Translate in Hindi / Marathi / English

Monday, 24 June 2024

संधिवात म्हणजेच आर्थरायटिस | संधिवाताच्या आजारामध्ये शरीरातील इतर अवयवांमध्ये देखील सूज येऊ शकते | संधिवाताचा शरीरावर विपरीत परिणाम | संधिवात हा विशेषत: महिलांचा शत्रू पुरुषांपेक्षा महिलांमध्येच सांधेदुखी हा प्रकार जास्त करून असतो | आर्थरायटिसचे सर्वात महत्त्वाचे कारण आपल्या शरीरात तयार होणारे युरिक ऍसिड असते

संधिवात म्हणजेच आर्थरायटिस

 

संधिवाताचा शरीरावर विपरीत परिणाम

सांधेदुखी म्हणजे सांध्यांना येणारी सूज यामुळे साधे दुखतात. 12 ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक संधिवात दिवस' साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सांध्यांना होणाऱ्या सांधेदुखीच्या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. संधिवात हा विशेषत: महिलांचा शत्रू पुरुषांपेक्षा महिलांमध्येच सांधेदुखी हा प्रकार जास्त करून असतो. सांधेदुखीतही अनेक प्रकार आहेत. गाऊट ही एक अतिशय वेदनामय स्थिती असते. शरीरातील लहान-मोठ्या सर्व सांध्यांवर याचा परिणाम होतो. आर्थरायटिसचे सर्वात महत्त्वाचे कारण आपल्या शरीरात तयार होणारे युरिक ऍसिड असते. शरीरातील काही रासायनिक प्रक्रिया बिघडल्यामुळे सांधे आणि त्याच्याजवळ युरिक कण जमा होऊ लागतात. आपल्या शरीरात तयार होणाऱ्या युरिक ऍसिडपैकी 70 टक्के मूत्रमार्गाने विसर्जित होते आणि उरलेले पचन संस्थेमार्फत. जेव्हा युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते तेव्हा ते सांधे, किडनी मूत्रनलिकेत मूतखड्याच्या स्वरूपात जमा होऊ लागते. गाऊट दीर्घकाळ राहिल्यास युरिक कण त्वचेच्या खाली (कोपर आणि कानाच्या बाहेरील भागात) जमा होऊ लागतात. जर गाऊटवर उपचार केले नाहीत, तर युरिक कणांचा हा संग्रह ज्याला "टोळी' म्हणतात, त्वचा फाडून बाहेर येऊन संक्रमणाची शिकार होऊ शकते. गाऊट असलेल्या व्यक्तींनी मांस, मासे, पाव, कोबी, मशरूम, डाळ . खाणे टाळावे किंवा त्यांचे सेवन कमी प्रमाणात करावे.

सांधे सांध्याच्या आसपासच्या पेशी, स्नायू मांसपेशी यांच्या आजारांना इंग्रजीमध्ये 'मस्क्युलेस्केलेटल' आजार असे म्हटले जाते. जगभरात केलेल्या संशोधनामध्ये याचे प्रमाण 15 ते 50 टक्के जनसंख्येमध्ये आढळून येते. 'मस्क्युलेस्केलेटल' आजारापैकीच एक महत्त्वाचा आजार म्हणजे संधिवात होय. (संधिवात / आथ्राइटिस). एकट्या भारतामध्येच संधिवाताचे जवळपास 18 करोड रुग्ण आहेत आणि एवढे रुग्ण असूनसुद्धा सामान्य जनतेला संधिवात या आजाराबद्दल क्वचितच माहीत असेल. उलट समाजामध्ये संधिवात आणि संधिवाताचे उपचार याबद्दल भलतेच गैरसमज पसरले आहेत. संधी म्हणजे सांधा आणि वात म्हणजे त्यामध्ये येणारी सूज, संधिवाताला इंग्रजीमध्ये अर्थराइटिस असेही संबोधतात. संधिवात हा कोणताही आजार नाही, हे एक लक्षण आहे. ज्याप्रमाणे ताप येणे हे एक लक्षण आहे आणि ताप बऱ्याच आजारांमध्ये येऊ शकतो. जसे डेंग्यू, टीबी कोरोना इत्यादी आजार त्याचप्रमाणे संधिवात हा 100 पेक्षाही जास्त आजारांमध्ये आढळून येतो. ज्याप्रमाणे ताप आल्यावर सर्वांना पॅरोसिटेमॉल हे औषध दिले जाते हे सर्वांना माहीतच आहे. पण ताप कशामुळे आला आहे, त्या आजाराचे निदान करून त्यासाठी आजाराचे औषध देणे गरजेचे असते. त्याच पद्धतीने संधिवात नेमका कोणत्या आजारामुळे झाला आहे, याचे निदान करून त्या आजाराची औषधे आपणास रुग्णाला द्यावी लागतात.

संधिवात कोणाला होतो?

संधिवात हा 20 ते 50 वयोगटातील व्यक्तींना होतो. साधारणतः याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते; पण काही संधिवात (उदा. पाठीच्या मणक्याचा संधिवात) पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. जरी संधिवाताचे प्रमाण 20 ते 50 वयोगटात अधिक असले तरी तो लहानांपासून वृद्धापर्यंत कोणालाही होऊ शकतो. संधिवाताचे नेमके कारण अज्ञात आहे; परंतु अनुवंशिकता, वातावरण, व्यसन या घटकांमुळे संधिवाताचे आजार होऊ शकतात, असे विविध संशोधनांमध्ये दिसून आले आहे.

 संधिवात म्हणजेच आर्थरायटिस एक किंवा अधिक सांध्यांना त्रास देतो. ज्यामुळे वेदना होतात आणि शरीराला सूज येते. जगभरातील अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. ऑस्टियोआर्थरायटिस आणि संधिवात हे सर्वात जास्त आढळणारे आजार आहेत. मात्र संधिवात 100 हून अधिक भिन्न प्रकार आहेत. हे रोगप्रतिकारक शक्तीवर देखील परिणाम करू शकतात.

सांधेदुखीचे तोटे काय आहेत?

हे सांधे तसेच स्नायू, संयोजी ऊतक, कंडर आणि तंतुमय ऊतकांना नुकसान पोहोचवू शकते. हे हात, कूल्हे, गुडघे आणि मणक्यासह कोणत्याही सांध्याचे नुकसान करू शकते. भारतात संधिवाताचे 180 दशलक्षाहून अधिक रूग्ण आहेत. ज्यामुळे मधुमेह, एड्स आणि कर्करोग यासह इतर अनेक रोगांपेक्षा ते अधिक गंभीर आहे. हा रोग किती व्यापक आहे याबाबत लोकांना कल्पना नाही. संधीवाताची समस्या वाढवण्यात अनेक चुकीचे समज आजही आहेत. याबाबत योग्य माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

सांधेदुखीची लक्षणे

Ø सांधे दुखी

Ø सांध्यातील लालसरपणा

Ø कोमल, उबदार, सुजलेले सांधे

Ø सांध्यातील जडपणा जो सहसा सकाळी जास्त जाणवतो

Ø थकवा, ताप आणि भूक लागणे

संधिवात अनेक प्रकारचे असतात. ज्यामुळे मुले आणि तरुण, प्रौढ कुणालाही त्रास होऊ शकतो. ही स्थिती वृद्ध लोकांमध्ये अधिक सामान्यपणे दिसून येते. पण त्याचा परिणाम किशोरवयातील व्यक्ती वरही होऊ शकतो. मुलांमध्ये संधिवात हा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्याला बालपण संधिवात किंवा किशोर संधिवात देखील म्हणतात. यामुळे सांधे कायमचे खराब होऊ शकतात.

सर्व सांधेदुखी म्हणजे संधिवात असतो का?

टेंडोनिटिस, बर्साइटिस आणि इतर मऊ-उतींच्या दुखापतींसह अनेक रोगांमुळे सांधेदुखी होऊ शकते आणि संधिवात सारखी वेदना होऊ शकते. म्हणून, कोणत्याही प्रकारच्या वेदनांचे योग्यरित्या निदान करणे महत्वाचे आहे. संधिवात लवकर ओळखणे आणि त्यावर उपचार केल्याने केवळ तुमचे सांधेच नाही तर तुमच्या महत्त्वाच्या अवयवांनाही नुकसान होण्यापासून वाचवता येते. काही प्रकार, जसे की संधिवात, हृदय, रक्तवाहिन्या, मेंदू, त्वचा, डोळे, फुफ्फुसे आणि त्वचेचे नुकसान करू शकतात. तुम्हाला कोणत्या प्रकारचा संधिवात आहे. हे शक्य तितक्या लवकर ओळखणे महत्त्वाचे आहे. कारण यावर अनेक उपचार उपलब्ध आहेत. उपचारांचा योग्य कोर्स सुरू केल्याने तुम्हाला दीर्घकालीन परिणाम टाळता येऊ शकतात. व्यायामामुळे ताकद, गती आणि लवचिकता वाढवताना अस्वस्थता आणि सूज कमी होण्यास मदत होते. काहीच हालचाल केल्यामुळे म्हणजे निष्क्रियतेमुळे लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात. ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज वाढते. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी, आपल्या मर्यादा काय आहेत हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टरांशी चर्चा करूनच व्यायाम करावा. संधिवाताचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. संधीवातामुळे विकृती होऊ शकते. त्यामुळे संधीवात आणि त्याचा प्रकार लवकर ओळखून त्याच्यावर योग्य उपचार घेऊन टाळता येतो. सांधेदुखीचे बहुतेक रुग्ण योग्य उपचार घेऊन निरोगी जीवन जगतात. बर्फासोबतच उष्णतेमुळेही सांधेदुखीपासून आराम मिळतो. योग्य प्रकारे लागू केल्यास, उष्णता सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना आणि कडकपणा कमी करू शकते. कॉम्प्रेससाठी कोल्ड पॅड वापरल्याने वेदना आणि सांध्यातील सूज कमी होण्यास मदत होते. जेव्हा सांधे दुखत असतात, तेव्हा लोकांनी व्यायाम करण्यापूर्वी उबदार कॉम्प्रेस करावे. याव्यतिरिक्त, कोल्ड कॉम्प्रेस देखील वेदना कमी करू शकते आणि जर सांध्यामध्ये जळजळ होत असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो.

सांधेवाताचा त्रास कमी करण्याचे उपाय

वैद्यकशास्त्रात प्रगती झाली असली तरी सांधेदुखीबद्दल अजून बरेच काही शिकायचे आहे. रोग प्रक्रिया विकसित होण्यापासून आणि आपल्या जीवनावर परिणाम होण्यापासून रोखण्यासाठी काही साध्या सावधगिरी बाळगल्या पाहिजेत. संधिवात सोबत अनेक नियंत्रणीय आणि बदलता येण्याजोगे जोखीम घटक असतात. व्यायाम आणि पौष्टिक, संतुलित आहार यासह जीवनशैली राखून आपण काही प्रकारच्या संधिवात होण्याचा धोका कमी करू शकतो याची जाणीव ठेवली पाहिजे. त्यामुळे त्यांची प्रगतीही थांबू शकते.

संधिवात टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी?

1. संधिवात टाळण्यासाठी बॅलेन्स डाएट घेतलं पाहिजे. यामध्ये पालेभाज्या, प्रोटीन, कॅल्शियमयुक्त पदार्थांचा वापर केला पाहिजे.

2. व्यायाम शरीरासाठी अत्यंत गरजेचा आहे. यासाठी रोज सकाळी व्यवस्थित व्यायाम केला पाहिजे.

3. रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे खूप गरजेचे आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर संधिवातावर मात करता येते.

4. काही संधिवातावर वेळीच उपचार केले तर त्यावर मात करता येते. तर, काही संधिवातावर उशिराने उपचार केले तर शुगर, बीपी यांसारखे त्रास होतात. यासाठी जर तुम्हाला त्रास जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सारांश

सांधेदुखी म्हणजे सांध्यांना येणारी सूज यामुळे साधे दुखतात. संधिवाताच्या आजारामध्ये शरीरातील इतर अवयवांमध्ये देखील सूज येऊ शकते. हे आजार इतके घातक असतात की त्यामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीरातील कोणताही अवयव बाधित होऊ शकतो. केस गळणे, चेहऱ्यांवर लालसर रॅश/चट्टे येणे, तोंडामध्ये अल्सर / व्रण येणे, डोळे लाल होणे, डोळ्यामध्ये अथवा तोंडामध्ये कोरड पडणे, थंडीमध्ये हाता-पायांची बोटे पांढरी- निळी होणे, सोरियासिस आजार (त्वचारोग), अत्यंत थकवा जाणवणे, सांधे दुखणे, सुजणे किंवा सकाळी उठल्यावर सांधे आखडणे, हाता-पायाच्या बोटांमध्ये वाकडेपणा येणे, स्नायू वा मांसपेशींमध्ये कमजोरी येणे, ज्यामुळे बसून उठणे, जीने चढणे, . त्रास होतो. मधुमेह रक्तदाबाप्रमाणेच संधिवाताचे एकदा निदान झाल्यास आयुष्यभर औषधोपचार करावे लागतात. सांधे, स्नायू शरीरातील इतर अवयव यांना इजा होण्यापूर्वी वेळीच उपचार सुरू केल्यास संधिवातावर पूर्ण नियंत्रण मिळवणे शक्य असते. तर नाही, काही मोजके अपवाद वगळता रुग्णांना आयुष्यभर स्टेरॉईडस् घ्यावयाची गरज नसते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधे घेतल्यास आपल्या किडनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. याउलट स्वतःच्या मर्जीनुसार वारंवार वेदनाशामक औषधे घेतल्याने मात्र कालांतराने किडनी निकामी होण्याचा धोका असतो.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know