Translate in Hindi / Marathi / English

Tuesday, 19 March 2024

लहान मुलांतील चिंताजनक लठ्ठपणा | बालपणातील लठ्ठपणा | बालपणातील लठ्ठपणाची कारणं | बालपणातील लठ्ठपणाचे आरोग्य होणारे परिणाम | चाइल्डहूड ओबेसिटी कशी रोखायची | हाय कॅलरी फूडचे सेवन | कमी चरबी असलेले प्रथिनयुक्त पदार्थ

बालपणातील लठ्ठपणा

 

लहान मुलांतील चिंताजनक लठ्ठपणा

गेल्या दोन दशकांत वाढतं दरडोई उत्पन्न आणि शहरीकरणामुळे, चाइल्डहूड ओबेसिटी म्हणजेच बालपणातील लठ्ठपणा भारतात महामारी बनली आहे. 14 मिलियन लठ्ठ मुलांसह चीनच्या खालोखाल भारत लठ्ठ मुलांच्या संख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जास्त वजन असलेल्या मुलांचं प्रमाण सुमारे 15% आहे. अधिक मिळकत असलेल्या फॅमिलींना सेवा देणाऱ्या खासगी शाळांमध्ये याचं प्रमाण 36-40% पर्यंत वाढलं आहे. ही वाढ चिंताजनक आहे.

बालपणातील लठ्ठपणाची कारणं

बालपणातील लठ्ठपणाचं मूलभूत कारण म्हणजे शरीरातील कॅलरींचं प्रमाण आणि खर्च केलेली ऊर्जा यांच्यातील असंतुलन होय. भारतीयांना अनुवांशिकदृष्ट्या लठ्ठपणाचा धोका असतो; पण बालपणातील लठ्ठपणा मुख्यत्त्वे पर्यावरणाच्या प्रभावामुळे होतो. आर्थिक समृद्धीमुळे आहारात पारंपरिक ते मॉडर्न पदार्थ, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचा समावेश होतो. स्मार्ट फोन क्रांती आणि शहरांमध्ये फूड-डिलिव्हरी अॅप्सची झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या मुलांसाठी आणि पालकांसाठी साखर आणि फॅट्सचे भरपूर प्रमाण असलेले पदार्थ सहज उपलब्ध झाले आहेत. त्यांना एका क्लिकवर हव्या त्या पदार्थांची होम डिलिव्हरी मिळते. शहरीकरण आणि डिजिटल क्रांतीमुळे बैठी लाईफस्टाइल वाढली असून, शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. कोविड साथीच्या आजाराने गोष्टी आणखी वाईट झाल्या, कारण मुलं शाळेत जाऊ शकत नव्हती. ती घरातच असल्याने शारीरिक हालचाली मंदावल्या लठ्ठपणाचं प्रमाण वाढू लागलं.

बालपणातील लठ्ठपणाचे आरोग्य होणारे परिणाम

बालपणातील लठ्ठपणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. लठ्ठ मुलांना टाईप-2 डायबेटिस, हाय कोलेस्टेरॉल, हाय बीपी, ऑस्टियोअर्थरायटिस, कोरोनरी हार्ट डिसीज, स्ट्रोक, पित्ताशयाचा आजार, श्वसन समस्या, वर्तणुकीशी संबंधित समस्या आणि काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका असतो. तीनपैकी दोन लठ्ठ मुलं प्रौढ झाल्यावरही लठ्ठच राहतील आणि त्यांना प्रौढ लाईफस्टाइलमधील आजारांचा धोका असेल, असा अंदाज आहे. भारतात डायेबिटसचं प्रमाण प्रचंड वाढत असून, येत्या काळात आपला देश जगातील डायबेटिसची राजधानी बनेल, असा अंदाज आहे.

चाइल्डहूड ओबेसिटी कशी रोखायची

 डब्ल्यूएचओच्या मते, लहान मुलांमधील लठ्ठपणा हे 21व्या शतकातील सार्वजनिक आरोग्यासमोरील सर्वांत गंभीर आव्हानांपैकी एक आहे. चाइल्डहूड ओबेसिटीला प्रतिबंध करणं आवश्यक आहे, कारण लठ्ठपणावर उपचार करणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे ते रोखणं हाच एकमेव पर्याय आहे.

1. फळं आणि भाज्यांचं सेवन वाढवा.

2.  पुरेसं पाणी प्या.

3.  स्क्रीन टाइम कमी करा. टीव्ही पाहताना खाऊ नका. कारण यामुळे गरजेपेक्षा जास्त अन्न आपण खातो. तसंच टीव्हीवरील जाहिराती मुलांना फास्ट फूडकडे आकर्षित करतात.

4.  साखरेचे सेवन कमी करा. साखरेला आता नवीनतंबाखूम्हटलं जातं. साखर सर्व वयोगटांसाठी प्रतिबंधित करायला पाहिजे. गोड पेयांपेक्षा पाणी पिण्याला जास्त प्रोत्साहन द्यायला पाहिजे.

5. शारीरिक हालचालींना प्रोत्साहन द्या. मर्यादित वेळ आणि शिक्षणाच्या प्रेशरमुळे मुलांना जास्त वेळ बसून अभ्यास करावा लागतो. त्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली कमी होतात. पालकांनी लहान मुलांना शारीरिक व्यायाम आणि मोठ्या मुलांना दररोज किमान 60 मिनिटं म्हणजेच एक तास व्यायाम करायला लावणं आवश्यक आहे.

6.  चालणं, ट्रेकिंग, सायकलिंग यासारख्या मैदानी खेळांसाठी मुलांना प्रोत्साहित करायला हवं. शनिवार रविवारी रोजी फॅमिली पिकनिक काढल्यास मुलांना योग्य सवयी विकसित करण्यास मदत करते.

मुलांसाठी पालक रोल मॉडेल्स

मुलं पाहतात की त्यांचे पालक काय खातात. हेल्दी इटिंगमध्ये जास्तीत जास्त फळं, भाज्या, कडधान्यं आणि काजू खाणं याचा समावेश आहे. फॅट्सचं प्रमाण मर्यादित करणं आणि त्याचा वापर सॅच्युरेटेड फॅट्समधून अनसॅच्युरेटेड फॅट्सकडे करण्याचा सल्ला दिला जातो. मुलं दोन वर्षांची झाल्यानंतर त्यांना दुधाऐवजी स्कीम्ड दूध द्यावं. त्यांना ताजे पदार्थ खाण्यास प्रोत्साहन द्यावं. फास्टफूडमध्ये फॅट्स, साखर आणि मीठ भरपूर असतात. त्यामुळे ते काही प्रसंग असेल तरंच अथवा वीकेंडला खायला द्यावे. स्नॅकिंग आणि बींजिंग हे जास्त कॅलरी घेण्याचं प्रमुख कारण आहे. वाढत्या मुलांसाठी हेल्दी स्नॅकचे पर्याय उपलब्ध असले पाहिजेत.

मुलं हेल्दी मिलटाइम बीहेव्हियर शिकतात. त्यांना बळजबरीने खाऊ घातल्यास त्यामुळे बहुतेकवेळा पूअर सेल्फ कंट्रोल लठ्ठपणाच्या समस्या उद्भवतात. म्हणून मुलं भूक लागल्यावर खातात ना हे पालकांनी सुनिश्चित करणं आवश्यक आहे. तसंच मुलं बोअर झालीत किंवा थकलीत म्हणून जेवत नाहीयेत ना, त्याचीही खात्री करायला पाहिजे.

मुलांना तुम्ही 6-12 महिन्यांपासून आरोग्यपूर्ण सवयी लावू शकता. आयांनी योग्यवेळी त्यांना दूध देणं बंद किंवा कमी करून विविध प्रकारच्या आरोग्यपूर्ण पदार्थांचा त्यांच्या आहारात लवकर समावेश केल्यास या लहान मुलांना नंतर चांगला आहार घेण्याची सवय लागेल.

हाय कॅलरी फूडचे सेवन

शाळेत जाणाऱ्या हेल्दी मुलाने हाय कॅलरीज असलेले अन्नपदार्थ खाल्ले, टीव्ही व्हिडिओ गेम्सच पाहिले, मैदानी खेळ अजिबातच खेळले नाहीत आणि त्याच्या होमवर्कचा प्रचंड ताण असेल तर त्यामुळे थोडं वजन वाढतं. आणखी कॅलरीयुक्त अन्न खाल्याने शारीरिक हालचाली मंदावतात त्यामुळे ओबेसिटी असलेली मुलं लवकर थकतात. पायऱ्यांऐवजी लिफ्ट वापरतात. सतत काही ना काही खात असतात. त्यामुळे आणखी वजन वाढतं.

आणखी लठ्ठपणामुळे त्यांच्या वयातील मित्र-मैत्रिणी चेष्टा करतात त्यामुळे ते धावू शकत नाहीत. बाहेर जाऊन लोकांशी संवाद साधत नाहीत. मित्र-मैत्रिणींनी चेष्टा केल्यावर ती एकटी राहू लागतात घराच चिडचिड करतात.

विविध गंभीर आजार होऊ शकतात, एकटी राहतात डिप्रेशन येऊ शकतं त्यामुळे या मुलांना अस्थमा, डायबेटिस, हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याचा धोका असतो. समाजात मिसळल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतोही मुलं वाढ झाली तरीही लठ्ठच राहतात. सीएडी तसंच कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो.

संतुलित आहार कसा असावा?

 हृदयाचं आरोग्य सांभाळण्यामध्ये संतुलित आहाराचा महत्त्वाचा वाटा असतो. संतुलित आहार म्हणजे नेमकं काय? विविध जीवनसत्त्वं, खनिजं शरीराला देणारे विविध खाद्यपदार्थ योग्य प्रमाणात घेणं म्हणजे संतुलित आहार घेणं. मुलांच्या डब्यामध्येही अशा प्रकारचा संतुलित आहार असेल, याची पालकांनी काळजी घेतली पाहिजे. फळं आणि भाज्याकोणत्याही आहारातला हा सर्वांत प्रमुख घटक आहे. ऋतुमानानुसार पिकणारी रंगीबेरंगी फळं भाज्या खाण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावं. त्यात शरीरासाठी आवश्यक पोषणमूल्य फायबर्स असतात. धान्यरिफाइंड पदार्थांपेक्षा अख्ख्या धान्यापासून तयार केलेला ब्रेड, पास्ता यांची निवड करावी. यातून शरीराला फायबर मिळतं. त्याची पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते हृदयरोगाचा धोका कमी होतो.

कमी चरबी असलेले प्रथिनयुक्त पदार्थ

डाळी, टोफू या कमी चरबी असलेल्या प्रथिनांमुळे अमिनो ऍसिड्स शरीराला मिळतात. यातून कमी सॅच्युरेटेड फॅट शरीरात जातं.

वेट लॉस: पाणी प्यायल्याने वजन कमी होत? जाणून घ्या पाणी पिण्याची वेळ आणि पद्धत चांगली चरबीएव्होकॅडो, नट्स, बिया, ऑलिव्ह ऑइल यातून शरीरासाठी आवश्यक चांगली चरबी मिळू शकते. यामुळे शरीरातली सूज, दाह कमी होऊन कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.

कमी साखर मुलांना डब्यात खूप गोड पदार्थ, पॅकबंद अन्नपदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ देऊ नयेत. कारण यातून अतिरिक्त साखर मुलांच्या शरीरात जाते. त्याऐवजी फळं, घरी केलेली चिक्की, दही, वड्या या गोष्टी द्याव्यात. आहाराबरोबरच मुलांना सतत क्रियाशील राहण्यासाठी प्रेरित करणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम, मैदानावरचे खेळ यामुळे त्यांच्या हृदयाचं आरोग्य नीट राहू शकतं. मुलांचा स्क्रीन टाइम कमी केला, तर हे शक्य होऊ शकतं मुलांचं वजन नियंत्रणात राहील. शालेय वयापासूनच मुलांना योग्य आहार नियमित व्यायामाची सवय लावली, तर ती मुलांना त्यांच्या भविष्यात निश्चित उपयोगी पडू शकते.

सारांश

मुलांच्या दिनक्रमात सर्वांत महत्त्वाचा भाग आहार आणि व्यायामाचा असतो. सध्याच्या मुलांना फास्टफूडची इतकी सवय झाली आहे, की त्यामुळे अनेक लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे. त्यावर उपाय म्हणून शाळेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच मुलांना घरच्या पौष्टिक डब्याची व्यायाम आणि खेळाची सवय लावली पाहिजे. त्यामुळे मुलं सुदृढ चपळ बनतील. गेल्या काही वर्षांमध्ये मुलांचा आहार कमालीचा बदलला आहे. सहज उपलब्ध होणारं फास्टफूड खिशालाही परवडणारं असतं. पालकांची क्रयशक्तीही वाढली असल्यानं मुलांना या गोष्टी सहज मिळतात; मात्र यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या बळावते आहे. फास्टफूडमध्ये शरीराला अपायकारक अनेक घटक असतात. चरबी, अतिरिक्त साखर आणि सोडियम असतं. त्याच वेळी त्यात पोषणमूल्य मात्र अभावानंच आढळतात. हे अन्न सतत खाल्ल्यामुळे वजन वाढतं, चरबी वाढते आणि भविष्यकाळात हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोकाही वाढतो. म्हणून मुलांना घरी तयार केलेले पौष्टिक पदार्थच डब्यात देऊन त्यांची सवय लावली पाहिजे.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know