Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 27 March 2024

शरीर डिटॉक्स करणे म्हणजेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे. या विषारी घटकांमुळे तुमचे शरीर आजारी पडण्याआधी, स्वतःचे संरक्षण करा आणि निरोगी शरीर ठेवा. | शरीर निरोगी ठेवण्यासाठी केवळ बाहेरून स्वच्छता ठेवणे आवश्यक नाही तर अंतर्गत सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे | डिटॉक्स करण्यासाठी विचित्र डाएट करू नका

डिटॉक्स

 

शरीर डिटॉक्स करणे म्हणजे काय?

डिटॉक्स म्हणजे शरीरातील विषकारक घटक शरीराबाहेर टाकणे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी केवळ बाहेरून स्वच्छता ठेवणे आवश्यक नाही तर अंतर्गत सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. ज्याला डिटॉक्सिफिकेशन असे म्हणतात. यामध्ये शरीरात साचलेली घाण वेगवेगळ्या प्रकारे बाहेर काढली जाते.  आपले शरीरच एक स्वयंचलित प्रयोगशाळा आहे. ती स्वतःच हे पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते .आजकाल अनेक जाहिराती प्रसारमाध्यमावर झळकत असतात; “हे खाल्यामुळे तुमच्या शरीरात नको असणारे घटक शरीराबाहेर टाकले जातील” “तसेच वजन कमी होईल.जे साफ चुकेचे आहे. डिटॉक्स हा चुकीचा समाज आहे. कोणताही पदार्थ एका गोळीने/ औषधाने शरीराबाहेर टाकला जात नाही, मग ते चरबी असो किंवा दुसरे काही किंवा कोणत्याही औषधाने पोटाची चरबी कमी होत नाही तसेच केस गळतीही थांबत नाही. डिटॉक्स करण्यासाठी विचित्र डाएट करू नका, नको ती औषधे घेऊ नका. शरीर डिटॉक्स करणे खूप महत्वाचे आहे. कारण शरीर डिटॉक्स केल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर निरोगी राहते. त्याचबरोबर चुकीच्या खाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार तुमच्या शरीराला घेरतात.

डिटॉक्स फूड म्हणजे हे विषकारक पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त असणारे पदार्थ .खरेतर शरीरातून नको असणारे पदार्थ बाहेर टाकण्याचे काम कोणताही पदार्थ करू शकत नाही.

शरीराला डिटॉक्सची गरज वाटण्याची लक्षणे

नेहमी थकल्यासारखे वाटते.

वाढतं वजन

बद्धकोष्ठता

निद्रानाश

त्वचेवर ऍलर्जी

डिटॉक्स नैसर्गिकरित्या होण्यासाठी उपाय –

     शांत व पुरेशी झोप

     पुरेसा व्यायाम (अति नाही)

     पोषक आहार (जास्त प्रमाणात फळे व भाज्या)

     दुध व दुग्धजन्य पदार्थ

     मोबाईल व टीव्ही ची संगत कमी; निसर्गाशी संगत जास्त

     सगळ्यात महत्वाचे ७ ते ८ ग्लास पाणी प्रतिदिन.

शरीर डिटॉक्स करण्याचे फायदे

नियमित डिटॉक्स केल्याने त्वचा चमकदार आणि प्रॉब्लेम फ्री होते.

शरीरातील विषारी घटक काढून टाकल्यामुळे शरीरावर सूज येत नाही.

त्यामुळे चयापचय गतिमान होतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

डिटॉक्सच्या मदतीने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते.

किडनी, यकृत आणि पोटाचे आजार टाळण्यासाठी तुम्ही डिटॉक्सची मदत घेऊ शकता.

मानसिक आरोग्य सुधारते.

भूक चांगली लागते.

खऱ्या अर्थाने विषकारक पदार्थ कोणते?

१)    प्रयोगशाळेत तयार केली जाणारी रसायने (उदा. औषधे)

२)    जड मूलद्रव्ये (रासायनिक खाते व कीटकनाशके)

३)    प्रक्रिया केलेले पदार्थ (उदा.  ‌पॅकेटमध्ये असणारे)

डिटॉक्स प्रक्रिया नैसर्गिकरीत्या पार पडणारे अवयव

१)   यकृत (Liver)

२)   वृक्क (Kidney)

शरीरात सतत उर्जा निर्मिती होत असते .उर्जेसोबत कार्बन डायऑक्साईड (co2), पाणी (H20) तयार होते. शरीरातील सर्व पाणी दोन किडनी मिळून सतत गाळत असतात. किडनीचे वजन काही ग्रँम आहे,परंतु दिवसभरात १८०लि. ते २०० लि.पाणी गाळप करतात . त्यामधून हवे असणारे द्रव शरीरात परत शोषले जातात. नको असणारे विषकारक घटक लघविवाटे शरीराबाहेर टाकले जातात.म्हणूनच डिटॉक्स करण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही.फक्त पुरेसे पाणी प्या. (८ ते १० ग्लास)

३)   पचनसंस्था

४)  त्वचा

त्वचा हा उत्सर्जन करणारा सर्वात मोठा अवयव आहे.त्वचेला लहान लहान असंख्य छिद्रे असतात.या छिद्रामधून घामावाटे पाणी बाहेर पडते.या घामासोबत शरीरात नको असणारे विषकारक घटक बाहेर पडतात.घाम येण्यासाठी व्यायाम/चालणे (३० मि.) करावे.

५)  फुफ्फुस (Lungs)

जर वरील अवयव निरोगी व स्वस्थ असतील तर शरीराची डिटॉक्स प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरळीत पार पडेल. त्यासाठी कोणताही पदार्थ/औषध/गोळ्या घेण्याची गरज नाही.

शरीरातील डिटॉक्स प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरळीत पार पडण्यासाठी काही सोपे उपाय:

१)   मद्यपान करू नये.

मद्यपानामुळे यकृतावर परिणाम होतो. परिणामी ते निकामी होण्याची शक्यता असते. यकृताचे कार्य मंद होताच शरीराची स्वच्छता प्रणाली कमकुवत होते

२)   पुरेशी झोप (आठ तास)

पुरेशी झोप घेतल्याने आरोग्य सुधारते व नैसर्गिकरितीने उत्सर्जन होते.

३)   पुरेसे पाणी

पाणी नुसतेच तहान भागवत नाही तर शरीराचे तापमानही योग्य राखण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर हाडामध्ये असणारे वंगण सुधारते/सुरक्षित ठेवते.पचनक्रिया सुधारते, पोषकतत्वे शोषण व शोधन करण्यास मदत करते आणि नको असणारे घटक लघवीवाटे शरीराबाहेर टाकते.

४)  साखर व प्रक्रियायुक्त पदार्थ कमी –

या पदार्थामुळे शरीराचा स्थूलपणा वाढतो .त्याचबरोबर हृदयविकार, कॅन्सर, डायबेटीस सारख्या आजारांना आमंत्रण देतात.

५)  अँटिआँक्सीडंट पदार्थाचे सेवन करावे.

*आंबट फळे * भाज्या * काळा चहा + लिंबू

* फळे * मसाले * जीवनसत्वे * बदाम * गवती चहा    

 ६) जास्त तंतुमय पदार्थ खा:

उदा. काकडी, टोमॅटो, मुळा, कोबी, बीट.

 ७) दररोज पुरेसा व्यायाम करा.

 ८) आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे.

डिटॉक्स करण्याचा दुसरा मार्ग:

फुफ्फुस

आपण नाकावाटे शरीरात सतत ऑक्सिजन आत घेत असतो व कार्बन डायओक्साईड बाहेर सोडत असतो. कार्बन डायओक्साईड हा विषकारक घटक असला तरी तो बाहेर टाकण्यासाठी वेगळ अस काहीच करावे लागत नाही.

डिटॉक्स करता लक्षपूर्वक हे करा

मोठा श्वास घ्या ५ सेकंद श्वास रोखा. आता सोडा. आहे ना सोपा मार्ग. म्हणून अधून मधून मोठे श्वास घ्या. श्वासाचा वास कमी करते. लसून,मासे,कांदा यासारख्या गंधयुक्त पदार्थामुळे तोंडातील श्वासाला वास येतो. वास घालवण्यासाठी जेवणानंतर आणि सकाळी उठल्यावर एक ग्लास लिंबू पाणी प्यावे. (टीप:फक्त कोमट पाण्यासोबत घ्यावे) लिंबू लाळेला उत्तेजन देतो. तोंड कोरडे पडू देत नाही.

लिंबू पचनास मदत करते


आयुर्वेदात बद्धकोष्टता रोखण्यासाठी काही रोज सकाळी कोमट पाण्यासोबत लिंबू घेण्यास सुचवले आहे. आयुर्वेदात म्हटले आहे; आंबट लिंबाची चव ‘अग्नीला उत्तेजन देते. (भूक लागणे असा अर्थ घ्यावा.)

लिंबू पाचक म्हणून खालीलप्रमाणे वापरावा.

लिंबू+सैंधव मीठ

लिंबू वजन कमी करण्यास काही अंशी मदत करते.

लिंबूमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल अँ‌‍‌टिआँक्सिडंट लठठपणा कमी करण्यास मदत करते. हे अँ‌‍‌टिआँक्सिडंट संयुग रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवते. मधुमेह असणारया व्यक्तीसाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी काही अंशी गुणकारी.

लिंबू जीवनसत्व ‘क (विटामिन c) चा उत्तम स्तोत्र

लिंबूवर्गीय फळामध्ये जीवनसत्व ‘क जास्त प्रमाणात असते. जीवनसत्व ‘क हा प्राथमिक अँ‌‍‌टिआँक्सिडंट आहे,जो आपल्या शरीरातील पेशीमध्ये असणारे मुक्त आयन प्रभारविरहित करतो. पेशींचे मुक्त आयनापासून बचाव करते. जीवनसत्व ‘कहृदय, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग,स्ट्रोक,रक्तदाब कमी करणे/जास्त असणे अशा रोगांसंबंधी धोके टाळण्यास मदत करते.साधारणपणे एका लिंबाच्या रसात १६-१८ मिली ग्रँम व्हिटॅमिन सी असते. प्रौढांसाठी व्हिटॅमिन सी घेण्याची मात्रा साधारण ६५ ते ९० मिली ग्रँम प्रतिदिन.

लिंबामध्ये असणारे जीवनसत्व ‘क त्वचेवरील सुरकुत्या,कोरडी त्वचा व त्वचेवरील काळपटपणा (टॅनिंग) कमी करण्यास मदत करते.

लिंबू हायड्रेशनला प्रोत्साहन देते. (शरीरातील पाणी पातळी सुधारण्यास मदत करते.)

कोबी

तुम्हाला माहिती आहे का की कोबी तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने बॉडी डिटॉक्स होते. कारण कोबीमध्ये भरपूर फायबर आढळते. जे शरीरासोबतच पोटही निरोगी ठेवण्यास मदत करते. तुम्ही ते सॅलडमध्ये वापरू शकता.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्याच्या मदतीने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन देखील होते. कारण नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यात सोडियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी देखील असते. याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.

घरगुती डिटॉक्स पाणी

पाणी हायड्रेशनसाठी सर्वोत्तम पेय आहे. परंतु पाण्याला स्वतःची चव नसल्याने,काही लोक पाणी पिण्याचे टाळतात. पाणी पिण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी १ ग्लास पाण्यात लिंबू पिळावा . घरगुती डिटॉक्स वॉटर अर्थात क्लीन्सिंग वॉटर- तुळस, पुदिना, आलं, लिंबू यांचा रोजच्या आहारात जरूर वापर करावा. त्यांचा रस, पाणी पिणं शरीरासाठी उत्तम आहे. या घरातील नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन करणाऱ्या पदार्थांमुळे पोटाचं संतुलन राखलं जातं. ज्यांना केवळ पाणी पिण्याचा कंटाळा आहे त्यांनी रोज तुळशीची पानं आणि लिंबाची फोड पिण्याच्या पाण्यात टाकून ते पाणी प्यावं. पुदिन्याची पानं, अळ्यांचा लहान तुकडा आणि अर्धे लिंबू यांचा ताजा रस करून नक्की प्यावा.

सारांश

अनेकदा असे घडते की आपल्याला कोणत्याही कारणाशिवाय सुस्ती वाटू लागते, अचानक आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात, आपले अन्न नीट पचत नाही. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर समजून घ्या की तुम्हाला तुमचे शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. म्हणजेच, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे आवश्यक आहे. या विषारी घटकांमुळे तुमचे शरीर आजारी पडण्याआधी, स्वतःचे संरक्षण करा आणि निरोगी शरीर ठेवा. डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेदरम्यान हलके अन्न खा. यामुळे तुमचे वजनही कमी होईल आणि शरीराची ऊर्जाही वाढेल. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल किंवा साखरेची तक्रार असेल तर हलका आहार घेतल्यास तुमचे कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know