Translate in Hindi / Marathi / English

Monday, 17 June 2024

उपवास धार्मिक आध्यात्मिक महत्त्व | योग्य पद्धतीने उपवास केल्यास आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात | योग्य पद्धतीने उपवास केल्यास पचन प्रक्रियेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते | वेगेवगळ्या वैद्यकीय पद्धतीमधील माहितीनुसार,आपलं शरीर पूर्णपणे डिटॉक्सिफाय करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ पुरेसा असतो | उपवासाच्या निमित्ताने या नऊ दिवसांत अनावश्यक तसंच विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते |

उपवास

 

उपवास धार्मिक आध्यात्मिक महत्त्व

योग्य पद्धतीने उपवास केल्यास आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात.काही जण फराळचे सेवन करून उपवास करतात तर काही लोक नऊ दिवस कडक व्रत ठेवतात. वेगेवगळ्या वैद्यकीय पद्धतीमधील माहितीनुसार, आपलं शरीर पूर्णपणे डिटॉक्सिफाय करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ पुरेसा असतो. म्हणजे उपवासाच्या निमित्ताने या नऊ दिवसांत अनावश्यक तसंच विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.

आपण ज्या खाद्यपदार्थांचे सेवन करतो, त्याचे सकारात्मक तसंच नकारात्मक परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही होत असतात; ही बाब लक्षात घ्यावी. नवरात्रीच्या दिवसांत व्रतादरम्यान सात्विक भोजन फलाहार केल्यानं शरीर आणि मनाला सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा होतो. योग्य पद्धतीने उपवास केल्यास शरीरासह मानसिक आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते.

 उपवासादरम्यान तुमची पचन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू असते, याचा तुम्ही अनुभव घेतला असेलच. कारण पौष्टिक-सात्विक अन्नपदार्थ, फलाहाराच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. पौष्टिक खाद्यपदार्थ आपल्या पचन संस्थेची खोलवर स्वच्छता करतात. या प्रक्रियेदरम्यान नसापेशींच्या दुरुस्तीचे कार्य देखील पार पडते.

आतड्यांमधील सूज, यकृताशी संबंधित विकार-जखम, अल्सर इत्यादी समस्या नैसर्गिकरित्या ठीक होण्यास मदत मिळते.

योग्य पद्धतीने उपवास केल्यास पचन प्रक्रियेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.

जी लोक फिट राहण्यासाठी भरपूर कष्ट करत आहेत. त्यांनीही आहार-विहाराच्या नियमांचं पालन करून उपवास केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

नवरात्रीचे व्रत करताना तुम्ही फलाहार, कुट्टू तसंच शिंगाड्याचे पीठ आणि साबुदाण्याचे खाद्यपदार्थ तयार करून खाऊ शकता. पण तेलकट- मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

उपवासाचे फराळ तयार करताना अतिशय कमी प्रमाणात तेल-तुपाचा वापर करावा. कारण नवरात्रीच्या उपवासासाठी खाल्ले जाणारे बरेच पदार्थ नैसर्गिकरित्या फॅट फ्री असतात. यापासून पाककृती तयार करतानाही त्यातील मूळ गुणधर्म टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच यामध्ये अधिक प्रमाणात तेल- तूप किंवा तिखट गोष्टींचा समावेश करणं टाळावे.

शरीरातली आमनिर्मिती आणि उपवासाचे महत्त्व

पावसाळ्यामधील अनारोग्याला कारण होणारे अग्नीमांद्य हे केवळ पचन-संस्थानाच्या नव्हे तर वास्तवात सर्व शरीरगत आजारांनाही कारणीभूत होऊ शकते.अग्नी (भूक,पचनशक्ती चयापचय) मंद असतानाही पचायला जड असा पौष्टीक आहार सेवन करणे, पोटाला तडस लागेपर्यंत जेवण, आहाराच्या तोडीचा व्यायाम शरीराला मिळणे,घाम निघेल असे परिश्रम करणे,जड अन्न सेवन करून लगेच झोपणे, आहारसेवन करताना अन्नाचा विचार करता अन्य गोष्टींचा विचार करणे,अन्नसेवनानंतर मानसिक ताण होईल असे व्यवहार करणे, दिवसा झोपणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूक लागलेली नसताना अन्नसेवन करणे आणि आधी सेवन केलेले अन्न पचलेले नसतानाही पुन्हा अन्नसेवन करणे या कारणांमुळे अन्नाचे अर्धवट पचन होते.

अर्धवट पचलेल्या या आहारापासुन आहार-रस तयार तर होतो,मात्र तो संपूर्णपणे पचलेला (अपक्व) असतो,ज्याला आयुर्वेदानेआमअसे नाव दिले आहे. (अष्टाङ्गहृदय .१३.२५) आधुनिक जीवनशैलीजन्य कॅन्सरपासुन ह्र्दयरोगांपर्यंत विविध आजारांचे कारण असलेला असा हा आम तयार होण्याची सर्वाधिक शक्यता पावसाळ्यात असते.कारण वर सांगितलेली बरीचशी कारणे पावसाळ्यामध्ये बाहुल्याने आपल्याला लागू होतात.

आम म्हणजे नेमके काय?

संपूर्ण महाराष्ट्रामधील निदान तीन-चार करोड जनता तरी श्रावणामध्ये वेगवेगळ्या व्रतवैकल्याच्या निमित्ताने उपवास करीत असते.असे असूनही उपवास करण्यामागे धार्मिक कारणांशिवाय आरोग्य कारणेही आहेत,याची अनेकांना कल्पना नसते.शरीरामध्ये तयार होणार्या आमाचे पचन करणे , हे लंघन म्हणजे उपवासामागील मुख्य उद्दिष्ट आहे.सर्वप्रथम आम म्हणजे काय ते समजून घेऊ.सेवन केलेल्या अन्नावर पचन-संस्थानामध्ये पाचक रसांच्या विविध प्रक्रिया होऊन त्यापासुन आहार-रस तयार होतो.या अन्न-रसाचे आतड्यामार्फ़त शोषण होऊन तो सर्व शरीर-धातुंना पोषण देतो.काही कारणांमुळे जर अन्नावर पचनाच्या प्रक्रिया व्यवस्थित झाल्या नाहीत तर अन्नाचे पचन अर्धवट होऊन कच्चा आहार-रस तयार होतो, ,ज्याला आयुर्वेदानेआमम्हटले आहे,कच्चा ( पचलेला) या अर्थाने.

पाचक स्त्रावांच्या प्रक्रिया

भांड्यामध्ये डाळ-तांदूळ आणि पाणी ठेवून ते मिश्रण उकळवून खिचडी तयार करताना एक अवस्था येते,जेव्हा डाळ तांदूळ शिजलेले तर असतात,त्यांचा टणकपणा निघून गेलेला असतो,मात्र ते व्यवस्थित पचून सेवनासाठी योग्य बनलेले नसतात,अर्थात कच्चे असतात.अशाच प्रकारे आपण सेवन केलेल्या आहारावर शरीरातील विविध पाचक स्त्रावांच्या प्रक्रिया तर होतात,अन्नकणांचे विघटनही होते,मात्र त्या सर्व प्रक्रियांमध्ये काहीतरी कमी राहिल्याने अन्नकणांचे विघटन व्यवस्थित होऊन ते किंचित स्थूल आकाराचे तयार होतात,अपेक्षेप्रमाणे सूक्ष्म बनत नाहीत.अशा अन्नकणांनीयुक्त आहाररस हा कच्चा असतो.

संपूर्ण पचन झालेल्या या आहाररसाला कच्चा या अर्थानेआमअसे म्हणतात.कच्चा असला तरी ह्या आमरसाचे आतड्यामार्फ़त शोषण होते तो शरीर-धातुंपर्यंत पोहोचतोही.मात्र या आमरसामध्ये शरीर-धातुंचे (शरीरकोषांचे)पर्याप्त पोषण करण्याची क्षमता नसते. (धात्वग्निदौर्बल्यादधातुस्थितोऽपक्वोऽन्नरसः धात्वग्निभिरपाकादामः׀ डल्हणसुश्रुतसंहिता .१५.३२) त्यामुळे धातुंना पोषण मिळते,तेही अर्धवट स्वरुपाचे.अशा आमरसावर पोसले जाणारे शरीरधातु (शरीरघटक) हे सकस-निरोगी बनत नाहीत,किंबहुना दुर्बल -कमजोर बनतात. अशा दुर्बल शरीराच्या अवयवांना अतिरिक्त कामाचा ताण पडला वा इजा,जंतुसंसर्ग,वगैरे प्रकारे काही त्रास झाला तर त्यांना तो सहन होत येत नाही आणि ते विकृतींनी ग्रस्त होतात. सकस आहार घेणार्या आहारविधींचे नियम अनुसरणार्या व्यक्तीचे शरीर शरीरधातु सुद्धा सकस-सक्षम असतात. मात्र आमरसावर पोसलेल्या शरीराचे अवयव निकस असल्याने लहान-मोठ्या आजारांना बळी पडण्याची दाट शक्यता असते. असे शरीर सहसा या नाही तर त्या रोगाला बळी पडते.

उपवास एक गुणकारी आहाराचे शास्त्र

उपवास ही केवळ डाएटिंग कीवा धर्माच्या नावावर केले जाणारे नसून याचे आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्व आहे. कारण उपवासामुळे अग्निप्रदीप्त होऊन आरोग्य टिकून राहते. परंतु अयोग्य पद्धतीने केलेल्या उपवास जसे कीएकादशी आणि दुप्पट खाशीअसे केल्यास याने शरीराला त्रास होणार आहे.

उपवास = उप + वास

उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे कीवा असणे. केवळ काही विशिष्ट पदार्थ खाणे म्हणजे उपवास नव्हे, तर आपल्या ज्ञानेंद्रिया च्या, कर्मेद्रीयाच्या आणि उभयात्मक मनाच्या जवळ जाणे म्हणजे उपवास करणे. आपले लक्ष म्हणजेच आपला वास, म्हणजे शुद्धी, आपले मन एकाग्र करणे, आपली सद-सद विवेक बुद्धी वापरणे हा खरा उपवास होय.

संपूर्ण दिवस ध्यानस्थ बसणे आणि त्या ध्यान अवस्थेत इतके मग्न होऊन जाणे की भूक, तहान किंवा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीकडे लक्ष राहणे म्हणजे उपवास. मानवी शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे.

साधना अशी असावी की, जेव्हा तुमचे शरीर विसरून तुम्ही तुमच्या आतल्या शरीराला (सूक्ष्म) म्हणजे आत्म्याकडे जाता त्यावेळी तुम्हाला त्या भौतिक शरीराची काहीच गरज नसते. अश्या वेळी शरीर आपोआपच आपले काम करत असते.

जसे की, महावीर स्वामींप्रमाणे प्रमाणे - महीने कोणी अन्न ग्रहण करता राहू शकते का? कारण उपवासचा अर्थ काय खावे आणि काय खाऊ नये असा नसून, एखादी व्यक्ति आपल्या आत्म्या मध्ये आपल्या स्वतःमध्ये लीन होणे असा आहे, जेणेकरून त्याला इतर कोणत्याही गोष्टीचे भान राहणार नाही. जर शरीराबद्दल त्याला काही भान राहणार नाही आणि तो पूर्णता आत्म्या मध्ये एकरूप झाला तर, जेवणाचे भान कसे राहील.

उपवास लंघन ह्यात फरक आहे का?

उपवास हा लंघनाच्या दहा प्रकारापैकी एक आहे. लंघन म्हणजे लघुता (हलकेपणा), शरीरामद्धे लाघवता निर्माण करणे. उपवास म्हणजेच वासापासून दूर राहणे. आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धती मध्ये आहार आणि विहाराला खूप महत्व आहे.

बदलती जीवनशैली आपल्या चुकीच्या खण्यापिण्याच्या सवयीमुळे शरीर यंत्रणा बिघडते, ती दुरुस्त करण्यासाठी शरीर स्वतःहून प्रयत्न करत असते. या प्रयत्ंनातील महत्वाचा भाग म्हणजे शरीरातील अनावश्यक साठलेले पदार्थ बाहेर टाकणे. हीच विषारी द्रव्ये अनेक आजारांचे मुळ आहे. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी विश्रांती लंघन ह्या प्रक्रियांचा वापर केला जातो.

उपवासाचे प्रकार कोणते प्रत्येक प्रकाराचे गुण अथवा अवगुण कृपया सांगावेत?

उपवास हा केवळ शारीरिक नसून कायिक, वाचिक आणि मानसिक अश्या प्रकारे ही केला जातो.

कायिक उपवास म्हणजे शरीराने कोणत्याही प्रकारची हिंसा करणे. वाचिक म्हणजे मौन धरण करणे अथवा आपल्या बोलण्यातून कोणालाही दुखावणे. आणि मानसिक म्हणजे मनाची चंचलता कमी करून मन एकाग्र करणे, प्रत्येकाला मदत करणे, मनामद्धे देखील सात्विक भाव निर्माण करणे. राग, ईर्ष्या, द्वेष, लोभ . रागा पासून अलिप्त राहणे.

उपवास केल्यास किती वाजता सोडावा?

उपवास केल्यास तो नेहमी संध्याकाळी सूर्य मावळण्याआधी अन्न ग्रहण करावे. या नियमाचे दररोज ही पालन करावे. आयुर्वेदात सुर्यास्तापूर्वी जेवण घेणे केव्हाही चांगले. म्हणजे साधारण संध्याकाळी वाजण्याआधी रात्रीचे जेवण घ्यावे. आपल्या घरातील आजी आजोबा ही नेहमीच रात्रीचे जेवण लवकर घ्या असे सांगतात मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

सुर्यास्ता नंतर पोटातील अग्नि शमन पावतो आणि पंचनाची क्रिया मंदावते. त्यामुळे उशिरा खाल्ले गेलेले अन्न पंचले नाही तर आपण इतर व्याधीना निमंत्रण देतो. यामुळे वजन वाढणे, मलावष्टम्भ, जास्त चरबी वाढणे, अम्लपित्त, अश्या आजाराना आपण निमंत्रण देतो.

उपवासामध्ये काय ग्रहण करावे

काय खाऊ नये?

आजकाल च्या ट्रेंड नुसार जसे साबूदाणा वडा किवा खिचडी, चिप्स, भरपूर प्रमाणात शेंगदाणे, बटाटा किवा त्याचे चमचमीत वेफर्स तसेच केळीचे तिखट चमचमीत वेफर्स खाऊ नयेत.

काय खावे?

राजगिरा, रताळे, राजगिरा लाह्या, दूध, सर्व प्रकारची फळे (डाळिंब अंजीर, वेलची केळ अथवा केळी) , लाल भोपळा ,सुका मेवा अथवा भिजवून घेतलेले (बदाम, अंजीर, अक्रोड, खजूर, काळ्या मनुका) , वरई अमसुल सार असा आहार घ्यावा जेणेकरून पित्त वाढणार नाही.

उपवासाच्या दिवशी कांदा लसूण का ग्रहण करू नये?

आयुर्वेदानुसार सत्व, रज आणि तम असे तीन गुण असतात. त्यातील रज आणि तम गुण ही स्थितिदर्शक आहेत म्हणजे ह्या गुणांची व्यक्ति आहे त्या स्थितीच राहते. तम म्हणजे अंधकार अज्ञानाचा अंधार, रंग, चिडचिड, मानसिक नैराश्य, कोणतेही काम करण्याची भावना. आयुर्वेद शास्त्रानुसार कांदा आणि लसूण या दोन्ही गोष्टी रजोगुणात्मक तमोगुणात्मक म्हणजे शरीरामद्धे आणि मनामध्ये राजसीक आणि तामसिक गुणांची वृद्धी करतात असे वर्णन केले आहे. हिंदू संस्कृतीनुसार श्रवण मास, चातुर्मास अश्या वेळी कांदा-लसूण यांचे सेवन वर्ज्य सांगितले आहे कारण कांदा आणि लसूण याने वाढणाऱ्या तम गुणामुळे ध्यान / साधना दरम्यान मन एकाग्र होत नाही. साधना उत्तम होण्याकरिता सत्व गुणाची वृद्धी होणे महत्वाचे आहे आणि त्याकरिता नेहमी सात्विक अन्नाचे सेवन करावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. आहारामध्ये कांदा लसूण याचे काही प्रमाणात सेवन केल्यास त्याचे आरोग्याकरीत फायदे ही सांगितले आहेत परंतु त्याचे प्रमाण आणि निर्माण पद्धती यानुसार ते सेवन केले पाहिजे.

उपवासाला बेकरीतील पदार्थांचे सेवन चालते का?

नाही, उपवासच काय तर इतर वेळी सुद्धा बेकरीचे पदार्थ खाणे टाळावे.

बेकरीचे पदार्थ बनविताना वापरलेल्या यीस्ट प्रकारामुळे शरीरामद्धे कृमि म्हणजेच जंत होण्याचे प्रमाण वाढते. तसेच यामध्ये वापरत असलेल्या मैदयामुळे पंचनाच्या तक्रारी वाढून मलावष्टम्भ, मूळव्याध, अपचन, गसेस होणे, अम्लपित्त अश्या तक्रारी वाढतात.

उपवास आठवडयातून किती वेळा करावा?

उत्तम आरोग्याकरिता आठवड्यातून एक वेळा उपवास करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्ति उपवास करू शकत नाही त्यांनी किमान लघु भोजन अल्प मात्रेत घ्यावे.

उपवास कोणी करू नये?

Ø आयुर्वेदानुसार लहान मुले

Ø वृद्ध व्यक्ति

Ø कमी बल असलेल्या स्त्रिया / पुरुष

Ø गर्भिणी (गरोदर स्त्रिया)

Ø व्याधी ग्रस्त रुग्ण (आजारी व्यक्ति) अथवा नुकतेच आजारातून बाहेर पडलेले व्यक्ति

Ø सूतिका (बाळाला दूध पाजणारी आई)

उपवास कसा सोडावा?

उपवास नेहमी सूर्यास्तपूर्वी सोडावा जेणेकरून अन्नाचे पचन व्यवस्थित होईल.

एकाच वेळी अधिक अन्न खाऊ नये, जेणेकरून अपचन होणार नाही.

उपवास सोडताना नेहमी हलके, पौष्टिक आणि सात्विक अन्न जसे, गव्हाची पोळी / फुलका तेल अथवा तूप लावून, एखादी फळभाजी, मुग डाळीचे कढण असे अन्न घ्यावे.

रजोगुणी आणि तामसीक पदार्थ खाणे पुर्णपणे टाळावे.

उपवास सोडण्यापूर्वी भात घ्यावा आणि नंतर पोळी भाजी असे समीकरण सर्वत्र दिसते, यामागील उद्देश हा भात पचण्यास हलका अश्या अर्थाने घेतला जात असावा. परंतु आयुर्वेदानुसार भात हा शिजण्यास पाणी अधिक लागते म्हणजे तो पाण्यातच तयार होत असल्याने कफ वाढविणारा असे म्हणले जाते, यामुळे पोटातील अग्नि ही मंदावतो म्हणून उपवास सोडताना नेहमी पहिले एक घास पोळीचा घ्यावा आणि नंतर भात घ्यावा जेणेकरून पोटातील अग्नि प्रदीप्त होऊन अन्नाचे पचन होईल.

उपवासाने वजन कमी होण्यास मदत होते का?

आयुर्वेदानुसार सांगितले आहे, हिताशिस्यात (हितकर आहाराचे), मिताशिस्यात (कमी प्रमाणात / योग्य प्रमाणात) आणि कालभोजिस्यात (योग्य वेळेत) खा. साधारण तासाचा काळ दोन जेवणामद्धे जाऊ द्या. अश्या प्रकारे कोणी उपवास करत असेल सात्विक, लघु, ताजे आणि पथ्यकर अन्न घेत असालतर नक्कीच पोटातील अग्नि वाढून अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि शरीरामद्धे आणि पोटामध्ये अतिरिक्त चरबी वाढत नाही आणि वजन कमी होण्यास शरीरामद्धे हलके पणा निर्माण होतो.

उपवासाने पचनशक्ती सुधारते का?

अपथ्याकर अन्न, अध्यशन (अति प्रमानात खाणे), विषमाशन (खाण्याच्या वेळा पाळणे), अजीर्णशन (आधी घेतलेलं अन्न पचन होताच दुसरे अन्न ग्रहण करणे) असे घेतल्यास अग्नि मंदावतो आणि अन्नाचे पचन नीट होता शरीरात आमदोष वाढू लागतो. याच उलट आपणास जर आपचंनाच्या तक्रारी असतीला आणि उपवास केला तर शरीर शुद्धीकरणाचे काम करून सर्व साठलेला आम शरीराच्या बाहेर टाकतो आणि अग्नि पूर्ववत होतो आणि पचन शक्ति सुधारते.

गरोदर स्त्रीने उपवास करावा का?

नाही.यावेळी गर्भाची (बाळाची) पूर्ण वाढ ही आईने घेतलेल्या आहारावर अवलंबून असते. बाळाचे संपूर्ण पोषण हे आईच्या आहारवर अवलंबून असते. याकरिता आईने (गर्भिणी) ने संपूर्ण आहार घेणे महत्वाचे असते. उपवास करू नये. परंतु काही अजीर्णचा त्रास जाणवलं तर लघु (हलका) आहार घेतल्यास चालते परंतु उपाशी राहू नये.

सारांश

उपवास हा कायिक, वाचिक आणि मानसिक अश्या तीन प्रकारे केला जातो. भारतीय संस्कृतीत उपवासाला धार्मिक रित्या महत्व दिले गेले असले तरी त्यामागे शास्त्रीय दृष्टीकोण ही सांगितलं आहे.

उपवासणे फक्त देवपूजा, यज्ञ-याग, किवा ध्यान साधना घडते असे नसून शरीराची आणि मनाची जडण-घडण देखील होते. उपवास शरीर आणि मन शुद्धीकरणाची एक प्रक्रियाच होय. आयुर्वेद शास्त्रानुसार मांसाहार हा पचण्यास जड असतो, मांस शिजण्यासही वेळ लागतो. पचण्यास जड असे अन्न पदार्थ खाल्यास निरनिराळ्या तक्रारी जाणवू लागतात. शिवाय मांसाहार केल्याने तमोगुण (तामस प्रवृत्ती) वाढून मनाची चंचलता, वजन वाढणे, ग्लानि, आळस उद्भवतो. खरे तर मांसाहार हा जिभेने पाणी पिणार्याव प्राण्यांचा आहार आहे, मनुष्याचा नाही. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य शुद्ध आणि सात्विक असावे. कारण आयुर्वेद शास्त्रानुसार उपवास हा आपण शरीराला आणि आपल्या इंद्रियना विश्रांति मिळावी म्हणून करतो.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know