Translate in Hindi / Marathi / English

Saturday, 30 March 2024

गुढीपाडवा म्हणजे नववर्ष | चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो | दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे | गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली | कडुलिंबाची पानं या दिवसांमधे अंघोळीच्या पाण्यामधे टाकुन स्नान करणे चांगले मानले आहे | मनाला नवी उमेद देणारा हा सण

गुढीपाडवा

 

गुढीपाडवा म्हणजे नववर्ष

साडे तिन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा. (दसरा, गुढीपाडवा, अक्षयतृतिया हे तीन पुर्ण मुहूर्त आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे कार्तिक शुध्द प्रतिपदेचा अर्धा मुहूर्त). कोणतही शुभकार्य करण्याकरिता या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. गुढी पाडवा हा भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.

गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. पौराणिक कथेनुसार, शालिवाहन नामक एक कुंभाराचा पुत्र होता. शत्रू त्याला खूप त्रास देत असत. मात्र, एकटा असल्यामुळे तो शत्रूशी लढा देण्यास असमर्थ होता. तेव्हा त्याने एक युक्ती केली. शत्रूशी सामना करण्यासाठी त्याने मातीचे सैनिक तयार केले. पाणी शिंपडून त्यांच्यात जीव भरला. शत्रूचे आक्रमण झाले, तेव्हा हेच सैन्य लढले आणि विजयी झाले. तेव्हापासून शालिवाहन शकाचा आरंभ झाला, अशी मान्यता आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवसाच्या विशेष प्रकारे शुभेच्छा दिल्या जातात.

गुढी पाडवा हा सण महाराष्ट्र आणि गोवा, केरळ या राज्यांमध्येही साजरा होतो. या राज्यांमध्ये हा गुढी पाडवा हा 'संवत्सर पाडवो' नावाने साजरा केला जातो. काश्मीर राज्यात नवरेह, मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा, कर्नाटकमध्ये हाच पाडवा युगाडी पर्व नावाने ओळखतात तर आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांमध्ये हा दिवस उगाडी, अशा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.

गुढीपाडवा माहिती इतिहास

गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. यामध्ये 'गुढी' म्हणजे 'विजय ध्वज' आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते. या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला होता. याच कारणामुळे शालिवाहन शकही याच दिवशी सुरू होतो.

गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली. या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचेही मानले जाते. पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री रामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले. यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला. ज्याला गुढी म्हणतात.

आदिशक्तीचे प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले. या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते.

गुढीपाडवा महत्त्व

गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो. जुनी वाळलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, तर आंब्याला मोहोर येतो. या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो. गुढीला सजवण्यात येणार्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. तर  या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-पडशांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते. अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात.

कश्या प्रकारे उभारावी गुढी

गुढीची उंच काठी बांबू पासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते. ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुऊन पुसून घ्यावी. त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवली जाते. तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावतात. गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात.

गुढीपाडवा पूजा विधी


गुढी उभारल्यावर गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात. निरंजन लावून उदबत्ती ओवाळतात. दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीस परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरविली जाते.

गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून, त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या/गडू/फुलपात्र बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात/उंच गच्चीवर/गॅलरीत लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.

गुढी पाडवा रेसिपी

गुढीपाडवा हा खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठीही ओळखला जाणारा सण आहे. या दिवशी श्रीखंड-पुरी, खीर-पुरी, बासुंदी-पुरी, भाजी-पुरी, पुरणपोळी, मसालेभात, कोशिंबीर, चटण्या, लोणचे, पापड, आलू वड्या, बत्तावडे खास साग्रसंगीत पद्धतीत शैलीत नैवेद्य तयार केलं जातं.

आंब्याच्या हिरव्याकंच पानांसोबत पिवळ्या झेंडूचे तोरण. दाराच्या समोर पाटावर बांबूच्या काठीला सुंदर वस्त्र गुंडाळून, कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्यांनी आणि साखरेच्या पांढऱ्या गाठीचा हार घालून नटलेली गुढी आणि घरात गुढीसाठी केलेला गोडाचा नैवेद्य. सारंच कसं मनमोहक आणि उत्साही. मनाला नवी उमेद देणारा हा सण.  चैत्राच्या टक्क उन्हातही मनाला उभारी देणारा हा गुढीपाडव्याचा सण मराठी माणसांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येतो. चैत्राच्या महिन्यात पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला निसर्ग आणि वसंताची बहार घेऊन येणा-या या गुढीपाडव्याला महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्त्व आहे.

गुढीपाडव्याचे आरोग्य महत्व

चैत्र शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व आहे. या दिवशी मीठ, हिंग, ओवा, मिरी, साखर आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून गोळी तयार केली जाते आणि तीचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वेचेचे आरोग्य सुधारते त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे. कडुलिंबाची पानं या दिवसांमधे अंघोळीच्या पाण्यामधे टाकुन स्नान करणे चांगले मानले आहे. गौतमीपुत्राची सत्ता असलेली राज्य कर्नाटक आंध्रप्रदेश मधे स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद साजरा करण्याकरता या दिवशी संवत्सर पाडवो उगादी या निराळया नावांनी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

सारांश

चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. या दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो. मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडवा हा मानवी जीवनात नवचैतन्य भरतो. चैत्रात आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. फळांचा राजा आंबा याच काळात मोहरतो, फळतो आणि आपल्या रसाळ फळांनी सगळ्यांची रसना तृप्त करायला सज्ज होतो. अंगणात मोगर्याचा सुगंध दरवळायला लागतो, आंबाही हिरव्या कंच पानांच्या शालूने नटतो, आंब्याची डाळ, पन्हे, हा सारा थाट, वसंताच्या आगमनाची चाहूल असते. असा हा गुढीपाडवा  सगळ्यांच्या जीवनात वसंत फुलवतो.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know