Translate in Hindi / Marathi / English

Friday, 12 April 2024

डायबेटिस आणि इन्शुलिनचे इंजेक्शन | इन्सुलिन म्हणजे काय | डायबेटिसमधील ३० टक्क्यांहून अधिक रुग्ण रोज इन्शुलिनचे इंजेक्शन टोचून घेत असतात | काय आहे इन्शुलिन | 14 नोव्हेंबर, जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो | इन्शुलिन बाटली काचेची असल्याने आतल्या औषधावर हवेच्या तापमानाचा परिणाम चटकन होतो

डायबेटिस आणि इन्शुलिनचे इंजेक्शन

 

इन्सुलिन म्हणजे काय

जगभरात ४२. कोटी लोक मधुमेहाने पीडित आहेत. . कोटी लोक रोज सीरिंजने इन्शुलिन घेत आहेत. 'टाइप ' डायबेटिसचे सर्व रुग्ण आणि 'टाइप ' डायबेटिसमधील ३० टक्क्यांहून अधिक रुग्ण रोज इन्शुलिनचे इंजेक्शन टोचून घेत असतात. रोजच्या या इंजेक्शनबद्दल शास्त्रशुद्ध तांत्रिक माहिती खूप कमी जणांना असते आणि त्याचमुळे इंजेक्शनबद्दल अफवा आणि अज्ञान फार प्रमाणात दिसते.

कोणी लावला 'इन्शुलीन'चा शोध?

100 वर्षांपूर्वी, 1921 मध्ये संशोधकांना, शरीरातील साखर नियंत्रणात ठेवणाऱ्या 'इन्शुलीन'चा शोध लागला. विज्ञानातील क्रांतिकारी संशोधांमध्ये, 'इन्शुलीन'चा शोध समाविष्ट आहे. कॅनडाच्या टोरॉन्टो विद्यापिठातील, प्रसिद्ध अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. फेड्रीक बॅटींग, आणि त्यांच्या सोबत काम करणारा त्यांचा सहकारी, विद्यार्थी चार्ल्स बेस्ट, यांना 'इन्शुलिन'चं जनक मानलं जातं. इन्शुलीनच्या शोधात, टोरॉन्टो विद्यापिठातील शरीरविज्ञान विभागाचे प्रमुख, डॉ. जेजेआर मॅकलॉईड यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. तर, 'इन्शुलीन' शुद्ध करण्यासाठी, जेम्स कोलिप यांनी अपार कष्ट घेतले होते. इन्शुलीनच्या शोधासाठी 1923 साली, डॉ. फेड्रीक बॅटींग आणि डॉ. जेजेआर मॅकलॉईड यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं.

दरवर्षी, 14 नोव्हेंबर, जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. इन्शुलिनचे शोधकर्ता डॉ. फेड्रीक बॅटींग यांचा हा जन्मदिवस आहे.

काय आहे इन्शुलिन?

इन्शुलिन हे प्रथिन आहे. इन्शुलिन एक विशेष प्रकारचे हार्मोन आहे. इन्शुलिनचे मुख्य काम शरीरात शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आहे. इन्शुलिन एक विशेष प्रकारचे हार्मोन आहे, जे स्वादुपिंडात तयार होते. स्वादुपिंडात खूप साऱ्या पेशी असतात. त्यापैकी एका पेशीचे नाव बीटा सेल आहे. इन्शुलिनच्या हार्मो नला एनाबॉलिक हार्मोनसुद्धा म्हटले जाते. हे हार्मोन शरीराच्या विकासासाठी जबाबदार आहे. उदाहरणार्थ, आपण जे खातो, ते शरीराच्या विकासात कोणत्या प्रकारे उपयोगी पडेल हे मोठ्या प्रमाणात इन्शुलिनवर अवलंबून असते. इन्शुलिनचे मुख्य काम शरीरात शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आहे. पचल्यानंतर अन्न ग्लुकोजमध्ये बदलते. शरीरात जेव्हा ग्लुकोजचे प्रमाण वाढते, तेव्हा बीटा सेल्सना सिग्नल मिळतो. त्यानंतर बीटा सेल्समध्ये तयार होणारे इन्शुलिन या ग्लुकोजला शरीरातील लहान लहान पेशींमध्ये विभागते. त्यामुळे शरीरात ग्लुकोजचे प्रमाण संतुलित राहते.

'टाइप १' डायबेटिसचे सर्व रुग्ण आणि 'टाइप २' डायबेटिसमधील ३० टक्क्यांहून अधिक रुग्ण रोज इन्शुलिनचे इंजेक्शन टोचून घेत असतात. रोजच्या या इंजेक्शनबद्दल शास्त्रशुद्ध तांत्रिक माहिती खूप कमी जणांना असते आणि त्याचमुळे इंजेक्शनबद्दल अफवा आणि अज्ञान फार प्रमाणात दिसते; म्हणून आज ही माहिती घेऊ. इन्शुलिन हे प्रथिन आहे. ते तोंडाने घेतले, तर त्याचे पचन होऊन जाईल. त्यामुळे इंजेक्शनव्यतिरिक्त इतर मार्गांनी इन्शुलिन घेण्याचे आजपर्यंतचे प्रयत्न पूर्णत्वास गेलेले नाहीत.

इन्शुलिन औषध बाटलीत, डिस्पोजेबल पेन, पर्मनंट पेनची रिफिल या तीन स्वरूपात उपलब्ध आहे. इन्शुलिनची नावे, घटक, कार्यपद्धती वेगवेगळी असते आणि त्याची नावेही वेगवेगळी असतात. ती नावे आणि प्रमाण अचूकतेने लक्षात ठेवावे. चुकीचे इंजेक्शन घेतल्यास त्रास होतो. इन्शुलिन बनविणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. लहानपणी इंजेक्शनचा बागुलबुवा हा मोठ्यांच्या धाकामुळे आलेला असतो. तो सोडून द्या. पूर्वीच्या इंजेक्शनप्रमाणे काचेच्या सिरींज, मोठ्या सुया, त्या उकळवण्याची कटकट, फुटण्याची भीती, चुकीचे डोस घेताना वेदना, हे सगळे विसरून जा; कारण इन्शुलिन इंजेक्शन घेणे हे अत्यंत सोपे आणि वेदनाविरहित आहे. इन्शुलिन टोचण्यासाठी डॉक्टर, नर्स किंवा अगदी नातेवाईकांचीही गरज नसते. ते आपले आपल्याला सुलभतेने घरी, बाहेर, ऑफिसमध्ये असे कुठेही घेता येते. इन्शुलिनच्या सुया या न दुखणाऱ्या, अत्यंत लहान, निर्जंतुक केलेल्या, सर्वत्र उपलब्ध, स्वस्त आणि अचूक ठिकाणी इंजेक्शन टोचणाऱ्या असतात. या रोजच्या इंजेक्शनमुळे पोट, मांड्या किंवा इतर कोणत्याही अवयवाला कोणतीही इजा होत नाही. मात्र, ते घेण्याचे तंत्र अचूक हवे.

अधू डोळ्यांसाठी चष्मा ही जशी गरज आहे; तसेच अधू स्वादुपिंडासाठी इन्शुलिन ही सवय असून, गरज आहे. डोळ्याला चष्मा लागणे हा जसा गंभीर जीवघेणा उपचार नाही; तसेच रोज इन्शुलिन घेणे हा जीवघेणा किंवा गंभीर उपचार नाही. आहारविहाराचे पथ्य व शिस्त ही प्रत्येक मधुमेहीला पाळावी लागते, किंबहुना गोळ्यांसाठी ती जास्त पाळावी लागते. हल्ली जेवणाशी काहीही संबंध नसलेली अत्यंत उपयुक्त इन्शुलिन बाजारात आली आहेत. इन्शुलिन आणि जेवण दोन्हीची वेळ पाळावी. इन्शुलिन बाटलीत ४०० युनिट, तर पेनमध्ये ३०० युनिट इंजेक्शन असते. ४० आयव्ही इन्शुलिन आणि १०० इंटरनॅशनल युनिट इन्शुलिन बाटल्या वेगवेगळ्या असतात आणि त्यासाठी वेगवगेळ्या सुया असतात. एकाची सुई दुसऱ्याला वापरली, तर डोस चुकतो. सुया डिस्पोजेबल असतात. रेग्युलर इन्शुलिन ३०:७०, ५०:५० लाँग अॅक्टिंग इन्शुलिन अशा विविध इन्शुलिनला जागतिक स्तरावर सर्व देशांसाठी आणि सर्व इन्शुलिन कंपन्यांसाठी एक समान, असा प्रत्येक इन्शुलिन प्रकाराचा वेगवेगळा कलर कोड असतो. जसे ३०:७० इन्शुलिनला चॉकलेटी रंग, रेग्युलर इन्शुलिनला पिवळा रंग इ.

इन्शुलिन बाटली काचेची असल्याने आतल्या औषधावर हवेच्या तापमानाचा परिणाम चटकन होतो. त्यामुळे बाटली फ्रीजच्या दारात ठेवावी लागते. फ्रीज नसल्यास माठाला ओला टॉवेल गुंडाळून माठात ठेवली जाते. इन्शुलिन पेनला मात्र असे नाही. ते पेन रुम टेंपरेचरलाही योग्य राहते; तरीही प्रवासासाठी कूल बॅग्जही मिळतात. मोठ्यांसाठी ९० अंश कोनात आणि मुलांसाठी ४५ अंश कोनात ६ एमएम सुई आवश्यक त्या ठिकाणी पोहोचते. कोन चुकल्यास इंजेक्शन कातडीतच राहते आणि कातडीखाली पोहोचत नाही. त्यामुळे कातडीवर चट्टे उठतात आणि इन्शुलिनचा उपयोगही चुकीचा होतो. इन्शुलिन इंजेक्शन शिकवण्यासाठी घरपोच आणि मोफत सेवा देण्याची सोय असते. इन्शुलिनला इतर गोळ्या आणि आहाराविहाराची जोड आवश्यक असते. इन्शुलिन म्हणजे जादू नाही, की चुटकीसरशी सर्व विनासायास नॉर्मल होईल. एकमेकांच्या सुया वापरू नयेत. अस्वच्छ सुया मोडून टाकाव्या, बोथट सुया बदलाव्या. इन्शुलिन टोचण्याची जागा स्वच्छ असावी. टोचण्यापूर्वी इन्शुलिन हलवून एकजीव करून मग टोचावे. या सगळ्या सूचना पाळल्यास इन्शुलिन हे मधुमेहींचे अमृत आहे, याची अनुभूती येईल.

कॅप्सूलच्या माध्यमातूनही इन्शुलिन

वैज्ञानिकांनी शरीराला इन्शुलिन पुरविण्यासाठी एक नवीन पद्धत शोधली आहे. त्यानुसार मधुमेहाचे पेशंट्स आता कॅप्सूलद्वारेसुद्धा इन्शुलिन घेऊ शकतील. यामुळे इन्शुलिनसाठी सीरिंज किंवा इन्शुलिन पंपाची गरज समाप्त होऊ शकते. विज्ञानपत्रिका नेचर नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे. संशोधनानुसार वैज्ञानिकांनी इन्शुलिन देण्यासाठी विशेष प्रकारचे नॅनो कण विकसित केले आहेत. या नॅनो वाहकात इन्शुलिन आहे. हे कण मानवी केसांच्या

/ १०,००० भाग इतके लहान आहेत. ते इतके लहान आहेत की, त्यांना सामान्य मायक्रोस्कोपमधून पाहता येणार नाही. या नॅनो वाहकांच्या माध्यमातून डायबिटीसच्या पेशंट्सच्या लिव्हरपर्यंत इन्शुलिन पोहोचविणे जास्त सोपे आहे. संशोधकांनी सांगितले की, इन्शुलिनविषयी समस्या ही आहे की, ते शरीरात विघटित होते आणि अशा प्रकारे शरीरात जिथे त्याची आवश्यकता असते, तिथे पोहोचू शकत नाही. तोंडाने घेता येईल असे मधुमेहाचे औषध विकसित करण्यात

हे एक मोठे आव्हान ठरले आहे. प्रमुख संशोधक पीटर मॅककोर्ट म्हणाले की, आम्ही पचनतंत्राच्या माध्यमातून पोटातील अॅसिड आणि पचन एंझाइम्सद्वारे इन्शुलीनला तुटण्यापासून वाचविण्यासाठी एक कोटिंग बनविले आहे. हे त्याला आपले मुक्कामाचे ठिकाण म्हणजे लिव्हरपर्यंत पोहोचेपर्यंत सुरक्षित ठेवते. या कोटिंगला एंझाइम्सद्वारे लिव्हरमध्ये तोडण्यात येते, ते केवळ तेव्हाच सक्रिय होतात जेव्हा रक्तशर्कराचा स्तर जास्त असतो.

सारांश

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे अनेकांना वजनवाढीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. वजन कमी करताना कमी कॅलरीजचं सेवन करणं आणि फॅट्सयुक्त पदार्थांचं मर्यादित सेवन करणं हा सर्वांत सोपा मार्ग आहे. अनेकांना याचा उपयोग होतो आणि त्यांचं वजन नियंत्रणात येतं; पण वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला इन्सुलिन रेझिस्टन्स असेल आणि टाइप 2 डायबेटीसचा धोका असेल तर? ‘स्क्रिप्स क्लिनिक सेंटर फॉर वेट मॅनेजमेंटमधले एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि वेट मॅनेजमेंट एक्सपर्ट, मायकेल डब्ल्यू. ली (एमडी) यांच्या मते, अशा व्यक्तीने डॉक्टरांशी सल्लामसलत केली पाहिजे. ‘स्क्रिप्सने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? इन्सुलिन हे आपल्या स्वादुपिंडाने तयार केलेलं एक मेटाबॉलिक हॉर्मोन आहे. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपल्या शरीरातल्या पेशींना रक्तातली साखर किंवा ग्लुकोजच्या स्वरूपात इंधन त्वरित वापरासाठी उपलब्ध आहे, हे सांगण्याचं काम इन्सुलिन करतं. काही प्रकरणांमध्ये विविध कारणांमुळे, शरीरातल्या पेशी इन्सुलिनला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत आणि रक्तातून साखर सहजपणे घेऊ शकत नाहीत. अशा वेळी हाय ब्लड शुगर लेव्हल कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्वादुपिंड अधिक इन्सुलिन तयार करून प्रतिक्रिया देतं. ही स्थिती हायपरइन्सुलिनेमिया म्हणून ओळखली जाते. पेशी इन्सुलिनला खूप प्रतिरोधक बनल्या तर त्याचा परिणाम रक्तातल्या शुगर लेव्हलवर होऊ शकतो. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे वजन वाढू शकतं, प्रीडायबेटिक परिस्थिती उद्भवू शकते आणि टाइप 2 डायबेटीस होऊ शकतो. इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यास वजन कमी करणं अधिक कठीण होतं. कारण, शरीर रक्तातली अतिरिक्त साखर चरबी म्हणून साठवतं.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know