फळे योग्य कि फळांचा रस
कोणता फळांचा रस कोणत्या आजारामध्ये फायदेशीर
दररोज एक फळ किंवा रस प्यावा. असे काही लोक
आहेत जे आपल्या दोन दिवसांची सुरुवात फळ किंवा रसाने करतात. पण तुम्ही तुमच्या शरीरानुसार
योग्य फळे खात आहात का? कारण अनेकांना कोणत्या फळाची अॅलर्जी आहे आणि कोणत्या फळाचा
फायदा होतो हेही माहीत नसते. फळांमध्ये अशी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स
असतात. फळे शरीरासाठी देखील आवश्यक असतात कारण त्यातील नैसर्गिक गोडवा म्हणा किंवा
साखर शरीरासाठी फायदेशीर असते.
फळे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
वास्तविक, फळामध्ये भरपूर फायबर असते जे पोटाच्या पचनसंस्थेसाठी खूप चांगले असते, तसेच
वजन कमी करण्यात आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यात हे फळ महत्त्वाची भूमिका बजावते.
फळांमध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स शरीरातील जुनाट
आजार दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
फळांचा रस पिताना या गोष्टींची विशेष काळजी
घ्या की फळ फक्त एका फळापासून बनत नाही, अनेक फळे त्यात मिसळलेली असतात. मात्र, अनेक
फळांची चव चाखायची असेल तर ज्यूस पिऊ शकतो. पण फळांचा रस बनवल्यानंतर त्यातील फायबरचे
प्रमाण कमी होते. फळांचा रस बनवताना त्यातील पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स कमी होतात. त्यात
असलेली साखर आणि कॅलरीजही वाढतात.
फळाचा रस कसा आजारात फायदेशीर
पदार्थांच्या रूपात ज्यूसचे सेवन सर्वत्र
प्रचलित आहे. परंतु सामान्यपणे लोकांना हे माहीत नसते की कधी, कोणता ज्यूस घेणे श्रेयस्कर
आहे. हे लक्षात घेतल्यास याने कित्येक आजारांचा इलाज केला जाऊ शकतो.
अॅसिडिटी: गाजर, काकडी, तुळशीचा रस, फळांचा रस अधिक रस तसेच दूधही लाभदायक आहे.
दमा: बीट, कोबी, गाजर, गोड द्राक्ष्यांचा रस, भाजीचे सूप अथवा मुगाचे सूप,
बकरीचे दूध घेणे लाभकारी आहे. तूप, तेल, लोणी खाऊ नये.
रक्तशुद्धीसाठी: लिंबू, टोमॅटोचा रस, एक भाग अननसाचा रस भोजनापूर्वी केवळ १०० ग्रॅम
घ्यावा. प्रातःकाळी रिकाम्या पोटी लिंबू - पाणी घ्यावे.
संधिवात: गाजर, पालक, काकडी, हिरवी कोथिंबीर, नारळाचे पाणी तसेच सफरचंद घ्यावे.
डायबिटिज: यासाठी कोबी, कारले आणि पालकाचा रस घ्यावा.
मूतखडा: यासाठी काकडीचा रस श्रेष्ठ आहे. सफरचंद, गाजर अथवा भोपळ्याचा रसही सहाय्यक
आहे.
वजन
कमी करण्यासाठी: अननस, कोबी, कलिंगड, लिंबाचा रस फायदेशीर
आहे.
रक्तवृद्धीसाठी: मोसंबी, द्राक्षे संत्री, पालक, टोमॅटो, बीट, सफरचंदाचा रस रात्री घ्यावा.
रात्री भिजविलेल्या खजुराचे पाणी सकाळी सेवन करावे. केळही उपयोगी आहे.
सर्दी
कफ: यामध्ये मुळा, लसूण, गाजराचा रस, मूग अथवा
भाजीचे सूप घेणे श्रेयस्कर आहे.
डोळ्यांची
दृष्टी वाढविण्यासाठी: गाजराचा रस, हिरव्या कोथिंबिरीचा रस श्रेष्ठ
आहे.
वजन
वाढविण्यासाठी: पालक, गाजर, बीट आणि कोबीच्या रसाचे मिश्रण,
दूध, दही, सुका मेवा, द्राक्षे आणि सफरचंदाचा रस घ्यावा.
सफरचंदाचा रस
सफरचंदाच्या
रसात
अँसेटालकोलीन
नावाचे
रसायन
स्मरणशक्ती
वाढवतो
आणि
मेंदूची
कार्यप्रणाली
सक्षम
ठेवतो.
अमेरिकेत
उंदरावर
झालेल्या
संशोधनात
हे
सिद्ध
झाले
आहे
की
यामुळे
अल्झायमरचा
(स्मृतिभ्रंश)धोका कमी होतो. नियमितपणे
सफरचंदाचा
रस
पिणे
युवकांसाठी
फायद्याचे
ठरते.
इतर फायदे: सफरचंद फायबरचा चांगला स्रोत आहे. याच्यामुळे
पचन
प्रणाली
सुधारते
आणि
अपचनाची
समस्या
होत
नाही.
संत्र्याचा रस
संत्र्यामध्ये
मोठय़ा
प्रमाणात
अँटिऑक्सिडेंट
असते.
हेस्पेरीडिन
नावाच्या
अँटिऑक्सिडेंटमुळे
रक्तवाहिन्या
निरोगी
राहतात.
ज्यामुळे
हृदयासंबंधी
आजार
होण्याची
शक्यता
कमी
होते.
हा
रस
सायट्रेटचा
चांगला
स्रोत
आहे.
आंबट
फळांमध्ये
हा
घटक
मोठय़ा
प्रमाणात
आढळतो.
इतर फायदे: किडनीस्टोन(मूतखड्याची)
शक्यता
कमी
होते.
त्याचप्रमाणे
रक्तदाब
नियंत्रणात
राहतो.
अननसाचा रस
यात आढळणारे ब्रोमेलेन
एंजाइम
आहारातील
प्रोटीन
पचवण्यासाठी
मदत
करतात.
रिकाम्यापोटी
हा
रस
पिल्यास
यातील
ब्रोमेलेन
एंजाइम
अँटिअन्फ्लेमेटरी
एजंट
म्हणून
काम
करतात.
यामुळे
सांध्यात
येणारी
सूज
आणि
दुखण्याची
समस्या
कमी
होते.
इतर फायदे: सर्दी, पडसे, कफ या आजारात अननसचा रस अत्यंत उपयुक्त ठरतो.
नारळ पाणी
हा एखाद्या एनर्जी ड्रिंक्सपेक्षा
कमी
नाही.
म्हणून
शारीरिक
कसरत
केल्यानंतर
नारळ
पाणी
पिण्यास
प्राधान्य
द्यावे.जास्त शारीरिक श्रम केल्यानंतर
घामावाटे
निघालेल्या
पाण्याचे
प्रमाण
कायम
राखण्यासाठी
हा
चांगला
पर्याय
ठरतो.
यात
असणारे
इलेक्ट्रोलाइटस
मिठाचा
पुरवठा
करतात.
इतर फायदे: रक्तातील साखरेचा स्तर संतुलित ठेवणे, एलडीएल कोलेस्टेरॉलची
पातळी
आणि
रक्तदाब
नियंत्रणात
ठेवणे.
मुलांना
‘या’फळांच्या ज्यूसपासून दूर ठेवलं पाहिजे
लहान मुलांना फळाचा रस अर्थात फ्रुट ज्यूस द्यावा का हा प्रश्न तुम्हाला कोणीही विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? तर हो द्यायलाच हवा. पण मंडळी तुम्हाला माहित असेलच की कोणत्याही
गोष्टीला
दोन
बाजू
असतात.
एक
चांगली
बाजू
आणि
दुसरी
वाईट
बाजू.
तशीच
फळांच्या
रसाची
सुद्धा
एक
चांगली
बाजू
आहे
आणि
एक
वाईट
बाजू!
सर्वात
प्रथम
हे
समजून
घ्या
फळांचा
रस
वाईट
म्हणजे
फळे
वाईट
असतात
असे
मुळीच
नाही.
उलट
जाणकार
सांगतात
की
फळांच्या
रसापेक्षा
मुलांना
थेट
फळे
खाऊ
घालावीत.
फळांचा
रस
प्यायल्याने
शरीरातून
महत्त्वपूर्ण
फ्लूईड
आणि
इलेक्ट्रोल
निघू
शकतात
आणि
ही
गोष्ट
अतिसाराला
आमंत्रण
देऊ
शकते.
अनेक फळांच्या रसामध्ये
सोर्बिटोल असते जे एक बिगर पाचक शुगरचे रूप आहे. सोर्बिटोल अधिक प्रमाणात वाढल्याने
शरीर आतड्यांमधील रक्त वाहिन्यांमधून पाण्याला खेचून त्याला पातळ करण्याचे प्रयत्न
करते यामुळे विष्ठा पातळ होते. सफरचंद, नासपती आणि चेरीच्या ज्यूस मध्ये सोर्बिटोल
मोठ्या प्रमाणात असते. एका आठवड्यात या फळांचा रस आणि शुगरयुक्त ड्रिंक्स कमी प्रमाणात
प्या. या ऐवजी तुम्ही अननस, संत्री, स्ट्रोबेरी, किवी या फळांचा रस बाळाला देऊ शकता.
यात सोर्बिटोलचे प्रमाण कमी असते.
फ्रूक्टोज एक समस्या
फळांचा रस अतिसाराला कारण होऊ शकतो यामागे
अजून एक कारण असते ते म्हणजे फ्रूक्टोज होय. जास्त करून लोकांना फ्रूक्टोज मुळे समस्या
निर्माण होत नाही परंतु काही लोकांना यामुळे अतिसार, अपचन आणि पोट फुगण्याची व्याधी
निर्माण होऊ शकते. खासकरून बाळांना सोर्बिटोल आणि फ्रूक्टोज युक्त फळांचा रस कमीत
कमी दिला पाहिजे. बेरीज जसे की स्ट्रोबेरी, रसबरी, ब्लूबेरी यात फ्रूक्टोज कमी प्रमाणात
असते. याशिवाय संत्री आणि लिंबू यांसारख्या आंबट फळांमध्ये देखील फ्रूक्टोजची मात्रा
सामान्य असते.
फळांची
अॅलर्जी
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे
कि काही मुलांना फळे व फळांचा रस प्यायल्याने अॅलर्जी होऊ शकते. अॅलर्जी म्हणजे एखादा
पदार्थ खाल्ल्याने त्याचे नकारात्मक व वाईट परिणाम शरीरावर दिसून येतात. अनेक लहान
मुलांनी एखादे विशिष्ट फळ किंवा त्या फळाचा ज्यूस प्यायल्यास त्यांना अतिसाराची समस्या
उद्भवू शकते. खास करून संत्री खाल्ल्याने किंवा त्याचा ज्यूस प्यायल्याने लहान मुलांन
अतिसार होतो असे एका संशोधनात दिसून आले आहे. जेव्हा कधी तुम्ही आपल्या बाळाला पहिल्यांदा
कोणतेही फळ खाऊ घालला तेव्हा ते खाऊ घातल्यावर 2 दिवस वाट पहा जर बाळाला कोणतीही शारीरिक
समस्या सुरु झाली तर डॉक्टरांना दाखवा.
घातक
बॅक्टेरिया
काही प्रकरणांमध्ये फ्रुट ज्यूस प्यायल्याने
घातक बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात ज्यामुळे मुलं आजारी पडू शकतात. त्याला गेस्ट्रोइंटेस्टाइनल
संबंधी समस्या जसे की अतिसार होऊ शकतो. म्हणून बाळाला नेहमी पॉश्चरीकृत ज्यूसच पाजावा.
बाळाला कोणतेही फळ खाऊ घालण्यापूर्वी ते चांगल्या प्रकारे धुवून घ्या. स्टोर केलेल्या
ज्यूसवर बॅक्टेरिया आणि जंतूची पैदास होण्याची शक्यता सावाधिक असते. म्हणून बाळाला
ताजा ज्यूसच पाजावा. तुम्ही केवळ बाळालाच नाही तर पूर्ण कुटुंबाला घरात तयार केला गेलेलाच
ज्यूस द्यावा.
फ्रुट ज्यूसचे
इतर तोटे
ज्यूसमुळे पोट भरते ज्यामुळे बाळाला कमी
भूक लागते आणि ते जेवण खायला नकार देतात. परंतु फ्रुट ज्यूस मध्ये साखरेची मात्रा अधिक
असते यामुळे मुलांच्या दातांना किड लागू शकते. फळांचा ज्यूस प्यायल्याने कोणतीही कठीण
शारीरिक क्रिया केल्यास उलटी देखील होऊ शकते. एकंदर पाहता काही विशेष काळजी घेऊन ठराविक
फळांचा ज्यूसच बाळाला द्यायाल्याने त्यांना कोणताही त्रास होणार नाही. तर ही काही खबरदारी
घेऊनच यापुढे बाळाला ज्यूस भरवा.
सारांश
आपण नेहमी फळांचा वापर करतो. येथे फळांनाही धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्व दिले जाते. फळांच्या फायद्यांबद्दल आपल्या सर्वांना माहित आहे की बहुतेक सर्व फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व, जीवनसत्त्वे आणि इतर अनेक आरोग्यदायी पदार्थ असतात. त्यामुळे ताजी फळे किंवा काही भाज्याही आरोग्यासाठी खूप चांगल्या मानल्या जातात. साहजिकच या फळांचे रस देखील आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. म्हणूनच, जर तुम्हाला तुमच्या शरीरात जीवनसत्त्वे, खनिजे, एन्झाईम्स आणि नैसर्गिक शर्करा नियमितपणे पुरवायची असेल, तर तुम्ही फळांच्या रसाचे सेवन करावे. जर तुम्हाला तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल आणि शरीराची सर्व कार्ये सामान्य करायची असतील तर तुम्ही फळांचा रस अवश्य घ्या.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know