Translate in Hindi / Marathi / English

Friday, 19 April 2024

उसाच्या रसातील औषधी गुण | उसाच्या रसात ७० ते ७५ टक्के पाणी, १३ ते १५ टक्के सुक्रोजच्या रूपातील साखर आणि १० ते १५ टक्के फायबर्स असतात | उसाचा रस टेस्टी असण्यासोबतच शरीराला आतून थंड करतो | उसाच्या रसामध्ये खूपसारे पोषक तत्व असतात ज्यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, पोटॅशिअम, मिनरल्स, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस इत्यादींचा समावेश आहे

उसाचा रस

 

उसाच्या रसातील औषधी गुण

उसाचा रस म्हणजे शुद्ध साखर नसते. उसाच्या रसात ७० ते ७५ टक्के पाणी, १३ ते १५ टक्के सुक्रोजच्या रूपातील साखर आणि १० ते १५ टक्के फायबर्स असतात. उन्हाळा सुरू झाला की, लोक सर्वात जास्त उसाचा रस पितात. लहान शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत सगळीकडे हा रस लोकांचा फेवरेट आहे. उसाचा रस टेस्टी असण्यासोबतच शरीराला आतून थंड करतो. सोबतच यातून शरीराला बरेच फायदे होतात.

उसाच्या रसामध्ये खूपसारे पोषक तत्व असतात ज्यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, पोटॅशिअम, मिनरल्स, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस इत्यादींचा समावेश आहे. हे सगळे पोषक तत्व शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतात. मात्र, हेही तितकंच खरं आहे की उसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीराला नुकसानही होतं. एका दिवसात कुणीही दोन ग्लासपेक्षा जास्त उसाचा रस पिऊ नये. चला जाणून घेऊन उसाचा रस जास्त पिण्याचे नुकसान.

उसाच्या रसात जास्त असतात कॅलरी

उसाच्या रसामध्ये कॅलरींचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्ही वजन कमी करत असाल, उसाचा रस कमी प्या. एका ग्लास उसाच्या रसात जवळपास २५० कॅलरी आणि १०० ग्रॅम शुगर असते. अशात उसाचा रस प्यायल्यास बरं होईल. जेणेकरून वजन कंट्रोलमध्ये राहिल. यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी आणि ग्लायसेमिक लोड जास्त असतो. याने शुगर लेव्हल प्रभावित होते. अशात डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी यापासून दूर रहावं.

पोट होऊ शकतं खराब

जर तुम्ही एका दिवसात ते ग्लास उसाचा रस सेवन करत असाल तर तुमची हालत खराब होऊ शकते. यात पोलिकोसनॉल नावाचं तत्व असतं. जे शरीराला नुकसान पोहोचवतं. याने पोट खराब होण्यासोबतच उलटी, चक्कर येणे, इंसोम्नियाचा धोका निर्माण होऊ शकतो.

संक्रमण होण्याचा धोका वाढतो

उसाचा रस स्वच्छ ठिकाणीच प्यावा. कारण अस्वच्छता असेल तर माश्या लागतात आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जात नाही. काही ठिकाणी उस व्यवस्थित स्वच्छ करताही मशीनमध्ये टाकला जातो. याने त्यावर लागलेली धुळ, माती रसात मिश्रित होते. याने संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.

जास्त वेळ ठेवलेला रस पिऊ नये

अनेक लोक मार्केटमधून उसाचा रस आणतात आणि फ्रिजमध्ये ठेवतात. त्यानंतर ते तासांनी हा रस पितात. हे करणं महागात पडू शकतं. उसाचा रस फार लवकर खराब होतो, सोबतचो दूषितही होतो. उसाचा रस तुम्ही १५ ते २० मिनिटांपेक्षा जास्त ठेवू शकत नाही. जास्त वेळ ठेवला तर तो ऑक्सीडाइज होतो. जास्त वेळ ठेवलेला रस प्यायले तर अनेक शारीरिक समस्या होऊ शकतात. नेहमीच फ्रेश ज्यूसचं सेवन करा.

रक्त पातळ होतं उसाच्या रसाने

जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्त पातळ होऊ शकतं. कारण यात पोलिकोसनॉल असल्याने रक्त पातळ होऊ शकतं. अशात काही कापलं किंवा लागलं तर रक्त येणं बंद होण्यास वेळ लागतो. आणि तेवढ्यात खूप रक्त वाहून जातं. जे लोक रक्त पातळ करण्यासाठी औषध घेत आहेत त्यांनी उसाचा रस पिऊ नये.

लाल रंगाचा उसाचा रस

यासोबत लाल रंगाचा उसाचा रस चुकूनही पिऊ नका. असा उसाचा रस तुमचे आरोग्य बिघडू शकतो. लाल रंगाचा उसाचा रस प्यायल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. लाल रंगाचा उसाचा रस प्यायल्याने लाल कुजाचा रोग होण्याची शक्यता असते. ही बुरशी आहे, त्यामुळे उसावर लाल रंग दिसून येतो. असा उसाचा रस प्यायल्याने हिपॅटायटीस , डायरिया आणि पोटाचे घातक प्राणघातक आजार होऊ शकतात.

आता वळूया औषधी गुणांकडे. उसाच्या रसात शरीरासाठी गरजेचे असलेले फेनॉलिक आणि फ्लेवोनॉइड एंटीऑक्सिडेंट असतात. हे एंटीऑक्सिडेंट्स कॅन्सर होण्याचा धोका कमी करतात, तसेच तुमच्या डीएनए चं रक्षण करून हृदयविकार आणि इतर गंभीर आजार होण्यापासून तुमचं रक्षण करतात. उसाच्या रसावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने ती एक जमेची बाजू ठरते. प्रक्रिया केलेली नसल्याने रसातील जीवनसत्व आणि खनिजे कायम राहतात. पोटॅशियम सारख्या खनिजामुळे तर व्यायामानंतर येणारी शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘ऊसाचा रस

ऊसाच्या रसामध्ये व्हिटामिन ए, बी 1, बी 2, बी 3, बी 5, बी 6 आणि व्हिटामिन सी हे घटक असतात. याशिवाय मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियमही हे घटकही त्यात आढळतात. विशेष म्हणजे ऊसाचा रस पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे कोरोनापासून दूर राहिचे असेल तर दिवसातून किमान एक ग्लास ऊसाचा रस प्या. तसेच ऊसाचा रस फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाहीतर अनेक आजारांवर रामबाण उपाय देखील आहे.

1. हा रस आपल्या चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकण्यास मदत करतो. ऊसामध्ये सुक्रोजचे प्रमाण अधिक असते, जे कोणत्याही जखमेला लवकर बरी होण्यास मदत करते. तसेच, चेहऱ्यावरील सर्व डाग काढून टाकते आणि आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करते.

2. उन्हाळ्यात, तीव्र सूर्यप्रकाशामुळे आणि घामामुळे, चेहर्याचा चमक कुठेतरी कमी होणे सुरू होते, ऊस तो हरवलेला रस परत आणण्यास मदत करतो.

3. ऊसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह आणि पोटॅशियम असते, जे आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यास मदत करते.

4. ऊसामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे आपल्या शरीरातील वाढते वजन कमी करण्यास मदत करते, यामुळे आपल्या शरीरातील सर्व हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी होते.

5. ऊसामध्ये अल्कधर्मीचे प्रमाण जास्त असल्याने हे कर्करोगापासून आपले संरक्षण करते. हे स्तन, पोट आणि फुफ्फुसांच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करते.

6. ऊस आपल्या शरीरात ग्लूकोजच्या प्रमाणाचे संतुलन राखतो, ज्यामुळे ते मधुमेहाच्या आजारामध्येही हा रस प्यायला जाऊ शकतो. नैसर्गिक मधुरता असलेला ऊसाचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानीकारक नाही.

7. गरोदरपणात थकवा आणि इतर आजार टाळण्यासाठी ऊसाचा रस खूप फायदेशीर ठरतो. याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

8. गरोदरपणात महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत ऊसाचा रस सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

उसाची सर्वसाधारण माहिती

1) उस किती दिवसांत उगवतो?

उत्तर:- ऊस हा 30 दिवसांत उगवतो.

2) उसाची लागवड कधी करावी आणि कोणत्या महिन्यात करावी?

उत्तर:- ऊस हा आपण 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी सुरू हंगामी, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पूर्व हंगामात आणि आडसाली हंगामात 15 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत लावू शकतो.

3) ऊस येण्यासाठी किंवा पक्व होण्यासाठी किती काळ लागतो?

उत्तर:- ऊस हा 12 ते 14 महिन्यात येतो काही ऊस 10 ते 12 महिन्यात तर काही 14 महिन्यात येतात.

4) उसाचे एका एकरात किती टन उत्पादन मिळते?

उत्तर:- उसाचे उत्पादन हे त्याच्या वाढीवर अवलंबून असते. यात सरासरी एक एकरात 40 टन ऊस उत्पादन मिळते किंवा येपेक्षा सुद्धा अधिक मिळते.

5) ऊसाच्या वाढीसाठी चांगले खत कोणते?

उत्तर:- उसाची चांगली उंच आणि जाड वाढ होण्यासाठी महत्वाचे खत म्हणजे नायट्रोजन आहे. नायट्रोजन उसाला लवकर वाढण्यास मदत करतो.

6) महाराष्ट्रात सर्वात जास्त उसाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?

उत्तर:- महाराष्ट्रात सर्वाधिक उसाची लागवड पश्चिम महाराष्ट्रत केली जाते आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त उसाचे उत्पादन हे कोल्हापूर जिल्ह्यात होते.

7) भारतातील सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य कोणते?

उत्तर:- भारतातील सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य उत्तरप्रदेश हे आहे.

8) ऊसाची जास्त उत्पन्न देणारी जात?

उत्तर:- उसाचे जास्त उत्पन्न देणारी जात ही को 86032 ही आहे.

सारांश

उन्हाळ्यात भारतीयांचं सर्वात आवडतं ज्यूस म्हणजे उसाचा रस. उस पिळून काढलेला रस आणि त्यात थोडा लिंबाचा रस आणि बर्फ एवढं एकत्र केलं की देसी ज्यूस तयार होतो. उसाचा रस प्यायल्यावर उन्हात गारेगार वाटतं किंवा वर्षाच्या कोणत्याही महिन्यात प्यायलो तरी तरतरी येते. उसाच्या रसाचा एवढाच उपयोग आहे का? तर नाही. उसाच्या रसात काही औषधी गुणधर्म आहेत. मधुमेह असेल तर उसाचा रस पिऊ नका. रस जर भांड्यात साठवून ठेवलेला असेल तर पिऊ नका. बर्फ टाकता प्या. कारण बर्फामुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know