Translate in Hindi / Marathi / English

Thursday, 14 March 2024

थकवा आणि सुस्ती | थकवा आणि सुस्ती हे एखाद्या मोठ्या आणि गंभीर आजाराचे लक्षण असू शकते | ताप, सर्दी किंवा व्हायरल संसर्गामुळेही एखाद्या व्यक्तीला थकवा येऊ शकतो | खूप शारीरिक श्रम किंवा मेहनत केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला थकवा येऊ शकतो | रात्री झोपल्यानंतरही सकाळी-सकाळी थकवा जाणवू शकतो

थकवा आणि सुस्ती

 

तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्ती येते का? बऱ्याच वेळेसे काही मेहनतीचे काम करताच दमल्यासारखे वाटते का? अशी लक्षणे दिसत असतील तर तुम्हाला वेळीच सावधान व्हावे लागेल. बऱ्याच वेळेस थकवा आणि सुस्ती हे एखाद्या मोठ्या आणि गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

थकवा

बऱ्याच वेळा आपण ऑफिसमध्ये तासनतास काम करतो. घरी येऊन बेडवर झोपून जातो. तेव्हा आपण एवढे थकलेले असतो, की उठून बसायचीही ताकद नसते. असे जगातील बहुतांश लोकांसोबत होते. शारीरिक रित्या खूप मेहनतीचे काम केल्यानंतर लोकांना थकवा आणि सुस्ती येऊ लागते. मात्र बऱ्याच वेळेस ताप, सर्दी किंवा व्हायरल संसर्गामुळेही एखाद्या व्यक्तीला थकवा येऊ शकतो. पण तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सतत थकल्यासारखे वाटत असेल, सुस्ती येत असेल तर सावध होण्याची गरज आहे. कारण, रक्ताची कमतरता, हृदयासंबंधित आजार, नैराश्य, कॅन्सर किंवा एखाद्या संसर्गामुळे झालेल्या आजारामुळेही अशी परिस्थिती उद्भवू शकते. यापासून बचाव करायचा असेल, तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरू करावेत.

थकवा आणि सुस्ती का येते?

खूप शारीरिक श्रम किंवा मेहनत केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला थकवा येऊ शकतो. असा स्थितीत त्या व्यक्तीच्या अंगात उर्जा किंवा ताकद नसते. ती व्यक्ती एखादे काम नीट करू शकत नाही. तर कधी त्या व्यक्तीला वेदनाही जाणवू शकतात. झोप पूर्ण झाली नाही किंवा ताप आला असेल तर अशी परिस्थिती (थकवा सुस्ती) उद्भवू शकते. जर तुम्हाला हा त्रास बऱ्याच काळापासून होत असेल किंवा तुम्ही सिस्टमॅटिक एक्झर्शन इंटॉलरन्स डिसीज या आजाराशी लढा देत असाल, तर तुम्हाला रात्री झोपल्यानंतरही सकाळी-सकाळी थकवा जाणवू शकतो.

रात्रभर झोपल्यानंतरही आपली झोप पूर्ण झाली नाही, असे तुम्हाला वाटू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही घरी किंवा बाहेर, कुठेही काम करू शकत नाही. बहुतांश प्रकरणात ॲनिमिया, नैराश्य, फायब्रोमायल्गिया, किडनी, लिव्हर आणि फुप्फुसाच्या आजारामुळे थकवा आणि सुस्ती जाणवू शकते. त्याशिवाय व्हायरल आणि संसर्गजन्य आजारांमुळेही असा त्रास होऊ शकतो.

ॲलर्जी

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर त्या व्यक्तीला थकवा, अशक्तपणा, सुस्ती वाटणे, डोकेदुखी, नाक बंद होणे असे त्रास होऊ शकतात. त्याशिवाय ॲलर्जिक रायनायटिसमध्ये शरीराला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी झाल्यास त्या व्यक्तीचे डोळे नाकातून पाणी वाहू लागते. अशा परिस्थितीत त्या व्यक्तील खूप थकल्यासारखे वाटू शकते. मात्र ॲलर्जिक रायनायटिस वर सह इलाज करता येतो आणि ती ( परिस्थिती) बरी होऊ शकते. अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता, जे तुमच्या ॲलर्जीचे निदान करून त्यावर उपाय करू शकतात. ॲलर्जिक रायनायटिसची लक्षणे कमी करण्यासाठी ज्या पदार्थामुळे तुम्हाला ॲलर्जी झाली, त्याचे सेवन तत्काळ बंद करावे. तसेच औषधांचे सेवन करुन पूर्णपणे बरे वाटू शकते.

मधुमेह आणि थकवा

टाइप मधुमेहामध्ये रुग्णांना बऱ्याचा वेळा सुस्ती वाटते. त्यांना भूक तहान जास्त लागते, वारंवार लघवीला जावे लागते आणि त्यांचे वजन झपाट्याने कमी होते. जर तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवून योग्य औषधोपचार करावेत. तसेच योग्य आहार घ्यावा आणि थोडाफार व्यायाम, अथवा शारीरिक हालचाली कराव्यात. त्याशिवाय वजनावर नियंत्रण ठेवणे, व्यायाम करणे, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, कार्ब्सचे सेवन कमी करणे आणि वेळेवर नियमितपणे औषधे घेणे, या गोष्टी कटाक्षाने कराव्यात.

झोप पूर्ण होणे

जर तुम्ही शांत पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्हाला बऱ्याच काळापर्यंत थकवा जाणवू शकतो. तसेच सकाळी उठल्यावर सुस्त वाटणे, झोपेत घोरणे, असा त्रासही होऊ शकतो. हा त्रास बराच काळ चालू राहिल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या लक्षणांकडे नीट लक्ष देणे त्यावर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला बराच काळ झोपेची समस्या असेल तर त्या व्यक्तीने खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे दिनचर्या सुधारली पाहिजे. त्यानंतरही त्रास जाणवू लागल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधावा.

रक्ताची कमतरता

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरातील अनेक भागांवर कार्यावर परिणाम होतो. आपल्याला थकवा अशक्तपणा जाणवतो. या समस्येने पीडित असलेल्या व्यक्तीला चक्कर येणे, थंडी वाजणे असा त्रास होऊ शकतो. ॲनिमिया झाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी रक्ताची तपासणी करुन घ्यावी लागेल. लोहाच्या कमतरतेमुळे थकवा जाणवत असल्यास आहारात आयर्न सप्लीमेंट्सचा समावेश करावा. तसेच रोजच्या आहारात पालक, ब्रोकोली आणि रेड मीटचा समावेश करावा.

व्हायरल अथवा बॅक्टेरियाचा संसर्ग

या परिस्थितीमध्ये व्यक्तीला खूप थकवा, ताप, डोके दुखी तसेच शरीर दुखणे, असा त्रास जाणवतो. हे फ्लू पासून ते एचआयव्ही पर्यंत कुठल्याही संसर्गाचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला फ्ल्यू असेल तर तुम्हाला ताप येणे, डोकं अथवा शरीर दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणे, भूक लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत पीडित व्यक्ती घरातील औषधे किंवा ॲंटी-बायोटिक घेऊ शकतात. पण तुम्हाला व्हायरल अथवा बॅक्टेरिअल संसर्गाची लक्षणे जाणवल्यास , ते ठीक व्हायला बराच काळ लागू शकतो.

कॅन्सर

कर्करोग अथवा कॅन्सर झालेल्या व्यक्तीला थकवा येणे हे सामान्य लक्षण आहे. हा थकवा म्हणजे या आजारावरील उपाचारांचा साईड-इफेक्टही असू शकतो. कॅन्सरमध्ये थकवा आणि सुस्ती जाणवणे ही सामान्य थकव्यासारखी नसते, ते खूप वेदनाकारक असते. त्यामुळे रुग्णाला चालण्या- फिरण्यात खूप त्रास होतो अशक्तपणा जाणवतो. ही लक्षणे फुप्फुस, पोट आणि स्तनाचा कर्करोग झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात.

सतत थकवा येतो, मग करा हे सोपे उपाय

चहा-कॉफी पिणे टाळा - झोपण्याच्या आधी चहा किंवा कॉफी पिणे टाळा. तसेच चहा आणि कॉफीचा अतिरेक टाळा. आपण चहा किंवा कॉफी पिणे कायमचे सोडू शकलात तर ते तब्येतीसाठी जास्त लाभाचे ठरू शकते.

सतत पाणी प्या - डीहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या. दर तासाला किमान एक ग्लास पाणी प्या. जेव्हा तहान लागेल त्यावेळी पुरेसे पाणी प्या. थंड पाणी पिण्याऐवजी साधे पाणी प्या. स्वतःसाठी कायम तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि ते पाणी प्या. शीतपेय, सोडायुक्त शीतपेय यांचे सेवन टाळा.

फेरफटका मारा - रात्रीच्या जेवणानंतर किमान अर्धा ते एक तास सावकाश चालत मोकळ्या हवेवर फेरफटका मारण्याची सवय लावून घ्या. यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळेल.

व्यायाम करा किंवा चाला किंवा धावा - दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान अर्धा ते एक तास शारीरिक व्यायाम करा. व्यायाम करत नसाल तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान अर्धा ते एक तास मोकळ्या हवेवर वेगाने चालण्याचा अथवा वेगाने धावण्याचा (पळण्याचा) व्यायाम करा. यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळेल आणि सर्व स्नायू व्यवस्थित कार्यरत राहतील.

पुरेशी झोप घ्या - दररोज रात्री किमान सहा ते आठ तासांची झोप घ्या. झोप पूर्ण झाल्यावर थकवा दूर होईल आणि ताजेतवाने वाटेल. दैनंदिन कामांसाठी नवा उत्साह संचारेल.

थकवा दूर करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

थकवा दूर करण्यासाठी दररोज सकाळी पाण्यात भिजवलेले काळे मनुके खावा. त्यामुळे शुहर लेव्हल नियंत्रणामध्ये राहतेतसेच डाएटमध्ये ग्रीन आि रेड ज्यूसचा समावेश करा. कॉफी किंवा चहा पिण्या ऐवजी डाएटमध्ये फळांचा समावेश केल्यानं थकवा जाणवत नाही आणि दिवसभर एनर्जी राहते. प्रोटिन शेक देखील तुम्ही दररोज सकाळी पिऊ शकता. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानं देखील थकवा जाणवतो. त्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या आणि दिवसभरात देखील योग्य प्रमाणात पाणी प्या.

सारांश

थकवा हे अनेक अटींचे एक सामान्य लक्षण आहे ज्यामुळे तुम्हाला होऊ शकते दिवसभरात अचानक थकवा जाणवणे किंवा सर्व वेळ. तुम्हाला थकल्यासारखे वाटण्याची काही कारणे येथे आहेत:

शारीरिक परिस्थिती, मानसिक स्थिती, जीवनशैली घटक, लैंगिक परिस्थिती, दोष असंतुलन. शारीरिक परिस्थिती ज्यामुळे थकवा येतो. अशा अनेक शारीरिक परिस्थिती आहेत ज्यामुळे थकवा येऊ शकतो. येथे सर्वात सामान्य काही आहेत नेहमी झोपेची कारणे:

अशक्तपणा, थायरॉईड विकार, तीव्र वेदना, स्वयंप्रतिकार रोग, तीव्र थकवा सिंड्रोम, ह्रदय अपयश, कमी जीवनसत्व, गर्भधारणा, झोप श्वसनक्रिया मंद होणे. जर नेहमी थकवा जाणवणे आणि थकवा आल्यास, तुमच्या थकव्याला कारणीभूत असणार्या कोणत्याही अंतर्निहित वैद्यकीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोलणे महत्त्वाचे आहे.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know