंपरेनुसार काही ठिकाणी 16 वेगवेगळ्या पद्धतीची भाजी बनविली जाते. काही ठिकाणी नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.

तर काही ठिकाणी 5 प्रकारच्या कोशिंबीर तसेच गोडाचे पंचपक्वान्न ज्यामध्ये शेवयांची खीर, गव्हल्यांची खीर, पुरण, लाडू, काकडीचे गोड पातोळे याचा समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी पदार्थ देखील असतात.

वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे गोड पदार्थ तयार केले जातात. जसे घावन- घाटले, पुरणपोळी, साटोर्या, सांजोऱ्या, करंजी, लाडू, बासुंदी इतर. या व्यतिरिक्त फळे, मिठाई, फराळाचे (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) विविध पदार्थ तयार केले जातात.

गौरींचा आवडता नैवेद्य

कथली:

गौरीच्या आवडत्या नैवेद्यात हरसूलं आणि पडवळ हे महत्त्वाचं मानलं जातं. हेच दोन घटक टाकून बनवल्या जाणाऱ्या कढीला कथली असे म्हणतात. गौरींच्या नैवेद्यात कथलीला बरंच महत्त्व आहे.

कृती कथली बनवताना हरसुलं आणि पडवळ थोडं-थोडं चिरून घ्या. मग नेहमी आपण कढी जशी बनवतो. तशीच इतर कृती करा. म्हणजे दह्यामध्ये बेसन टाका आणि त्याची पातळ असं द्रावण बनवा. नंतर कढईमध्ये तुपाची किंवा तेलाची फोडणी घ्याला. ज्यामध्ये जिरं, आलं, तिखट, मिरची घाला. थोडी हळद घातल्यानंतर त्यात हरसुलं आणि पडवळंचे लहान तुकडे आधी शिजवून घेऊन मग ते फोडणीत टाका आणि नंतर दही आणि बेसनाचं केलेलं द्रावण टाका. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, साखर टाक आणि कढीला उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यात कोथिंबीर घाला. आपण कडीपत्ता देखील फोडणीत घालू शकता. अशाप्रकारे कथली तयार होते.

ज्वारीची आंबिल:

 गौरीचा सर्वात आवडता पदार्थ जो प्रत्येकाच्या घरी नैवेद्याला केलाच जातो. तो म्हणजे आंबिल. आंबिल ही ज्वारीची बनवली जाते. काही ठिकाणी फोडणीची आंबिल बनवतात. तर काही ठिकाणी साधी (पांढरी) आंबिल बनवतात. तर मग जाणून घेऊया आंबिल बनविण्याच्या दोन्ही पद्धतींबद्दल.

फोडणीची आंबिल:

 यासाठी सर्वात पहिले ज्वारीवर पाण्याच्या हबका मारून ती कुटली जाते. त्यानंतर चाळून त्यावरील टरफलं काढली जातात आणि उर्वरीत ज्वारी दळली जाते. मग आपण ते बाहेरून गिरणीवरून दळून आणि शकता किंवा आपल्या घरी मिक्सरवर पण बारीक करू शकता. ज्वारीचा भरडा तयार करायचा असतो म्हणजेच रव्या सारखी ज्वारी दळावी, अगदी बारीक पावडर होऊ देऊ नये. मग ही दळलेली ज्वारी पुन्हा चाळून घ्यावी. मग त्याची आंबिल बनवली जाते.

साधी (पांढरी) आंबिल:

साधी आंबिल बनवतांना वर सांगितल्याप्रमाणे पहिले तशीच ज्वारी बारीक करून घ्यायची. फोडणी देतांना मात्र फक्त पाण्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून आंबिल फोडणी करायची. ही आंबिल दूध-साखर घालून खाल्ली जाते.

सोळा भाज्यांची एक भाजी:

याशिवाय गौरी म्हणजेच महालक्ष्मी पूजनाला सोळा भाज्यांची एक भाजी केली जाते. या सोळा भाज्यांच्या भाजीचाही नैवेद्य महत्त्वाचा असतो. तसंच प्रत्येक विभागांमध्ये फुलोरा करण्याचं प्रमाण वेगळं आहे. फुलोरा म्हणजे करंजी, पाती, लाडू, अनारसे, वेणी-फणी, मोदक हे सर्व बनवून त्याचा नैवेद्य गौरी-महालक्ष्मींना दाखवला जातो. या फुलोऱ्याचंही सणाला खूप महत्त्व आहे.

गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात?

ज्येष्ठा गौरी पूजन: गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौराईच्या आगमनाने घरात चैतन्य द्विगुणीत होते. लाडक्या गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच गौराईचा सण पारंपरिक पध्दतीने साजरा होतो. गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य, गोडाचा नैवेद्य, फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. पण कोकण आणि अन्य काही भागांमध्ये गौराईचे आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी गौराई पूजनाला तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरीच्या आगमनानंतर कोकणामधील अनेक घरामध्ये सर्व महिला एकत्र येत झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. गौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडून दिली जात नाही. महत्वाचे म्हणजे सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट केली जाते.

'या' तिखटाच्या नैवेद्यात नेमकं काय असतं?

गौराईसाठी मटण, चिकन, खेकडे, मासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी तर गौरीसाठी वाईन देखील ठेवली जाते. गौराईच्या पाहुणचारामध्ये कोणतीही कसर सोडली जात नाही.

तिखटाचा नैवेद्य दाखवण्याची कथा

असे सांगितले जाते की, पौराणीक कथेत गौराईचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतिला आपले भूतगण दिले. हे भूतगण तिच्या रक्षणासाठी दिलेले असतात. गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला. त्यांनी तिची पूजा केली. तिला गोडधोड खायला बनवलं. तिचा चांगला पाहुणचार केला.

गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्व जण विसरले. पण गौराई त्यांना विसरली नाही. शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना समशानात रहायची सवय आणि मांस आवडत असे. त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली. त्यावेळी मांसाहार वर्ज असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ होती. तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले.

या प्रसंगाची आठवण ठेऊन जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मटण केले जाते. कारण ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे. त्या दिवशी मटण करतात पण त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जात नाही. तर तिच्या सोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो.

गौरीपुजनाचा पुजा विधी काय आहे?

ग्रामीण क्षेत्रामध्ये पाहावयास गेले तर ह्या दिवशी सर्व सवाशिन स्त्रिया नदीवर जात असतात.आणि जाता जाता गाणी म्हणत असतात आणि त्या गाण्यांमध्ये त्यांनी आपापल्या माहेराचा उल्लेख देखील केलेला असतो.मग गाणी म्हणता म्हणता त्या नदीवर जातात आणि मग तिथे नदीतुनच चार पाच खडे उचलत असतात आणि तिरडयाचे पान वाहत आपली पुजा संपन्न करत असतात आणि मग उचललेली खडेच गौर म्हणुन आपल्या घरी घेऊन जात असतात.अशा पदधतीने ग्रामीण क्षेत्रात गौरीपुजन केले जात असते. 

पण शहरात असे अजिबात होत नसते.शहरात आपल्या स्वताच्या घराच्या अंगणातुनच म्हणजेच आपल्या घराच्या परसबागेत लावलेल्या तुळशी वृंदावनापासुनच तिला घरात आणले जात असते.घरात प्रवेश करत असतानाच तिने दारात ठेवलेले धान्याच्या मापाला पाय लावुन घरात प्रवेश करायचा असतो.कारण तिची पावले ही अत्यंत शुभ मानली जात असते.मग तिला घरात आणल्यानंतर जिच्या हातात गौराई असते तिचे पाय धुवले जातात.तिला इतर स्त्रियांकडुन हळद कुंकु लावले जात असते.

ह्या दिवशी प्रत्येक घरासमोर रांगोळी देखील काढली जात असते.मग गौराईचा आपल्या घरात सदैव निवास राहावा यासाठी तिला संपूर्ण घरातुन फिरवले जात असते.मग तिला एका ठिकाणी स्थानापन्न केले जात असते.आणि तिने सदैव आपल्या घरातच वास करीत राहावे यासाठी हात जोडुन तिला प्रार्थना करायची असते. 

आणि मग शेवटी प्रथम दिनी आगमन,दितीय दिनी नैवेद्य दाखवुन पुजन करून झाल्यानंतर अखेर त्रितीय दिनी गौरीला शेवटचा निरोप दिला जात असतो.म्हणजेच तिचे विसर्जन केले जात असते.

गौरीपुजनाचे महत्व तसेच वैशिष्टय काय आहे?

गौरीपुजन केल्याने विवाहीत स्त्रीला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशिर्वाद मिळत असतो.

गौरीपुजन केल्याने आपल्या वैवाहिक जीवणात आनंदाचे आगमन देखील होत असते.

बहतेक स्त्रिया हे व्रत संतान सुख मिळण्यासाठी करीत असतात.

अविवाहीत मुलींना त्यांना हवा तसा जोडीदार प्राप्त होत असतो.

गौरीचे विसर्जन कसे करावे?

गौरी विसर्जनाच्या दिवशी सर्व स्त्रियांनी लवकर उठावे आणि सगळयात अगोदर अंघोळ करावी. मग अंघोळ करून झाल्यानंतर विसर्जन करण्याच्या अगोदर गौरीची पुजा करावी.त्यांच्यासमोर दिवे लावावे त्यांना सुगंधित पुष्प देखील अर्पित करावे. माता गौरीला नैवैद्य दाखवावा ज्यामध्ये फळ,हलवा मिठाई इत्यादींचा समावेश केला गेलेला असतो. मग त्यांची सगळयांनी मिळुन आरती करावी. आरती करून झाल्यानंतर वाजत गाजत त्या मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी घरातुन निघावे.

शेवटी एखाद्या नदी तसेच समुद्रामध्ये त्यांच्या मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी उतरायचे असते. मग आपण केलेल्या पुजेचा स्वीकार करावा अशी विनंती माता गौरीपुढे करावी आणि पुजेच्या दरम्यान आपल्याकडुन काही चुक झाली असेल तर त्याबाबद देखील माफी मागुन घ्यायची असते.जेणेकरून माता गौरी आपल्यावर रुष्ठ होत नाही.

मग गौरीचे विसर्जन करून झाल्यावर प्रसादाचे वितरण करून ब्राम्हणांना किंवा भुकेलेल्यांना जेऊ घालावे आणि थोडेफार पैसे त्यांना दान देखील करावेत. आणि मग सगळयात शेवटी आपण केलेल्या व्रताचे पारायण करायचे असते.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know