आंबा फळांचा राजा
आंबा खाण्याचे अनेक फायदे
उन्हाळा सुरू असून आपण सगळेजण मनसोक्त आंब्याचा आनंद घेत आहोत. आंब्याला त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे आणि असंख्य आरोग्य फायद्यांमुळे
फळांचा
राजा
म्हटले
जाते.
आंब्यामध्ये
व्हिटॅमिन
ए
आणि
सी,
फायबर,
पोटॅशियम
आणि
अँटिऑक्सिडंट्स,
व्हिटॅमिन
ई
आणि
कॅल्शियम
यांसारखे
सर्व
आवश्यक
पोषक
घटक
असतात.
आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा छान दिसते, पचनक्रिया
सुधारते,
रोगप्रतिकार
शक्ती
मजबूत
होते.
मधुमेहाच्या
रुग्णांसाठी
हा
एक
उत्तम
पर्याय
आहे
आणि
वजन
कमी
करण्यास
मदत
होते.
आंब्यापासून टिकाऊ पदार्थ
बाजारात हापूस फळांची आवक वाढल्यावर त्याला
दर कमी मिळतो. अशावेळी पक्व हापूस फळांपासून पल्प (रस), आंबा पोळी, हापूस आंबा पेय
तर कच्च्या आंब्यापासून लोणचे, गोड चटणी आणि पन्हे इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार
करावेत.
लोणचे
१) पूर्ण वाढलेल्या
कच्च्या
फळांची
निवड
करावी.
फळे
पाण्याने
स्वच्छ
धुवून
घ्यावीत.
फळे
पुसून
कोरडी
करून
घ्यावीत.
२) फोडी तयार कराव्यात. त्यांचे वजन करावे. आंबा फोडी स्टील पातेल्यात
घेऊन
एकूण
लागणारी
हळद
व
मीठ
यापैकी
निम्मी
हळद
व
मीठ
फोडींना
लावावे.
आंबा
फोडी
स्टील
पातेल्यात
तीन
तास
अंगचे
पाणी
निचरण्यासाठी
तशाच
ठेवाव्यात.
त्यानंतर
पातेल्यातील
फोडी
बाहेर
काढून
प्लॅस्टिक
टोपलीमध्ये
निथळत
ठेवाव्यात.
३) तेलामध्ये
मसाल्याची
फोडणी
देण्यापूर्वी
एकूण
लागणारे
तेल
(Oil) उकळून
घ्यावे.
मोहरी
डाळ
गरम
करून
घ्यावी.
मेथी
गरम
करून
मिक्सरद्वारे
डाळ
करून
घ्यावी.
पाखडून
साल
काढून
टाकावी.
उर्वरित
मीठ
तापवून
घ्यावे.
४) फोडणीसाठी
स्टील
पातेल्यात
निम्मे
तेल
घेऊन
गरम
करावे.
तेलामध्ये
प्रथम
मेथी
त्यानंतर
मोहरी
डाळ,
हिंग
टाकून चांगले
परतवून
घ्यावे.
फोडणीचा
खमंग
वास
आल्यावर
गॅसवरून
पातेले
खाली
उतरावे.
त्यामध्ये
उर्वरित
हळद,
लाल
मिरची
पावडर
टाकून
मिश्रण
ढवळावे.
त्यानंतर
फोडणीमध्ये
उर्वरित
मीठ
टाकून
मिश्रण
ढवळून
एकजीव
करावे.
५) लोणचे टिकविण्यासाठी
आवश्यकता
वाटल्यास
त्यात
सोडीयम
बेंझोएट
हे
परिरक्षक
मसाल्यामध्ये
मिसळावे.
प्रथम
वाटीमध्ये
थोडे
मसाल्याचे
मिश्रण
घेऊन
त्यात
सोडीयम
बेझोंएट
चांगले
विरघळून
मगच
मसाल्यात
टाकून
चांगले
ढवळून
घ्यावे.
६) एक किलो आंबा फळांपासून
अंदाजे
दीड
किलो
लोणचे
(Pickles) तयार
होते.
म्हणून
१
किलो
फळांपासून
लोणचे
तयार
करताना
२३५
मिलीग्रॅम
प्रती
किलो
तयार
लोणचे
या
हिशोबाने
एकूण
३५३
मिलीग्रॅम
सोडीयम
बेंझोएट
मिसळावे.
त्यानंतर
मसाल्याची
फोडणी
गरम
असतानाच
त्यात
अंगचे
पाणी
नीचरलेल्या
आंबा
फोडी
मिसळून
लोणचे
तयार
करावे.
७) लोणचे मुरण्यासाठी
७
दिवस
टोपामध्ये
तसेच
ठेवावे.
दररोज
चांगले
मुरण्यासाठी
हळुवार
ढवळावे.
अशाप्रकारे
मुरलेले
लोणचे
बरण्यांमध्ये
भरावे.
त्यावर
शिल्लक
राहिलेले
गोडेतेल
ओतावे.
तेलाची
पातळी
लोणच्यावर
राहील
याची
काळजी
घ्यावी.
लोणच्यासाठी साहित्य:
घटक ---प्रमाण
आंबा फोडी ---१ किलो
मीठ ---१६५ ग्रॅम
मेथी ---१३ ग्रॅम
हळद ---२० ग्रॅम
हिंग पावडर ---३३ ग्रॅम
लाल मिरची पावडर ---३२ ग्रॅम
मोहरी डाळ ---६५ ग्रॅम
गोडेतेल ---१६७ ग्रॅम
सोडीयम बेंझोएट --- २३५ मिलीग्रॅम
प्रती
किलो
तयार
लोणचे.
कच्च्या आंब्याची गोड चटणी
१) पूर्ण वाढ झालेली तयार आंबा फळे चटणी तयार करण्यासाठी
घ्यावीत.
फळांचे
वजन
करून
पाण्याने
स्वच्छ
धुवून
घ्यावीत.
फळे
पाण्यामध्ये
नरम
होईपर्यंत
शिजवावीत.
२) पल्पर यंत्राद्वारे
गर
काढून
तो
वजन
करून
घ्यावा.
गरामध्ये
१:१ या प्रमाणात साखर मिसळावी (१ किलो गर + १ किलो साखर). या मिश्रणात मीठ मिसळून मिश्रण ढवळून एकजीव करावे. सदर तयार मिश्रण गॅसवर उकळत ठेवावे.
३) मिश्रण उकळत असताना वेलची, दालचिनी, मिरची पावडर, आले, कांदा आणि लसूण या मसाल्याच्या
पदार्थांची
मलमलच्या
कापडात
सैलसर
पुरचुंडी
बांधावी.
ही
पुरचुंडी
उकळत
ठेवलेल्या
मिश्रणात
सोडावी.
मिश्रण
सतत
ढवळत
राहावे.
मिश्रण
जॅम
प्रमाणे
घट्ट
झाल्यावर
(एकूण
विद्राव्य
घटक
६८
अंश
ब्रिक्स)
मसाल्याची
पुरचुंडी मिश्रणात पिळून काढून टाकावी. नंतर मिश्रणात व्हिनेगार
मिसळून
ते
पुन्हा
जॅमप्रमाणे
घट्ट
होईपर्यंत
उकळावे.
४) तयार झालेली चटणी टिकण्यासाठी
मिश्रणात
२३५
मिलिग्रॅम
सोडीयम
बेंझोएट
प्रती
किलो
चटणीत
मिसळावे.
सोडीयम
बेझोंएट
थोड्या
कोमट
पाण्यात
मिसळून
नंतरच
चटणीमध्ये
टाकावे.
५)
चटणी
गरम
असतानाच
निर्जंतुक
केलेल्या
रुंद
तोंडाच्या
बरण्यात
भरून
त्यावर
अॅल्युमिनियम
फॉईल
लावून
हवाबंद
करावी.
बरण्यांना
झाकणे
लावून
थंड
व
कोरड्या
जागी
साठवणूक
करावी.
एक
किलो
गरापासून
अंदाजे
१.५ किलो चटणी होते.
चटणीसाठी आवश्यक साहित्य:
घटक: प्रमाण
शिजवलेल्या
कच्च्या
आंब्याचा
गर
---१
किलो
साखर - १ किलो
वेलची - १५ ग्रॅम
दालचिनी - १५ ग्रॅम
लाल मिरची पावडर - १५ ग्रॅम
आले - १५ ग्रॅम
कांदा - ६० ग्रॅम
लसूण - १५ ग्रॅम
मीठ - ४० ग्रॅम
व्हिनेगार
- ९०
मिलि
सोडीयम बेंझोएट - २३५ मिलीग्रॅम/किलो चटणी
आंबा पोळी
१) पूर्ण पिकलेली, स्वाद येणारी हापूस आंबा फळे रस काढण्यासाठी
निवडावीत.
फळे
स्वच्छ
धुवून
फळांवरील
साल
सुरीच्या
साहाय्याने
काढावी.
साल
काढलेली
आंबा
फळे
पल्पर
यंत्रामध्ये
टाकून
रस
काढावा.
२) पल्प स्टील पातेल्यात
घेऊन
वजन
करावे.
आंबा
पोळी
करताना
रस
खराब
होवू
नये
तसेच
पोळी
टिकावी
म्हणून
रस
तयार
केल्यावर
त्यात
प्रति
किलो
रस
१
ग्रॅम
पोटॅशियम
मेटाबाय
सल्फाईट
हे
परिरक्षक
मिसळावे.
३) रसामधील एकूण विद्राव्य
घटकांचे
प्रमाण
हॅण्ड
रिफ्रॅक्टोमीटरच्या
साहाय्याने
पहावे.
रसामध्ये
साखर
मिसळून
रसामधील
एकूण
विद्राव्य
घटकांचे
प्रमाण
३५
अंश
ब्रिक्स
करावे
(अंदाजे
१७०
ग्रॅम
साखर
प्रती
किलो
रस).
४) साखर विरघळून झाल्यावर रसामध्ये सायट्रिक आम्ल मिसळून रसाची आम्लता ०.५ टक्के करावी (अंदाजे २.३ ग्रॅम सायट्रिक आम्ल प्रती किलो मिश्रण).
५) अॅल्यूमिनियम
ट्रे
ला
तुपाचा
पातळ
थर
देवून
पोळीसाठी
तयार
केलेला
रस
ट्रे
मध्ये
ओतावा.
६)
पोळी
वाळवणी
यंत्रामध्ये
५५
अंश
सेल्सिअस
तापमानाला
वाळवावी.
वाळलेली
पोळी
प्लॅस्टिक
पिशावीमध्ये
हवाबंद
करावी.
आमरस
१) आमरस तयार करण्यापूर्वी
प्रथम
रिकाम्या
काचेच्या
बाटल्या
तसेच
क्राऊन
कॅपचे
(बिल्ले)
प्रथम
निर्जंतुकीकरण
करावे.
त्यासाठी
टोपामध्ये
बाटल्या
बुडतील
एवढे
पाणी
घेऊन
त्यात
बाटल्या
फुटू
नयेत
म्हणून
तळाशी
मलमल
कापड
टाकावे.
त्यानंतर
त्यात
बाटल्या
पूर्णपणे
बुडवाव्यात.
नंतर
पाण्याला
अर्धा
तास
उकळी
काढून
बाटल्या
निर्जंतुक
कराव्यात.
कापडात
बांधून
बिल्ले
उकळत्या
पाण्यात
५
ते
१०
मिनिटे
ठेवावेत.
त्यानंतर
पाणी
निथळून
बाटल्या
व
बिल्ले
कोरडे
करावेत.
२) पूर्ण पिकलेली, स्वाद येणारी हापूस आंबा फळे रस तयार करण्यासाठी
निवडावीत.
फळे
स्वच्छ
धुवून
फळांवरील
साल
सुरीच्या
साहाय्याने
काढावी.
साल
काढलेली
फळे
पल्पर
यंत्रामध्ये
टाकून
रस
काढावा.
३) रसामधील एकूण विद्राव्य
घटकांचे
प्रमाण
हॅण्ड
रिफ्रॅक्टोमीटरच्या
साहाय्याने
तपासावे
आणि
साखर
मिसळून
२५
अंश
ब्रिक्स
करावे
(अंदाजे
७०
ग्रॅम
साखर
प्रति
किलो
रस).
त्यानंतर
रसाची
आम्लता
तपासून
ती
सायट्रिक
आम्ल
मिसळून
०.५ टक्के करावी (अंदाजे २.३ ग्रॅम सायट्रिक आम्ल प्रती किलो साखर घातलेला रस). रस १० मिनिटे उकळवावा उकळत असताना त्यातील एकूण विद्राव्य
घटकांचे
प्रमाण
आणि
आम्लता
पुन्हा
तपासावी.
आवश्यकता
भासल्यास
साखर
व
सायट्रिक
आम्ल
मिसळून
आवश्यक
प्रमाण
राखावे.
रस
उकळत
असताना
शेवटची
पाच
मिनिटे
शिल्लक
राहिल्यावर
रसामध्ये
पोटॅशियम
मेटाबाय
सल्फाईट
मिसळावे
(७००
मिलीग्रॅम
प्रती
किलो
रस).
पोटॅशियम
मेटाबाय
सल्फाईट
टाकण्यापूर्वी
गरम
पाण्यात
विरघळून
नंतर
संपूर्ण
रसात
टाकून
ढवळावे.
४) दहा मिनिटे उकळल्यावर
त्वरित
गरम
रस
बाटलीमध्ये
भरावा.
बाटली
भरतेवेळी
रसाचे
तापमान
तपासावे.
रसाचे
तापमान
८०
अंश
सेल्सिअसच्यावर
ठेवणे
आवश्यक
आहे,
अन्यथा
बाटल्या
खराब
होण्याची
शक्यता
असते.
५) रस बाटलीमध्ये
भरल्यानंतर
ताबडतोब
क्राऊनकॅप
यंत्राच्या
साहाय्याने
क्राऊन
कॅप
(बिल्ला)
लावावा.
ताबडतोब
भरलेल्या
बाटल्यांचे
पाश्चरीकरण करावे. त्यासाठी पातेल्यामध्ये
पाणी
घेऊन
८०
अंश
सेल्सिअस
पर्यंत
गरम
करावे.
पातेल्यामध्ये
तळाला
स्वच्छ
कापड
टाकून
बाटल्या
हळूहळू
सोडाव्यात.
बाटल्या
३०
मिनिटे
तशाच
पातेल्यामध्ये
ठेवाव्यात.
त्यानंतर
पातेल्यामधून
काढून
थंड
व
कोरड्या
जागी
साठवण
करावी.
हापूस आंबा पेय
१) पूर्ण पिकलेली हापूस फळे पाण्याने स्वच्छ धुवून साल काढावी. पल्पर यंत्र किंवा मिक्सरच्या
साहाय्याने
रस
काढावा.
२) पेय तयार करताना १२.५ टक्के रस घेऊन पेयातील एकूण विद्राव्य
घटकांचे
प्रमाण
१५
टक्के
व
आम्लता
०.२५ टक्के राखण्यासाठी
त्यात
योग्य
प्रमाणात
साखर
व
सायट्रिक
आम्ल
मिसळावे.
उर्वरित
पाणी
मिसळावे.
त्याकरिता
रसातील
एकूण
विद्राव्य
घटक
व
आम्लता
तपासावी.
त्याप्रमाणे
आवश्यक
रस,
साखर,
सायट्रिक
आम्ल
व
पाणी
घेऊन
पेय
तयार
केले
जाते.
३) सर्वसाधारणपणे
हापूस
आंब्यापासून
पेय
तयार
करताना
१
किलो
पेय
तयार
करण्यासाठी
अंदाजे
१२५
ग्रॅम
आंबा
रस,
१२१
ग्रॅम
साखर,
२
ग्रॅम
सायट्रिक
आम्ल
आणि
७५२
मिलि
पाणी
घेऊन
हे
सर्व
घटक
एकजीव
करून
पेय
तयार
करावे.
४) तयार पेय फार काळ टिकवून ठेवावयाचे
असल्यास
ते
८५
अंश
सेल्सिअस
तापमानाला
१०
मिनिटे
गरम
करून
टिकण्यासाठी
त्यात
१२०
मिलीग्रॅम
पोटॅशियम
मेटाबाय
सल्फाईट
प्रति
लिटर
पेयामध्ये
मिसळावे.
५) तयार पेय गरम असतानाच (८० अंश सेल्सिअस तापमान) निर्जंतुक
करून
घेतलेल्या
काचेच्या
बाटल्यांमध्ये
(अर्धा
तास
पाण्यात
उकळवून
घेतलेल्या)
भरून
बिल्ला
लावून
हवाबंद
कराव्यात.
टोपामध्ये
पाणी
गरम
करून
(८०
अंश
सेल्सिअस
तापमान)
त्यामध्ये
बाटल्या
अर्धा
तास
ठेवाव्यात.
अशाप्रकारे
तयार
केलेल्या
पेयाची
साठवण
थंड
व
कोरड्या
जागी
करावी.
कच्च्या आंब्याचे पन्हे
१) पन्हे तयार करण्यासाठी
पूर्ण
वाढ
झालेली
परंतु
कच्ची
फळे
घेऊन
उकळत्या
पाण्यात
चांगली
शिजवावीत.
शिजलेली
फळे
थंड
झाल्यावर
त्याची
साल
काढून
पल्पर
यंत्र
किंवा
मिक्सरद्वारे
त्यांचा
गर
काढावा.
२) रायवळ आंब्यापासून
पन्हे
तयार
करताना
१
किलो
पन्हे
तयार
करण्यासाठी
१००
ग्रॅम
कच्च्या
आंब्याचा
गर,
१९०
ग्रॅम
साखर
आणि
७१२
मिलि
पाणी
घेऊन
मिश्रण
एकजीव
करावे.
हे
मिश्रण
१
मि.मी. च्या चाळणीतून गाळून घ्यावे. मंदग्नीवर
८५
अंश
सेल्सिअस
तापमानाला
१०
ते
१५
मिनिटे
गरम
करून
नंतर
त्यात
टिकविण्यासाठी
१२०
मिलीग्रॅम
पोटॅशियम
मेटाबाय
सल्फाईट
हे
परिरक्षक
मिसळावे.
नंतर
हे
पन्हे
गरम
असताना
निर्जंतुक
केलेल्या
बाटल्यात
भरावे
आणि
बाटल्या
क्राऊन
कॉर्क
यंत्राने
झाकण
लावून
हवाबंद
कराव्यात.
३) सदर बाटल्यांचे
गरम
पाण्यात
(८०
ते
८५
अंश
सेल्सिअस
तापमान)
३०
मिनिटे
पाश्चरीकरण करावे. बाटल्यांची
साठवणूक
थंड
व
कोरड्या
जागी
करावी.
पन्ह्यामध्ये
स्वादासाठी
थोडी
वेलची
पावडर
व
मीठ
टाकावे.
४) हापूस आंब्यापासून
पन्हे
तयार
करताना
१७.५ टक्के उकडलेल्या
आंब्याचा
गर
घेऊन
वरील
पद्धतीने
पन्हे
तयार
करावे.
सारांश
आंबा हे फळ आपल्याला सगळ्यांना त्याच्या सुमधूर चव आणि सुगंध यासाठी परिचित आहे, तसेच त्यामध्ये असलेल्या अति गर मुळे आंब्याला फळांचा राजा असे संबोधले जाते. आंबा हे फळ आपल्याला सगळ्यांना त्याच्या सुमधूर चव आणि सुगंध यासाठी परिचित आहे, तसेच त्यामध्ये असलेल्या अति गर मुळे आंब्याला फळांचा राजा असे संबोधले जाते. जर आंबा व त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा विचार केला तर आंब्यापासून बनलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना वर्षभर आपल्या देशात व अन्य देशात बाहेरील भरपूर मागणी असते. त्यामुळे आंबा फळ प्रक्रिया उद्योग हा एक निश्चितपणे यशस्वी होण्याचा एक खात्रीलायक मार्ग आहे.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know