Translate in Hindi / Marathi / English

Thursday, 25 April 2024

पचन आणि अपचन | पचन आणि पाचक प्रक्रिया | आपल्या पोटाचे सुधृढआरोग्य | आपली पचनसंस्था म्हणजे तोंडा पासून गुदद्वारा पर्यंत गेलेली एक लांबलचक पोकळ नळीच होय | पिष्टमय पदार्थाचं रूपांतर ग्लुकोज मध्ये, प्रथिनांचं रूपांतर अमायनो अॅसिड मध्ये व स्निग्ध पदार्थाचं रूपांतर फॅटी अॅसिड मध्ये होते

पचन आणि पाचक प्रक्रिया

 

 आपल्या पोटाचे सुधृढआरोग्य

आपल्या लहानपणी / तरूणपणी जेवणाच्या पंगती मध्ये ताटभर जिलेब्या किंवा भरपूर बासुंदी पैंज म्हणून अनेकांनी रिचवली असेल. तसेच कॉलेज मध्येही वसूल करायचे म्हणून मेस किंवा पार्टीत भुके पेक्षा जास्त खाणारे

अनेक असतात. इथे त्या क्षणी जरी ते खूश झाले तरी पुढे दोन दिवस त्यांना पोटाचा त्रास होतोच. आपल्या रोजच्या धावपळीत देखील बरेच जण मला अपचन झाले असे म्हणतात.

पचन आणि अपचन


आपल्या पैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी अपचनाचा त्रास झालेलाच असतो. पचन म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे पाचक रसात रूपांतर होणे, ज्यामुळे आपलं पोषण व शरीर धारणा होत असते. आपली पचनसंस्था म्हणजे तोंडा पासून गुदद्वारा पर्यंत गेलेली एक लांबलचक पोकळ नळीच होय, ज्याची लांबी साधारण पणे नऊ मीटर इतकी असते. अन्नाचे पूर्ण पचन करून त्यातली पोषणद्रव्ये शरीरात शोषून घेणे व शेवट राहिलेला मळ शरीरातून गुदद्वारा मार्गे बाहेर टाकणे हे काम पचनसंस्था अव्याहतपणे करत असते.

अन्नपचन कसे होते?

आपण तोंडातून अन्न आत घेतो, जे तोंडाच्या पोकळीत दातांनी चावून चावून बारीक केले जाते. बारीक झालेले हे अन्न गिळायला सोपे जाते. तोंडा मध्येच या अन्नात लाळ मिसळली जाते, जी अन्ना तील पिष्टमय पदार्थाचे विघटन करते. अर्थात त्याच्या पचनाला सुरुवात करते. हे काम लाळेतील सलायव्हरी अमायलेझ नावाचे एन्झाइम करते.

गिळलेले अन्न पुढे अन्न नलिकेत उतरते व तिथून जठरा पर्यंत आणले जाते. अन्ननलिके मध्ये मात्र अन्न पचन होत नाही. जठरात आल्या वर हे अन्न जठरा तील पाचक रसात मिसळले जाते. अन्न पचनाचे मुख्य कार्य जठरा मध्ये होत असते. जठरात

) हायड्रोक्लोरिक अॅसिड,

) लायपेज,

) पेप्सीनोजेन

) प्रोटेनिन असे विविध पाचकरस असतात,

जे स्निग्ध पदार्थ, नत्र युक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ यांचं पचन घडवू लागतात. तसेच जठरात म्युकस म्हणजे पातळ बोळ असलेला हा पदार्थ अन्न पातळ करण्या साठी उपयोगी पडतो. जठरातून हे अध्रे पचन झालेले अन्न पुढे लहान आतडय़ात शिरते. लहान आतडय़ा यकृता तून आलेला

पित्तरस स्वादुपिंडा कडून आलेले पाचकरस (एन्झाइम्स उदा. ट्रिप्सीन, अमायलेझ .) पुढे अन्नाचे पचन पूर्ण करतात. म्हणजे पिष्टमय पदार्थाचं रूपांतर ग्लुकोज मध्ये, प्रथिनांचं रूपांतर अमायनो अॅसिड मध्ये व स्निग्ध पदार्थाचं रूपांतर फॅटी अॅसिड मध्ये होते. आपला अन्नमार्ग हा आतून स्नायूंनी बनलेला असतो. या स्नायूंच्या आकुंचन- प्रसरणा मुळे अन्न मार्गात अन्न पाणी पुढे पुढे ढकलले जाते. स्नायूंच्या या हालचालीस पेरी स्टाल्सीस असे म्हणतात व त्यामुळेच अन्न एका अवयवातून पुढच्या अवयवात जाते. हे पचलेले अन्न मोठय़ा आतडय़ां च्या टोका पर्यंत म्हणजे रेक्टम पर्यंत जाते. या पूर्ण मार्गात द्रव पदार्थाचे शोषण होते उरलेला मळ गुदद्वारा मार्फत बाहेर टाकला जातो.

अपचन


अन्न जर नीट पचले नाही तर आपण अपचन झाले असे म्हणतो. अन्न पचन मार्गात जास्त वेळ राहते, कुजण्या ची प्रक्रिया सुरू होते, हानिकारक बॅक्टेरिया लहान मोठय़ा आतडय़ा तयार होतात आतडय़ा चा दाह होणे, असे आजार उद्भवतात. आपल्या शरीरात काही पाचक रसांची कमतरता असल्यास अन्नपचन योग्य रीत्या होत नाही.

अन्न नीट पचले नाही तर तसेच ते पुढे जाते त्यातील मोठे कणही आतडय़ांत शोषले जातात, ज्यामुळे अॅलर्जी निर्माण होऊ शकते.

अन्नपचन योग्य झाले नाही तर शरीरा साठी आवश्यक असलेली पोषणद्रव्ये तयार होत नाहीत थकवा जाणवू लागतो. कुपोषण विविध विटामिन्स ची कमतरता होते.

आपल्या सवयी आणि अन्नपचन

आपल्या चुकीच्या सवयी चुकीच्या पद्धतीचा आहार पचनाच्या तक्रारी

निर्माण करतात.

) प्रीझ र्व्हेटिव्ह घातलेले अन्नजे जास्त टिकाऊ असतं. डबाबंद अन्न, प्रोसेस्ड अन्न, प्रीझव्र्हेटिव्ह घातलेलं अन्न हे सर्व खाल्ल्याने पचनाचे विकार होतात.

) काहींना लॅक्टोज पचत नाही, गॅसेस होतात, पोट फुगल्या सारखे वाटते, ढेकर येतात, अॅलर्जी होते.

) तळलेले पदार्थ, मार्गारिन, रासायनिक द्रव्ये मिसळलेले पदार्थ हे पचायला जड जातात. खूप तळलेले, जास्त तूप असलेले पदार्थ, खूप वेगवेगळे अन्नघटक एकत्र केलेले जडान्न पचन क्रिया मंदावते.

) नॅचरल (नैसर्गिक) अन्न म्हणजे फळे, कडधान्ये, दाणे, भाज्या या पचायला अगदी उत्तम.

) अती प्रमाणात मांसाहार करणे, धान्यावर प्रक्रिया करणे, तांदळाचा कोंडा काढून वापरणे, अती प्रमाणात गोड पदार्थ खाणे,शरीराला घातक आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व गॅस्ट्रिीस, क्रोनिक डिसिज सारखे आजार उद्भवतात. म्हणून नैसर्गिक अन्न खाण्यावर भर द्यावा.

फास्ट जीवनपद्धती म्हणजे अपचन

अपचन म्हणजे अन्न नीट पचणे. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच जणांमध्ये अपचन, गॅसेस, अॅसिडिटी याचा त्रास होताना दिसतो. याला कारण आपली फास्ट जीवनपद्धती. अपचनाचा त्रास प्रत्येकात वेगवेगळे लक्षण घेऊन प्रकटू शकतो. पोटाला तडस लागणे, खाल्ल्या नंतर पोट फुगल्या सारखं, वाटणे, अस्वस्थता वाटणे, छातीत जळजळ होणे, करपट ढेकरा येणे, भूक लागणे, काहीवेळा नुसता कोरडा खोकला येणे.

अपचनाची कारणे


तेलकट, अति स्निग्धपदार्थ, अती मसालेदार चमचमीत पदार्थ खाणे, अतिशय गोड खाणे. अतिताण, तणाव, अति काळजी, नैराश्य ग्रस्तता या सर्वामुळे अपचनाचा विकार वाढतो.

वेदना शामक औषधे, स्टिरॉईड्स यांचा अतिरिक्त वापर, जठरातून पोटातील आम्लपाचक रस अन्ननलिकेत येणे.  शरीरात पाचक रसांचा अभाव किंवा कमतरता या सर्वामुळे पोटात अपचन होऊ शकते.

पोटाची समस्या

सर्व शारीरिक समस्यांचे मूळ म्हणजे पोट. जर आपले पोट ठीक असेल तर आपण पूर्णपणे ठीक रहाल. लोक आपल्या पोटाची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी बहुतेकांना पचन संबंधित समस्या असते आणि बर्‍याच लोकांना ही समस्या असते. यासाठी लोक निरनिराळ्या प्रकारची औषधे घेत राहतात, परंतु असे असूनही त्यांच्या पचनक्रियेचा प्रश्न सुटत नाही.  निरोगी आतडे योग्य पचन संबंधित आहे. जेव्हा आपले आतडे निरोगी असते तेव्हा वजन कमी करण्याची प्रवृत्ती खूप वेगवान असते. पौष्टिक पदार्थ शोषण्यासाठी आणि शरीरातून विषोक्त पदार्थ बाहेर टाकण्यासाठी निरोगी आतडे मायक्रोबायोम आवश्यक आहे. निरोगी आतडे योग्य पचन संबंधित आहे. जेव्हा आपले आतडे निरोगी असते तेव्हा वजन कमी करण्याची प्रवृत्ती खूप वेगवान असते. पौष्टिक पदार्थ शोषण्यासाठी आणि शरीरातून विषोक्त पदार्थ बाहेर टाकण्यासाठी निरोगी आतडे मायक्रोबायोम आवश्यक आहे. जर आपले आतडे निरोगी असेल तर आपल्याला सूज येणे, मधुमेह, लठ्ठपणा, कमी उर्जा आणि मुरुमांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. निरोगी आतड्यांसाठी, चांगले बॅक्टेरिया वाढविण्यासाठी एखाद्याने आंबलेले पदार्थ आणि प्रोबियॉटिक पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

दही

दही एक प्रोबायोटिक आहार आहे ज्यामध्ये आतड्यांसाठी अनुकूल बॅक्टेरिया असतात. हे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढविण्यात मदत करते आणि पचन सुधारण्यास मदत करते. खराब बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी हे उत्तम आहे.

आंबा

आंबा हे एक उच्च फायबरयुक्त अन्न आहे जे आपल्या पोटासाठी खूप चांगले आहे. हे आपल्या आतड्यात चांगले बॅक्टेरिया जिवंत ठेवते. आपल्या पोटाचे आरोग्य सुधारण्याबरोबरच, शरीराची चरबी कमी करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते.

खोबरेल तेल

नारळ तेलामध्ये चांगले गुणधर्म असतात जे चांगल्या आतड्याच्या आरोग्यास प्रोत्साहित करतात. त्यात एक अँटीवायरल, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे जो आपल्या आतड्यातील खराब बॅक्टेरिया नष्ट करतो. आपल्या पोटात आम्लतेची पातळी पुनर्संचयित करताना फॅटी अॅसिड बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.

लसूण

लसूणमध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात जे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. आपल्या आतड्यात निरोगी बॅक्टेरिया तयार करण्यासाठी आणि विषक्त पदार्थ काढून टाकण्यासाठी हे चांगले असते.

चॉकलेट

चॉकलेटमध्ये पॉलीफेनॉल हे सेंद्रिय रसायन असते जे आतड्यांतील बॅक्टेरियाच्या वाढीस आणि कार्यक्षमतेस प्रोत्साहन देते.

पचनशक्ती मजबूत करण्यासाठी सोपे उपाय


अनेक वेळा आहारात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीचा कमी प्रमाणात समावेश केल्यानेही पचनशक्ती कमकुवत होते. अशा स्थितीत व्हिटॅमिन सी आणि डी जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. व्हिटॅमिन सी साठी तुम्ही लिंबू, संत्री, किवी, स्ट्रॉबेरी यासारखी लिंबूवर्गीय फळे खाऊ शकता. व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने केवळ पोटाचे आरोग्य सुधारत नाही तर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. तुम्ही जे काही खात आहात ते नीट चावून खा. तोंडात असलेले अन्न किमान 15 ते 20 वेळा चघळावे, तरच ते पोटात घ्यावे. अन्न जास्त प्रमाणात चघळल्याने लाळ एंझाइम्स उत्तेजित होतात, ज्यामुळे पचन सुधारते. जर तुम्ही दररोज 2-3 लीटर पाणी प्यायले नाही तर तुमच्या पचनसंस्थेला कोणतेही अन्न पचण्यात समस्या येऊ शकतात. पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. सकाळी उठल्यावर 1-2 ग्लास कोमट पाणी प्या, तुमची पचनशक्ती मजबूत होईल. जेवढे पाणी प्याल तेवढे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. हे शरीरातील डिटॉक्स पदार्थ काढून टाकते. तुमच्या आहारात शक्यतो फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. भरपूर धान्य, फळे आणि भाज्या खा. फायबर तुमच्या पचनसंस्थेतील पाणी शोषून घेते, ज्यामुळे मल सैल होतो आणि आतड्यांमधून बाहेर पडणे सोपे होते. रोज 20-30 मिनिटे व्यायाम केल्याने पचनक्रियाही मजबूत होते. तुम्ही पोटाचे काही व्यायाम करायला सुरुवात करा. याशिवाय दररोज चालणे किंवा जॉगिंग करणे, यामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित राहते, अन्न लवकर पचते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. जर तुम्हाला बाथरूममध्ये जावे लागत असेल, परंतु तुम्ही तुमच्या कामामुळे ते पुढे ढकलत असाल तर ते करू नका. याचा पचन आणि आतड्यांवर नकारात्मक परिणाम होतो. जर तुम्ही एक किंवा दोन दिवस शौच केले नाही तर मोठ्या आतड्यात राहून ते कठीण आणि घट्ट होईल, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठतेमुळे इतर अनेक समस्यांची समस्या वाढू शकते. जीवनशैलीत काही छोटे बदल करून तुम्ही तुमची पचनसंस्था निरोगी ठेवू शकता.

सारांश

आपली पचनसंस्था जितकी चांगली असेल तितके आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहतो. पोटात बद्धकोष्ठता किंवा गॅस तयार होण्याचा त्रास होत असेल तर हे खराब पचनाचे लक्षण असू शकते. पाचन तंत्र नीट राखणं हे एक कठीण काम आहे. धावपळीच्या जीवनशैलीत पचनावर थेट परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. अवेळी खाणं, जास्त तेलकट-मसालेदार पदार्थ खाणं, फळं-हिरव्या पालेभाज्या न खाणं इत्यादींमुळे पचनसंस्था बिघडत जाते. खराब पचनामुळे या समस्या उद्भवतात. शरीराचे एकंदर आरोग्य राखण्यासाठी, योग्य पचन सर्वात महत्त्वाचे आहे. पचनाच्या समस्येमुळे लोकांना अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. चांगल्या पचनासाठी, आपल्याला आहार संतुलित करावा लागेल. योग्य आहाराप्रमाणेच अन्नपचन होणं आवश्यक आहे. तुम्ही फरपूर प्रमाणात पोषक आहार घेत असाल, मात्र त्याचे पचन योग्य प्रकारे होत नसेल, तर तुम्ही घेत असलेल्या पोषक आहाराचं पूर्ण पोषण तुम्हांला मिळत नाही. याशिवाय तुम्हांला अपचन, गॅस, आंबट ढेकर, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक समस्या उद्भवतात.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know