पोषक केळफुल
केळफुलाचे आयुर्वेदिक गुणधर्म
तज्ज्ञांकडून
मिळालेल्या
माहितीनुसार
केळफुलाचं
सेवन
करण्याचे
अनेक
फायदे
असतात.
केळफुलात
अनेक
आयुर्वेदिक
गुणधर्म
असतात.
केळफुलात
प्रामुख्यानं
फायबर,
प्रथिनं,
पोटॅशिअम,
कॅल्शियम,
तांबं,
फॉस्फरस,
लोह,
मॅग्नेशियम
आणि
ई
जीवनसत्त्वं
असतात.
या
गुणधर्मांचा
फायदा
होण्यासाठी
केळफुलाचा
नियमित
आहारात
समावेश
करावा
असा
सल्ला
आयुर्वेद
तज्ज्ञ
देतात.
खनिजांनी भरलेल्या केळीच्या
फायद्यांविषयी आपण सगळ्यांनी बरेच काही ऐकले असेल, परंतु आज आम्ही तुम्हाला केळ फुलांच्या
फायद्यांबद्दल सांगणार आहोत. केळीच्या फुलांमध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम,
लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटामिन ईसारखी खनिजे आणि जीवनसत्वे आढळतात.
हे फुल कच्चे किंवा शिजवून, तसेच सूप, कोशिंबीर आणि तळून देखील खाल्ले जाऊ शकते. याशिवाय
केळीच्या फुलाचा हेअर पॅक किंवा फेस पॅक म्हणूनही वापर करता येते याबाबत
तज्ज्ञांकडून
माहिती
घेतली
असता
केळफुलाचे
अनेक
गुणधर्म
तर
समजलेच
पण
ते
आपल्या
आहारात
कसं
समाविष्ट
करावं
हे
देखील
समजलं.
1.
आयुर्वेदात
केळाच्या
फुलाचा
काढा
करुन
मधुमेह
असलेल्यांना
पिण्याचा
सल्ला
दिला
जातो.
यामुळे
इन्शुलिनची
पातळी
कमी
होते.
रक्तातील
साखर
नियंत्रित
ठेवण्यासाठी
केळफुलाची
भाजी
खाण्याचाही
सल्ला
दिला
जातो.
2.
केळफुलात
असलेल्या
पोषक
तत्त्वांमुळे
आणि
त्यातील
फायबरमुळे
वजन
कमी
करण्यातही
या
फुलाची
मदत
होते.
वजन
कमी
करण्यासाठी
केळाच्या
फुलाचा
उपयोग
सूप
किंवा
कोशिंबीरीत
करण्याचा
सल्ला
दिला
जातो.
3.
केळफुलाचा
उपयोग
आपलं
मानसिक
आरोग्य
सुधारण्यासाठीही
होतो.
केळफुलातील
गुणधर्मांमुळे
त्याचं
सेवन
केल्यास
आपला
मूड
सुधारतो.
केळफुलात
असलेलं
मॅग्नेशियम
तणाव
कमी
करतं
आणि
नैराश्य
येण्यापासून
वाचवतं.
केळफुलात
अँण्टिऑक्सिडण्ट
तत्वं
असतात.
हे
घटक
आपलं
फ्री
रॅडिकल्सपासून
आपलं
संरक्षण
करतात.
फ्री
रॅडिकल्सचा
परिणाम
त्वचेवर
जसा
होतो
तसाच
यामुळे
अल्झायमर,
पार्किनसन्स
या
आजरांचा
धोकाही
असतो.
केळफुलाचा
समावेश
आपल्या
आहारात
नियमित
किंवा
वरचेवर
ठेवला
तर
त्याचा
उपयोग
शारीरिक
आरोग्यासोबतच
मानसिक
आरोग्य
सुधारण्यासही
होतो.
4.
केळफुलाच्या
काढ्यात
हळद,
मिरे
पूड
आणि
जिरे
घालून
तो
पिल्यास
हे
सूप
गर्भाशयाशी
निगडित
समस्या
दूर
करतं.
केळफुलाच्या
या
काढ्याचा
उपयोग
मनातील
भीती
दूर
करण्यासही
होतो.
5.
केळफुलातील
फायबर
पचनास
मदत
करतं.
सेवन
केलेल्या
आहारातील
पोषक
तत्त्वं
शोषून
घेण्यास
वेळफुलातील
गुणधर्म
उत्तेजन
देतात,
6.
टॅनिन,
अँसिड,
फ्लेवोनॉइड
आणि
अँण्टिऑक्सिडण्टस
भरपूर
प्रमाणात
असतं.
हे
घटक
फ्री
रॅडिकलशी
लढण्यास
उत्तेजन
देतात.
तसेच
केळफुलातल्या
या
गुणधर्मांमुळे
कर्करोग
आणि
हृदयरोगाचा
धोका
कमी
होतो.
केळफुलाच्या
काढ्याचा
उपयोग
किडनीशी
संबंधित
समस्या
दूर
करण्यास
होतो.
7.
हृदयासाठी
केळीची
फुले
खाण्याचे
फायदे
हृदय निरोगी ठेवण्यासाठी
लोक
केळीच्या
फुलांचे
सेवन
करतात.
केळीची
ताजी
फुले
हृदयासाठी
चांगली
मानली
जातात.
असे
म्हटले
जाते
की
केळीच्या
फुलामध्ये
असलेले
फेनीलफेंयलेनोने नावाचे
फेनोलिक
कार्डिओ
संरक्षणात्मक
प्रभाव
आहे.
याशिवाय
केळीच्या
फुलांचे
सेवन
केल्याने
हृदयाचे
दुखणेही
कमी
होऊ
शकते.
आहाराकडे
लक्ष
देण्यासोबतच
हृदय
निरोगी
ठेवण्यासाठी
योगासनेही
करत
राहायला
हवी.
8.
जुलाबात
केळीच्या
फुलांचे
फायदे
केळीच्या फुलांचे सेवन केल्याने अतिसाराच्या
समस्येपासून
सुटका
मिळते.
त्यामुळे
अतिसारापासून
आराम
मिळतो,
असे
म्हटले
जाते.
जरी
लोक
पारंपारिकपणे
अतिसार
कमी
करण्यासाठी
याचा
वापर
करतात,
परंतु
त्याच्या
कोणत्या
गुणधर्मांमुळे
ते
फायदेशीर
ठरते
हे
स्पष्ट
नाही.
मासिक पाळीतील वेदनांवर गुणकारी केळफूल
केळे हे बिनबियांचे
सर्वात
जुने
फळ
आहे.
निसर्गतच
जंतुनाशक
वेष्टनामध्ये
असल्याने,
केळ्यातून
जंतूंची
बाधा
होत
नाही,
त्यामुळे
आपोआपच
सर्वाचे
आरोग्य
उत्तम
राहते.
वर्षभर
उपलब्ध
असणारे,
सर्वाच्या
खिशाला
परवडणारे
हे
फळ
आबालवृद्धांना
आवडते.
केळ्याला
शास्त्रीय
भाषेमध्ये
‘‘मुसा पॅराडिसिअॅका” म्हटले
जाते.
केळफुलामुळे
गर्भाशयाच्या
तक्रारी
दूर
करता
येतात.
कारण
केळफुलाच्या
सेवनाने
शरीरातील
अंतस्रावांचे
प्रमाण
संतुलित
करता
येते.
यामुळे
मासिक
पाळीत
अति
रक्तस्राव
होत
असेल
तर
केळफुलाची
भाजी
खाणे
उपयुक्त.
केळफुलामुळे
प्रोजेस्टेरॉन
या
हार्मोन्सचे
प्रमाण
संतुलित
राहते
व
यामुळे
मासिक
पाळीत
होणाऱ्या
वेदना
केळफुलाच्या
सेवनाने
कमी
होतात.
केळ्याच्या
फुलाचे
सेवन
केल्यामुळे
शरीरामधील
प्रोजेस्टेरोनची
पातळी
वाढते.
यामुळे
मासिक
पाळीदरम्यान
अधिक
रक्तस्त्राव
होत
नाही.
यासाठी
तुम्ही
पाण्यामध्ये
मीठ
मिक्स
करून
केळ्याचे
फुल
शिजवून
घ्या.
शिजवून
घेतलेली
फुलं
थंड
झाल्यानंतर
त्यामध्ये
१/२ नारळ, २ ग्रॅम मिरची, अर्धा चमचा जीरं मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणामध्ये
दही
मिक्स
करा.
आणि
गरजेनुसार
यामध्ये
मीठ
टाका.
त्यानंतर
तुम्ही
याचे
सेवन
करू
शकता.
यामध्ये
फायबर
तसेच
पोषक
तत्त्वांचा
आधिक
प्रमाणात
समावेश
असल्याने
वजन
कमी
करण्यासाठी
देखील
याचा
उपयोग
होतो.
वजन
कमी
करण्यासाठी
सूप
किंवा
सलाडमध्येही
या
फुलांचा
तुम्ही
समावेश
करू
शकता.
केळफूल
केस गळतीवर पॅक
केसातील कोंडा केस गलतीस कारणीभूत ठरतो आणि केस निर्जीव देखील होतात. जर तुम्हालाही
असा
समस्या
असतील,
तर
केळ्याच्या
फुलाचा
हेअर
पॅक
बनवून
वापर
केल्याने
या
समस्या
मुळापासून
दूर
होतील.
याशिवाय
केळ्याचा
हेअर
पॅक
केसांची
वाढ
सुधारतो.
याचा
हेअर
पॅक
करण्यासाठी
आधी
केळीचे
फुल
पाण्यात
उकळवा.
यानंतर,
उकडलेले
फुल
पूर्णपणे
पिकलेल्या
एका
केळ्यासह
व्यवस्थित
मिक्स
करून
त्याची
पेस्ट
करा.
नंतर
त्यात
मध
आणि
दूध
मिसळा
आणि
हेअर
पॅक
तयार
करा.
अर्ध्या
ते
एक
तासासाठी
केसांवर
हा
हेअर
पॅक
लावा,
मग
केस
स्वच्छ
धुवा.
आठवड्यातून
दोन
ते
तीन
वेळा
हे
करा.
केळफुल भाजी
केळफुलाच्या
भाजीसाठी
एक
केळफुल,
पाव
कप
काळे
चने
किंवा
वाटाणे,
1 चमचा
तेल,
मोहरी,
जिरे,
चिमूटभर
हिंग,
पाव
चमचा
हळद,
अर्धा
चमचा
तिखट,
1 चमचा
काळा
मसाला,
2 चमचे
गूळ,
आंबटपणासाठी
चिंचेचा
कोळ
किंवा
2 आमसुलं,
चवीपुरतं
मीठ,
पाव
कप
नारळाचा
चव
हे
साहित्य
घ्यावं.
केळफुलाची
भाजी
करताना
पाव
कप
चणे
आधी
पाण्यात
सहा
ते
सात
तास
भिजत
ठेवावेत.
केळफुलं
सोलून
घ्यावे.
केळफुलाची
आमसुली
रंगाची
सालं
काढून
आतमधे
असलेले
कळ्यांचे
गुच्छ
वेगळे
करुन
घ्यावेत.
हळुहळु
आतमधे
कोवळ्या
कळ्या
मिळत
जातात.
शेवटी
शेवटी
केळफुलात
पांढरा
दांडा
लागला
की
सोलणं
थांबवावं.
प्रत्येक
कळीमधला
काळा
दांडा
आणि
पारदर्शक
पातळ
पापुद्रा
काढून
टाकावा.
सर्व
कळ्या
सोलून
झाल्या
की
त्या
बारीक
चिरुन
घ्याव्यात.
एका खोलगट पातेल्यात
मिठाचं
पाणी
तयार
करावं.
चिरलेली
केळफुलं
मिठाच्या
पाण्यात
तीन
चार
तास
भिजवून
ठेवावेत.
यामुळे
केळफुलाचा
चीक
आणि
काळपट
राप
निघून
जाईल.
केळफुलं
हातानं
घट्ट
पिळून
घ्यावीत.
केळफुलं
आणि
चणे
वेगवेगळ्या
डब्यात
ठेवून
प्रेशर
कुकरमधे
ठेवून
तीन
शिट्या
करुन
वाफवून
घ्यावेत.
कढईत तेल गरम करावं. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करावी. शिजवलेले चणे आणि केळफुलं फोडणीस घालावे. ते फोडणीत परतून घेऊन त्यात काळा मसाला, चवीपुरतं मीठ आणि चिंचेचा कोळ घालून वाफ काढावी. भाजीला थोडा रस्सा हवा असल्यास त्यात थोडं पाणी घालावं. पाण्याला उकळी आली की त्यात गूळ घालून पुन्हा भाजी शिजवावी. भाजी शिजली की त्यात खोवलेलं नारळ घालावं.
सारांश
केळ्याचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर लाभ मिळतात हे साऱ्यांनाच ठाउक आहे. पण तुम्हाला माहित आहे का केळ्याच्या झाडाचे देखील अनेक उपयोग आहेत. केळ्याच्या झाडाचा प्रत्येक भाग हा आपल्यासाठी उपयोगी ठरतो. केळफुल, केळ्याची पानं याचे भरपूर फायदे आहेत. केळ्याच्या फुलामध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह ,मॅग्नेशियम, व्हिटॅमिन इ आदी पोषक तत्त्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. केळ्याची फुलं तुम्ही कच्ची किंवा शिजवून देखील त्याचे सेवन करू शकता. त्याचबरोबरीने सलाड किंवा सूपमध्ये देखील याचा वापर तुम्ही करू शकता. केळ्याच्या फुलाचे निरोगी आरोग्याला मिळणारे भरपूर लाभ आहेत. आयुर्वेदामध्ये केळ्याच्या फुलाचा औषधी रुपामध्ये वापर केला जातो. त्याचबरोबरीने हेअर सीरम, फेशिअल ऑइल, क्रिम, स्क्रब तयार करण्यासाठी या फुलाचा वापर करण्यात येतो.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know