जेवणाचे शिष्टाचार
एकत्र जेवताना पाळावयाचे शिष्टाचार
उदर
भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म
असे म्हणतात कि ''माणूस जसा खातो, तसा बनतो".
काही अंशी हे खरेही आहे कारण आपला मूड, स्वभाव हे आपल्या खाण्यावरही अवलंबून असतात.
लहान मुलांवर आपण संस्कार करतो त्यामध्ये खाण्याचा किंवा जेवणाचा संस्कार महत्त्वाचा.
उष्टावण संस्कार
भारतात बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर काहीजण
उष्टावणाचा संस्कार करतात. लहानपणी लागलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी माणसाला आयुष्यभर
साथ देतात आणि त्याला घडवतात. लहानपणापासून कौतूकाने पोळीशी फक्त जॅम किंवा साखरआंबा
भरवणारी आई अचानक दहाव्या वर्षी मुलाला गवारीच्या शेंगांची भाजी खाल्लीच पाहिजे अशी
सक्ती करते, तेंव्हा मुलगा तिचे ऐकण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. काही घरांमधून वडीलधा-यांच्या
खाण्याच्या आवडीनिवडी जपण्याच्या नादापायी अवास्तव सवयींना पाळल्या जातात. मुले मोठी
होऊन ह्याच संस्कारांची शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात.
त्यामुळे लहानपणी मुलांना खाण्यापिण्याच्या
सवयी लावण्यासाठी आईवडीलांना विशेष प्रयत्न करावे लागतात. एखाद्या पदार्थाची गोडी लागण्यासाठी
त्यांना कदाचित अनेकवेळा प्रयत्न करावे लागतील. भाज्या व फळांची आवड निर्माण होण्यासाठी
आवडत्या पदार्थात त्या एकत्र करणे, आकर्षकरित्या मांडणे, गोड बोलून भरवणे, खेळाडू किंवा
आवडत्या व्यक्तीचा आदर्श समोर ठेवणे वगैरे विविध युकत्यांनी मुलांना सवयी लावता येतील.
लहानपणापासून आपले मुल जंक फूड, तळकट, अतिगोड, डबाबंद पदार्थ किंवा शीतपेयांपासून दूर
राहील ह्याची दक्षता आईवडीलांनी घ्यायला हवी. आजचे भोवतालचे वातावरण असे आहे की त्यावर
पूर्ण निर्बंध असणे अवघड आहे, परंतु त्यातल्या त्यात त्यांचे सेवन व आकर्षण कमी करण्यासाठी
प्रयत्न केला गेला पाहीजे.
आधुनिक पिढीचा आहार
आताच्या पिढीच्या मुलांचा आहार १९५० सालच्या
मुलांच्या तुलनेत अतिशय निकृष्ट आहे. गेल्या शतकातली मुले संध्याकाळभर खेळायची, शारिरीक
व्यायाम करायची आणि आल्यावर घरचे ताजे चौरस जेवण करुन शांत झोपायची. अभ्यास आणि स्पर्धेचे
ताणही कमी होते, त्यामुळे त्यांचे जीवन अधिक आरोग्यपूर्ण आहे ह्यात शंका नाही.
हिंदीत म्हण आहे ''देर आये दुरुस्त आये".
आहारच्या चांगल्या सवयीचे कुठल्याही वयोगटात स्वागतच आहे. पुढील सवयी सर्वसामान्य लोकांसाठी
आहेत. सकाळी प्रत्येकाने न्याहारी घेण्याची सवय लावून घ्यायला हवी. उशीर झाला म्हणून,
सवय नाही म्हणून किंवा कितीवेळा (विशेषता स्त्रियांना) खायचे ह्या संकोचापायी सकाळी
काहीही खाल्ले जात नाही. न्याहारीला इंग्रजीत ब्रेकफास्ट हा योग्य शब्द आहे. रात्रभर
घडलेला उपास सोडणे अतिशय आवश्यक आहे. रात्रभर शरीराने वापरलेले ग्लुकोज आणि उर्जा भरुन
काढणे गरजेचे आहे. न्याहारी केल्याने जेवणापर्यंत काम करण्याची आपली कार्यक्षमता टिकून
राहते. तसेच थकवा, डोके दुखणे, झोप येणे टाळता येते. न्याहारी करुन आलेल्या मुलांना
गणित आणि वाचनात अधिक गती येते असे सिध्द झाले आहे. वर्गात त्यांची चलबिचल कमी होते,
लक्ष लागते, स्मरणशक्तीही चांगली राहते.
फूड पिरॅमीड
आपले रोजचे खाणे हे अधिक पौष्टीक आणि आरोग्यवर्धक
असावे ही काळजी प्रत्येकाने घ्यायचीच आहे. त्याच बरोबर पुढील बाबींची काळजी घेणेही
अत्यावश्यक आहे. शालेय जीवनात शिकलेल्या 'फूड पिरॅमीड' चा वापर व्हावा. त्यानुसार चरबीयुक्त
पदार्थांचे सेवन ३०% पेक्षा जास्त नसावे. आहारात तंतूमय पदार्थांचा वापर वाढवावा. त्यासाठी
तृणधान्ये, भाज्या व फळांचा आहारात समावेश असावा. आहारात मीठ, मैदा आणि साखर ह्या तीन
पांढ-या घातक पदार्थांचा उपयोग कमीत कमी असावा.शुध्द आणि स्वच्छ पाणी दिवसातून ५-६
ग्लास गरजेनुसार पिण्यात यावे. 'ऍरीयेटेड ड्रींक्स', हवाबंद जंक फूड, केक, कॅन्डीज,
पांढरा ब्रेड ह्या सगळ्यांना सरबत, घरी केलेला खाऊ, ब्राऊन ब्रेड असे पर्याय शोधण्यात
यावे. मधल्या वेळेचे खाणेही पौष्टीक असावे.
बहुतेक वेळा आहाराच्या चांगल्या सवयी मोठी
माणसे किंवा लहान मुले पटकन लावून घेतात. खरी समस्या असते ती तरुणांची. पौगंडावस्था
ही खरतर वाढीची अवस्था परंतु निरिक्षणातून सिध्द झाले आहे ह्या वयात आवश्यक ती उर्जा
आणि पोषणमुल्ये चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे ६०% मुलांना मिळत नाही. त्यामध्ये व्हीटॅमीन
ए, कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसीड तसेच तंतूमय पदार्थांची कमतरता जास्त असते. मुलींमध्ये
लोह आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पुढील आयुष्यात त्यांना ऑस्टिओपोरोसीस सारख्या समस्यांना
तोंड द्यावे लागते. आपल्या तरुण मुलांची आवड, त्यांच्या खाण्याच्या वेळा ह्या बाबी
जमेस धरुन मुले पोषक आहार कसा घेतील ह्याकडे पालकांचे विशेष लक्ष असावे. न्याहारी आणि
जेवणाच्या वेळा चुकवणे, बाहेरचे जंकफूड खाणे, सतत तोंडात काही ना काहीतरी टाकत रहाणे
ह्यामुळे तरुणांच्या खाण्यावर परिणाम होतो. शैक्षणिक जबाबदा-या, सोय, वेळ किंवा कामाच्या
वेळा ह्या अनेक कारणांसाठी तरुण मुले सकाळची न्याहारी घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या
चयापचयाच्या क्रिया मंदावतात व कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तसेच चुकीच्या वेळेला जास्त
खाल्ले गेल्यामुळे वजनही वाढते. ह्यासाठी त्यांना सकाळी पटकन खाता येण्यासारखे पदार्थ
तयार ठेवावेत. तरुण मुलांना सतत तोंडात काहीतरी टाकण्याची सवय असते. त्याचा परिणाम
त्यांच्या मुख्य जेवणावर होत असतो. ह्यासाठी तरुणांनी मधल्या वेळचे किंवा तोंडात टाकायचे
पदार्थही पौष्टीक असावे, ह्यासाठी पालकांनी दक्ष राहीले पाहिजे.
फास्ट फूड
फास्ट फूडचा सर्वात मोठा ग्राहक आजचा तरुण
वर्ग आहे. सोय, चटकदार, फॅशन आणि 'पीअर ग्रुप प्रेशर' मुळे फास्ट फूड खाल्ले जाते.
त्यामधून फक्त फॅटस आणि रिकाम्या कॅलरीज मिळतात. ह्याबद्दल पालकांनी आपल्या मुलांना
जास्तीजास्त जागरुक केले पाहिजे. त्यांना आरोग्यपूर्ण पदार्थ आणि मिळणा-या ठिकाणांचीही
माहिती दिली पाहिजे. जेणेकरुन निवडीचे अधिक पर्याय त्यांना उपलब्ध होतील. हल्ली तरुणांमध्ये
'झिरो साईजचे' फॅड आहे. मॉडेल्स प्रमाणे बारीक होण्यासाठी न जेवणे, डायटींग पिल्स घेणे,
उपास करणे, रेचक घेणे, उलटया काढणे ह्या सारखे प्रकार केले जातात. घरच्यांनी वजनाबाबत
चर्चा न करता मुलांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वावर भर दिला पाहिजे. डायटींग पेक्षा नियमित
व्यायाम आणि योग्य आहारावर अधिक भर दिला पाहिजे.
भारतात प्रत्येक जाती आणि धर्माच्या जेवणाखाण्याच्या
विशिष्ट सवयी आणि पध्दती आहेत. प्रत्येकाची जेवायला बसायची पध्दत तसेच पदार्थ वाढण्याच्या
पध्दतीत फरक असतो. ग्लोबलायझेशनच्या ह्या जमान्यात शहरांमधून हा फरक फारसा राहिलेला
नाही. परंतु आजही खेडयांमधून किंवा सणांच्या दिवशी प्रत्येक जातीची खाद्य परंपरा जपली
जाते. कोकणात केळयाचे पान जेवतांना उभे ठेवून प्रथम मीठ वाढून डावी-उजवी बाजू वाढली
जाते त्याउलट केरळमधे केळ्याचे पान आडवे करुन मध्यभागी भात वाढून बाजूनी भाज्या व लोणची
वाढली जातात. प्रत्येकाची पध्दत वेगळी असली तरी पोषक आहारा बरोबर प्रत्येकाने 'टेबल
मॅनर्स' पाळणे अतिशय महत्त्वाचे. जेवतांना हळू बोलणे, आवाज न करता चावून खाणे, भांडयांचा
आवाज न करणे इत्यादी गोष्टी भारतीय जेवणांत पाळल्या जातात.
जमिनीवर बसून जेवण केल्याने होणारे फायदे
वजन नियंत्रणात राहते - जेव्हा तुम्ही सुखासनात बसता, तेव्हा तुमचा मेंदू शांत होतो. तुमच्या व्यवस्थितपणे
जेवणावर
लक्ष
केंद्रित
करू
शकता.
डायनिंग
टेबलवर
जेवण
न
करता
सुखासनात
बसून
केल्याने
खाण्याची
गती
संथ
होते.
यामुळे
पोट
आणि
मेंदूला
योग्य
वेळेवर
तृप्तीची
जाणीव
होते.
अशाप्रकारे
सुखासनात
बसून
जेवण
केल्याने
तुम्ही
गरजेपेक्षा
जास्त
जेवण
करण्यापासून
दूर
राहू
शकता.
जमिनीवर
बसून
जेवन
केल्यानंतर
पोट
सुटत
नाही.
शिवाय
अपचन,
जळजळ,
पोटासंबधीत
विकार
होत
नाहीत.
अन्न पचवणे सोपे - सुखासनात बसून जेवण केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. या व्यतिरिक्त
जेव्हा
तुम्ही
जमिनीवर
बसून
जेवण
करता
तेव्हा
तुम्ही
स्वाभाविकपणे
खाण्यासाठी
थोडेसे
पुढे
वाकता
आणि
अन्न
गिळण्यासाठी
पुन्हा
पूर्वस्थितीमध्ये
येतात.
अशाप्रकारे
वारंवार
पुढे
आणि
मागे
वाकल्यामुळे
तुमच्या
पोटातील
मांसपेशी
सक्रिय
होतात.
यामुळे
तुमच्या
पोटातील
अॅसिडही
वाढते.
यामुळे
तुम्हाला
अन्न
पचवणे
सोपे
जाते.
वेळेआधीच म्हातारपण येऊ देत नाही - जेवण करण्याची ही पारंपारिक
पद्धत
तुम्हाला
वृद्धावस्थेपासून
दूर
ठेवते,
कारण
सुखासनात
बसून
जेवण
केल्याने
मणका
आणि
पाठीच्या
समस्या
होत
नाहीत.
सुखासनात
बसून
जेवल्याने
चेहऱ्यावर
सुरकुत्या
पडत
नाहीत.
कुटुंबाला एकत्रित ठेवते - सामान्यतः
जमिनीवर
बसून
जेवण्याची
प्रथा
एक
कौटुंबिक
गतिविधि
आहे.
योग्य
वेळेवर
संपूर्ण
कुटुंब
एकत्रितपणे
जेवण
करत
असेल
तर
एकमेकांमधील
सामंजस्य
वाढते.
तुमच्या
कुटुंबाशी
समरस
होण्याचा
हा
अतिशय
उत्तम
पर्याय
आहे,
कारण
जमिनीवर
बसून
जेवण
केल्याने
तुमचे
मन
शांत
राहते.
यामुळे
हा
उपाय
तुमच्या
कुटुंबाला
एकत्रित
ठेवण्यासाठी
उपयुक्त
आहे.
वय वाढू शकते - एका संशोधनानुसार
जे
लोक
जमिनीवर
पद्मासन
किंवा
सुखासनात
बसतात
आणि
कोणत्याही
गोष्टीचा
आधार
न
घेता
उठून
उभे
राहण्यास
सक्षम
असतात,
त्यांची
दीर्घ
काळ
जगण्याची
शक्यता
जास्त
असते.
या
मुद्रेतून
उठण्यासाठी
जास्त
लवचिकपणा
आणि
शारीरिक
शक्तीची
आवश्यकता
असते.
या
संशोधनातून
हेही
समोर
आले
आहे
की,
जे
लोक
कोणत्याही
आधाराशिवाय
उठून
उभे
राहण्यास
सक्षम
नसतात,
त्यांची
पुढील
सहा
वर्षात
मृत्यूची
शक्यता
6.5 पटीने
जास्त
होती.
डोकं शांत राहते - जे लोक सुखासनात बसून जेवण करतात, त्यांचा मेंदू तणाव रहित राहण्याची
शक्यता
जास्त
असते,
कारण
यामुळे
मेंदू
रीलॅक्स
आणि
तंत्रीका
शांत
होतात.जमिनीवर बसून जेवन केल्यांनतर
एकाग्रता
वाढते.
आयुर्वेदानुसार
मन
शांत
ठेवून
जेवण
केल्यास
अन्न
व्यवस्थित
पचते
तसेच
जेवल्यानंतर
संतुष्टतेची
जाणीव
होते.
- सुखासनात बसल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो,
त्यामुळे
अन्नपचनात
मदत
मिळते.
प्राणवायुला
गती
मिळते.
यकृत
व
आमाशय
दोघांचे
कार्य
सुलभरीत्या
होते.
- टेबल-खुर्चीवर बसून जेवल्याने
शारीरिक
उष्णता
योग्यप्रकारे
निर्माण
होत
नाही,
त्यामुळे
अन्नपचनात
मदत
मिळत
नाही.
यकृत
व
आमाशय
व
मलाशयाला
हानी
पोहोचते.
पोटाचे
विकार
उद्भवतात,
मूत्ररोग
वाढतो.
आहाराकडे
फक्त सवयीने करण्याची गोष्ट न बघता यज्ञ कर्म म्हणून बघावे. त्यामुळे आपल्याला बल,
ओज आणि स्वस्थतेची प्राप्ती होईल.
सारांश
भूक
लागली की आपली हातातोंडाची गाठ पडते. परंतु, ही सवय योग्य नाही. स्वतःवर संयम हवा.
आधाशाप्रमाणे अन्नग्रहण करणे उचित नाही. म्हणून समोर पंचपक्वान्नयुक्त ताट असो नाहीतर
पिठले भाकरी, दोन वेळचे जेवण ज्याच्या कृपेने मिळत आहे, त्या अन्न दात्याचे म्हणजे
परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे आणि ते शिजवून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार
मानायचे संस्कार आपल्यावर घातले आहेत. म्हणून 'वदनी कवळ घेता' हा श्लोक म्हणून ईश्वरत्त्व
त्या अन्नात मिसळल्यावर आपण अन्न सेवन करतो. शास्त्रामध्ये जेवण करताना पाय पसरवून, पालथी मांडी घालून किंवा पाय वर करून बसने निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. कारण पाय ताणून बसल्याने पोटाच्या नसनाड्या व जठरावर ताण पडतो. पोटाचे अवयव ताणलेल्या स्थितीत असताना खाल्याने मंदाग्नी, अपचन, वातप्रकोप यासारखे अनेकानेक पोटाचे आजार होतात. सुखासनात बसून जेवल्याने तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know