Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 20 March 2024

हेअर कलरिंग | मानवी सौंदर्याच्या निकषांत केस हा एक महत्त्वाचा घटक आहे | केस रंगविण्यापूर्वी घ्या खबरदारी | सध्याच्या काळात केस रंगवून घेणे, म्हणजे हेअर कलरिंग वाढले आहे | आपले केस नेहमीच सुंदर दिसावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते | पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर कलर्स वापरले जातात

हेअर कलरिंग

 

केस रंगविण्यापूर्वी घ्या खबरदारी

केस रंगविण्यात आता काही नावीन्य उरले नसले, तरी ते रंगविताना काही खबरदारी घेणे आवश्यक असते. तशी ती घेतली नाही, तर त्रास होण्याची शक्यता असते. केस रंगविताना काय काळजी घ्यावी.

मानवी सौंदर्याच्या निकषांत केस हा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतापुरता विचार केला, तर दाट काळेभोर केस हा आवश्यक निकष मानला जातो. हवामान आणि भौगोलिक स्थितीनुसार केसांचा रंग बदलतो. आशियाई लोकांचे केस काळे आणि पाश्चात्त्यांचे सोनेरी किंवा भुरकट असे सर्वसाधारणपणाने दिसते. सध्याच्या काळात केस रंगवून घेणे, म्हणजे हेअर कलरिंग वाढले आहे. काही जण सगळे केस रंगवून घेतात तर काही जण त्यांची फक्त टोके. कोणी कोणता रंग वापरावा हे मर्जीवर असले, तरी केस रंगवून घेणे ही सोपी बाब नाही. त्यात थोडी चूक झाली, तरी संबंधित व्यक्ती एखाद्या विदूषकाप्रमाणे दिसण्यास वेळ लागत नाही. ग्राहकाच्या केसांच्या डाइंगसाठी कपडे धुण्याची पावडर वापरली गेल्याचा एक व्हिडिओ काही काळापूर्वी व्हायरल झाला होता. आकर्षक आणि वेगळ्या रंगांचे आकर्षण वाटले, तरी ते तुम्हाला योग्य ठरतातच असे नाही. हेअर कलरिंग हे कौशल्याचे काम असल्याने केस रंगवून घेताना काय काळजी घ्यावी या बाबत तज्ज्ञांचा सल्ला काय आहे ते पाहा. केस रंगविण्यापूर्वी पुरेशी काळजी घेतल्यास, नुकसान होते.

केसांमुळे महिलांचे सौंदर्य वाढते. त्यामुळे आपले केस नेहमीच सुंदर दिसावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते आणि म्हणूनच स्त्रिया आपल्या केसांवर वेगवेगळ्या प्रकारची हेअर केअर उत्पादने लावतात. आजकाल केसांना कलर करण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय आहे. पण हेअर कलर करूनही महागडे केस काही दिवसांनी निखळायला लागतात. त्यामुळे केसांना पुन्हा रंग द्यावा लागतो.

रंगविताना केस जास्त उचलले जाणे ही नेहमी होणारी चूक असते. तीव्र स्वरूपाची ब्लिच वापरल्यामुळेही केसांचे जास्त नुकसान होते. केसांना रंग देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांची तपासणी करून घेणे योग्य ठरते. खूप काळ टिकणारा रंग केसांना लावून घेण्यास लोक पसंती देत असले, तरी त्यामुळे केसांची हानी होऊ शकते. रंगविल्यानंतरही केसांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते.

केसांना मेहेंदी किंवा हेयरर कलर

केस पांढरे व्हायला लागले की आपल्याला त्यां केसांना रंगवण्यासाठी काहीना काही उपाय करावा लगतो. बरेच जण केसांना मेहेंदी किंवा हेयरर कलर लावतात. हल्ली केसांसाठी हाय लाईट्स हा पर्याय देखील ट्रेन्डमध्ये आहे. पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर कलर्स वापरले जातात. केस काळे करणाऱ्या हेअर कलर्समध्ये केमिकल्स असतात. त्यामुळे केसांच्या समस्या आणखीन वाढतात. कधीकधी केसांचा रंग लावतांना जास्त डार्क झाला तर फार विचित्र दिसायला लागतो. पण, एकदा केसांना कलर लागला की तो सहज कमी करता येत नाही. त्यामुळे तसंच वावरावं लागतं. घरीच काय पण, पार्लरमध्ये केसं रंगवल्यानंतर हवा तसा परिणाम दिसत नाही. पण तरीही, रंग कमी होईपर्यंत वाट पहावीच लागते. पण आता चिंता करी नका काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही केसांना लागलेला कलर कमी करु शकता. त्यासाठी फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. घरात सहज मिळणाऱ्या लिंबाचा वापर करून कलर कमी करता येतोकेसांचा कलर कमी करण्यासाठी लिंबाचा रस काढून घ्या. एक कप लिंबाच्या रसात अर्धा कप कंडिश्नर मिसळा. हे मिश्रण मिक्स करा. आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. स्प्रे बॉटल नसेल तरी काचेच्या भांड्यात ठेवा आणि ब्रशच्या सहाय्याने लावा. या पद्धतीने करा वापर केसांचा गुंता काढा त्यानंतर केसांचे छोटेछोटे सेक्शन करून घ्या. आता या मिश्रणाचा केसांवर स्प्रे करा. स्प्रे बॉटल नसेल तर हेअर ब्रशच्या सहाय्याने हे मिश्रण स्कॅल्प आणि केसांच्या टोकापर्यंत चांगलं लावा. यानंतर,पुन्हा केस विंचरा आणि कमीतकमी 1 तासासाठी उन्हात बसा. मात्र त्वचेवर उन्हाचा परिणाम होऊ नये यासाठी सूर्यप्रकाशात बसण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन लावा. लिंबाच्या रसामध्ये असलेलृं सायट्रिक ऍसिड नैसर्गिकरित्या हेयर कलर कमी करण्यास मदत करेल. उन्हामुळे केसांवर लावलेलं मिश्रण सुकल्यानंतर केस कोमट पाण्याने चांगले धुवा. यानंतर,केसांवर कंडिश्नर लावा आणि 8 ते 10 मिनिटांनी केस कोमट पाण्याने पुन्हा धुवा. यानंतर केस हेवेवर वाळू द्या. केस पूर्णपणे सुकल्यानंतर केसांमध्ये मॉइश्चरायझिंग मास्क लावा.

केसांबाबत काही शंका असल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तुम्ही अनेक रंग वापरून केस रंगविणार असणार, तर असा सल्ला अवश्य घ्या. त्यामुळे केसांचे संभाव्य नुकसान टळते.

केसांना रंग देताना त्यात प्राथमिक रंग (बेस कलर्स) महत्त्वाची भूमिका बजावतात. लायटर बेस लेव्हलचे रंग आणि ब्लिच्ड केसांमुळे जास्त चांगले परिणाम मिळतात.

केस रंगविण्यासाठी वापरले जाणारे रंग आणि अन्य उत्पादने दर्जेदार असल्याची खात्री करायला हवी. रंग लावल्यावर केसांचे आरोग्य चांगले ठेवणारी उत्पादने निवडण्याची दक्षता घ्या. आपली त्वचा आणि डोळ्यांच्या रंगांचा विचार करून केसांचा रंग निवडला, तर ते जास्त योग्य ठरते.

केस रंगविल्यानंतर योग्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरून केसांची काळजी घ्यावी.

कोणताही अनुभव नसताना घरीच केस रंगविण्याचा प्रयोग करणे टाळा.

केस रंगविल्यावर अत्यंत गरम जागी जाणे टाळा.आपल्या केसांचे स्वरूप आणि पोतानुसार रंग देणे चांगले ठरते. केसांची मजबुती हासुद्धा महत्त्वाचा घटक आहे. प्रकृती बरी नसताना केसांवर काही प्रयोग करू नका.

घरी नॅचरल हेअर कलर

चमकदार व मऊ केसांसाठी बीटापासुन तयार करा घरच्या घरी नॅचरल हेअर कलर. बिटामध्ये लोह आणि व्हिटॅमिनची सर्वाधिक मात्रा असते. यामुळे आपल्या केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते आणि मुळांसह केस मजबूत देखील होतात. केसांसाठी केमिकलयुक्त ट्रीटमेंट करण्याऐवजी आपण घरच्या घरीच रामबाण नैसर्गिक उपाय करू शकता. यापैकीच एक म्हणजे बीटरूट. केसांवरील  नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी आपण बिटाचा वापर करू शकता. केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हेअर केअर रुटीनमध्ये बिटाचा समावेश करावा. तुम्ही बीट खाऊ देखील शकता आणि केसांवर लावूही शकता. पण काही लोकांना बिटाची चव आवडत नसल्याने या आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक कंदमुळाचे सेवन करणं टाळतात. केसांसाठी बिटाचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती?

बिटामध्ये लोह आणि व्हिटॅमिनची सर्वाधिक मात्रा असते. यामुळे आपल्या केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते आणि मुळांसह केस मजबूत देखील होतात. पुरेशा प्रमाणात केसांना पोषक घटक मिळाल्याने केस सुंदर व चमकदार दिसतात. बिटाच्या नैसर्गिक गडद रंगामुळे केसांवरील नैसर्गिक चमक पुन्हा येण्यास मदत मिळते. तसंच बिटाचा रसाच्या वापरामुळे कोरड्या व निर्जीव केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. केसांवर केमिकलयुक्त कलर ट्रीटमेंट करण्याऐवजी बिटाच्या रसाचा वापर करावा. यामुळे केसांना भरपूर लाभ मिळतील.जी लोक आपल्या आहारामध्ये बिटाचा समावेश करतात, त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होत नाही. तसंच रक्तभिसरणाची प्रक्रिया देखील योग्य पद्धतीने सुरू राहते. यातील पोषक घटकांमुळे केसांनाही ऑक्सिजनचा आणि पोषण तत्त्वाचा पुरवठा होण्यास मदत मिळते. यामुळे केस चमकदार होतात.नॅचरल हेअर कलरचा वापर आपण महिन्यातून एकदा करू शकता. पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन ते चार तासांचा वेळ काढणे आवश्यक आहे. बिटाचे नॅचरल हेअर कलर लावल्यास तुमच्या केसांना पूर्णतः नैसर्गिक रंग मिळेल.

बिटापासुन नॅचरल हेअर कलर कसा तयार करायचा?

नॅचरल हेअर कलर तयार करण्यासाठी मध्यम आकाराचे चार बिट घ्यावा आणि स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढा. आता बीट कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा. जाडसर पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट एका भांड्यामध्ये गाळा आणि रसामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. आपण आपल्या आवश्यकतेनुसार सामग्रीचे प्रमाण ठरवू शकता. हे मास्क लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुऊन घ्या पण कंडिशनर लावणे टाळाबीटरूट हेअर कलर  दोन ते तीन तासांसाठी लावून ठेवा. यानंतर केस पुन्हा स्वच्छ धुऊन घ्या. यावेळेस आपण कंडिशनरचा उपयोग करू शकता. अशा पद्धतीने बीटरूट हेअर कलरचा वापर केल्यास तुमच्या केसांवरील नैसर्गिक चमक पुन्हा येण्यास मदत मिळू शकते.

सारांश

लोक केसांना दोन कारणांसाठी कलर करतात. एकतर त्यांचे केस पांढरे झाले आहेत किंवा स्टाईलसाठी. दोन्ही बाबतीत केस गळण्याची भीती असते. बरेच लोक हेअर कलरसाठी डाय वापरतात. तर काही लोक मेहंदी वापरतात. आपण केसांना कलर करण्याबाबत बोललो, तर डाय आणि मेहंदी वापरण्याचे वेगवेगळे फायदे आहेत, तर काही तोटे देखील आहेत. जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर तुम्हाला बळजबरीने ते पटकन झाकून टाकावे लागेल. स्टाइलिंगसाठी कलर करताना त्यांचा वारंवार वापर करू नका. मेहंदीपेक्षा केसांना कलर लावणे सोपे आहे. ते आधीपासून मिक्स करुन ठेवण्याची गरज नाही आणि धुण्यास देखील सोपे आहे. त्याच वेळी हेअर कलरमध्ये केमिकल्स  असतात, ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या एलर्जी होऊ शकतात. हेअर कलरमुळे केसांच्या गुणवत्तेवरही वाईट परिणाम होतो.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know