Translate in Hindi / Marathi / English

Sunday, 21 April 2024

गुडघेदुखी | आयुर्वेदिक औषधे आणि सांध्यातील वेदना आणि संधिवात उपचार गुडघा आणि सांधेदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत | गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे | गुडघेदुखी केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही होते | गुडघेदुखीची अनेक कारणे आहेत

गुडघेदुखी

 

गुडघेदुखीने हैराण

गुडघेदुखीला कायमचे बाय बाय करण्यासाठी या नैसर्गिक घटकांचा वापर करा. गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. गुडघेदुखीचा सामना केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांनाही होतो. पुरूषांपेक्षा आणि महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या अधिक बघायला मिळते. आपल्याही घरामध्ये महिलांना गुडघेदुखीच्या त्रासामुळे वैतागलेले तुम्ही बघितले असेल. तशी गुडघेदुखीची अनेक कारणे आहेत. यामध्ये सर्वांत महत्वाचे म्हणजे खराब जीवनशैली हेच आहे. वय कोणतेही असो गुडघेदुखीचा त्रास अनेकांना होतो आहे. गुडघेदुखीची समस्या अनेकांना अत्यंत कमी वयामध्ये होताना दिसते आहे. अनेक ठिकाणी उपचार करूनही गुडघेदुखीचा त्रास काही कमी होत नाही.

गुडघेदुखीवर आयुर्वेदाचे वरदान

काही विकारात सुरुवातीला तात्पुरती औषधे घेऊन कामचलावू उपचार केले जातात. आजार वाढल्यानंतर मग आयुर्वेदिय उपचारांकडे वळले जाते. अशा विकारांपैकी एक विकार म्हणजे गुडघेदुखी. सर्वसामान्यपणे अशा पेशंटकडून विचारले जाणारे प्रश् म्हणजेडॉक्टर, माझा एक गुडघा का दुखतो?’ ‘डॉक्टर हा संधीवात आहे का?’ ‘अमूक एक औषध आमच्या नातेवाईकांनी घेतले, त्यांचे गुडघे दुखणे कमी आले; पण त्याच औषधांनी माझे का कमी येत नाहीत?’ ‘डॉक्टर, वजन वाढल्याने गुडघे दुखतात, असे म्हणतात आणि वजन कमी करण्यासाठी मी चालावे म्हटले तर शक्य होत नाही. याला काय करणार?’ ‘डॉक्टर, माझ्या गुडघ्यात पाणी तर झाले नाही ना?’ असे भीतीयुक्त प्रश्नसुद्धा काहीजणांकडून केले जातात.

गुडघेदुखीच्या प्रत्येक पेशंटची वेगवेगळी अवस्था असते. कोणाचे लहापणापासून गुडघे दुखत असतात, तर कोणाचे इतर सांध्यांच्या जोडीला गुडघे दुखत असतात. काहींना चालण्याने बरे वाटते. तर अनेकांना चालण्याने वाढते. कोणाच्या गुडघ्यावर सूज असते, तर कोणाच्या गुडघ्यावर अजिबात सूज नसते. कोणाला तेल लावल्याने, शेकण्याने बरे वाटते, तर कोणाला वाटत नाही. कोणी गुडघ्याचे व्यायाम करतो तर कोणी कॅप वापरत असतो.

एकाच गुडघेदुखीच्या या अनेक अवस्था असण्याचे कारण की गुडघेदुखी ही तक्रार एक दिसत असली तरी ती वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या आजाराच्या परिणामी होत असते.

रुग्णाची अवस्था

काहीजण नियमित वेदनाशामक औषधे घेत असतात. यामध्ये काहींना स्टिरॉईडसारख्या औषधांची सवय जडलेली असते. आणि विविध दुष्परिणामही झालेले असतात. काहीजणांनी गुडघ्यातील इंजेक्शनचा वापर केलेला असतो. कोणी विशिष्ठ लेप लावत असतात. तर कोणी जाहिरातीला भुलून एखाद्या आयुर्वेदिय गोळ्या किंवा काढा घेत असतात. काही जण नुसते गुडघे शेकत असतात. ‘आयुर्वेदिक औषधअसे म्हणून प्रत्यक्षात गुपचूप इंग्लिश गोळ्या कुटून त्याचे मिश्रण करून देणार्याभोंदू वैद्यांकडूनफसलेले आणि अशा भेसळयुक्त औषधांचे कालांतराने दुष्परिणाम झालेले पेशंटही पाहण्यात आहेत. गुडघे दुखत असतानाहीकायमचे चालणे बंद होईलया भीतीने किंवाव्यायाम केल्यावर गुडघेदुखी बरी होईलया गैरसमजाणे किंवाजोडीची मैत्रीण चालायला जाते म्हणूनक्रेझ म्हणून स्वतःच्या गुडघेदुखीचा विचार करता फिरायला जाणार्या आणि आजार वाढविणार्या भगिनीही आढळतात.

गुडघेदुखीची कारणे

आघात झाल्याने, गुडघ्यातील हाडांची झीज झाल्यामुळे, गुडघ्यातील वंगण कमी झाल्यामुळे, गुडघ्यातील आतील आवरणाला सूज आल्यामुळे गुडघ्यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे, गुडघ्यात पाणी झाल्यामुळे, र्हुमॅटॉईड, आरथ्रॉयटीसमुळे, रक्तातील युरिक ॅसिड वाढल्यामुळे, अतिस्थूलपणामुळे सातत्याने उभे राहून ताण आल्यामुळे, इत्यादी विविध कारणांमुळे गुडघेदुखी ही तक्रार होत असते. गुडघेदुखीवर शास्त्रीय आयुर्वेदिक उपचार करताना या कारणांची निश्चिती करूनच उपचार केले जातात. प्रत्येकाची गुडघेदुखी ही वेगवेगळ्या कारणांमुळे असते, त्यामुळे उपचारही प्रत्येकाचे भिन्न असतात.

मणक्याच्या विकारामुळे गुडघेदुखी

काहीवेळा गुडघेदुखीच्या रुग्णांत कंबर फारशी दुखत नसतानादेखील एक्स-रे केल्यानंतर अथवा एमआरआय केल्यानंतर मणक्याची सूज, मणक्याची झीज, मणक्यात गॅप आलली असणे, चकती सरकलेली असणे असे दोष आढळून येतात. ज्यामुळे कंबरेतून खाली येणार्या शीरांवर दाब पडत असतो त्यामुळे गुडघेदुखी जास्त जाणवत असते, अशावेळी मणक्याच्या विकारावर उपचार केल्यानंतर गुडघेदुखीला आराम मिळतो. असे अनुभवास येते. त्यामुळे गुडघेदुखीवर पुरेसे उपचार करूनदेखील आराम मिळत नसल्यास एकवेळा हा मणक्याचा तर आजार नसेल ना? असे समजून मणक्याच्या तपासण्या करून घ्याव्यात.

शास्त्रीय आयुर्वेदिय उपचार

शास्त्रीय आयुर्वेदिय उपचार करताना पेशंटचे वय किती आहे? त्याचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे? पूर्वी घडलेली कष्टाची कामे अथवा आघात, त्याचा दैनंदिन आहार, त्याची प्रकृती, वजन, स्थूलपणा अथवा कृशपणा तो राहतो तो प्रदेश पाण्याशी अथवा थंडीशी असणारा संपर्क त्याची सर्वसाधारण शरीराची शक्ती, पचनशक्ती, चालू असणारा ऋतू, मानसिक अवस्था .चे परीक्षण करून तसेच असणारी विविध व्यसने, शरीरातील मधुमेह किंवा रक्तदाब इत्यादी इतर विकार त्यावरील चालू असणारे उपचार, ताणतणाव, गुडघेदुखीसाठी घेतलेे गेलेले विविध उपचार या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेऊन आणि नंतरच गुडघेदुखीचे कारणे निश्चित करून मगच त्यावर उपचार केले जातात.

उपचार करताना पोटातील वातशामक औषधे, स्थानिक उपचार, आहारामधील पथ्य आणि, योग्य असे व्यायाम यांचाएकाचवेळी सांघिक वापरकेला जातो. त्यामुळे होणारा उपयोगही लवकर होऊन जास्त काळ टिकणारा मिळतो.

स्थानिक उपचार

शतावरी, अश्वगंधा, दशमूळ, निर्गुडी, लसूण, एरंड, कण्हेर, प्रसारिणी, बला, सुंटी, रास्ना, इत्यादी वातशामक औषधांनी सिद्ध केलेली वेगवेगळ्या तेलांनी, मसाज करणे आणि नंतर वाफेने अथवा काढ्यांनी ते अथवा तेलाने अथवा पाल्याने शेकणे तर काहीवेळा विविध वनस्पतीत चूर्णांचे लेप लावणे, हे स्थानिक उपचार केले जातात. गुडघ्यातील हाडांची झीज झालेली असल्यास आयुर्वेदातील बस्ती हा पंचकर्म उपचार केल्याने खूप चांगला आराम मिळतो.

पोटातील औषधे

वर सांगितलेले वातशामक वनस्पतीत औषधांचे काढे, घनसार आणि गुग्गुळ, आणि अभ्रक, माक्षिक लीठ, गोंदती, नाग, सुवर्ण, रौप्य, कुकुटककांडत्वक्, इत्यादी भस्मे यांच्या एकत्रीकरणातून झालेल्या विविध संयुक्त गोळ्या पेशंटचे प्रकृती, वय, आजाराची तीव्रता इत्यादींचा सर्वांगीण विचार करून वापरले जातात.

व्यायाम महत्त्वाचे

आयुर्वेदिक उपचारांच्या जोडीलाच वात प्रकोप करणारा आहार टाळणे महत्त्वाचे असते. दूध, सुंठ, पांढरे तीळ, बाभळीच्या डिंकाची पावडर, उडीद डाळ, आले लसून मेथ्या .चा वैद्य सल्ल्याने उपयोग करावा. आपल्या दैनंदिन कष्टाचा विचार करून योग्य असे व्यायाम करावेत. गुडघ्याला आधार देण्यासाठीनी कॅपअवश्य वापरावी. थंड वारा गारठा, ओलेपणा, पाण्यातील काम, . सी., सतत उभे राहणे, जास्त चालणे यापासून गुडघ्याचे रक्षण करावे.

गुडघेदुखी व सांधेदुखी वर घरगुती रामबाण इलाज

वयाच्या चाळिशीनंतर साधारण प्रत्येकालाच थोडयाफार प्रमाणात गुडघेदुखी जाणवते. जिन्याची चढ-उतार करणं, मांडी घालून किंवा उकिडवं बसता येणं, चालताना, पळताना होणाऱ्या हालचाली करणं या सर्व शारीरिक हालचाली अवघड होत आहेत याची जाणीव दिवसेंदिवस वाढते आणि रोजचे कामकाज करणंही अवघड होतंय हे लक्षात येतं. हे घरगुती उपचार करून पहा

व्हिटॅमिन डी चे सेवन उत्तम

ज्यांचे राहण्याचे ठिकाण दमट किंवा थंड हवामानात असते त्यांच्या शरीरात व्हिटॅमिनडीची कमतरता असते. मात्र जे भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा भागात राहतात त्यांच्या मध्ये व्हिटॅमिनडीची डेफिशिएन्सी नसते. खाद्यपदार्थातून सुद्धा शरीराला भरपूर व्हिटॅमिनडीमिळू शकते. त्यासाठी तुम्हाला अवोकॅडो, मश्रूम्स, अंडी, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे लागेल.

आपला आहार योग्य आहे का?

डॉक्टर्स देखील आंबट पदार्थ, अति स्निग्ध पदार्थ जसे की मटण, मास, चिकट पदार्थ जसे की मैदा वगैरे वर्ज्य सांगतात सांधेदुखी मध्ये.ह्याचे कारण असे आहे की आपले मोठे आतडे ह्या पदार्थांमुळे नीट काम करत नाही.. त्यामुळे हे मोठे आतडे शरीरातील बॅक्टेरिया विसर्जित करण्या ऐवजी रक्तात मिसळायला मदत करते.

आणि आपली इम्युन सिस्टीम आपल्याच टिश्यूज वर हमला करते.ह्यात नुकसान स्नायूंचे होते. जॉइन्ट्सवरच्या स्नायूंचे नुकसान झाले तर अर्थरायटीस होतो. त्यामुळे आहारावर लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे. आतड्याचे आजार उद्भवू नयेत आणि शेवटी त्यांचे रूपांतर अर्थरायटीस मध्ये होऊ नये म्हणून आहारात पुढील पदार्थ नक्की घेऊ शकता.

भाज्या,फळे,कडधान्ये,डाळी आले :

ह्यातले जिंजरॉल नावाचे द्रव्य अर्थरायटीस थांबवायला मदत करते.

ओमेगा असलेले पदार्थ आवर्जून खा

ओमेगा फॅटी ऍसिड हे शरीरातील इंफ्लेमेशन बरे करते आणि अर्थरायटीसचा त्रास निर्माण करण्याच्या प्रक्रियेलाही थांबवते असे डॉक्टर्स सांगतात.

इतकेच नाही तर हे ओमेगा शरीराचे मेटाबॉलिझम वाढवतात.. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणारे योद्धे आपले वजन झपाझप कमी करू शकतात. आणि वजन कमी होणे म्हणजेच अर्थरायटीस होण्याची शक्यता कमी होणे असेही गणित आहेच.

म्हणून हे ओमेगा फॅटी ऍसिड शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.. सगळ्या प्रकारचा सुकामेवा जसे की अक्रोड, बदाम आणि मासे जसे की टुना, सारडीन, रावस ह्यांच्या सेवनाने भरपूर ओमेगा मिळते.

मालिश सर्व प्रकारच्या सांधेदुखीवर हा एकच उत्तम उपाय आहे. तिळाचे तेल, मोहरीचे तेल, एरंडेल तेल ही स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले काही तेलाचे प्रकार आहेत जे वेदना कमी करण्यासाठी सांध्यांवर लावता येतात.

त्यानंतर अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टरांना प्रकृती दाखवल्यावर, तेही काही दिवस नवीन औषधोपचार, फिजिओथेरपी करण्याचा सल्ला देतात आणि उपचारांनी बरं वाटलं नाही, तर गुडघ्याची कृत्रिम सांधारोपणाची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचं सांगतात. शस्त्रक्रिया करण्याने किती रुग्ण बरे झाले याची आकडेवारी देतात आणि शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह धरतात.

शस्त्रक्रियेचा सल्ला ज्यांना मानवत नाही किंवा परवडत नाही, ती मंडळी पुन्हा आपल्या जुन्या उपचाराकडे वळतात. ज्यांना हा सल्ला पटतो, आर्थिकदृष्टया परवडतो, ते रुग्ण शस्त्रक्रिया करून घेऊन मोकळे होतात. शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यातील वेदना तर आजिबात नाहीशा झालेल्या असतात, म्हणून थोडा उत्साह वाढतो, पण शारीरिक हालचालीत फारशी सुधारणा झाल्याचं जाणवत नाही. तज्ज्ञ डॉक्टर धीर देतात. औषधं, विश्रांती आणि फिजिओथेरपी यातून सुधारणा होईल असं आश्वासन देतात. मांडी घालून बसणं कसं अनावश्यक आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतात.

सारांश

सांधेदुखीचा त्रास बहुधा वयस्क व्यक्तींना आयुष्याचा महत्वाचा टप्पा म्हणून केला जातो, परंतु तसे होणे आवश्यक नाही. सांध्यातील वेदना, विशेषत: गुडघेदुखी, विशेषत: दुर्बल होऊ शकते, हालचाल मर्यादित करते आणि जीवनाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम करते. जरी वय, गुडघा आणि सांधेदुखीसह होणा-या संयुक्त अधोगतीशी संबंधित सामान्यतः तीव्र वर्कआउट्स, पुनरावृत्ती खेळांच्या दुखापती आणि सांधेदुखीच्या आजारांमुळे ताणतणावाच्या परिणामी देखील होऊ शकते. कारण, उपचार, आहार आणि जीवनशैलीच्या निवडीनुसार अशा समस्या तीव्र होऊ शकतात आणि अगदी तीव्र होऊ शकतात. सांधे आणि गुडघेदुखीचे कारण काहीही असो, सांधेचे आणखी क्षीण होणे टाळण्यासाठी लवकरात लवकर परिस्थितीवर उपाय म्हणून पाऊल उचलणे महत्वाचे आहे. याचा अर्थ असा आहे की वेदनाशामक औषधांच्या पॉपिंगपेक्षा समग्र उपचारांचा वापर करा ज्यामुळे मूलभूत कारणांकडे लक्ष देता केवळ लक्षणेस आराम मिळतो. आयुर्वेदिक औषधे आणि सांध्यातील वेदना आणि संधिवात उपचार गुडघा आणि सांधेदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know