धुळवड
धुलीवंदन रंगपंचमी प्रथा, इतिहास
फाल्गुन पौर्णिमेला होळी असे म्हणतात. होळीचा
दुसरा दिवस म्हणजेच धुळवड किंवा धुलीवंदन किंवा रंगपंचमी. अनेक गावांमध्ये दोन दिवस,
तीन दिवस, पाच दिवस, पंधरा दिवस होळी किंवा धुली वंदन साजरी करण्याची पद्धत आहे. खरे
धुलीवंदन किंवा धुळवड म्हणजे होळी जाळून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी राख असते ती अंगाला
लावणे आणि त्यानंतर स्नान करणे. यात देखील तफावत आढळते. काही काही ठिकाणी चिखल फेकला
जातो. धुळवळीची माती एकमेकांच्या अंगावर टाकली जाते. पण बऱ्याच प्रमाणात होळीची राख
ही एकमेकांना लावली जाते आणि त्यानंतर स्नान केले जाते. म्हणजेच आपण धुली म्हणजेच धूळ
आणि वंदन म्हणजे ती वंदनीय पवित्र अशी राख. तेव्हा आपण आपल्या अंगाला लावायचं आणि त्यानंतर
आपण आंघोळ करायची. अशी त्यामागची भावना असते. कारण पृथ्वी म्हणजेच माती म्हणजेच ही
राख किंवा धूळ. तिला पूजन करण्याचे, तिच्यापुढे नतमस्तक होण्याचा, हा एक मार्ग आहे
असे म्हटले तरी चालेल. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण मोठ्या
उत्साहाने रंग खेळतात. चैत्र महिन्यातील कृष्ण प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत रंगांचा हा
उत्सव सुरू असतो. म्हणूनच याला रंगपंचमी म्हणतात. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील
पंचमीला रंगपंचमी सण साजरा केला जातो. रंगपंचमी हा महाराष्ट्राचा प्रमुख सण आहे. हा
सण देवी-देवतांना आमंत्रण देण्यासाठी साजरा केला जातो. रंगपंचमीला शुद्ध मनाने पूजा
केल्यास देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी जे काही रंग वापरले जातात,
जे एकमेकांना लावले जातात ते वाऱ्यावर उडवले जातात. असे केल्याने देव वेगवेगळ्या रंगांकडे
आकर्षित होतात असे मानले जाते.
प्राचीन काळापासून रंगपंचमी
या उत्सवाचा इतिहास खूप जुना आहे. असे म्हटले
जाते की, प्राचीन काळी जेव्हा होळीचा सण बरेच दिवस साजरा केला जात असे, तेव्हा त्याची
समाप्ती रंगपंचमीने होते आणि त्यानंतर कोणीही रंग खेळले नाही. खरं तर, रंगपंचमी हा
होळीचा एक प्रकार आहे जो चैत्र महिन्याच्या कृष्ण पंचमीला साजरा केला जातो. होळीची
सुरुवात फाल्गुन महिन्यापासून होते आणि फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहनानंतर हा सण चैत्र
महिन्याच्या कृष्ण प्रतिपदेपासून रंगपंचमीपर्यंत सुरू असतो. देशाच्या अनेक भागात यानिमित्ताने
धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन केले जाते. शास्त्रानुसार रंगपंचमी हा वाईट
शक्तींवर विजय मिळवण्याचा सण असल्याचे म्हटले आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी काय केले जाते
हल्ली या धुलीवंदनाचे
स्वरूप
बदलत
चालले
आहे.
हल्ली
कोणीच
होळीची
राख
अंगाला
लावताना
दिसत
नाही.
एकमेकांना
लावताना
दिसत
नाही.
एवढेच
नव्हे
तर
आधी
स्त्रिया
पाण्याने
भरलेला
हंडा
होळीच्या
राखेवरती
सूर्यप्रकाशात
ठेवायचे
आणि
मग
त्या
पाण्याने
घरातील
मुलांना
आंघोळ
घातली
जायची.
असे
करण्याचा
एक
समज
होता
की
त्यांना
उन्हाळा
बांधणार
नाही.
हि
गोष्ट
देखील
कोणी
करताना
फारसे
आढळत
नाही.
काही
गावांमध्ये
ही
गोष्ट
आवर्जून
केली
जात
असेल.
पण
शहरी
भागात
या
सर्व
गोष्टी
लोप
पावताना
आपल्याला
दिसत
आहेत.
साधा
उल्लेख
ही
कुणी
करत
नाही
किंवा
पाहण्यातही
आलेला
नाही.
याचे बदललेले स्वरूप म्हणजे एकमेकांना
रंग
लावणे.
एकमेकांच्या
अंगावरती
रंगीत
पाण्याचा
फवारा
उडवणे.
रंगीत
फुगे
मारणे
इत्यादी.
हल्लीचे
धुलीवंदन
किंवा
रंगपंचमी
म्हणजे
एक
त्रासदायकच
आहे
असे
म्हटले
तरी
चालेल.
पुरातन
काळी
श्रीकृष्ण
व
राधा
यांनी
देखील
होळी
खेळल्याचे
आपल्याला
ऐकण्यात
आले
असेलच.
त्यामध्ये
त्यांनी
फुलांचा,
नैसर्गिक
रंगांचा
उपयोग
केलेला.
पण
हल्ली
त्याच्या
उलट
आपल्याला
पाहायला
मिळते.
परंतु हळूहळू ही परिस्थिती
बदलत
चालली
आहे.
लोक
देखील
सजग
होत
आहेत.
त्यामुळे
नैसर्गिक
रंग
देखील
हल्ली
उपलब्ध
आहेत.
जर
ते
नसतील
तर
आपण
आपले
घरगुती
काही
उपाय
आहेत.
जसे
की
हळद
आहे
किंवा
मुलतानी
माती
आहे.
यांचा
वापर
करून
देखील
धुलीवंदन,
रंगपंचमी
साजरी
करू
शकतो.
आपल्या त्वचेला इजा करणारे रंग. तसेच जबरदस्तीने
एकमेकांना
रंग
लावणे.
त्यानंतर
जबरदस्तीने
भांग
पाजणे.
हे
प्रकार
हल्लीच्या
होळीमध्ये
सर्रास
पाहायला
मिळतात.
आपल्या देशात विविध प्रांतात हा सण वेगळ्या नावांनी आणि कारणांनी साजरा केला जातो. उत्तरेकडे
हा
सण
भगवान
श्रीकृष्णांनी
वध
केलेल्या
पूतना
नावाच्या
राक्षशिणीच्या
स्मरणार्थ
साजरा
केला
जातो.
पूतना
राक्षशिणीचा
पुतळा
जाळून
आनंदोत्सव
होतो.
बंगाल
प्रांतात
होळी
हा
सण
दोलायात्रा
या
नावाने
साजरा
करतात.
बंगालमध्ये
या
दिवशी
घरोघरी
श्रीकृष्णाच्या
मूर्तीला
झोपाळ्यावर
बसवून
पूजा
करतात.
संध्याकाळी
कृष्णावर
गुलाल
उधळून
सर्वांना
गुलाल
वाटतात.
नंतर
अग्नीची
पूजा
करून
होळी
पेटवतात.
दक्षिण
प्रांतात
कामदेवाच्या
स्मृतीनिमित्त
होळी
पेटवली
जाते.
त्यामागची
पौराणिक
कथा
अशी
आहे
की,
एकदा
भगवान
शंकर
तपसाधना
करत
असताना
मदन
किंवा
कामदेवाने
शंकराची
तपसाधना
भंग
पावावी
म्हणून
शंकराचे
लक्ष
विचलित
करून
पार्वतीकडे
वेधण्याचा
प्रयत्न
केला.
त्यामुळे
शंकरांनी
क्रोधित
होऊन
आपला
तृतीय
नेत्र
उघडून
कामदेवाला
जाळून
टाकले.
कामदेवाची
आठवण
म्हणून
'कामण्णा'
नावाचा
पुतळा
करून
तो
जाळण्याची
प्रथा
होळीच्या
दिवशी
पाळली
जाते.
महाराष्ट्रातही
होळी
पौर्णिमा
मोठा
प्रमाणात
साजरी
केली
जाते.
या
दिवशी
संध्याकाळी
घराबाहेर
लाकडे,
शेण्या,
गोवऱया,
झाडांची
वाळलेली
पाने
यांचा
ढीग
रचून
त्यात
मधोमध
एरंडाच्या
झाडाची
फांदी
उभी
करतात.
'श्री
होलिकायै
नमः'
या
मंत्राने
होळीची
पूजा
करतात.
होळीला
तीन
प्रदक्षिणा
घालतात.
पुरणपोळीचा
नैवेद्य
दाखवून
होळी
पेटवली
जाते.
ताशा,
टिमकी,
ढोल
वाजवून
गाणी
म्हटली
जातात.
होळीचा
दुसरा
दिवस
हा
धुळवड
म्हणून
साजरा
करतात.
या
दिवशी
होळी
दुधाने
शांत
केली
जाते.
होळीतील
राख
सर्वांगास
लावून
धुळवड
खेळतात.
होळीत
वाळलेल्या
झाडांची
काष्टे
आणि
पालापाचोळा
जाळलेला
असतो.
त्याचेही
शास्त्रत्यदृष्टया
औषधी
महत्त्व
आहे.
अशी
औषधी
रक्षा
सर्वांगास
लावल्याने
उन्हाळा
बाधत
नाही
आणि
त्वचा
स्वच्छ
होते
हा
यामागचा
उद्देश
आहे.
या
उत्सवाच्या
निमित्ताने
जुने
वैरभाव,
हेवेदावे,
अनिष्ट
चालीरिती
यांचेही
होळीत
दहन
करून
स्वच्छ
मनाने,
आनंदाने
आणि
सकारात्मक
वृत्तीने
आयुष्याला
सामोरे
जावे
हाच
या
होळी
आणि
धुळवड
या
सणामागचा
खरा
संदेश
आहे.
धुलीवंदन / रंगपंचमी साजरे करताना काय काळजी घ्यावी
लहान मुलांना कोणतेही दागिने वगैरे घालू नये. खेळण्यांमध्ये
ते
हरवण्याची
शक्यता
असते.
दुसरे म्हणजे ओल्या रंगाने होळी खेळू नये. कारण इतर कोणते ओले रंग लावले. तर ते पक्के
होतात आणि निघण्यामध्ये
खूप
वेळ
लागू
शकतो.
त्यानंतर रंगपंचमी खेळण्याआधी
शरीराला
तेल
लावावे.
म्हणजे
एखादा
रंग
जास्त
काळ
टिकणार नाही आणि लवकर निघण्यास मदत होईल.
तसेच केसांना देखील रंगांपासून
वाचवायचे
असेल
तर
शॉवर
कॅप
किंवा
फडका
वगैरे
तुम्ही
बांधू
शकता.
अगदी
नाही
तर
तुम्ही
केसांना
देखील
तेल
लावू
शकता.
त्याने
रंग
लवकर
निघू
शकतो.
सारांश
तसे हे रंगांची उधळण करणारे धुलीवंदन जर आपण सजगरित्या व सावधतेने साजरे केले तर नक्कीच त्याचा आपण पुरेपूर आनंद लुटू शकतो. यामध्ये कोणालाही इजा होणार नाही याची देखील खात्री बाळगली पाहिजे. त्यात कोणावरती जबरदस्ती करू नये. कोणाच्या मनाविरुद्ध रंग लावू नये. याचे देखील भान ठेवणे आवश्यक आहे. इतरांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा देखील आपण विचार करावा. कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही. याकडे देखील आपले लक्ष असले पाहिजे. तरच हा सण कुठच्याही संकटाशिवाय निर्विघ्नपणे पार पडू शकतो.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know