Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 10 April 2024

तमालपत्र बहूउपयुगी वनस्पती | दालचिनी व तमालपत्र हे मसाल्यातील अत्यंत महत्वाचे मसाले आहेत. दालचिनीच्या झाडापासूनच तमालपत्र मिळते | तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत | तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते | दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात

तमालपत्र बहूउपयुगी वनस्पती

 

तमालपत्राचे औषधी उपयोग

तमालपत्राचा (दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक आहे. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे. तसेच तमालपत्र खाणे एक अत्यंत फायद्याचे आहे.

तमालपत्राचे फायदे

1.    तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. पोटातील ज्या काही समस्या असतील तर तमालपत्रामुळे दूर होतात. चहामध्ये तमालपत्रचा वापर करा. कप, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.

2.   तमालपत्राचा लाभ डायबिटीज रुग्णाला होता. सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हा तमालपत्राचा प्रभाव सकारात्मक दिसून येत आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे. ते त्यांना अधिक लाभदायक आहे. 

3.   तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करा. काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्राशन करावे.

4.   तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करुन पिणे. किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते. 

5.   जर तुम्हाला वेदना होत असतील तर तमालपत्र हा त्यावर चांगला उपाय आहे. तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो. डोके दुखत असेल. मान दुखत असेल तर तेलाने मसाज केल्याने त्याचा लाभ मिळतो.

जेवणातच नाही तर 'या' कारणांसाठी देखील तमालपत्र फायदेशीर

तमालपत्राचा (दालचिनीचे पान) जास्त वापर हा भारतीय मसाल्यांमध्ये केला जातो. पण तमालपत्र फक्त जेवणाचीच चव वाढवत नाही, तर ते तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. तमालपत्रात अनेक औषधी गुण आहेत. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांची मात्रा अधिक आहे. त्यामुळे तमालपत्राचा जेवणात वापर हा फायदेशीर असतो. पण तमालपत्राचा वापर फक्त खाण्यासाठीच नाही, तर इतर गोष्टींसाठी देखील केला जातो.

) घरात उंदीर आणि चिचुंद्रीनं धुमाकूळ घातला असेल, तर घराचे कोपरे, किचन आणि कपाटात तमालपत्र ठेवावे. उंदरांना तमालपत्राचा वास सहन होत नाही. तमालपत्राच्या वापरानं उंदीर घरातून पळ काढतील.

) तमालपत्राचा वापर झुरळ पळवण्यासाठी देखील केला जातो. किचन आणि कपाटाच्या कोपऱ्यांमध्ये किंवा झुरळं असलेल्या ठिकाणी एका प्लेटमध्ये तमालपत्र जाळून त्याचा धूर करा. याच्या वासामुळे झरळं बाहेर जातील.

) तमालपत्र आणि थोडेसे मीठ पाण्यात टाकून उकळून घ्या. ज्या ठिकाणी मुंग्या आहेत तिथे स्प्रे करा.

) तमालपत्र पाण्यात टाकून उकळून त्याची वाफ घ्या. तुम्हाला फ्रेश वाटेल.

) केसात कोंडा झाला असेल तर यावर तमालपत्र उपयुक्त आहे. तमालपत्र आणि दही मिसळून केसांमध्ये लावून केस धुवा. कोंडा दूर होईल.

) केसांमध्ये उवा झाल्या असतील, तर तमालपत्र पाण्यात उकळून घ्या. ते पाणी गार करून त्यानं केस धुवून घ्या. महिन्यातून ते वेळा हे केल्यावर उवा कमी होतील.

) तमालपत्र बारीक करून चाळून घ्या. आठवड्यातून दोन वेळा याने दातांना मसाज करा. पिवळेपणा कमी होईल.

) शरीरावर कुठे मुका मार किंवा इतर काही कारणांमुळे वेदना होत असतील, तर तमालपत्राच्या तेलानं मसाज करा.

) बाजारात असणाऱ्या रूम फ्रेशनरचा वापर करण्यापेक्षा तमालपत्राचा वापर करावा. यासाठी तमालपत्र, लवंग आणि दालचिनी पाण्यात उकळा. आता हे पाणी कापसात डिब करून रुममध्ये ठेवा. हे रूम फ्रेशनरचे काम करेल.

१०) तेजपत्ता तांदूळ, डाळ किंवा एखाद्या धान्यात ठेवा. त्यामुळे त्यात कुठलेच किडे होणार नाहीत.

तमालपत्राची शेती

आहारात सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या तमालपत्राची शेती खूप फायदेशीर ठरु शकते. तमालपत्राला इंग्रजीत बे लीफ असे म्हटले जाते.

प्रत्यक्ष शेती किंवा शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.

तमालपत्राची शेती कशी सुरु कराल?

आपण तमालपत्राची लागवड सहजपणे सुरू करू शकता. ही शेती करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात थोडी मेहनत करावी लागेल. जसजसे झाडे वाढतात तसतसे तुमच्या उत्पन्नात वाढ होत जाईल. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून तमालपत्राची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान दिले जाते.

किती उत्पन्न मिळणार?

नफ्याबद्दल बोलायचे झाले तर एका तमालपत्राच्या रोपातून तुम्ही वर्षाला 5 हजार रुपये कमवू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही वर्षाला 25 तमालपत्राची झाडे लावली तर तुम्हाला 75 हजार ते 1 लाख 25 हजार वार्षिक उत्पन्न मिळू शकते.

तमालपत्र लागवड माहिती

तमालपत्र हे एक मसाला पीक आहे. तमालपत्र पिकाचे शास्त्रीय नाव हे लॉरस नोबिलिस आहे.तमालपत्र  पिकाचे उगमस्थान हे भूमध्य आहे. तमालपत्र पिकाची शास्त्रीय फॅमिली ही लॉरासी आहे. भारतामध्ये तमालपत्र पिकाचा उपयोग हा मसाला पीक म्हणून केला जातो. भारतामध्ये मुख्यतः वर्षाकाठी हंगामामध्ये तमालपत्र ची लागवड केली जाते.

तमालपत्र (तेज पान) पिकासाठी आवश्यक मृदा

तमालपत्र पीक लागवडीसाठी मुख्यतः सुप्रसिद्ध, सुपीक चिकणमाती माती प्रकारची माती लागते तसेच जमिनीचा पीएच हा 6.0-7.0 असावा. जमिनीमध्ये जास्त प्रमाणात ऑरगॅनिक कंटेंट असेल तर याचा तमालपत्र पिकाच्या वाढीसाठी विशेष फायदा होतो.

तमालपत्र पिकासाठी बियाणे आणि लागवड

तमालपत्र पीक लावणी करत असताना संबंधित पिकामधील अंतर हे 1.5*1.5 मी इतके ठेवावे तसेच तमालपत्र पिकासाठी प्रति हेक्टर 2-3 किलो/हेक्टर बीज लागते. तमालपत्र (तेजपान) लागवडी पूर्वी बीज प्रक्रिया केल्यास चांगला फायदा दिसून येतो. बीज प्रक्रियेच्या मदतीने झाडांची वाढ चांगली होते रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

तमालपत्रसाठी आवश्यक जमीन आणि हवामान

तमालपत्र, एक सुगंधित औषधी वनस्पती, विविध प्रकारच्या हवामानात घेतले जाते परंतु समशीतोष्ण प्रदेशात तापमान असलेल्या तापमानात 15-25 डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ चांगली होते. 6.0-7.5 च्या पीएच श्रेणीसह सुसज्ज माती तमालपत्र साठी योग्य आहेत. भूमीच्या तयारीमध्ये नांगरणी करणे आणि बारीक बियाणे तयार करण्यासाठी त्रास देणे समाविष्ट आहे. तमालपत्र सामान्यत: थंड हंगामात लागवड केली जाते.

तमालपत्र चे महत्त्वाचे वाण

तुर्की बे, कॅलिफोर्निया बे, ग्रीक बे, स्पॅनिश बे हे तमालपत्र पिकाचे महत्त्वाचे वान आहेत तसेच भौगोलिक रचनेनुसार तमालपत्र पिकाचे अन्य देखील वाण असतात. वेगवेगळ्या मसाला पीक चे वेगवेगळ्या परिसरामध्ये विविध प्रकारचे वाण अस्तित्वात असू शकतात.

तमालपत्र साठी खत व्यवस्थापन

तमालपत्र साठी विविध नैसर्गिक खतांचा उपयोग केला तर चांगला फायदा मिळतो जसे की गांडूळ खत, शेणखत यांचा नियमित वापर केला तर वर्षाकाठी मध्ये जमिनीचा पोत सुधारतो आवश्यक 6.0-7.0 ph हा तमालपत्र पिकासाठी प्राप्त होतो तसेच आपण रासायनिक खतांचा देखील 1.5 *1.5 मी प्रमाणात उपयोग करू शकतो त्यामध्ये नत्र, स्फुरद तसेच पालाश चा समावेश होतो.

दालचिनी तमालपत्र हे मसाल्यातील अत्यंत महत्वाचे मसाले आहेत. दालचिनीच्या झाडापासूनच तमालपत्र मिळते. दालचिनीच्या झाडाची साल वाळवून दालचिनी तयार होते. तमालपत्राच्या तेलाचा उपयोग केला जातो. आपण आज दालचिनी तसेच तमालपत्राची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

तमालपत्र आणि दालचिनी

दालचिनी तयार करण्याची पद्धत

. दालचिनीची लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षी नोव्हेंबर ते मे महिन्यात दालचिनीचे झाड तोडून त्याचे साल काढून दालचिनी तयार होते.

. चौथ्या वर्षांपासून झाड तोडता त्याच्या तयार फांद्या तोडून साल काढून घ्यावे.

. झाडाचे साल सहजपणे निघत असल्यासच झाडाची तोडणी करावी.

. आवश्यकतेनुसार झाडाच्या फांद्यांचे दोन ते अडीच फुटाचे तुकडे करावेत.

. फांद्या तोंडल्यांनंतर शक्यतो लगेचच साल काढावीत.

. साल काढल्यानंतर सावलीत वाळवावी.

. साल वाळवतांना प्लास्टिक पाईप ला बांधून ठेवावीत जेणेकरून सालीची प्रत खालावणार नाही.

. साल बिना बांधल्या वाळवल्यास साल गुंडाळले त्यामुळे सालीचा आतील भाग नीट वाळत नाही.

. साधारणतः ते दिवसात साल वाळते. त्यांनतर हवाबंद डब्यात साठवून ठेवावेत.

तमालपत्र तयार करण्याची पद्धत

. दालचिनीचे झाड तोंडल्यानंतर फांद्यांवरची पाने काढून वेगळी करून घ्यावी.

. ही पाने सावलीत चांगली वाळवावीत.

. ही पाने वाळण्यानंतर विक्रीस पाठवावीत.

. एका झाडापासून . ते किलो तमालपत्रे मिळतात.

सारांश

लॉरस नोबिलिस प्लांटमधील तमालपत्र, त्याच्या चवदार पानांसाठी लागवड केलेली सुगंधी औषधी वनस्पती आहे. चांगल्या निचरा झालेल्या माती आणि सूर्यप्रकाशात भरभराट, तमालपत्र पाककृती डिशेस, सूप आणि स्टूमध्ये वापरले जाते. समशीतोष्ण हवामानात तमालपत्राची लागवड करणे सामान्य आहे, विविध पाककृतींच्या समृद्ध चवमध्ये योगदान देते. तमालपत्र विशेषतः अमेरिका आणि युरोप, भारत यासह अनेक देशांमध्ये अन्नात वापरले जाते. ते सूप, स्टू, मांस, सीफूड आणि भाजीपाला पदार्थांमध्ये वापरले जातात. ही पाने बहुतेक वेळा त्यांच्या पूर्ण आकारात वापरली जातात आणि सर्व्ह करण्यापूर्वी काढली जातात. भारत आणि पाकिस्तानमध्ये, याचा वापर दररोज बिर्याणी आणि इतर मसालेदार पदार्थांमध्ये आणि स्वयंपाकघरात गरम मसाला म्हणून केला जातो. आपल्या जेवणात वापरण्यासोबतच ते आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे अनेक देशांमध्ये उत्पादित केले जाते. त्याचे बहुतेक उत्पादक देश भारत, रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स आणि उत्तर अमेरिका आणि बेल्जियम .

तमालपत्र ला आपण इंग्रजीमध्ये बे-लीफ असे म्हणतो. तमालपत्र हे भारतामध्ये पिकवले जाणारे एक महत्त्वाचे नॉनफोडर पीक आहे. तसेच या पिकाचे विविध वैद्यकीय गुणधर्म देखील आहेत.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know