पंचामृत
पंचामृत ब्रेन टॉनिक
पंचामृतमध्ये
दूध,
दही
आणि
तूप
यांसारखे
दुग्धजन्य
पदार्थ
असतात.
परिणामी,
त्यात
कॅल्शियमचे
प्रमाण
जास्त
असते
आणि
हाडे
आणि
स्नायू
मजबूत
करण्यास
मदत
होते.
या
व्यतिरिक्त,
त्यात
अनेक
नैसर्गिक
अँटिऑक्सिडंट्स
देखील
असतात,
जे
शरीरातील
हानिकारक
मुक्त
रॅडिकल्स
निष्प्रभावी
करण्यात
आणि
ऑक्सिडेटिव्ह
तणाव
कमी
करण्यात
मदत
करतात.
पंचामृत
ब्रेन
टॉनिक
म्हणून
काम
करते.
हे
प्रजनन
प्रणाली
मजबूत
करण्यास
देखील
मदत
करते.
पंचामृत हा वाटीत घेऊन खायचा पदार्थ नव्हे पण दोन चमचे तरी नक्की खायला हवा. यात प्रमुख पाच पदार्थ असतात दूध, तूप, दही, मध आणि साखर/गूळ/केळी. शास्त्रीयदृष्टया
पाहिल्यास
हे
महत्त्वाचे
नुट्रीएंट्स.
साधारण
पाच
भाग
दूध
आणि
बाकी
पदार्थ
एक
भाग
अशी
पाककृती
असते.
प्रोटीनची
दूध,
हेल्थी
फॅटसाठी
तूप,
प्रोबायोटिकसाठी
दही,
मिनरल्स
आणि
अँटिऑक्सिडन्टसाठी
मध
आणि
कार्बोहैड्रेटसाठी
साखर.
प्रमाणात
खाल्ले
तर
हे
पाच
घटक
किंबहुना
नुट्रीएंट्स
अमृतासारखे
आपल्या
शरीरासाठी
काम
करतात
हा
संदेश
आहे.
यातही
प्रोटीन
जास्त
मिळावे
म्हणून
दूध
जास्त
असा
बादरायण
संबंध
जोडता
येऊ
शकतोच.
राज्यानुसार
पंचामृताची
रेसिपी
किंचित
बदलते.
महाराष्ट्रात
साखरेऐवजी
खडीसाखर
किंवा
केळी
वापरायचे.
फळातील
साखर
टेबल
शुगरपेक्षा
केव्हाही
चांगलीच.
तमिळनाडूमध्ये
आजही
केळीच
वापरतात,
साखर
शुद्ध
नाही
म्हणून.
काहीकाही
समजुती
खरोखर
पटतात
त्यातील
ही
एक.
केरळमध्ये
पंचामृतात
नारळाचे
पाणी
किंवा
मलाई
असते.
त्यांच्यासाठी
ते
अमृतच!
काही
ठिकाणी
विलायचीही
घालतात.
पूजेच्या
पंचामृतात
तुळशीचे
पानही
असते,
हिरव्या
पानाशिवाय
कोणतेही
डायट
पूर्ण
होऊच
शकत
नाही.
आज
सगळं
सिम्बॉलिक
लिहिणार
आहे
कारण
हा
पदार्थच
सिम्बॉलिक
आहे.
आपल्या
आयुर्वेदाचे,
संस्कृतीचे
प्रतीक!
आपल्याकडे
असलेल्या
सर्वोत्तम
गोष्टी
मग
त्या
अन्नातील
का
असेना,
देवाला
अर्पण
करायच्या
ही
भावना
किती
छान
आहे.
देव
म्हणजे
केवळ
मूर्तीतील
नाही,
किंबहुना
मूर्तीतील
नाहीच
तर
आपल्यासाठी
देव
म्हणजे
आईबाबा,
गुरू
इतकंच
नव्हे,
तर
घरी
येणारा
अतिथीही
देवच
आहे.
या
सगळ्यांनी
अमर
किंवा
फिट
राहावे
यासाठी
हे
अमृतासमान
पाच
पदार्थ
द्यावे
ही
भावना
खरी
आहे
आणि
आचरणात
आणावी
अशीच
आहे.
असंही
आपण
प्रार्थना
करतांना,
'सर्वांना
चांगली
बुद्धी
दे,
आरोग्य
दे',
असंच
म्हणतो,
इथे
सर्वांना
हा
शब्द
खूप
काही
सांगून
जातो.
महाराष्ट्रात
शेंगदाण्याचा
कूट,
चिंच,
गुळ
आणि
झणझणीत
फोडणी
यांचा
एक
अप्रतिम
चटणीसदृश
पदार्थ
सणावारी
बनवतात
त्यालाही
पंचामृत
म्हणतात.
हे
तिखट
व्हर्जन!
दूध
घालून
पंचामृत
बनवल्यावर
ते
लगेच
संपवायचे
असते
किंवा
ताजे
बनवावे
लागते.
पूजा
झाली
कि
लगेच
प्रसाद
म्हणून
हातावर
पडते
ते
पटकन
खाऊन
टाकायचे.
शिऱ्यासारखे
पंचामृत
पोटभर
मिळत
नाही,
एक
चमचाभर
मिळते.
पंचामृत
खाल्यावर
खूप
लोक
केसांवरून
हात
फिरवतात.
त्या
साखरेने
आपल्या
केसांना
मुंग्या
लागल्या
तर?
हा
प्रश्न
मला
लहानपणी
पडायचा.
प्रसादालाही
आदर
द्यायचा
ही
भावना
असावी
पण
हे
पदार्थ
केसांसाठी
चांगलेच
आहेत.
यातील
तूप
सोडल्यास
इतर
सगळे
पदार्थ
हेअरमास्कमध्ये
असतातच
ना!
साखर
नसते
हेअरमास्कमध्ये
पण
केळ
असते.
हेअरमास्कच
नव्हे
तर
फेसपॅकमध्ये
हेच
पदार्थ
असतात.
किती
सोपं
आहे
बघा,
पंचामृत
खायचे
आणि
थोडा
फेरफार
करून
त्वचा/
केसांसाठीही
वापरायचे.
आपले
पूर्वज
खूपच
हुशार
होते
असं
मी
म्हणणार
नाही;
पण
कमीतकमी
पदार्थात
जास्त
फायदे
नक्की
बघायचे.
पंचामृताचे महत्त्वाचे घटक
साहित्य
– २ ते ३ सर्विंग्ससाठी
ताजे दही - 1 चहा कप (175 मिली)
ताजे दूध - 1/2 चहा कप
चूर्ण साखर - 2 टेस्पून
देसी तूप - 1/8 टीस्पून
मध - 1/8 टीस्पून
गंगाजल - 1 टीस्पून
बदाम - ४ ते ५
काजू - ४ ते ५
मनुका (किशमिश) - 10 ते 15
फॉक्स नट (मखाना) - 10 ते 15
चिरोंजी - 10 ते 15
किसलेले ताजे नारळ - 1 टेस्पून
तुळशी (भारतीय तुळस) - 1 ते 4 पाने
तयारी -
दही फेटून बाजूला ठेवा.
लोणीचे लहान तुकडे करा.
बदाम आणि काजू चिरून घ्या.
कृती
-
एका भांड्यात दही, दूध, पिठीसाखर, देशी तूप आणि मध एकत्र करा.
आता मखणा, बदाम, काजू, बेदाणे, चिरोंजी, किसलेले ताजे खोबरे आणि गंगाजल घाला. चांगले मिसळा. अर्पण वाडग्यात पंचामृत स्थानांतरित
करा
आणि
शेवटी
तुळशीची
पाने
घाला.
पंचामृताचा अर्थ
पंचामृत म्हणजे पाच अमृतसदृश पदार्थांचे
मिश्रण.
पंचामृत
हे
5 प्रकारचे
घटक
मिसळून
तयार
केले
जाते.
पंचामृत
हे
देवाला
अन्न
अर्पण
करण्यासाठी
बनवले
जाणारे
पवित्र
पेय
असले
तरी
आरोग्याशी
संबंधित
अनेक
फायदेही
त्याच्याशी
निगडीत
आहेत.
जे
फार
कमी
लोकांना
माहीत
आहे.
दही
+ दूध
हे
विसंगत
संयोजन
आहे
की
नाही
हे
समजून
घेण्यासाठी
पंचामृताचे
मूल्य
जाणून
घेणे
महत्त्वाचे
आहे.
जेव्हा
आपण
पंचामृतमध्ये
दूध
आणि
दही
एकत्र
करतो
तेव्हा
ते
एक
सुसंगत
संयोजन
मानले
जाते.
कारण
त्यात
साखरेसारखे
पदार्थ
मिसळले
जातात.
तसेच
त्यातील
इतर
5 घटकांमुळे
दूध
आणि
दह्याचे
मिश्रण
वेगळे
होते.
पंचामृताचे आरोग्यदायी फायदे
१. गर्भवतींसाठी फायदेशीर
पंचामृत म्हणजे एक गोड मिश्रण असते जे गरोदर स्त्रीला पोषक तत्व प्रदान करू शकते. हे बाळाच्या विकासात मदत करते. यामुळे आईच्या स्नायूंना
मदत
मिळते
आणि
तिची
रोगप्रतिकारक
शक्ती
सुद्धा
वाढते.
या
सोबतच
गरोदरपणात
पंचामृताचे
सेवन
केल्याने
स्त्री
रिलॅक्स
आणि
स्वस्थ
राहते.
२. पचनक्रियेसाठी उपयुक्त
पंचामृत हे पचन तंत्राला मजबूत करते. ज्यामुळे अॅसिडीटी, पोटाच्या व आतड्यांच्या
समस्या
तसेच
अल्सर
पासून
सुद्धा
आराम
मिळतो.
ज्यांची
पचनशक्ती
काही
कारणाने
क्षीण
झालेली
असते
अशांनी
आवर्जून
पंचामृत
घ्यावे.
३. तरतरी येण्यास मदत
पंचामृत शरीराला ताकद देणाऱ्या सात उतींना पोषण देते ज्यात प्रजनन उती, दात, फॅटी टिश्यू, नार्व टिश्यू, मसल टिश्यू, प्लाझ्मा आणि रक्त पेशींचा समावेश होतो. त्यामुळे थकवा आला असेल किंवा अंगात ताकद नसेल तर नियमितपणे
पंचामृत
घ्यावे.
४. बुद्धी तल्लख होण्यास मदत
पंचामृताचे
सेवन
आपण
मुख्यतः
पूजेच्या
वेळी
करतो.
पण
पंचामृताचं
सेवन
नियमितपणे
केल्यास
बुद्धी
तल्लख
होते
आणि
स्मरणशक्तीही
वाढते.
म्हणून
गर्भवतींना
आवर्जून
पंचामृत
दिले
जाते,
जेणेकरुन
होणाऱ्या
बाळाची
बुद्दी
तल्लख
होईल.
५. त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त
पंचामृत हे तुमच्या त्वचेसाठी
एखाद्या
क्लिंजरप्रमाणे
काम
करते.
पंचामृताच्या
सेवनाने
तुमची
त्वचा
निरोगी राहते
आणि
स्कीन
सेल्सच्या
विकासालाही
मदत
मिळते,
त्यामुळे
त्वचेवर
आपोआपच
ग्लो
येतो.
पंचामृत
खाल्ल्याने
केस
निरोगी
आणि
चमकदार
होतात.
तसेच
काही
कारणाने
केसांची
वाढ
खुंटली
असेल
तर
ती
सुरळीत
होण्यास
मदत
होते.
सारांश
भारतात कोणतेही देवी देवता असो पंचामृत शिवाय पूजा अपूर्णच असते सर्वात पहिला प्रसाद म्हणजे पंचामृत हाच असतो हा सर्वात महत्त्वाचा शुद्ध असा पंचामृताचा प्रसाद असतो. पंचामृत मध्ये सर्व शुद्ध पदार्थ वापरून तयार केला जातो. गणपती देवता सर्वात आधी पुजली जाते तेव्हा गणपतीच्या प्रसादासाठी पंचामृत हे लागतेच पंचामृतानेच मूर्ती शुद्ध केली जाते आणि त्याचाच प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know