Translate in Hindi / Marathi / English

Tuesday, 16 April 2024

जांभळाचे आरोग्यदायी फायदे | मधुमेह, ह्रदयविकार, पोटाचे विकार आणि त्वचाविकारावर जांभूळ आहे | वर्षभर जांभळाच्या बिया, झाडाची साल, पानं, ज्युसेसचा आणि सिरपचा उपयोग करा | जांभूळात मोठ्या प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्व | जांभूळ खाल्ल्यानं दात आणि हिरड्या मजबूत होतात

जांभूळ

 

जांभळाचे आरोग्यदायी फायदे

जांभूळ खाल्ल्यानं आरोग्यासाठी होतात अनेक फायदे. मधुमेह, ह्रदयविकार, पोटाचे विकार आणि त्वचाविकारावर जांभूळ आहे गुणकारी. जूनचा काळ म्हणजे बाजारात जांभळं मिळतातंच. जांभूळ म्हणजे जंगली फळ. पण या फळाकडे फक्त सिझनल फळ म्हणून पाहू नका. दोन अडीच महिन्यात भरपूर जांभळं खाऊन घ्या. आणि पुढे वर्षभर जांभळाच्या बिया, झाडाची साल, पानं, ज्युसेसचा आणि सिरपचा उपयोग करा. कारण जांभळाचे १७ आरोग्यदायी फायदे आहेत. जांभूळ खाल्ल्यानंही आपण फीट राहू शकतो.

जांभळाचे आरोग्यदायी उपयोग

जांभळाचा मोठा फायदा हा मधुमेहाच्या आजारात होतो. जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचं रुपांतर ऊर्जेमध्ये होतं. जांभळाचा उपयोग मधुमेहातील प्राथमिक लक्षणांवर होतो. उदा. अति तहान लागणं, वारंवार लघवीला होणं यासारखी लक्षण जांभूळ खाल्ल्यानं बरी होतात. जांभूळाच्या फळासोबतच जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाच्या झाडाची साल, जांभळाचा रस याचाही मधुमेहावर उपचार करताना चांगला उपयोग होतो.

जांभूळात मोठ्या प्रमाणात आणि जीवनसत्त्व

जांभळाच्या झाडाच्या सालाची आणि बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी असते. डायरिया, अपचन, जुलाब यासारख्या आजारात त्यांचा उपयोग फायदेशीर असतो. जांभूळ हे नैसर्गिकरित्या रक्त शुध्द करतं. जांभळामध्ये मोठ्याप्रमाणावर लोह म्हणजेच आयर्न असतं. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानंतरही रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं. जांभूळात मोठ्या प्रमाणात आणि जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. जांभूळ हे गुणानं थंड फळ असल्यानं पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी असतं.

हे फळ उत्तम प्रतिजैविक म्हणूनही काम करतं

जांभूळात ॅस्ट्रीजेण्ट असल्यानं जांभूळ खाल्ल्यानं त्वचा चांगली राहते. विशेषत: तेलकट त्वचेकरता जांभूळ खूपच फायदेशीर असतं. जांभूळामुळे त्वचा ही मऊ आणि डागरहित राहते. शिवाय त्वचेच्या डागही जांभूळ खाल्ल्यानं कमी होतो. जांभूळामध्ये आॅक्सेलिक ॅसिड, मॅलिक ॅसिड, बेट्यूलिक ॅसिड यासारखे घटक असल्यानं जांभूळ हे फळ उत्तम प्रतिजैविक म्हणूनही काम करतं. जांभूळ खाल्ल्यानं दात आणि हिरड्या मजबूत होतात. आणि दात आणि हिरड्यात संसर्ग होत नाही. जांभूळात मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वं असतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आणि ॠतुबदलाच्या आजारावर जांभूळ फळाचं सेवन फायदेशीर ठरतं.

मूतखड्यांवर उपचार म्हणून जांभळाच्या बियांची पावडर

जांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतं. त्यामुळे जांभूळ फळाच्या सेवनाचा उपयोग त्वचा तरुण ठेवण्यासाठीही होतो. जांभूळामुळे त्वचेवर वाढत्या वयाच्या खुणा दिसत नाहीत. जांभळाच्या बियांची पावडर गायीच्या दूधात मिक्स करुन हा लेप चेहेऱ्याला लावल्यास चेहेऱ्यावरच्या मुरुम, पुटकुळ्या निघून जातात. मूतखड्यांवर उपचार म्हणून जांभळाच्या बियांची पावडर योगर्टसोबत घ्यावी. जांभळाचं व्हिनेगर/ सिरप दिवसातून दोन ते तीन वेळेस पाण्यासोबत समप्रमाणात घेतल्यास भूक वाढते.

जांभळाच्या ज्यूसच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती वाढते

जांभळाचं ज्यूस पाण्यात घालून ते पाणी त्वचाविकारात त्वचेला लावल्यास फायदेशीर ठरतं. जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, ऍनिमिया यावरही होतो. तसेच जांभळाच्या ज्यूसच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती वाढते. जांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्यानं जांभूळ खाल्ल्यानंतर ह्रदयविकारापासून दहा हात दूर राहाता येतं जांभूळ खाल्ल्यानं ह्रदय सशक्त होतं आणि हायपरटेन्शन होत नाही.

जांभळाच्या बिया

जांभळाचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी करण्यात येतो. जांभूळ आहे हे फळ मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, याकृत रोग आणि रक्तजन्य विकारात अतिशय लाभदायक आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बिया या चूर्णाच्या स्वरूपात देणे सर्वोत्तम उपाय मानला जातो. जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो.

जांभळाच्या बियांचे फायदे

जांभळाच्या बीमध्ये अँटी-डायबेटीस गुणधर्म आढळतात. त्यात असलेल्या अल्कोलीड्स केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते. टाईप-2 मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात.

जांभळाच्या बीमध्ये अल्कोलीड्स केमिकल आढळते. सर्व संशोधनात असे दिसून आले आहे की, हाय बीपी कमी करण्यात अल्कोलीड्स आम्ल खूप उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना रक्तदाब कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. बर्याच तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, अॅलिक अॅसिडच्या वापरामुळे रक्तदाब सुमारे 36 टक्के कमी केला जाऊ शकतो.

जांभळाची बी पाण्यात उगाळून चेहऱ्यावरती लेप केल्याने चेहऱ्यावरती आलेल्या तारुण्यपिटिका म्हणजेच मुरुमे बरे होण्यास मदत होते. मुलतानी माती, चंदन पावडर जांभूळ पावडर यांचे एकत्रित मिश्रण करून याचा लेप चेहऱ्यावरती नियमित लावल्यास मुरमे नाहीसे होतात.

या फळामध्ये क्रूड फायबर आढळते. पाचक प्रणाली सुधारण्यासाठी क्रूड फायबर अतिशय उपयुक्त आहे.

मुतखड्याची समस्या असणाऱ्यांनी जांभळाच्या बियांची पावडर दह्यात मिसळून खावी. यामुळे मुतखडा निघून जातो.

दात आणि हिरड्या चांगल्या आरोग्यासाठी देखील जांभूळ खूप फायदेशीर आहे. याच्या बियांमध्ये कॅल्शियम असते. त्याचा वापर केल्याने दात आणि हिरड्या मजबूत राहतात.

जर बोलण्यात काही अडचण येत असेल, तर जांभळाच्या बियांच्या काढ्याने गुळण्या करा. यामुळे आवाज स्पष्ट होतो.

जर आपल्याला गॅस्ट्रिक समस्येमुळे त्रास होत असेल तर, जांभळाच्या बिया वापरल्यास या समस्येपासून आराम मिळू शकेल. पावडर किंवा जांभळाच्या बियांचा अर्क प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते.

जांभळाच्या बियांची पावडर कशी बनवाल?

जांभळाच्या बिया स्वच्छ धुवून, त्या उन्हात वाळवा. उन्हात व्यवस्थित वाळल्यानंतर सोलून घ्या. त्यांनतर या बिया चांगल्या वाळल्यानंतर चांगल्या बारीक वाटून पावडर करून घ्या. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा पावडर मिसळून प्या.

जांभूळ अशक्तपणा दूर होतो. हर्बल तज्ञांचे सूत्र सांगतात की 100-150 ग्रॅम जांभूळ 15 दिवस सतत चघळल्याने रक्त शुद्ध होते आणि ऍनीमियामध्ये देखील फायदेशीर आहे, त्वचेच्या संसर्गामध्ये देखील ते फायदेशीर आहे. जामुनची फळे आदिवासी लोकांच्या मते चांगली दृष्टी आणि शारीरिक शक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. आदिवासी पिकलेले जामुन हाताने घासून बिया बाजूला ठेवतात, मिळालेला लगदा चवीनुसार गुळात मिसळून खातात. तसे, आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे तार्किक सूत्र आहे, इतके समजून घ्या की फळांमध्ये कॅरोटीन आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते आणि गुळात लोह पुरेसे असते. असे मानले जाते की गर्भवती महिलांना जांभूळ फळ दिल्यास लोहाची कमतरता होत नाही. मधुमेहींना जांभळाच्या बियांचे चूर्ण देतात. 2 ग्रॅम बियांचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ जेवणानंतर किंवा एक कप कोमट पाण्यात मिसळून घ्यावे असे सांगितले जाते. आधुनिक विज्ञानानेही जांभूळच्या या गुणधर्मांवर खूप अभ्यास केला आहे आणि त्याचे परिणामही समाधानकारक आहेत. तसे ते नियमित घेतले तरी हरकत नाही. जांभूळ बी टूथपेस्ट: मध्य प्रदेशातील बालाघाटमधील लांजी भागात लोक वाळलेल्या बियांची पावडर टूथपेस्ट म्हणून वापरतात. असे म्हटले जाते की जांभूळच्या बिया केवळ श्वासाची दुर्गंधी, हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट करत नाहीत तर हिरड्या मजबूत करतात. त्याच्या दातूननेही दात स्वच्छ केले जातात. जांभूळची साल देखील हिरड्यांसाठी फायदेशीर आहे. जांभूळच्या सालाची पावडर (एक चमचा) साधारण कपभर पाण्यात मिसळून, उकळून, थंड झाल्यावर धुवून घेतल्यास हिरड्यांची जळजळ, दातदुखी आणि हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येत खूप आराम मिळतो. सांधेदुखीमध्ये जांभूळ फायदेशीर आहे. जांभूळची साल बारीक करून घट्ट पेस्ट बनवा, त्याची जाड पेस्ट २ चमचे पाण्यात घालून सांधेदुखीच्या ठिकाणी आणि गुडघ्यांवर दिवसातून ३ ते ४ वेळा लावल्यास सांधेदुखीपासून आराम मिळू लागतो. जामुनची फळे खाल्ल्याने सांधेदुखीपासूनही आराम मिळतो, ते दाहक-विरोधी देखील असतात. किडनीच्या आरोग्यासाठीही जांभूळचे दाणे खास मानले जातात. जांभूळच्या दाण्यांची पावडर (4 ग्रॅम) कपभर दह्यामध्ये मिसळून रोज खाल्ल्यास दगडांवर फायदा होतो. जांभूळचा वापर यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. जांभूळ फळ बद्धकोष्ठता आणि पोटाच्या आजारांवर खूप फायदेशीर आहे.

सारांश

जांभळाच्या फळामध्ये लोह आणि फॉस्फरस सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. जांभळाच्या फळांबरोबरच, त्याच्या बिया (दाणे), पाने, साल आणि इतर भागांमध्ये देखील प्रचंड औषधी गुणधर्म आहेत आणि आदिवासी देखील विविध हर्बल उपचारांसाठी जांभळाचे सर्व भाग वापरून पहातात. खेड्यापाड्यातील वनौषधी तज्ज्ञांचे असे मत आहे की, जेवणानंतर १०० ग्रॅम जांभूळ फळाचे सेवन ऋतूतील बदलांशी संबंधित अनेक विकारांमध्ये खूप फायदेशीर ठरते. ऍनिमिया दूर करण्यात आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जांभूळ पूर्णपणे ठोस आहे. डांग- गुजरातच्या आदिवासी वनौषधी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जांभूळ आणि करवंदे फळांचा रस समान प्रमाणात मिसळून प्यायल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि ज्यांना ऍनिमिया आहे त्यांच्यासाठी ते फायदेशीर आहे.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know