Translate in Hindi / Marathi / English

Tuesday, 2 April 2024

रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा | काही लोकांना जेवताना किंवा जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते | रात्री उशिरा जेव्हा तुम्ही जड जेवणानंतर मिठाई खाता, तेव्हा त्या अन्नाचे पचन व्हायला जास्त वेळ लागतो | जेवणानंतर मिठाई खाणे टाळावे | जेवणापूर्वी गोड पदार्थ खाल्ल्याने पचन स्रावांचा प्रवाह वाढतो

जेवणानंतर गोड

 

रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा

मिठाईशिवाय बऱ्याच लोकांचे जेवण पूर्ण होत नाही. जेवणानंतर गोड खाणे जवळजवळ सर्वांनाच आवडते. यातही सरावात जास्त तीव्रतेने रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. साखर म्हणजेच गोड खाल्ल्याने डोपामाइन हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे आपल्याला मनाला आनंद आणि समाधान मिळते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खरंच चांगली आहे का? रात्री उशिरा जेव्हा तुम्ही जड जेवणानंतर मिठाई खाता, तेव्हा त्या अन्नाचे पचन व्हायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे जेवणानंतर मिठाई खाणे टाळावे. याउलट आपण जेवणापूर्वी गोड पदार्थ खाल्ल्याने पचन स्रावांचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे आपल्या पचन प्रक्रियेची गती सुधारण्यास मदत होते. याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टर नागरेकर यांनी माहिती दिली आहे. त्यांनी जेवणानंतर गोड पदार्थ का खाऊ नये आणि ही सवय सोडवण्यासाठी एक उत्तम उपाय सांगितलं आहे.

जेवणानंतर गोड खाणे

जेवणानंतर गोड खाणे टाळण्यासाठी उपाय ज्यांना जेवणानंतर गोड खाण्याची कायम तीव्र इच्छा होते. त्यांची ही सवय हळूहळू व्यसन बनत जाते. मग त्यांना अनेक प्रकारचे त्रास होतात. मात्र एक उपाय केल्यास तुमची ही सवय बंद होऊ शकते. यासाठी काळे खजूर आणि काळ्या मनुका घ्या. ते एका वाटी पाण्यामध्ये दोन तास भिजत ठेवा. दोन तासानंतर ते त्याच्य पाण्यात चांगले एकजीव करून घ्या. नंतर त्यातील कोळ दाबून बाजूला काढा. याचे एक द्रावण तयार होईल. हे मिश्रण जेवणापूर्वी प्यावे. यामुळे तुमची जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा कमी होते. हा उपाय सलग सात दिवस केल्यास तुमची जेवणानंतर गोड खाण्याची सवय कायमची मोडेल आणि याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणामदेखील होणार नाही. केवळ तुम्हाला डायबिटीज किंवा कोणत्याही पदार्थाची ऍलर्जी असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जेवणानंतर गोड खाल्ल्याने काय होते? - रात्रीच्या जेवणानंतर गोड खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. कारण यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते. यामुळे वजन वाढण्याचीदेखील शक्यता असते. कोरोनरी हृदयरोगाच्या मागे गोड पदार्थ मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. - आयुर्वेदानुसार जेवण करण्यापूर्वी गोड खाणे चांगले. पण जेवणानंतर मिठाई खाण्याची सवय टाळण्याची अनेक कारणे आहेत. रात्री जड जेवणानंतर मिठाई खाल्ल्यास ती पचायला बराच वेळ लागतो आणि परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते.

हानिकारक जेवणानंतर गोड खाण्याची सवय

आतड्यांमधील चांगल्या आणि वाईट जीवाणूंचं संतुलन नसल्यास गोड पदार्थ खावेसे वाटतात. जास्त तेलकट, मसालेदार, जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे सहसा ही परिस्थिती उद्भवते. त्यामुळे आतड्याची क्रिया सुरळीत पार पडत नाही. परिणामी, अन्नाचं पचन योग्यरितीनं होत नाही. सध्या लॉकडाऊनमध्ये ही सवय सोडणं सहज शक्य आहे. कारण इतर वेळी पुरेसा वेळ हातात नसतो. यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून रिकाम्यापोटी प्यायल्यास १० दिवसातच फरक दिसू लागेल. यामुळे आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढू लागेल आणि पचनक्रिया सुरळीत होईल. गोडाची सवय सोडण्यासाठी शरीराला लिंबू सरबत पिऊन डिटॉक्सिफाय करणंदेखील आवश्यक आहे. सद्यस्थितीत डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ प्रत्येक व्यक्तीला मीठ गोड पदार्थ अति प्रमाणात खाण्याची सवय सोडण्याच्या सूचना देत आहेत. कारण लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

- अनेकांना जेवणानंतर मिठाई मिळाल्यास कामात लक्ष लागत नाही.

- रात्री जेवणानंतर गोड खायला मिळालं नाही तर झोप नीट लागत नाही.

गोड जेवणाआधी खावं की नंतर

काही लोकांना जेवताना किंवा जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते. त्याशिवाय त्यांना जेवल्याचे फिलिंगच येत नसावे. काहीतरी तिखट लागल्यावर लोक पटकन गोड खातात. पण, सतत गोड खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. या खाण्याच्या सवयीबद्दलची जास्त माहिती नसल्याने लोक गोड खाण्याला गांभिर्याने घेत नाही. अनेकांना अन्न खाल्ल्यानंतर गोड खाण्याची हौस असते. पण, नंतर त्यांना त्याचे दुष्परीणाम भोगावे लागतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर गोड खाण्याच्या चुकीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जेवणानंतर मिठाई खाल्ल्याने अन्न पचण्यास मदत होते, असा विचार करून लोक गोड पदार्थाचे सेवन अधिक करतात. तज्ञांच्या मते, असे काहीही होत नाही. आयुर्वेदातही या सवयीला चुकीची मानली गेली आहे. कारण, आयुर्वेदानूसार, गोड पदार्थ जेवल्यानंतर नाही तर जेवणाआधी खाणे उपयुक्त ठरते. आरोग्य तज्ज्ञांनी यामागे अनेक कारणे दिली आहेत. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या सुरू होतात.

- तज्ज्ञांच्या मते, जेवण करण्यापूर्वी गोड पदार्थ खाल्ल्याने जेवण पचायला सोपे जाते.

- जेवणापूर्वी गोड पदार्थ खाल्ल्यास टेस्ट बड्स सक्रिय होतात. त्यामुळे जेवणाची चव आणखी छान लागते.

- जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने पचन मंदावते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची भीती राहते.

- जेवणानंतर गोड खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. पण, मिठाईऐवजी गूळ किंवा खजूर खाणे हा आरोग्यदायी पर्याय असू शकतो.

- जेवणानंतर लगेच गोड खाण्याने आम्लपित्त, फुगणे, फुगणे असे त्रास होऊ शकतात.

जेवणानंतर दात घासा

आपण जेव्हा काही खारट पदार्थ खातो तेव्हा गोड खायची तीव्र इच्छा होते. त्यामुळे जेवणानंतर दात घासणं, हा सर्वात चांगला उपाय आहे. यामुळे तोंडाची चवही बदलते आणि सोबतच दातदेखील स्वच्छ राहतात. तोंडाची चव बदलल्यामुळे गोड खायची इच्छा कमी होते. पण तोंडातील लाळ पचनक्रिया सुरळीत्या पार पाडण्यासाठी मदत करते, त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच दात घासू नका. थोड्या वेळानं दात घासा.

झोपेचं गणित सांभाळा

जेवणानंतर गोड खायला मिळाल्यानं झोप लागायला वेळ लागू शकतो. पण सध्या ते शक्य आहे. इतरवेळी रात्री झोप लागल्यास दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. पण सध्या ऑफिसला जायचं नाहीय. तसंच एरवी प्रवसासाठी लागणारे एक-दोन तासदेखील आपल्या हातात आहेत. त्यामुळे रात्री झोप नाहीच लागली तरीही सकाळी झोपू शकता आणि उशिराही उठू शकता.

ड्रायफ्रुट्स खाऊ शकता

गोड पदार्थांना पर्याय म्हणून मनुका आणि खजूर खाऊ शकता. दिवसात १०-१२ मनुका किंवा - खजूर खाणंदेखील चांगलं असतं. एकवेळच्या जेवणानंतर - मनुके आणि एक खजूर पुरेसं आहे. हे ड्रायफ्रुट्स बरेच दिवस टिकतात, त्यामुळे जास्त प्रमाणात आणू शकता. तसंच त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे बिनधास्त खाऊ शकता. फक्त मर्यादीत प्रमाणात खा.

फळं खा

गोडाची सवय सोडायची असेल तर फळांचा आधार घेऊ शकतात. द्राक्ष, पपई, सफरचंद, संत्री अशी हंगामी फळं खाण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. यामुळे गोड खायची इच्छा कमी होते. घरी फळं स्वच्छ धुऊन झाकून ठेवावी आणि जेव्हा गोड खायची इच्छा होईल तेव्हा गोड खाण्याऐवजी फळं खावीत. शक्यतो जेवणानंतर लगेचच फळं खाणं टाळावं. किमान दोन तासांचं अंतर असावं. ते शक्य नसल्यास निदान एक तासांनंतरच फळं खावी.

बडीशेपचा पर्याय

जेवणानंतर गोड खायची इच्छा झाल्यास बडीशेप खाणं हा एक चांगला पर्याय आहे. बडीशेप थोडीशी गोड असते. पण त्याबरोबर खडी साखर खाणं टाळा.

सारांश

गोड पदार्थ मिळाले नाही तर काही मंडळी अस्वस्थ होतात. काहींना गोड पदार्थ खायला मिळाले नाहीत तर जेवण झाल्यासारखं वाटतच नाही. काही लोक तर मिठाई दिसताच त्यावर ताव मारतात आणि कितीही गोड खाल्लं तरीही त्यांचं मन भरत नाही. ही सवय दूर करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. एक लक्षात ठेवा की, कोणतीही सवय तत्काळ सुटत नाही, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे लगेच एका दिवसात अति गोड खाण्याची सवय पूर्णपणे सुटणं शक्य नाही. हळूहळू एकेक पाऊल पुढे जा. तसंच तुमच्या सवयीचं निरीक्षण करा. म्हणजे कधी गोड खाण्याची प्रकर्षानं इच्छा होते, किती प्रमाणात गोड पदार्थ खाता यावर लक्ष ठेवा, असं तज्ज्ञ सांगतात.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know