Translate in Hindi / Marathi / English

Saturday, 16 March 2024

आरोग्यदायी फळे व त्यांचे औषधी गुणधर्म | फळांमध्ये शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ व एंझाइम्स मुबलक प्रमाणात असतात | रोज एक फळ खाणे आरोग्यासाठी का महत्त्वाचे आहे | फळांमध्ये नैसर्गिकरित्या रक्तप्रवाहात साखर शोषून घेण्याची क्षमता कमी होते |

आरोग्यदायी फळे व त्यांचे औषधी गुणधर्म

 

आदिकाळापासून मानव फळे खात आलेला आहे. फळांमध्ये शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ व एंझाइम्स मुबलक प्रमाणात असतात. तसेच फळातील फ्रुक्टोज साखर सहज पचणारी व ऊर्जादायी असते.

फळे शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करण्यासाठी विविध प्रकारचे पोषक प्रदान करतात. फळांमुळेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्या पेशींना दुरुस्तीची संधी मिळते. जरी असे खूप कमी लोक असतील ज्यांनी दररोज एक फळ खाण्याचा विचार केला असेल.

रोज एक फळ खाणे आरोग्यासाठी का महत्त्वाचे आहे?

रक्तातील साखरेचे नियंत्रण: सर्व फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर असते. त्यात फायबर आणि पोषक घटक देखील असतात. त्यांच्यामुळे रक्तप्रवाहात साखर शोषून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही.

मानसिक आरोग्य: फळांमध्ये नैसर्गिकरीत्या काही पोषक घटक असतात, ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जामुन, जे मानसिक आरोग्य सुधारणारे फळ म्हणून ओळखले जाते.

वजन नियंत्रणात ठेवा: फळांची एक चांगली गोष्ट म्हणजे त्यामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यात फॅटचे प्रमाणही कमी आढळते, तर फायबर आणि पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळेच आहारात फळांचा समावेश केल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

अँटिऑक्सिडंट्स: फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे, तुमच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणारे नुकसान टाळण्याची संधी मिळते. अँटिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा झटका, कर्करोग आणि न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांचा धोका देखील कमी करतात.

पचन सुधारते: फळे नैसर्गिक एन्झाईम्सने भरलेली असतात. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होते. उदाहरणार्थ, अननसातील ब्रोमेलेन आणि पपईतील पपेन हे पचनासाठी चांगले असतात. हे एन्झाइम प्रथिने तोडण्यास मदत करतात.

फळांमध्ये नैसर्गिकरीत्या काही पोषक घटक असतात, ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जामुन, जे मानसिक आरोग्य सुधारणारे फळ म्हणून ओळखले जाते.

फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?

अशी काही फळे आहेत जी तुम्ही रिकाम्या पोटी सहज खाऊ शकता. परंतु अशी अनेक फळे आहेत जी तुम्ही ब्रेकफास्ट किंवा दुपारच्या जेवणादरम्यान म्हणजेच 10 ते 12 च्या दरम्यान खाऊ शकता. हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. अशी अनेक फळे आहेत ज्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.

फळे खाण्याची उत्तम वेळ:

सकाळी उठल्यानंतर, दुपारी १२ च्या सुमारास, सायंकाळी ते यावेळेत रोज फळे खावीत.

दिवसभरात फळांच्या माध्यमातून साखर तुमच्या पोटात गेल्यास तुमची एनर्जी लेव्हल मेंटेन राहील.

फळे कधी खाऊ नयेत:

जेवणानंतर किंवा जेवणाआधी लगेचच फळे खाऊ नयेत.

रात्री झोपण्याच्या आधी फळे खाऊ नयेत.

रात्री फळे खाल्याने एनर्जी वाढते आणि झोप शांत लागत नाही.

आणि जर आपल्याला मधुमेह असेल तर आपण कच्ची केळी ते आपल्यासाठी खूप उत्तम राहणार.

आंबा

कैरी आंबा या दोन्ही अवस्थेत या फळात भरपूर पौष्टिक घटक आढळतात. कैरीतजीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. ते स्कर्व्ही या आजारावर उपयोगी ठरते. तसेच पिकलेल्या आंब्यात मॅलिक टारटारिक आम्ल असतात. आंब्यातीलजीवनसत्व रातांधलेपणावर गुणकारी ठरते.

आवळा

आवळ्यामध्येजीवनसत्वाचे प्रमाण ६०० मि. ग्रॅ. असते. आवळ्यातीलजीवनसत्व शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास खूप मदत करते. आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातीलजीवनसत्व  जास्त प्रमाणात नष्ट होत नाही. आवळ्यामध्ये क्रोमियम मोठया प्रमाणात असते. यामुळे शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे मधुमेहावर आवळा गुणकारी ठरतो. आवळ्यात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्यामुळे हाडांच्या आजारावर अराम मिळतो.

कलिंगड

कलिंगडामत आद्रतेचे खनिजांचे प्रमाण भरपूर असल्यामुळे तहान भागते तसेच खनिज द्रव्यांची घामाद्वारे होणारी हानी भरून निघते. कलिंगडाच्या बियांचा उपयोग शक्तिवर्धक तसेच हृदयविकारावर उपयोगी ठरतो. तसेच कलिंगडामध्ये पाणी पोटॅशिअमचे जास्त असल्यामुळे मूत्राशयाच्या किडनीच्या तक्रारींवर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो.

केळे

केळ्यामध्ये जीवनसत्वे, प्रथिने खनिजे यांचे जास्त प्रमाण असते. केळ्यामध्ये सहज पचणारी साखर असून थकवा जाऊन लगेच उत्साह येतो. केळ्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते त्यामुळे रक्ताक्षय असणाऱ्यांनी रोज एक केळे खाणे आरोग्यदायी ठरते. तसेच केळ्यामध्ये कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडांचा ठिसूळपणावर केळे गुणकारी ठरते.

खरबूज

खरबूजामध्येजीवनसत्वाचे प्रमाण २९ मि. ग्रॅ. असते. तसेच आद्रता खनिजांचे प्रमाणही भरपूर असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.

डाळिंब

डाळिंबाच्या रसामध्ये अँथोसायनिन या रंगद्रव्याचे जास्त प्रमाण असते. ते शरीरात अँटीऑक्सिडंटचे काम करते शरीरातील फ्री रॅडीकल कमी करून रोगप्रतिकारक क्षमता वाढवते तसेच डाळिंबाचा रसातील लोह रक्तातील होमोग्लोबीनचे प्रमाण वाढवते. डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी असतात. तुम्ही रिकाम्या पोटी आरामात डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता होत नाही. आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली असते.

किवी

किवीमध्ये भरपूर पोषक असतात जे तुम्ही रिकाम्या पोटी खाऊ शकता. डेंग्यूच्या आजारात किवी खूप चांगली आहे. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते आणि शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते.

पपई

पपई स्वादिष्ट, आरोग्यासाठीही सहज पचणारे फळ आहे. पपई शक्ती वाढविते. पपईत, ‘आणिजीवनसत्वे तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने तंतुमय पदार्थ भरपूर असतात. ‘जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.  पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर पपई सर्वोत्तम आहे. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता आणि पोटफुगीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

द्राक्ष

द्राक्ष मुख्यतः काळी हिरवी असतात. काळ्या द्राक्षांमध्ये अँथोसायनिन असल्यामुळे औषधी गुणधर्म जास्त असतात. द्राक्षांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह तसेचजीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. द्राक्षांमध्ये पिष्टमय पदार्थ फलशर्करा जास्त प्रमाणात असतात. ही फलशर्करा खाल्ल्याबरोबर रक्तात शोषली जाऊन ऊर्जा उत्साह निर्माण होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी द्राक्षे खावित.

पेरू

पेरुतजीवनसत्त्व २१२ मि.ग्रॅ. असते तसेच ग्लुकोज, टॅनिन ॅसिड या घटकांमुळे जेवण सहज पचण्यास मदत होऊन पचनक्रीया सुधारते. ‘जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पेरु हा उत्सावर्धक देखील आहे. पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहते कारण यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात.

संत्रे

संत्र्यात, ‘आणिजीवनसत्वे तसेच तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो. त्यातल्या जीवनसत्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कॅल्शीयमचे प्रमाण फक्त संत्र्यात जास्त असते.

सफरचंद

सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषणमूल्ये असतात. यात कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह ही खनिजे तर, ‘जीवनसत्त्वे असताततसेच तंतुमय पदार्थ, खनिजे, प्रथिने आद्रता हे घटकही असतात. यात मॅलिक ॅसिडचे प्रमाण जास्त असून ते शरीरातील पचन क्रिया वाढवते. सफरचंदातीलजीवनसत्त्व पेक्टिनमुळे रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होऊन रक्त पुरवठा सुरळीत होतो हृदयविकाराचा धोका कमी होतो.

अननस

अननसामध्ये ब्रोमेलिन एंझाइम असते. ते अन्न पचनास मदत करते. प्रथिनयुक्त आहाराचे सहज पचन होण्यासाठी अननसाचा उपयोग होतो. अननसामध्ये ‘क जीवनसत्व ४७ मि. ग्रॅ. असते. त्याचबरोबर ६७ टक्के सायट्रिक आम्ल व ३३ टक्के मॅलिक आम्ल असते. ही आम्ले शरीरात उष्णता व ऊर्जा निर्माण करतात. अननसाच्या गरामधे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते.

फळे कोणती खावी?

फळे आणि पालेभाज्या,फुलभाज्या या विषयावर माहिती असणे आरोग्यासाठी फार गरजेचे आहे.त्यात कुठली आरोग्यास घातक आहे असा प्रश्न उपस्थित करणे हास्यास्पद ठरेल.थोड्याफार प्रमाणात सर्वच फळे,भाज्या खाल्या पाहिजेत.

निसर्गाने मनुष्याच्या आहारासाठी वैविध्यपुर्ण फळांची निर्मिती केली आहे.सजीवाला अनेक व्याधी होत असतात.फळांची उपयुक्तता ही त्यासाठी मनुष्याने अक्कलहुशारीने योग्य प्रकारे हाताळली पाहिजे.जास्तीत जास्त आयुष्य प्राप्त करण्यासाठी फळांचा ऊपयोग केला पाहिजे.शिजविलेले अन्न आपण खातो त्यात तेल,तिखट,मीठ यांचा समावेश असतो पण फळे खल्ल्याने त्यापासून मुक्ती मिळते.रसाहार किवा चावून चावून चोथा खाल्यास फायदा होतो. आपले जीवन स्वाथ्यपूर्ण आणि सुखी पाहिजे तर निसर्गाशी संबंध ठेवला पाहिजे तो या फळांच्या सेवनाने आपण पुर्ण करू शकतो.

सारांश

तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी कोणती फळे खाऊ शकतात असा प्रश्न पडतो.आजच्या खराब लाइफस्टाइलमध्ये तंदुरुस्त राहणे हेही मोठे काम आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात पोषकतत्त्वे मिळणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच रोग टाळण्यासाठी योग्य फळे आणि भाज्या वेळोवेळी खाव्यात. जर तुम्हाला विविध आजारांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्हाला तुमच्या आहारात फळांचा समावेश करावा लागेल. फळे खाल्ल्याने पचनक्रिया योग्य राहते. दिवसाची सुरुवात निरोगी करायची असेल तर फळांनी करा, असे डॉक्टर अनेकदा सांगतात.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.






No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know