Translate in Hindi / Marathi / English

Monday, 10 June 2024

रताळे हे एक कंद आहे | पांढरे रताळे आणि लाल रताळे | लाल रताळे जास्त गोड असते व गुणांनी अधिक चांगले असते | रताळ उपवासाच्या दिवशी याचा खाद्य म्हणून अनेक ठिकाणी वापर होतो, तसेच हे गरिबांचेही खाद्य असून, पचनास हलके आहे | उत्तर भारतात लाल, तर दक्षिण भारतात पांढरी रताळी जास्त पसंत करतात

रताळ

 

रताळ्याचे आरोग्यदायी फायदे

रताळे हे एक कंद आहे. रताळ्याचे 2 प्रकार असतात. पांढरे रताळे आणि लाल रताळे. लाल रताळे जास्त गोड असते व गुणांनी अधिक चांगले असते. उपवासाच्या दिवशी याचा खाद्य म्हणून अनेक ठिकाणी वापर होतो, तसेच हे गरिबांचेही खाद्य असून, पचनास हलके आहे. रताळ्यात नैसर्गिक साखर असते.रताळे मूळचे दक्षिण अमेरिकेतील आहे. उत्तर भारतात लाल, तर दक्षिण भारतात पांढरी रताळी जास्त पसंत करतात. रताळ्यात पाणी 68%, प्रथिने 1%, मेद 03%, स्टार्च 28%, तंतुमय पदार्थ व खनिज पदार्थ 1% असून अ, क आणि ब-समूह जीवनसत्त्वे असतात. त्याची साठवण करताना स्टार्चच्या काही भागांचे शर्करांमध्ये रूपांतर हाेते. पूरक अन्न म्हणून रताळी कच्ची किंवा शिजवून खातात. ती उकडल्यामुळे त्यांची गोडी वाढते. रताळे पौष्टिक, तसेच सारक आहे. रताळ्यात व वेलीमध्ये कवकनाशक व सूक्ष्मजीवनाशक घटक आढळतात.

रताळंही एक भारतामध्ये उगवणारी आयुर्वेदिक वनस्पती आणि कंदमूळ आहे. यामध्ये पांढरे आणि लाल दोन प्रकार आहेत. लाल रताळे चवीला जास्त गोड असते पोषक तत्व चांगल्या प्रमाणात असतात. उपवासाचे दिवशी याचा खाद्य म्हणून अनेक ठिकाणी वापर केला जातो. हे चवीला गोड असल्यामुळे सगळयांना आवडत. अनेकदा रताळ्याचे नाव घेतलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. रताळ्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. रताळ खाल्ल्याने वजन लवकर वाढण्यास मदत होते. जर तुम्ही रोजच्या आहारात रताळ्याचा समावेश केला तर तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होतील.

रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन , व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर यासारखे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. तसेच रताळ्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते. त्यामुळे रताळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुरळीत होते. रताळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, ज्याच्यामुळे आतड्यांच्या हालचालींचे नियमन करणे सोपे होते. तसेच शरीराची पचनक्रिया सुधारते. रताळ्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. रोजच्या आहारात उकडलेलं रताळ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. रताळ्याची चव गोड असल्यामुळे लहान मुलांना देखील तुम्ही हे देऊ शकता. यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. रताळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. जर तुम्ही नियमितपणे रताळे खाल्ले तर सर्दी, खोकला, फ्लू या आजरांचा धोका कमी होतो.

उकडलेलं रताळं आरोग्याचा खजिना

रताळ्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते. रताळं पोषक तत्वांनी समृद्ध असते. रताळ्याचं सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन , व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर यासारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

पचनक्रिया सुरळीत होईल: रताळ्याचं सेवन केल्याने पचन व्यवस्थित होतं. रताळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे आतड्यांच्या हालचालींचे नियमन करणं सोपे होतं आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रताळ्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

त्वचेची चमक: बीटा कॅरेटीन असलेल्या पदार्थाचे नियमित आहारात सेवन केल्यास त्वचा चमकण्यास मदत होते. तसेच रताळ्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट फ्री रॅडिकल्सचे नुकसान कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा ग्लो होतो.

अकाली वृद्धत्वासाठी फायदेशीर: रताळ्यामध्ये जीवनसत्त्व चे प्रमाण ही असते. हे जीवनसत्त्व कोलेजनच्या संश्लेषणात महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यामुळे त्वचेची लवचिकता प्रभावित होण्यास मदत होते. सुरकुत्या आणि कोरडेपणा टाळण्यासाठी व्हिटॅमिन देखील फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुम्हाला मुलायम आणि तरुण त्वचा हवी असेल तर रोजच्या आहारात रताळ्याचा वापर करा.

चट्टे कमी करते: रताळ्यामध्ये अँथोसायनिन्स असतात, ज्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक- विरोधी गुणधर्म असतात. हे डाग टाळण्यास मदत करू शकतात.

केसांसाठी फायदेशीर: रताळ्यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन घटक केस गळणे आणि पातळ होण्यास देखील मदत करू शकतात. जीवनसत्त्वे आणि व्यतिरिक्त, यामध्ये जीवनसत्त्वे बी आणि तसेच पोटॅशियम, मॅगनीज इत्यादी खनिजे देखील भरपूर आहेत. हे सर्व पोषक आरोग्यासाठी तसेच केसांसाठी फायदेशीर आहेत आणि केसांच्या निरोगी वाढीस मदत करू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात फायदेशीर: शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती अनेक आजारांना बळी पडण्यापासून आपलं संरक्षण करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रताळ्याचं सेवन करणं फायदेशीर आहे. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन आणि व्हिटॅमिन सी ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे रताळे खाल्ले तर सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर विषाणूजन्य आजारांचा धोका कमी होईल.

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम: भारतात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अलिकडे प्रौढांपासून ते तरुणांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारणे फार गरजेचं आहे. रताळ्याचं सेवन केल्याने हृदयाचं सुधारते, ज्यामुळे हृदयासंबंधित आजार दूर ठेवण्यास मदत होईल. रताळ्यामध्ये त्यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

वजन नियंत्रित राखण्यास मदत: चवी गोड असलेलं रताळं वजन नियंत्रित राखण्यासही फायदेशीर आहे. रताळ्याची चव गोड असली तरी, हे कमी उष्मांक आणि उच्च फायबरयुक्त आहे. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्हाला जास्त खाण्याच्या सवयीपासून दूर करते आणि यामुळे हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते. रताळे एक कंदवर्गीय फळपीक आहे. रताळेचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. रताळे उपवासात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. याचे सेवन बारामाही केले जाते, मात्र हिवाळ्यात हे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने याचे सेवन हिवाळ्यात जास्त केले जाते. हे एक असं फळ आहे ज्याचे सेवन प्रत्येकजन मोठ्या चविने करत असतो. रताळ्याचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश केला जातो. रताळ्याचे शिकरण, हलवा, मुरंबा, चटणी इत्यादी पदार्थ तयार करून त्याचे सेवन केले जाते.

रताळे खाण्याचे दुष्परिणाम

मुतखडा असलेल्या व्यक्तींनी रताळ्याचे सेवन टाळावे: मुतखडा अर्थात किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी रताळ्याचे सेवन करू नये असा सल्ला दिला जातो. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रताळ्यामध्ये ओकसॉलेट नामक घटक असतो, जे की एका प्रकारचे कार्बनिक आम्ल असते.यामुळे मुतखडा किडनी स्टोन या समस्येत वाढ होऊ शकते. त्यामुळे मुतखडा असलेल्या व्यक्तीने याचे सेवन शक्यतोवर करू नये किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे सेवन करावे.

एलर्जी असलेल्या व्यक्तीने याचे सेवन करू नये: रताळ्याचे जास्त सेवन केल्याने यापासून विविध प्रकारची ऍलर्जीची समस्या उत्पन्न होऊ शकते. रताळे एक मेनीटोल युक्त पदार्थ असते, त्यामुळे याचे सेवन केल्याने ऍलर्जी होऊ शकते तसेच ज्या लोकांना आधीच ऍलर्जीची समस्या आहे त्यांनी देखील रताळ्याच्या सेवन टाळावे यामुळे त्यांच्या समस्येत वाढ होऊ शकते.

पोटासंबंधित विकार वाढू शकतात: ज्या लोकांना नेहमीच पोटासंबंधी कुठले ना कुठले विकार असतात त्या लोकांनी रताळ्याची सेवन करणे टाळावे. रताळ्या मध्ये असलेले मेनीटोल घटक जे की एक प्रकारचे कार्बोहाइड्रेट असते. याला शुगर अल्कोहोल किंवा पॉलीपोल म्हणून संबोधले जाते. या कार्बोहायड्रेट मुळे मानवी शरीरात पोटासंबंधित आजार उत्पन्न होऊ शकतात. यामुळे पोट दुखी सारखे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आधीच पोटात संबंधित विकार असलेल्या व्यक्तीने तसेच कोणत्याही व्यक्तीने याचे प्रमाणाबाहेर सेवन करू नये यामुळे पोटा संबंधित विकार जडू शकतात.

सारांश

रताळे जसे चवीला रुचकर लागतात तसेच त्यात असणारे औषधी गुणधर्म मानवी शरीरासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. यात प्रामुख्याने विटामिन बी 6, अँटिऑक्सिडंट, फायबर असे अनेक पोषकतत्वे उपलब्ध असतात. जे की मानवी शरीराला अनेक प्रकारे फायदे पोहोचवीत असतात. याच्या सेवनाने डायबिटीस सारख्या महाभयंकर आजारांवर देखील नियंत्रण मिळवले जाऊ शकते. तसेच डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी याचे सेवन नुकसानदायक ठरत नाही. असे असले तरी रताळे खाण्याचे काही दुष्परिणाम देखील मानवी शरीराला होत असतात.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know