ॲक्युपंचर व ॲक्युप्रेशर म्हणजे काय?
ॲक्युपंचर म्हणजे काय?
ॲक्युपंचर या पद्धतीमध्ये बारीक सुयांचा वापर केला जात असतो. काही विशेष प्रकारांच्या आजारांवर ॲक्युपंचर ही पद्धती वापरली जाते. मित्रांनो, ॲक्युपंचर ही फार जुनी पद्धती आहे. फार प्राचीन काळापासून ही पद्धत चालत आलेली आहे.
ही पद्धती जरी भारतामधील असली तरी चीनमध्ये ही पद्धत खूप प्रसिद्ध म्हणून ओळखली जाते. चीनमध्ये देखील या पद्धतीचा वापर केला जातो. एखादा आजार झाल्यावर आपण ते गोळ्या औषधी घेऊन त्याला तात्पुरता बराच करत असतो. परंतु ॲक्युपंचर पद्धती मुळे आजार हा बिना औषधी शिवाय मुळापासून बरा केला जातो.
अनेक वेळा औषधी घेतल्यामुळे लिव्हर किडनी खराब होण्याची शक्यता असते. परंतु, या पद्धतीने मुळे ही समस्याच निर्माण होत नाही. शिवाय, आजार हा मुळापासून बरा केला जात असतो. ॲक्युपंचर पद्धतीमुळे अनेक प्रकारचे आजार बरे होत असतात. जसे की,
तीव्र डोकेदुखी जाण्यासाठी
अपचनाची समस्या जाण्यासाठी
मानसिक टेन्शन जाण्यासाठी
मोठ्या प्रमाणात नैराश्य आले असेल, तर ते जाण्यासाठी.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
गुडघेदुखी जाण्यासाठी
मान दुखी, पाठ दुखी जाण्यासाठी
कंबर दुखी जाण्यासाठी
ॲक्युपंचर या पद्धतीमध्ये शरीरातील विशिष्ट भागांवर बारीक निर्जंतुकीकरण सुया या टोचल्या जातात. आजारावर औषधी न वापरता निर्जंतुकीकरण सुया टोचून तो आजार हा मुळापासून बरा केला जात असतो. ॲक्युपंचर या पद्धतीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवली जात असते.
ॲक्युपंचर पद्धती चे फायदे
ॲक्युपंचर पद्धती यामध्ये औषधी शिवाय उपचार केला जात असतो त्यामुळे बरेच काही फायदे या पद्धतीमुळे होतात जसे की,
ॲक्युपंचर पद्धतीमुळे वेदना या कमी प्रमाणात होत असतात.
बरेच रोग आजार हे बिना औषधी शिवाय मुळासकट बरे केली जात असतात.
मानसिक टेन्शन ताण तणाव कमी करण्यासाठी ही पद्धती फार उपयोगी ठरते.
ज्या व्यक्तींना अनिद्राची समस्या असेल तर अशा व्यक्तींसाठी ही पद्धती अत्यंत उपयोगी ठरते.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी देखील पंचर पद्धती अत्यंत प्रभावीपणे काम करते.
ॲक्युपंचर पद्धतीमुळे पचनाच्या समस्या दूर होतात. जर आपल्या शरीराचे पचनक्रिया ही व्यवस्थित सुरळीत असेल तर अतिरिक्त वाढलेले वजनही कमी होण्यास उपयोगी ठरते.
शरीरातील जळजळ कमी होण्यासाठी देखील या पद्धतीचा अत्यंत उपयोग होत असतो.
ॲक्युप्रेशर पद्धती म्हणजे काय?
ॲक्युप्रेशर पद्धती हे देखील फार प्राचीन काळापासून चालत आलेली पद्धती आहे आणि आज देखील या पद्धतीचा वापर केला जात असतो. ही पद्धती देखील काही विशिष्ट प्रकारच्या आजारांसाठी एक उपचार पद्धती म्हणून वापरली जात असते. ॲक्युप्रेशर या पद्धतीमध्ये शरीरावरील काही विशिष्ट प्रकारच्या भागांवर दाब दिला जात असतो. म्हणजेच शरीरावरील काही विशिष्ट प्रकारचे पॉईंट्स वर प्रेशर देऊन या पद्धतीद्वारे उपचार केले जातात.
शरीरावरील मुख्य अंग जसे की, हात, पायांची तळवे यांवर विशिष्ट ठिकाणी प्रेशर देऊन रोग हा हा बरा करण्याचा प्रयत्न केला जात असतो. जसे की, जर तुम्हाला हृदय संबंधित समस्या असतील तर हृदयाचा प्रेशरबिंदू हा उजव्या पायाच्या तळ्यांमध्ये असतो तर त्या तळपायाच्या बिंदूवर प्रेशर दिले जाते आणि रोगाचे निदान केले जाते.
ॲक्युप्रेशर पद्धतीमध्ये हातांची बोटे, हात, अंगठे, पाय यांना उपकरणाच्या साह्याने सक्रिय केले जाते. शिवाय, या पद्धतीमध्ये काही ठराविक ठिकाणी मालिश देखील केली जात असते. ॲक्युप्रेशर पद्धतीमध्ये प्रेशर पॉईंट कोणत्या बाजूने असतात हे माहीत असणे गरजेचे ठरते. एक्यूप्रेशर हे भारतात नवीन नाव नाही. शरीराच्या मुख्य बिंदूंना मालिश करून वेदना कमी करण्याची ही पद्धत चीनमधून उद्भवली आहे. ज्याचा इंग्रजीत अर्थ 'पॉइंट्स' असा होतो. वैकल्पिक औषधांमध्ये ही पद्धत बर्याच काळापासून अस्तित्वात आहे.
ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर दोन्ही समान पद्धती आहेत. फरक एवढाच आहे की ॲक्युपंक्चरमध्ये प्रेशर पॉइंट्सवर सुया टोचल्या जातात, तर ॲक्युप्रेशरमध्ये हाताने किंवा काही उपकरणांद्वारे मसाज केला जातो.
पाय आणि हातांचे बिंदू दाबणे याला रिफ्लेक्सोलॉजी म्हणतात, तर मसाजद्वारे संपूर्ण शरीराचे बिंदू दाबण्याला शियात्सू म्हणतात. अर्थात, या उपचारांना जास्त वेळ लागतो, परंतु कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
ज्या ठिकाणी प्रेशर पॉईंट असतात तर त्या ठिकाणी प्रेशर देऊन त्यांना सक्रिय केले जाते. ॲक्यु पॉईंट ची मालिश करताना श्वास घेणे तसेच शांत राहणे गरजेचे ठरते. ॲक्युप्रेशर पॉईंट वर प्रेशर दिल्यामुळे मालिश केल्यामुळे संबंधित रोगाचे निदान हे व्यवस्थित रित्या केले जात असते. या पद्धतीमुळे अनेक प्रकारचे फायदे होतात.
ॲक्युप्रेशर पद्धतीचे फायदे
ॲक्युप्रेशर पद्धतीमुळे गंभीर पाठदुखीचा त्रास हा जाण्यास मदत होऊ शकतो.
ॲक्युप्रेशर या पद्धतीमुळे लेबर पेन या समस्येवर देखील आराम मिळण्यास मदत होते.
मानसिक ताण तणाव, सतत चिंता करणे या समस्येवर देखील एक्यूप्रेशर पद्धतीमुळे निदान केले जाते.
शरीरातील अन्य प्रकारच्या समस्येवर ही पद्धती तर महत्त्वाची ठरते. शिवाय, शरीराच्या त्वचेवर देखील या पद्धतीचा खूप महत्त्वाचा फायदा होतो. सुरकुत्या जाण्यासाठी या पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होतो.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील एक्यूप्रेशर पद्धती फायदेशीर ठरते.
फुफ्फुस आणि रोग प्रतिकारशक्ती साठी
तळहाताच्या मध्यभागी असलेला बिंदू दररोज दोन ते तीन मिनिटे दाबल्याने फुफ्फुसे मजबूत होतात आणि त्यासंबंधीच्या सर्व समस्यांपासून आराम मिळतो. यामुळे दमा आणि ब्रॉन्कायटिसचा धोका कमी होऊ शकतो. याशिवाय हा पॉइंट दाबल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.
किडनी साठी
तुमच्या सर्वात लहान बोटाच्या टोकावर मूत्रपिंडाचा बिंदू आहे. ते दाबून ठेवल्यास किडनीचा त्रास टाळता येतो.
उच्च रक्तदाब साठी
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अनामिकेच्या नॅकलचा भाग दाबा. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येईल आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोकाही कमी होईल.
डोळ्यांसाठी
अंगठ्यानंतर तर्जनी खाली बिंदू दाबल्याने दृष्टी सुधारते.
स्वादुपिंड साठी
स्वादुपिंडाशी निगडीत समस्या असल्यास करंगळी आणि अनामिका (रिंग फिंगर) मध्ये दोन बोटांनी खाली असलेला बिंदू दाबल्यास आराम मिळतो.
सायनस, दात आणि अल्सर
सायनस, दात आणि अल्सरच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तर्जनीच्या नॅकल एरियाला दाबा. यामुळे खूप आराम मिळतो.
थायरॉईड साठी
जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर दररोज सुमारे पाच मिनिटे अंगठ्याखालील बिंदू दाबा. यामुळे बराच दिलासा मिळेल. यामुळे थायरॉईड हार्मोन्स संतुलित राहतात.
ॲक्युप्रेशरमुळे आरोग्य फायदे
एक्यूप्रेशरच्या मदतीने केवळ वेदना कमी होत नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. ॲक्युप्रेशरमुळे तणाव, तणाव, अस्वस्थता आणि चिंता यासारख्या समस्या दूर होतात. झोपेची गुणवत्ता सुधारते, चांगली झोप येण्यास मदत होते. स्नायू आणि हाडांचे सांधे शिथिल होतात त्यामुळे शरीराला आराम वाटतो. पचनाशी संबंधित समस्याही दूर होतात
एक्यूप्रेशर शरीरात एंडोर्फिन सोडते. ही थेरपी दाहक-विरोधी प्रभावाला प्रोत्साहन देते, ज्यामुळे संधिवात होण्यास मदत होते.एक्यूप्रेशर थेरपी केमोथेरपीसह कर्करोगाच्या उपचारानंतर लगेच होणारी मळमळ देखील प्रतिबंधित करते. एक्यूप्रेशर थेरपी थकवा कमी करण्यास आणि मूड सुधारण्यास देखील मदत करते. एक्यूप्रेशरचा योग्य वापर केल्यास रक्ताभिसरणातही मदत होते.
एक्यूप्रेशर थेरपीचे काही दुष्परिणाम देखील असू शकतात जसे की:
चुकीच्या मुद्यांवर दबाव आणल्याने इतर समस्या उद्भवू शकतात. जास्त दाब दिल्यास शरीराच्या त्या भागात फ्रॅक्चर होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान एक्यूप्रेशर थेरपी घेतल्याने गर्भपात होण्याचा धोका असू शकतो. जर हा आजार जुनाट असेल तर एक्यूप्रेशर थेरपीमुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
सारांश
ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर पद्धती निसर्गोपचाराचा एक भाग आहेत. या दोन्ही पद्धतींमध्ये आपल्या हात आणि पायांचे ते बिंदू दाबले जातात, जे शरीराच्या विविध भागांशी संबंधित असतात. हे मुद्दे दाबून अनेक समस्या सोडवता येतात. ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरमध्ये फरक एवढाच आहे की ॲक्युप्रेशरमध्ये त्या बिंदूंना हाताने दाबून किंवा एखाद्या उपकरणाने दाबून दाब दिला जातो, तर ॲक्युपंक्चरमध्ये त्या बिंदूंवर सुया टोचल्या जातात.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know