कडुलिंबाचे फायदे
बहुगुणी कडुलिंब निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी
कडूलिंब अथवा कडुनिंब वा बाळंतलिंब या नवावे
ओळखले जाते. भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि बांग्लादेश या देशात आढळणारा
वृक्ष आहे. कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये
अर्कपादक, निंबक, पारिभद्रक; मराठींत कडूनिंब, बाळंतनिंब; हिंदींत नीम; गुजराथींत लिमडूं
आदी नावे आहेत. कडुनिंबातील प्रथिने शरीराला रोगप्रतिकारक क्षमता देणार्या पेशींना
कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यास उद्युक्त करतात. ते कर्करोगाच्या पेशीवर थेट हल्ला
करत नाहीत तर त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखली जाते. कडूलिंब हे शरीरासाठी
लाभदायक आहे.
कडुलिंब ही एक भारतीय औषधी वनस्पती आहे.
औषधी वनस्पती क्षेत्रातील कडुलिंबाचे वाढते महत्त्व पाहून खूप वर्षांपूर्वीच भारताने
या वनस्पतीचे पेटेंट आपल्या नावावर करून घेतले. म्हणून भारतीय वनस्पतीचा दर्जा कडुलिंबाला
मिळाला. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाचा उपचार केल्यास रक्त, पचन आणि त्वचेशी
निगडीत कित्येक असाध्य रोग दूर होऊ शकतात. शिवाय साधा ताप, खाज-खरुज, मच्छर चावणे,
इन्फेक्शन आणि जुन्या जखमा भरणे यांसारख्या गोष्टींत सुद्धा कडुलिंब रामबाण ठरते.
कडुलिंब त्वचेवर गुणकारी
जर तुमच्या त्वचेवर कोणते इन्फेक्शन झाले
आहे आणि तुम्हाला त्यावर योग्य उपाय माहित नसेल वा ते नक्की कोणते इन्फेक्शन आहे हे
कळत नसेल तर त्वरित कडुलिंबाची पाने घेऊन त्यावर चोळल्यास फायदा होऊ शकतो. काही दिवसांतच
तुम्हाला त्या जागेवर फरक जाणवू लागेल आणि ती जागा इन्फेक्शन मुक्त होईल. अनेकदा केवळ
कडुलिंब चोळून फायदा होत नाही तर त्याचे योग्य उपचार घेतल्यास जलद परिणाम दिसू शकतात.
अशावेळी तुम्ही आयुर्वेदातील जाणकारांशी अवश्य संपर्क साधायला हवा.
कडुलिंब दातदुखीपासून मुक्तता
तुम्ही अनेक लोकांना कडुलिंबाच्या काडीने
दात घासताना पाहिले असेल. ते यासाठीच करतात जेणेकरून दाताच्या समस्या दूर राहाव्यात.
जे लोक नियमित कडुलिंबाच्या काडीने दात घासतात त्यांना आयुष्यात कधीही दातदुखी वा हिरडेदुखी
सारखी समस्या सतावत नाही. जर तुम्हाला दाताशी वा हिरड्यांशी निगडीत कोणताही त्रास जाणवला
तरी सुद्धा तुम्ही कडुलिंबाच्या काडीने दात घासण्यास सुरुवात करू शकता. तुम्हाला फरक
नक्की दिसेल. कडुलिंबाच्या याच उपयुक्ततेमुळे सर्व टूथपेस्ट मध्ये हमखास कडुलिंब आढळते.
कडुलिंबाच्या पानांची अंघोळ
कडुलिंबाच्या पानांची अंघोळ करणे हे सर्वांसाठीच
लाभदायी आहे. जे लोक आपल्या अंघोळीच्या पाण्यात नेहमी कडुलिंबाची पाने टाकतात वा त्या
पानांसकट पाणी गरम करतात आणि मग अंघोळ करतात त्यांच्या त्वचेत कधीच संक्रमण होत नाही.
काही लोकांची त्वचा खूप संवेदनशील असते आणि वारंवार त्यांना विविध प्रकारचे आजार होत
असतात अशांनी तर आवर्जून कडुलिंबाच्या पानांची अंघोळ करावी. असे कल्यास त्यांना कधीच
त्वचेच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही आणि ज्या समस्या आहेत त्या सुद्धा दूर
होतील.
पोटातील
जंत
पोटातील जंत दूर करण्यासाठी कडूनिंबाच्या
पानात मध आणि मिरपूड मिसळा. त्याचा दोन – तीनदा वेळा हा प्यायला प्या.
ताप
ऋतू बदलला की आपल्याला सर्दी, खोकला, ताप
येत असतो. हे नेहमीचे चक्र झाले आहे. पण जर तुम्ही दररोज कडुनिंबाची दोन पाने खाल्ली
तर आपल्याला कधीच ताप येणार नाही.
मुरुम
कडुनिंबाचा पाला वाटून तो मुरुमांवर लावल्यास
आराम मिळतो आणि त्वचा रोगमुक्त देखील राहते.
किडनी
स्टोन (मुतखडा)
किडनी स्टोनचा त्रास टाळण्यासाठी सुमारे
१ ग्रॅम कडूलिंबाची पाने १ लिटर पाण्यात बारीक करून घ्या आणि चांगले उकळवा. नंतर हे
पाणी थंड झाल्यावर प्या. दररोज असे केल्यास मुतखड्याच्या समस्येपासून मुक्तता होईल.
जर दगड तुमच्या मूत्रपिंडात असेल तर दररोज सुमारे 2 ग्रॅम कडुलिंबाची पाने पाण्याबरोबर
घ्या, त्याचा फायदा होईल.
कान
दुखणे
कडुनिंबाचे तेल कानात टाकल्यास कान दुखणे
किंवा कानाच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
तोंडाच्या
समस्या
कडूलिंब दातांसाठीही फायदेशीर आहे, नियमितपणे
कडुनिंबाने दात घासल्याने जंतू नष्ट होतात
आणि हिरड्या मजबूत होतात आणि दात चमकदार व निरोगी असतात.
काविळ
काविळ मध्येही कडुनिंबाचा उपयोग खूप फायदेशीर
आहे. काविळच्या रुग्णाला कडुलिंबाच्या पानांच्या रसात आल्याच्या पावडरचे मिश्रण द्यावे
किंवा कडुनिंबाच्या पानांचा 2 भाग आणि 1 भाग मध मिसळून प्यायल्यास काविळवर गुणकारी
ठरते.
केसांसाठी कडुलिंबाच्या पानांचे फायदे
जसे आयोग्यासाठी
कडुलिंबाचे
खूप
फायदे
आहेत,
तसेच
केसांच्या
आरोग्यासाठी
ही
याचे
बरेच
फायदे
मिळतात.
कोरड्या व कमकुवत केसांवर कडुलिंबाची
पेस्ट
लावल्यास
केसांना
चमक
येते
व
केस
मजबूत
बनतात.
तसेच
कडुलिंबाची
पाने
पाण्यात
उकळून
त्या
पाण्याने
केस
धुतल्याने
केसातील
उवा
पण
दूर
होतात.
कडुनिंबाचे
दुष्परिणाम
आपण कडूलिंबापासून
मिळणारे
फायदे
बघितले
कडुलिंबाचे
अनेक
फायदे
आहेत
हे
खरे
आहे,
पण
त्याचे
जास्त
सेवन
केल्याने
आपल्याला
अनेक
तोटे
होऊ
शकतात.
चला
तर
मग
जाणून
घेऊया
याचे
काय
तोटे
आहेत.
1.
जर
तुम्ही
उपवास
करत
असाल
तर
या
वेळी
कडुलिंब
खाणे
टाळा
कारण
कडुलिंब
शरीरातील
साखरेची
पातळी
कमी
करते,
उपवासमुळे
तुम्ही
रिकाम्यपोटी
असता
अश्यावेळी
शरीरातील
साखर
कमी
झाली
तर
तुम्हाला
अशक्तपणा
जाणवेल
चक्कर
येण्याचीही
शक्यता
असते
त्यामुळे
जर
तुम्ही
उपवास
करत
असाल
तर
कडुलिंबाचे
सेवन
करू
नये.
2.
स्त्रिया
गरोदर
असतील
किंवा
स्तनपान
करत
असतील
तरी
त्यांनी
कडुलिंबाचे
सेवन
टाळावे.
कारण
कडुलिंबाच्या
सेवनाने
शरीरातील
उष्णता
वाढेल,
जर
शरीरातील
उष्मा
जास्त
वाढला
असेल
तर
ती
गर्भ
गमावू
शकते.
3.
केस
धुन्यासाठी
कडुलिंबाच्या
रसाचा
वापर
करत
असाल
तर,
कडुलिंबाचा
रस
तुमच्या
डोळ्यात
येणार
नाही
याची
काळजी
घ्या,
कारण
ते
तुमच्या
डोळ्यांना
त्रास
देऊ
शकते.
डोळ्यात
जळजळ
होउ
शकते.
4.
कडुलिंबाच्या
अतिसेवनाने
तोंडाची
चव
संपू
शकते,
तोंड
बेचव
होऊ
शकते.
5.
कडुलिंबाचे
जास्त
सेवन
केल्याने
शुक्राणूंची
कमतरता
भासू
शकते.
कडुलिंबाच्या
अतिसेवनाने
धातू
पातळ
व
कमकुवत
होऊ
शकतो.
6.
जर
तुम्ही
कडुलिंबाचे
जास्त
सेवन
करत
असाल,
तर
तुम्हाला
किडनीच्या
समस्या
होऊ
शकतात.
मात्र,
अशी
कोणतीही
मोठी
प्रकरणे
समोर
आलेली
नाहीत.
पण
हेल्थ
एक्स्पर्ट
सांगतात
की
याचे
अतिसेवन
करू
नये.
7.
कडुलिंबाचे
प्रमाणापेक्षा
जास्त
सेवन
पोटात
जळजळ
निर्माण
करू
शकते,
पण
यावर
कोणताही
पुरावा
नाहीये,
पण
तरीही
काही
अद्यायनातून
हे
समजले
आहे
की
याचे
जास्त
सेवन
पोटातील
समस्या
वाढवू
शकतात.
8.
जर
तुम्हाला
ब्लुड
शुगर
ची
समस्या
असेल
तर
डॉक्टर
कडुलिंबाची
पाने
खाण्याचे
सुचवतात
जर
कडुलिंबाच्या
पानांचे
सेवन
प्रमाणापेक्षा
जास्त
झाले
तर
लो
ब्लुड
शुगर
ची
समस्या
होऊ
शकते
ज्यामुळे
अशक्तपणा
व
चक्कर
येऊ
शकते.
कडुलिंब किती प्रमाणात घ्यावे?
कडुनिंबाच्या
पानांचा
नियमित
सेवन
करू
नका
त्यासाठी
तुम्ही
तुमच्या
डॉक्टरांचा
सल्ला
घ्या
तुम्ही
दिवसाला
1 किंवा
2 पाने
खाऊ
शकता.
कडुलिंबाच्या
पानांचा
अर्क
दातांना
आणि
हिरड्यांवर
महिनाभर
वापरु
शकता.
हेल्थ एक्सपर्ट च्या मते दररोज 2 मिलिग्राम
पेक्षा
कमि
कडूलिंबाचा
रस
घेऊ
शकता.
या
आधी
तुम्ही
तुमच्या
डॉक्टरांचा
सल्ला
घ्या
ब्रश केल्यानंतर
30 सेकंद
माऊथवॉश
म्हणून
फक्त
15 मिली
कडुनिंब
वापरा.
केसांमध्ये
उवा
असल्यास,
100 मिली
कडुनिंबाचा
रस
केसांवर
10 मिनिटे
लावा
आणि
उवा
गेल्यानंतर
सौम्य
शॅम्पूने
केस
धुवा.
शेतीमध्ये कडुलिंबाचे फायदे
कडुनिंबाची कीटकनाशके आणि कीटकनाशके: शेतकरी
पिकाचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा
वापर करतात. शेतजमिनीवर त्याचा फार वाईट परिणाम होतो. रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे
जमिनीची सुपीकता कमी होते. पुढे या जमिनी नापीक होतात, त्यावर शेतकऱ्यांना शेती करणे
अजिबात शक्य होत नाही. याशिवाय अशा खतांनी पिकवलेल्या भाज्यांचाही आरोग्यावर खूप वाईट
परिणाम होतो. पिकांवर निंबोळी कीटकनाशकाचा वापर करा: शेतकऱ्यांना शेतात जास्तीत जास्त सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करण्यासाठी
सरकार आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना सतत प्रोत्साहन देते. या मध्ये, कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना
कडुलिंबाची पाने, कडुलिंबाची पेंड आणि निंबोळी यांचा कीटकनाशके म्हणून वापर करून शेतात
वापरण्याचा सल्ला देतात. असे केल्याने पिकातील सर्व प्रकारच्या शत्रू कीटकांचा नायनाट
होतो आणि पिकाला कोणत्याही प्रकारचे रोग येत नाहीत. यासोबतच पिकांच्या उत्पादनात अनेक
पटींनी वाढ होते. याशिवाय पिकांचा खर्चही अनेक पटींनी कमी होईल.
असे
कडुलिंबाचे कीटकनाशक बनवा: सर्व प्रथम 10 लिटर पाणी घरी घ्या. कडुनिंबाची
पाच किलो हिरवी किंवा कोरडी पाने आणि बारीक चिरलेली कडुनिंब निंबोळी, दहा किलो ताक
आणि दोन किलो गोमूत्र, एक किलो लसूण एकत्र मिसळून घ्या. नीट मिक्स करून एका मोठ्या
भांड्यात ठेवा. रोसामा हे द्रावण काड्यांमध्ये मिसळत रहा. रंग दुधाळ झाल्यावर या द्रावणात
200 मिलीग्राम साबण आणि 80 मिलीग्राम टीपॉल घाला. आपल्या गरजेनुसार याची फवारणी करा.
निंबोळी खत वापरा: शेतात रासायनिक खतांऐवजी कडुलिंबाच्या पानांचे खत देखील वापरले जाऊ शकते. कडुनिंबाची पाने आणि निबोलीस खड्ड्यात टाकून चांगले कंपोस्ट खत तयार करता येते. त्याचा शेतात वापर केल्यास शुद्ध पीक मिळेल.
सारांश
कडूलिंबाच्या झाडाचे अनेक उपयोग असून ती एक मौल्यवान औषधी वनस्पती असून हजारो वर्षांपासून भारतात त्याचा उपयोग केला जात आहे. सर्व रोग निवारिणी तथा आरिष्ट असा उल्लेख चरक संहिता या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात केला आहे. कडूलिंबाची पाने दररोज सकाळी चावून आल्यास कालांतराने शरीरावर कुठल्याही विषाचा शरीरावर परिणाम होत नाही. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहिसे होतात.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know