पाचवी म्हणजे काय?
पाचवीला पुजलेली सटवाई
सटी म्हणजे ‘सटवाई’ किंवा ‘सटवी’ या नावाने ओळखली जाणारी आणि प्राचीन काळापासून
पुजली जाणारी मातृदेवता. अगदी शिवी म्हणून वापरला जाणारा हा शब्द खरंतर मूळ संस्कृत
‘षष्ठी’ या शब्दापासून तयार झाला आहे. मुलाच्या जन्मानंतरच्या सहाव्या रात्री
‘सटवी’ देवीची शांती करण्यासाठी रात्रभर दिवा लावून ठेवतात. पाट्यावर एक नारळ,
कोरा कागद, पेन किंवा पेन्सिल, मुलगा असेल तर हातोडा व मुलगी असेल तर कोयती असे एक
शस्त्रही ठेवतात व त्यांचे पूजन करतात. त्या रात्री देवी स्वत: येऊन त्या मुलाच्या
कपाळावर त्याचे अदृश्य पण अटल भवितव्य आणि स्वभाववैशिष्ट्य लिहिते, असा समज आहे. यालाच
‘ब्रम्हलिखित’ असे म्हटले जाते.
आपल्या लोकजीवनात
अनेक
दैवतांना
मानाचं
स्थान
असतं
पण
काही
देवता
या
केवळ
एखाद्या
वेळीच
सन्मानाला
पात्र
ठरतात
एरव्ही
त्यांचा
नामोल्लेख
हा
कायमच
उपरोधाने
होतो.
अशीच
सर्वांच
दैव
लिहीणारी
पण
स्वतः
मात्र
या
उपरोधाच्या
बाबतीत
दुर्दैवी
ठरलेली
देवता
म्हणजे
सटवाई
अर्थात
षष्ठी.
षष्ठी अर्थात सटवाई ही मूळ प्रकृतीच्या
सहाव्या
अंशापासून
प्रगट
झाली
म्हणून
तीचं
नाव
षष्ठी.
ती
विष्णूमाया
रूपिणी
आणि
ब्रम्हदेवाची
मानसकन्या
आहे
तीला
स्कंद
कार्तिकेयाची
शक्ती
मानतात.
बाळाचं
दैव
लिहीणारी
देवी
म्हणून
तीचा
लौकीक
आहे.
मांजर
हे
तिचं
वाहन
आहे
जन्मानंतर
पाचव्या
रात्री
बाळाचं
नशीब
लिहायला
ती
येते
महाराष्ट्रात
पाचव्या
दिवशी
संध्याकाळी
तर
गुजरात
मध्ये
सहाव्या
दिवशी
षष्ठी
पूजन
करतात.
कृत्य
दिवाकर
ग्रंथात
म्हटल्या
प्रमाणे
बाळाच्या
जन्मानंतर
पाचव्या
किंवा
सहाव्या
दिवशी
संध्याकाळी,
रात्रीच्या
पहिल्या
यामी(
दिवसांचा
तो
प्रहर
रात्रीचा
तो
याम
म्हणुन
ती
यामिनी)
बाळाच्या
बापाने
सुस्नात
होऊन
देवता
स्मरण
संकल्प
युक्त
असा
कलश
मांडून
त्यावर
ताम्हण
ठेवावे.
त्यात
तांदळाचे
अष्टदल
काढून
आठ
कोपऱ्यात
अनुक्रमे
विघ्नेश
( गणपती)
जन्मदा,
जिवंतिका,शस्त्रगर्भा
,स्कंद
( कार्तिक)
राका
, अनुमती,सिनीवाली,कुहू, वातघ्नी या देवता सुपारीवर , शस्त्रावर
शिशुरक्षिणी
आणि
मूर्तीवर
( चांदी
किंवा
सोन्याची
पुतळी
) यांचं
आवाहन
करून
विघ्नेशादी
आवाहित
देवताभ्यो
नमः
असं
म्हणून
षोडषोपचार
पूजन
करावे
आणि
मग
प्रार्थना
करावी
संपुज्य क्षेत्रस्याधिपती
देवी
सर्वारिष्ट
विनाशिनी
बलीं
गृहाण
मे
रक्ष
क्षेत्रं
सूतींच
बालकम्
(अर्थ: या जागेची मालकीण असणारे हे देवी हा बली घे आणि या सुतिका घराचं आणि बाळाचं रक्षण कर. इथे बली
म्हणजे उडिद घातलेला भात याला अनुसरून कोल्हापूर
भागात
काही
ठिकाणी
थेट
मुंडी
पाय
ठेवले
जातात
) त्या
नंतर
या
आवाहित
देवांना
विनंती
करतात
जननी सर्व भूतानाम् बालानाम् च विशेषतः नारायणी स्वरूपेण बालं रक्ष मे सर्वदा
(अर्थ: सर्व जीवांना विशेषतः लहान बाळाला आईसारखे सांभाळणारी
नारायणी
स्वरूप
अशी
ती
सटवाई
माझ्या
बाळाचं
रक्षण
कर
).
ग्रह भूत पिशाच्चेभ्यो
डाकीनी
योगिनीषुच
मातेव
रक्ष
मे
बालं
श्वापदे
पन्नगेषुच
गौरीपुत्रो
यथा
स्कंदः
शिशुत्वे
रक्षितः
पुरा
तथा
मप्याययं
बाल:
षष्ठिके
रक्ष
ते
नमः
(अर्थ: हे षष्ठी जसं पूर्वी तू गौरीपुत्र
कार्यिकेय
बाळ
असताना
त्याच
सर्व
संकटातून
रक्षण
केलस
तसं
माझ्या
या
बाळाचं
ग्रह
भूत
पिशाच्च
डाकिनी
योगिनी
जनावर
साप
नाग
यांपासून
आई
सारखे
रक्षण
कर
)
हा झाला शास्त्रोक्त
विधी
पण
लोकाचारात
सुतिका
घर
म्हणून
न्हाणीत
शेणाचा
गोळा
थापून
त्यावर
सटवाई
चिकटवून
तिची
पूजा
केली
जाते
त्यावेळी
तिथे
बाळाच्या
नशिबात
जे
जे
लिहावं
असं
वाटतं
त्या
वस्तू
उदा
पाटी
पेन्सिल
पेन
पैसे
अशा
वस्तू
पुजल्या
जातात
( यावरूनच
एखादं
माणूस
प्रसंग
वस्तू
सारखी
सारखी
आयुष्यात
येत
असेल
तर
पाचवीला
पुजलेला
असा
वाक्प्रचार
रूढ
झाला
आहे)
काही
घरात
वरच्या
आवाहित
देवतांच्या
प्रतिनिधी
म्हणून
पाच
कुमारिका
पूजन
करून
त्यांना
बाळाला
ओलांडून
जायला
सांगतात.
पाचवीच्या
पुड्यात
असलेल्या
ओवा
जायफळ
मुरडशेंग
वावडिंग
खारीक
बाळंतशेप
यांची
पूजा
करतात
खरंतर
ही
बाळाला
लागणारी
रोजची
औषधी
गुटी
आहे.
बाळंतिणीला
पथ
पालटणी
(पथ्यात
आहारात
बदल)म्हणून पाच भाज्या एकत्र करून खायला घालतात. असा हा पाचवीचा सोहळा! यानंतर बाळ सव्वा महिन्याच झालं की त्याला सटवाईच्या
दर्शनाला
नेतात.
ही
सटवाई
कधीही
गावाबाहेर
असते
पाचव्या
किंवा सहाव्या दिवशी पाचवीची पुजा
जून्या लोकांची समजूत आहे की बाळाच्या जन्मानंतर
पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पाचवीची पुजा करावी लागते. ती बोलतात की, सटवी किंवा सटवाई
देवी नवजात बाळाचे भविष्य लिहिते. "सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका"
अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या देवीची पूजा
जास्त प्रचलित आहे. रस्त्याच्या कडेला किंवा चौरस्त्यावरील दगडावर दिसणाऱ्या लाल रेघा,
अर्पण केलेले अन्न आणि कापलेला लिंबू ह्या सटवीच्या व्रताच्या खुणा. रात्रीच्या वेळेस
उपासक स्त्रीद्वारे हे क्रियाकर्म केलेले असते. काही
ठिकाणी हीच पुजा सुपामध्ये केली जाते. पण सगळीकडे वही आणि पेन आणि रात्रभर समई दिवा
जळतं ठेवणे, हे मात्र नक्कीच ठेवले जाते. कारण एकच सटवाई देवी बाळाचे भविष्य लिहिते
म्हणून.
सटवाई देवी पुजा विधी
या विधीवेळी लहान बाळाला वस्त्रांशिवाय
निंगडीच्या
म्हणजेच
निरगुडीच्या
पानांवर
झोपवले
जाते.
या
पानांवरून
उचलण्याचा
मान
आत्याचा
असतो.
निरगुडी
ही
वनस्पती
आयुर्वेदाच्या
दृष्टीने
उपयुक्त
असल्याचे
मानले
जाते.
पाचवीच्या
या
विधीमध्ये
एका
सुपात
तांदळावर
कलश
ठेवतात.
त्यावर
नारळ
ठेवून
केळीच्या
पानाचा
लहानसा
भाग
उभा
केला
जातो.
समोर
पानाचे
पाच
विडे
मांडून
त्या
विड्यांवर
सुपारी,बदाम, खारीक,अक्रोड,हळकुंड यांसारखे पदार्थ मांडले जातात. या दिवशी घुगऱ्या ,उकडीच्या पीठाचे मुटके, पिठाचा दिवा बनवला जातो. बाळंतिणीच्या
खाटेच्या
चार
पायांजवळ
चार
पीठाचे
दिवे
व
एक
दिवा
मोरीजवळ
ठेवतात.
जिल्ह्याच्या
उत्तर
भागातील
विधीमध्ये
नाममात्र
फरक
असतो.
इथे
पाट्यावर
वरवंटा
ठेवून
सात
विड्याची
पाने
देठ
खाली
करून
वरवंट्याला
टेकून
ठेवतात
.पानाच्या
टोकांना
शेंदूर
लावतात.
काजळाची
दोन
बोटे
प्रत्येक
पानाला
दोन
डोळे
म्हणून
लावतात.
काही
ठिकाणी
रुईच्या
पानांवर
‘सटी
व
लाठा’ अशी
दोन
चित्रे
काढली
जातात.
समोर
पीठाचे
सात
दिवे
व
पाटयाच्या
चार
कोपऱ्यांना
चार
पीठाचे
दिवे
लावतात.
प्राचीन
परंपरेची
जपणूक
करणारा
मालटा
हा
दगडी
दिवा
पाट्याच्या
मध्यभागी
लावतात.
नंतर
पूजन
करून
नैवैद्य
दाखवला
जातो.
सटवी, सटुआई, सटी,षष्ठी,रानसटवाई, छटी, घोडा सटवाई या नावांनी ओळखली जाणारी ही मातृदेवता आहे तरी कोण?
या मातृकेशी विशिष्ट प्रकारचे नाते असलेल्या स्कंदाला ‘षष्ठीप्रिय’
म्हणतात.
स्कंद
म्हणजेच
शिवपुत्र
कार्तिकेय.
काश्यपसंहितेप्रमाणे
षष्ठी
ही
स्कंदाची
बहिण
आहे.
स्कंद
व
विशाख
हे
तिचे
दोन
भाऊ.
तर
याऊलट
‘देवी
भागवत
पुराण’ व
महाभारतानुसार
ती
स्कंदाची
पत्नी
आहे.
इथे
ती
देवमेना
या
आणखी
एका
उपनावाने
ओळखली
जाते.
सुश्रुतसंहिता
षष्ठीला
‘रेवती’ हे
आणखी
एक
नाव
देते. कुषाणकाळातील एका मूर्तीमध्ये षष्ठी स्कंद आणि विशाख या दोघांमध्ये उभी असलेली दिसते. तिचे षष्ठी हे नाव सार्थक करणारी ही मूर्ती आहे. कारण या शिल्पात तिच्या खांद्यावर ओळीने पाच डोकी दिसतात. कुषाणकाळानंतर शिल्प क्षेत्रांत हा प्रकार लुप्त झाला. सटवाई देवी अनेक गावांची ग्रामदेवता आहे. हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाहीत. फक्त आडोसा असतो. असे असले तरी गुप्त काळांत मात्र बांधकाम होत असल्याचे दिसते. स्कंदगुप्ताच्या काळातील एका लेखांत छंदक नावाच्या व्यक्तीने षष्ठीदेवीचे एक मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. याच काळात षष्ठीदेवीच्या नावाला धरून मुलांची नावे ठेवण्याची पद्धत होती. सन ५३२ मध्ये मध्यप्रदेशातील मंदसोर येथे कोरलेल्या यशोधर्मन उर्फ विष्णुवर्धन याच्या लेखांत ‘षष्ठीदत्त’ नावाची व्यक्ती आढळते, तसेच द्रोणसिंहाच्या भामोद्रामोहता ताम्रपटाचा क्षत्रक नावाचा लेखक ‘षष्ठीदत्तां’चा मुलगा होता. बंगाली लोकांत षष्ठीचरण हे नाव आज ही आढळते. प्राचीन काळापासून
या
देवीला
पुजले
जात
असले
तरी
पुरूषांचा
तिच्या
पूजेशी
काही
संबंध
नसतो.
षष्ठी-सटी-सटवी म्हणजेच शक्तीचे दुर्गा हे रुप मानले असले तरी लोकमताप्रमाणे
ती
अविवाहित
आहे.
‘म्हसोबाला
नाही
बायको
आणि
सटवीला
नाही
दादला’ असे
म्हटले
जाते.
याच
कारणांमुळे
‘पाचवी-सटी’
या
कार्यक्रमाच्या
वेळेस
पुरुषांची
उपस्थिती
टाळली
जाते.
परंतु
कालांतराने
जसे
दगडी
दिव्याची
जागा
धातूच्या
दिव्याने
घेतली,
तसेच
या
‘लेडीज
स्पेशल’च्या
कार्यक्रमात
पुरूषांनीही
शिरकाव
केला.
कोणत्याही
कार्यक्रमाची
सांगता
‘मांस-मद्या’शिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी श्रद्धा असणारा एक वर्ग या प्राचीन संस्कृतीला
अर्वाचीन
पद्धतीने
साजरा
करतोय.
‘अर्थ
समस्या’ नावाची
गोष्ट
पाचवीलाच
पुजलेल्या
मुलींच्या
पालकांसाठी
ही
नवी
प्रथा
अनर्थाकडे
नेत
आहे.
यामुळे
आधीच
समस्यांच्या
गर्तेत
सापडलेल्या
मुलीकडील
लोकांना
हा
‘जादाचा
भुर्दंड’ बसतो.
अर्थात
संस्कृतीत
घडणारे
नवे
बदल
स्विकारायला
हवेतच,
पण
हे
बदल
असंस्कृत
नसतील
याची
काळजी
घ्यायला
हवी.
या
नव्या
प्रथांना
आवर
घालायलाच
हवा.
श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग सोडला तर खूप चांगला
संस्कार आहे!परंपरा आहे! कारण घरातील स्त्रियांना एकत्र येऊन हा दिवस साजरा करण्यात
खूप उत्साह असतो!मुळात घरात नवीन पाहुणा येणे हा आनंद घरात असतो व आयुष्यातील पहिला
संस्कार म्हणून पाचवीला महत्व आहे. नुकत्याच
जन्मलेल्या
बाळाच्या
रडण्याचा
आवाज
येतोय.
बाहेरच्या
बाजूला
मात्र
काही
साहित्याची
जमवाजमव
चाललीय.
‘मालटा’ नावाने
ओळखला
जाणारा
दगडी
दिवा,
जाते,
पाटा-वरवंटा अशा दगडी साहीत्याची
यादी
केली
जातेय.
कधीकाळी
नेहमीच्या
वापरात
असलेल्या
या
वस्तू,
पण
सध्याच्या
काळात
मिळवणे
दगडासारखेच
कठीण
झाल्यासारख्या.
ही
सर्व
जमवाजमव
चालली
आहे
ती
जन्माला
आलेल्या
बालकाला
कुठलीही
बाधा
होऊ
नये,
त्याला
चांगले
आयुष्य
व
आरोग्य
लाभावे
या
हेतूने
केल्या
जाणाऱ्या
पाचवीची.
सहसा
मुलीकडे
होणारा
हा
विधी.
संपूर्ण
महाराष्ट्रात
थोड्याफार
साम्य-भेदाने होतो.
पारंपरिक रूढी झालेली प्रथा आजच्या धावपळीच्या
युगात
टिकून
असून
ग्रामीण
भागात
जुन्या
जानकार
महिलांच्या
सल्ल्याने
विधी
पूजा
होत
आहे.
प्रसूतीनंतर
पाचव्या
दिवशी
मांडणी
करून
पूजेनंतर
सटवाई
ही
बालकाचे
भविष्य
लेखन
करण्यासाठी
देवता
आहे.
पारंपरिक
रीतिरिवाज
नक्षी
काढून
पाट
सजविण्यात
येऊन
बाळाची
पूजा
करून
अखंड
दिवा
तेवत
ठेवण्यात
येतो.
पूजेसाठी लागणारे साहित्य
तांब्याची
कळशी,
नारळ,
खोबऱ्याची
वाटी,
हळद,
कुंकू,
विड्याचे
पाने,
खारीक,
खोबरे,
मीठ,
राखाचे
संरक्षण
बाहुले,
देवीचा
फोटो,
बाळाची
खेळणी,
काजळ,
डबी,
आहारात
मेथी,
पालक,
भात,
पोळी,
वरण
पाच
पकवाने
(खाद्यपदार्थ)
आरबोर,
सैदळ
झाडांची
छोटी
फांदी.
सट चा अर्थ सहा असा आहे!सटवाई म्हणजे सहाव्या दिवसाची देवी जी बाळ जन्मल्या नंतर सहाव्या दिवशी बाळाला पहायला येते व बाळाच्या योग्यते नुसार त्याचे प्रारब्ध लिहून जाते.
अस म्हणल जात की बाळ जन्मल्या नंतर पाचव्या दिवसा पर्यंत त्याचे नशीब कोरे रिकामे असते त्याच्या हाता वर रेषा उमटलेल्या
नसतात
मग
पाचवीला
संध्याकाळी
पाच
वाजता
सटवाई
ची
पूजा
मांडली
जाते
व
एक
अखंड
दिवा
बाळ
जेथे
असते
त्या
खोलीत
तेवत
ठेवला
जातो.
मग
पाचव्या
दिवशी
रात्री
बारा
वाजता
व
सहाव्या
दिवशी
दुपारी
बारा
वाजता
सटवाई
येते
म्हणजे
रात्री
एकदा
व
दिवसा
एकदा
ती
येते
अस
म्हणल
जाते.
व
बाळाचे
भविष्य
लिहून
जाते
पूजे
मध्ये
वही
पाटी
पेन्सिल
व
बऱ्याच
गोष्टी
ठेवल्या
जातात
जेणेकरून
सटवाई
बाळाच्या
प्रारब्धात
शिक्षण
समृद्धी
व
सुख
लिहून
जाईल
आणि
दिवा
इतक्या
साठी
तेवत
ठेवला
जातो
की
सटवाई
आली
आणि
तिला
अंधार
दिसला
तर
ती
भविष्य
रिकामेच
ठेऊन
परत
जाते
व
एकदा
ही
पूजा
झाली
की
सहाव्या
दिवसा
पासून
बाळाला
नवीन
कपडे
घालण्यास
सुरवात
होते. श्रद्धा
अंधश्रद्धेचा
भाग
सोडला
तर
खूप
चांगला
संस्कार
आहे!परंपरा आहे! कारण घरातील स्त्रियांना
एकत्र
येऊन
हा
दिवस
साजरा
करण्यात
खूप
उत्साह
असतो!मुळात घरात नवीन पाहुणा येणे हा आनंद घरात असतो व आयुष्यातील
पहिला
संस्कार
म्हणून
पाचवीला
महत्व
आहे.
सारांश
यांत्रिक
व धावपळीच्या युगातही जुन्या रूढी, परंपरा शहरासह ग्रामीण भागात पाळल्या जात आहेत.
त्यातीलच बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पाचवी पूजन याची प्रथा आजही टिकून आहे.
सर्व स्तरातील कुटुंबीय ही प्रथा जोपासत आहे. सटवाई देवी सरस्वतीच्या रूपात येऊन बाळाला
आशीर्वाद देऊन त्याच्या नव्या आयुष्याची सुरवात करते. बाळाला उदंड निरोगी आयुष्य लाभो
त्याला आयुष्यभर भाग्याची साथ राहो आणि नशिबी एक सुखी समृद्धी आणि समाधानी दीर्घ आयुष्य
येवो यामागील या विधीची आख्यायिका आहे.
वही आणि पेन हे विद्येचे प्रतीक आणि माणूस हा शिक्षणाच्या सहाय्याने यशाची वाटचाल करतो. शेवटी बाळाच्या आयुष्यासाठी केलेली प्रार्थना आणि पूजा याचे भविष्य घडवण्याचा सटवाई मदत करते.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know