Translate in Hindi / Marathi / English

Saturday, 1 June 2024

आयुर्वेदिक गुलाब | आरोग्य समस्या दूर करते गुलाब | गुलाबाचे फुल हे स्नेहाचे आणि प्रेमाचे प्रतिक मानले जाते | फुलांचा राजा म्हणून गुलाबकडे पाहिलं जातं | गुलाबाच्या 100 पेक्षा जास्त जाती आहेत | गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये सौम्य रेचक प्रभाव असतो | गुलाबाचा चहा हर्बल आहे | गुलाबात चिंता कमी करणारे एलथेनाइन असते | गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात

आयुर्वेदिक गुलाब

 

आरोग्य समस्या दूर करते गुलाब

फुलांचा राजा म्हणून गुलाबकडे पाहिलं जातं. गुलाब एक बहुवर्षीय, काटे असलेले, पुष्पीय झुडूप आहे ज्याची फुले सुगंधीत असतात. याच्या 100 पेक्षा जास्त जाती आहेत. ज्यामध्ये अधिक एशियाई आहेत. तर काही प्रदेशांचा मूळ प्रदेश यूरोप, उत्तर अमेरीका आणि उत्तर पश्चिमी अफ्रीका देखील आहे. गुलाबाच्या फुलाला कोमलता आणि सुंदरतेचे प्रतिक मानले जाते. परंतु हे सुंदर फूलच नाही तर याचे अनेक औषधी गुण देखील आहेत. गुलाबाचा सुगंधच नाही तर याचे आंदरिक गुण देखील तेवढेच चांगले आहेत. गुलाब लाल, पिवळ्या, गुलाबी, केशरी अशा विविध रंगामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. गुलाबापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. गुलाबपाणी, गुलकंद, गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर अशा विविध पद्धतीने गुलाबाचा वापर केला जातो. हे फुल हृदयाचे आजार, कर्करोग आणि मधुमेहासारखे आजारांवर रामबाण औषध आहे. याशिवाय पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, चेहऱ्यावरील पुळ्या आणि डाग नैसर्गिक उपचारांद्वारे घालवण्यासाठी गुलाब गुणकारी ठरतो.

फुलांचा राजा म्हणून गुलाबकडे पाहिलं जातं. गुलाब लाल, पिवळ्या, गुलाबी, केशरी अशा विविध रंगामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. गुलाबापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. गुलाबपाणी, गुलकंद, गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर अशा विविध पद्धतीने गुलाबाचा वापर केला जातो. हे फुल हृदयाचे आजार, कर्करोग आणि मधुमेहासारखे आजारांवर रामबाण औषध आहे. याशिवाय पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी, चेहऱ्यावरील पुळ्या आणि डाग नैसर्गिक उपचारांद्वारे घालवण्यासाठी गुलाब गुणकारी ठरतो.

गुलाब रोपांची काळजी

गुलाब हे निसर्गाची सर्वात सुंदर देणे असून फुलांमध्ये या पिकाचे स्थान सर्वात वरचे असल्यामुळे गुलाबाच्या फुलाला फुलांचा राजा असे संबोधतात. गुलाबामध्ये अनेक आकर्षक जाति, रंगछटा आणि सुहास असल्यामुळे या फुलांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने केला जातो. तसेच आयुर्वेदातही गुलाबाच्या विषयी भरपूर प्रमाणात लिखाण केलेले आहेअलीकडच्या औद्योगिक क्रांतीच्या युगातही गुलाबाच्या फुलांचा वापर शोभेसाठी तसेच प्रदूषण टाकण्यासाठी होतो.  गुलाबापासून आत्तर, गुलाब पाणी, जाम, जेली, सरबत, गुलकंद अशा प्रकारचे विविध पदार्थ तयार करतात. त्यामुळे गुलाब हे व्यापार आहाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचे फुल पीक आहेआधुनिक युगात गुलाबाची फुले कट फ्लॉवर म्हणून वापरतातफुलांच्या एकूण व्यापारविषयक उलाढालीत जगात गुलाबाचा पहिला नंबर लागतोआपल्या भारतामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात गुलाबाची कट फ्लावर्ससाठी उत्पादन घेतले जात असून महाराष्ट्र लांब दांड्याच्या फुलांच्या उत्पादनात आघाडीवर आहे.

हवामान- गुलाबाचे पीक उष्ण तसेच समशीतोष्ण हवामानात चांगले येतेतरीपण उत्तम दर्जाची फुले मिळवण्यासाठी दिवसाचे सरासरी तापमान 25 ते 32 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे सरासरी तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस असावे. यासाठी सापेक्ष आद्रता 60 ते 65 टक्के असावी. पाच ते सहा तास स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी गुलाबाची वाढ चांगली होऊन फुले चांगली येतातगुलाबाच्या झाडांची वाढ सावलीत नीट होत नाही. सुधारित जाती- गुलाबाच्या फुलांचा आकार, रंग, पाकळ्यांची संख्या आणि ठेवण, दांड्याची लांबी, झाडाच्या वाढीचे सवयीनुसार गुलाबाच्या जातीचे प्रकार पडतात.

हायब्रिड टी= या गुलाबाच्या प्रकाराची लागवड लांब दांड्याच्या फूलांसाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. झाडे मध्यम ते जोरदार वाढतात. फुले मोठी, दुहेरी, आकर्षक रंगाचे आणि झुपकेदार असतात. या प्रकारच्या जातींमध्ये अमेरिकन हेरिटेज, एनिमल्सस्पार्क्स, आरिना, अरुणा, आकाश सुंदरी, अनुराग, अभिसारिका, अर्जुन, हसीना, मृदुला इत्यादी प्रकारच्या अनेक जातींचा समावेश होतो.

फ्लोरी बंडा= हायब्रीड टी आणि पोलियनथा या प्रकारातील जातीच्या संकरातूनफ्लोरी बंडा गुलाबाची निर्मिती झाली आहेया प्रकारातील फुले लहान लहान झुपक्यात येतातप्रत्येक फूल हे मोठ्या करायचे असते पण फुलांचा आकार हायब्रीड टीपेक्षा लहान असतोया प्रकारात बंजारन, चंद्रमा, डी होश, मर्सडीज, अरुणिमा, हिमांगिनी आईस बर्ग, निलांबरी, प्रेमा इत्यादी जातींचा समावेश होतो.

 मिनिएचर= लहान झाड, लहान आणि झुपक्याने येणारी फुले, लहान पाकळ्या, लहान आणि नाजूक देठ असलेला हा छोटा गुलाब असतोया प्रकारातील झाडे लहान आणि काटक असतात. कमी जागेत आणि कुंडीत लावण्यासाठी हा प्रकार उत्तम असतो.

वेलवर्गीय गुलाब= या प्रकारात वेलीसारखी आणि जोमदार वाढणारे गुलाब येतात. कुंपण, भिंती, कमानी आणि मांडव यावर चढविण्यासाठी या प्रकारातील जातीचा उपयोग होतो.

सुवासिक गुलाब= या प्रकारात सुगंध देणाऱ्या जातींचा समावेश होतोआत्तर, सुगंधी तेल, गुलाब पाणी इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी या प्रकारातील जातींची लागवड केली जाते.

गुलाब लागवडीसाठी पूर्वतयारी

 लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची आडवी उभी नांगरट करून तणे धसकटे वेचून घ्यावीत. त्यानंतर वखराच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

आजारांसाठी फायदेशीर गुलाब

गुलाब हे अनेक आजारांसाठी फायदेशीर आहे. गुलांबाच्या पाकळ्यांचा वापर हा चहा, विविध पदार्थ, मिठाई किंवा अनेक औषधे बनवण्यासाठी केला जातो. देशातील प्रसिद्ध शेफ संजीव कपूर गुलाबाच्या पाकळ्यांना आरोग्याचा खजिना मानतात. त्यानी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टद्वारे सांगितले आहे की, प्रेमाच्या प्रतीकाव्यतिरिक्त गुलाब आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे हे त्यांनी सांगितले आहे. गुलाब वजन कमी करण्यास मदत करतात असे ही त्यांनी सांगितले. मूळव्याध, चिंता आणि तणाव यासारख्या गंभीर आरोग्यांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या उपयुक्त ठरू शकतात.

. गुलाबाच्या पाकळ्या वाईट आणि रक्तरंजित अशा दोन्ही प्रकारच्या मूळव्याधांच्या लक्षणांशी लढण्यास मदत करतात. हे पचन सुधारून आतड्याची हालचाल वाढवू शकते. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये सौम्य रेचक प्रभाव असतो ज्यामुळे पचन सुधारते आणि त्याचे कार्य सुधारते.

. गुलाबाचा चहा हर्बल आहे पचनसंस्था सुधारण्यासाठी तो ओळखला जातो. वजन कमी करण्यासाठी निरोगी पचनसंस्था म्हणून एक किंवा दोन कप रोझ चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

. गुलाबाच्या पाकळ्या चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. तणाव कमी करून झोपेला चालना देण्यास मदत करते. त्यात चिंता कमी करणारे एलथेनाइन असते. त्यासाठी गुलाबाचा चहा फायदेशीर आहे.

. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात असे मानले जाते. अँटिऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करण्यास आणि शरीरातील सेल्युलर | आरोग्यास प्रोत्साहन देण्यास मदत करतात. तसेच याचा अर्क देखील जळजळ कमी करण्यात मदत करते. गुलाबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी चे अनेक आरोग्य फायदे आहेत.

सारांश

गुलाबाचे फुल हे स्नेहाचे आणि प्रेमाचे प्रतिक मानले जाते.त्याचा असणारा सुगंध आपले मनही प्रसन्न करतो.आपल्या मध्ये स्नेह निर्माण करणारा असा हा गुलाब खरोखर गुणाने अत्यंत स्निग्ध आणि शीतल म्हणजे थंडावा देणारा असा आहे.फार प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांना गुलाबाचे झाड ,त्याचे सुगंधी आणि आकर्षक फुल आणि त्याचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत. भाव प्रकाश या आयुर्वेदीय शास्त्रज्ञाने शेकडो वर्षांपूर्वी गुलाबाचे फुल हे उत्तम पित्तशामक असल्याचे सांगितले आहे. गुलाबाचे फुल हे अत्यंत सुगंधी असते. त्यामुळे वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होते. अनेक वेळा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना बराच घाम येतो. काही वेळा काही जणांमध्ये या घामाला दुर्गंधी येते. अशा वेळी घामाची हि दुर्गंधी कमी करण्यासाठी अनेक जण केमिकल युक्त सेंट चा वापर करतात. परंतु अशा सेंट चा अतिवापर आरोग्याला हिताचा ठरत नाही. म्हणून अति घाम येणाऱ्या आणि घामाला दुर्गंधी असणार्या व्यक्तींनी अंगाला बाहेरून लावण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचे चूर्ण तसेच गुलाबाचे नैसर्गिक अत्तर वापरावे.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know