Translate in Hindi / Marathi / English

Saturday, 15 June 2024

राशी चक्राची ओळख ४/४: मकर, कुंभ, मीन | मकर राशीचे जातक मेहनती, कार्याला वाहून घेणारे आणि प्रामाणिक, विश्वासू असतात | कुंभ राशीचे लोक आत्मविश्वासू आणि दृढनिश्चयी असतात | मकर राशीचे लोक खूप जास्त महत्त्वाकांक्षी असतात | मीन राशीचे लोक अत्यंत दयाळू असतात | कुंभ राशीच्या व्यक्ती मानव जातीसाठी प्रेम आणि समाज चांगला बनविण्याच्या प्रयत्नासाठी काहीही करू शकतात | मीन राशीसाठी सौंदर्य हे भौतिक विचाराऐवजी एक मानसिक विचार आहे

राशी चक्र ओळख- ४

 

राशी परिचय: मकर, कुंभ, मीन

मकर (CAPRICORN)

संस्कृत नाव: मकर

नावाचा अर्थ: बकरा

प्रकार: पृथ्वी, मूलभूत, नकारात्मक

स्वामि ग्रह: शनि

शुभ रंग: तपकिरी, राखाडी, काळा

शुभ वार: शनिवार

मकर राशीचे जातक मेहनती, कार्याला वाहून घेणारे आणि प्रामाणिक, विश्वासू असतात. त्यांचा स्वामी ग्रह शनि आहे, त्यामुळे ते शिस्तप्रिय असतात. ह्या राशीच्या व्यक्ती जे कार्यक्षेत्र निवडतील, त्यात त्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होतात. ह्या व्यक्ती अतिशय सावधपणे आणि ठाम विचाराने पुढे वाटचाल करतात. स्वतःच्या विचाराबद्दल, दृष्टिकोणाबद्दल ते नेहमी सजग असतात. स्वतःची प्रगती व्हावी आणि आपल्याकडे समृद्धी यावी म्हणून यासाठी ते कठोर परिश्रम करतात आणि कोणत्याही सोप्या, जवळच्या मार्गाने यश मिळवण्यास ते नकार देतात. ह्या व्यक्ती कठोर आणि ढोंगी आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला जातो परंतु वस्तुस्थिती अशी असते की ते अतिशय विनम्र असतात आणि त्यांचे विचार अतिशय प्रगल्भ असतात. ह्यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू पाहिली की त्यांच्या मनातील प्रेम आणि इतरांबद्दल त्यांच्या मनात असलेली काळजी आपल्याला दिसू शकते. आपल्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी  पोचण्यासाठी आणि स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी ह्या व्यक्ती सुट्टीच्या दिवशीही काम करण्यास तयार असतात. ह्यांच्या मनातील जबाबदारीची भावना आणि दृढ संकल्प इतरांना अतिशय हवेसे वाटणारे असतात. कोणतीही अडचण असली तरी ह्या व्यक्ती त्यातूनही मार्ग काढतात. मकर जातक अतिशय व्यावहारिक असतात आणि आपले ध्येय साधण्यासाठी हट्टी म्हणावे इतक्या टोकाला जाण्याचीही त्यांची तयारी असते. स्वतःच्या कठोर परिश्रमांचे फळ म्हणून त्यांना प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि धनलाभ मिळतात. मेहनती, प्रामाणिक, महत्वाकांक्षी, सहिष्णु, धैर्यवान आणि विश्वासू असे मकर जातक क्वचितच काही तडजोड करतात की ज्यामुळे त्यांच्या मेहनतीत काही कमतरता यावी. आपल्या शिस्तबद्ध वागणुकीने वाटेत येणाऱ्या सगळ्या अडचणींना सहन करत, तोंड देत स्वतःच्या व्यक्तित्वाशी जुळणारा, सहज असा मार्ग निवडतात. ह्या जातकांमध्ये कर्तव्यबुद्धी, नि:स्वार्थी वृत्ती आणि स्वीकृत कार्याप्रती भक्तिभाव असतो. निवडलेल्या ध्येयाप्रती त्यांच्या मनात वसणाऱ्या दृढ भावनेबद्दल त्यांचे नेहमीच कौतुक होते. त्यांच्या अशा स्वभावामुळे त्या व्यक्ती लहरी आणि काहीवेळा स्वतःचे नुकसान करणाऱ्या होतात. परंतु त्यांच्या एकूण अनुभवरुपी संपत्तीमुळे ते लोकांच्या आदराला पात्र होतात. त्यांचा स्वामी ग्रह शनि आध्यात्मिक वृत्तीचा आहे. मकर राशीच्या व्यक्ती स्वतःसाठी उच्च मानदंड निर्माण करतात आणि स्वतःचे स्थान किंवा स्वतःचा वेळ इतर कोणाला देऊ करत नाहीत. ते स्वतःच्या कार्यासाठी अशा प्रकारे वेळ काढतात, त्यावरून त्या व्यक्ती स्वतःचे वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य ह्या गोष्टी पूर्णपणे स्वतंत्र ठेवतात असे आपल्याला कळून येते. मकर राशीच्या व्यक्ती अजिबात घाईगडबड करता, शांतपणे निर्णय घेणारे चतुर व्यापारी होऊ शकतात. आपल्या वैवाहिक जोडीदाराची योग्यता असली किंवा नसली तरीही त्याने आयुष्यात सफल व्हावे असे त्यांना वाटत असते. ह्या व्यक्ती शिक्षण, उद्योग, शेती, प्राचीन वस्तू इत्यादी क्षेत्रात काम करू शकतात. आपल्या राशीचक्रातील ही सर्वात जास्त स्थिर रास आहे. ह्या राशीचे जातक आपल्या सहकाऱ्यांना सुरक्षितता, आराम आणि चिरस्थायी पाठिंबा देतात. ह्या सर्वात जास्त भरवशाच्या व्यक्ती असतात.

मकर राशीचा स्वभाव

आपल्या राशीचे प्रतीक बकरी आहे आणि एखाद्या पहाडी बकऱ्याप्रमाणेच आपण आपल्या आयुष्यात अधिकाधिक उच्च स्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असता, म्हणजेच आपण अतिशय महत्वाकांक्षी आहात. आपण जे उच्च ध्येय गाठण्याचा निश्चय केला असेल, ते ध्येय आपण नक्कीच गाठाल, याबद्दल आपल्या मनात पूर्ण विश्वास असतो. ही गोष्ट आपल्याला फार सुखदायक वाटते आणि त्याच कारणामुळे इतरांच्या मनात आपल्याबद्दल खूप आदर असतो. ह्या राशीचा जातक धोका पत्करण्यास कधीच घाबरत नाही, पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की तो बेपर्वा किंवा अविचारी असतो. ह्या राशीच्या जातकाने आपल्या सगळ्या कामाचे व्यवस्थित पूर्वनियोजन केलेले असते. स्वतःच्या नियोजनाची कार्यवाही करण्याअगोदर तो त्या योजनेचा सर्वांगांनी अभ्यास करतो. त्याचे प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकलेले असते. ह्या जातकाच्या नात्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होत जाते. आपण अतिशय स्वार्थी असण्याची शक्यता असते. आपल्यामध्ये अपार बळ असावे, त्यानुसार आपण कार्यरत असलेल्या क्षेत्राचे नेतृत्व आपल्याकडे यावे आणि आपल्याला उच्च सामाजिक दर्जा मिळावा अशी प्रबळ इच्छा आपल्या मनात वास करत असते. ह्या राशीचा जातक शांत आणि शालीन दिसू शकतो. मनोमन तो अतिशय भावुक असू शकतो. आपल्यातील स्वयंप्रेरणा आपल्याकडून कार्य करून घेते आणि आपण नेहमीच योग्य संधीच्या शोधात असता. आपण पूर्ण एकाग्रतेने कार्य करू शकता.

स्वामी ग्रह: शनि

शनि ग्रह हा ग्रह मर्यादा आणि बंधनांचे प्रतीक आहे. ह्या मर्यादांमुळे जर आपण अपयशी होत असलात तर हे लक्षात घेणे आवश्यक आहे की तर्क आणि इतर कशाच्यातरी प्रभावाखाली असण्यामुळे कालापव्यय करत आहात. पण जर आपण आध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करत असलात तर आपल्याला ते ज्ञान नक्की मिळेल. हे ज्ञान सगळ्या लौकिक व्यवहाराच्या पलीकडचे असते. मकर राशीचा स्वामी शनि ह्या गोष्टीची काळजी घेतो की, जातकाला त्याच्या लायकीप्रमाणे फळ नक्की मिळेल. आयुष्यात कोणताही अयोग्य मार्ग जवळचा आहे म्हणून स्वीकारलात तर काही काळाने आपण नक्कीच गोत्यात येता. परंतु आपले वागणे न्यायाला धरून असले तर त्याचे मधुर फळ आपणास नक्की मिळेल.

दहावे स्थान: व्यवसाय, कारकीर्द

पत्रिकेतील दशम भाव पित्याचे स्थान असून हे स्थान जातकाचे काम आणि व्यवसायही दर्शवते. समाजाचे आपल्याबद्दल काय मत आहे ही गोष्टही ह्याच स्थानावरून कळते. ह्या राशीच्या जातकाला अंतर्ज्ञान असते. आपले सामाजिक स्थान आणि आपल्यासाठी योग्य व्यवसाय ह्यांची माहिती आपणाला दशम स्थानावरून कळते.

तत्व: पृथ्वी

ही रास पृथ्वी तत्वाची आहे. व्यावहारिक वृत्ती हा ह्या राशीचा विशेष आहे. ह्या राशीचा जातक व्यवहारी असतो परंतु त्याच्यात सहजता कमी असते. आपले सगळे वागणे पूर्वनियोजित असते. आपणास अपयश सहन करणे फार कठीण जाते. प्रत्येक बाबीत स्वतःला यश मिळालेच पाहिजे, ह्यादृष्टीने आपण कार्य आणि प्रयत्न करता. एखादी गोष्ट समोर दिसल्याशिवाय, त्या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रमाण मिळाल्याशिवाय आपला त्यावर विश्वास बसत नाही. ज्या गोष्टी व्यवस्थित तपासलेल्या असतील, त्यांच्यावरच आपला विश्वास बसतो. प्रत्यक्ष व्यवहारात जे काही घडेल, तेच आपल्याला पटते, आवडते. निव्वळ आदर्शवादाचा आपण तिरस्कार करता. असे होण्याचे कारण हे आहे की आपण पृथ्वीशी जोडले गेले आहात. इतर लोकही आपल्या मताला महत्व देतात.

शक्ति: स्वीकारलेल्या मार्गावरून आपल्या ध्येयाच्या दिशेने आपण धीरोदात्तपणे वाटचाल करत राहाता. अपयशाचा आपल्या मनावर परिणाम होत नाही. मनाजोगते यश मिळेपर्यंत आपण प्रयत्न थांबवत नाही. मकर राशीचा जातक विसंबून राहाण्याजोगा, धैर्यवान आणि प्रामाणिक असतो. अडचणी पार करून जाण्याची क्षमता आपल्याला मानसिक ताकद देते.

कमतरता: मकर राशीच्या जातकाचा स्वभाव, वागणे निःसंदिग्ध असले तरी त्याच्यातही काही नकारात्मक बाबी आढळतातच. तो बऱ्याचदा स्वार्थीपणे वागतो. ज्यात त्याचा स्वार्थ साधला जाणार नसेल, असे काम तो क्वचितच हाती घेतो. काहीही करून स्वतःचे ध्येय गाठण्याच्या त्याच्या इच्छेमुळे किंवा वृत्तीमुळे तो बऱ्याचदा क्रूर म्हणावे असे वागतो आणि इतरांवर अत्याचार करतो असे म्हटले तरी चालेल. तो पूर्णपणे संवेदनाविहीन, भावनाशून्य होऊ शकतो.

जीवनशैली

मकर राशीच्या जातकांचा आहार: मकर राशीच्या जातकांच्या आहारविषयक सवयी आरोग्यदायक असतात. त्या व्यक्ती आपले जेवण वेळेवर घेतात. जेवताना इतर कोणत्याही गोष्टींनी ते विचलित होत नाहीत. त्यांना पौष्टिक आहार घेणे आवडते, उदाहरणार्थअंजीर, पालक, दूध, आंबट चवीची फळे, अंडी, कडधान्ये, गव्हापासून केलेला पाव, हातसडीच्या तांदुळाचा भात आणि मासे. मकर राशीची माणसे चाकोरीबद्ध आयुष्य जगतात आणि रोज एकाच प्रकारचा आहार घेणे त्यांना जमते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे. मकर राशीचा अंमल हाडांवर आणि दातांवर असतो. म्हणून ह्या राशीच्या जातकांनी दूध, दुधाचे पदार्थ, हिरव्या पानांच्या भाज्या असे भरपूर कॅल्शियम असलेले पदार्थ आपल्या आहारातून घ्यावे.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये: मकर राशीच्या जातकांचे शरीर सुंदर, सुडौल असून त्यांची त्वचा हळुवार, गुळगुळीत असते. भुवया बाकदार लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. वरचा ओठ पातळ असून हनुवटी रेखीव असते. त्यांची उंची सरासरीहून कमीच असते. डोळे खोल असून त्यांच्यात गंभीरपणा असतो. ह्या व्यक्ती सावकाश प्रत्येक शब्द तोलून मापून बोलतात. एखाद्या दार्शनिकासारखी किंवा वैज्ञानिकाप्रमाणे दिसणारी ही माणसे तटस्थ, संयमित, चारचौघांसारखी दिसतात. त्यांना व्यावहारिक बाबींची चिंता असू शकते. पण सौंदर्याला ही माणसे काही महत्व देत नाहीत.

सवयी: ही माणसे अतिशय मेहनती असतात. स्वतःच्या कामासाठी ती माणसे वैयक्तिक सुखावर निखारे ठेवण्यासही तयार होतात. अगदी स्वतःच्या कुटुंबाच्या सुखाचीसुद्धा पर्वा ही माणसे करत नाहीत. असे करण्यामागे गरिबीची दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागण्याची भीती ही कारणे असतातझोपण्याची वेळ सोडून बाकीचा सगळा वेळ ही माणसे कामच करत असतात. त्यामुळे ह्यांना इतर कशाहीसाठी वेळ मिळत नाही. मकर राशीचा जातक भौतिकतावादी नसतो. स्वतःच्या जेवणखाणाकडेही त्याचे लक्ष नसते. ह्याचा त्याच्या तब्येतीवर प्रतिकूल परिणाम होतो.

स्वास्थ्य: ह्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. त्यामुळे म्हातारपणातही त्यांची तब्येत चांगलीच असते. खरेतर, ह्यांचे वय जसजसे वाढत जाईल, तसतशी ह्यांची तब्येत अधिकाधिक ठणठणीत होत जाते. मकर राशीचे जातक असलेली प्रौढ माणसे आश्चर्यकारक म्हणता येतील अशा व्यक्तिमत्वाची असतात. परंतु, ह्यांच्या शरीरातील विशेषकरून गुडघे आणि हाडे कमकुवत असण्याची शक्यता असते. त्यांना सर्दी, सांधेदुखी, मुतखडा, पचनाचे विकार, काही चर्मरोग ह्यांच्यापासून त्रास होऊ शकतो. ह्या व्यक्तींनी पोटभर आणि अतिपौष्टिक अन्न तसेच मद्यपान यांच्यापासून दूर राहावे.

सौंदर्य: मकर राशीच्या व्यक्तींची शरीररचना सुडौल आणि मजबूत असते. त्यामुळे रस्त्यातून जाताना वळून त्यांच्याकडे पाहावे असे इतरांना वाटू शकते. डेनिमचे आणि अगदी अंगाबरोबर बसणारे कपडे ह्या व्यक्तींनी घातले तर ती माणसे अधिक सुंदर दिसतात. ह्या व्यक्तींनी सुरकुत्या नाहीशा करणारे क्रीम मानेला लावावे आणि पावलांना पायांच्या तळव्यांना पेडीक्युअर करून घ्यावे. इतरांना स्वतःकडे आकर्षून घेण्याची इच्छा ह्या व्यक्तींच्या मनात फार असते. ते साधण्यासाठी त्यांनी उठून दिसणारे चमकदार तपकिरी रंगाचे लिपस्टिक आणि नेलपॉलिश वापरावे. मकर राशीच्या व्यक्ती जरा नखरेबाज असतात. पण बाहेर फिरायला गेल्यावर ह्या व्यक्ती सुंदर दिसू लागतात. ह्यांना परंपरागत पद्धतीचा पेहराव आवडतो. ह्यांना दागिन्यांची फारशी आवड नसते. कुटुंबात पिढ्यानपिढ्या वापरले गेलेले दागिने मात्र त्यांना आवडतात.

कुंभ (AQUARIUS)

संस्कृत नाव: कुंभ

नावाचा अर्थ: घडा.

प्रकार: वायू स्थिर सकारात्मक

स्वामी ग्रह: युरेनस

भाग्यशाली रंग: निळा, निळसर हिरवा, करडा, काळा

भाग्यशाली दिवस: रविवार, शनिवार

हे व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या वातावरणात बदल करून ते राहण्यायोग्य एक चांगली जागा बनवीत असतात. याचे प्रतीक एक माणूस आहे जो खांद्यावर घडा उचलून नेत आहे. हे खऱ्या अर्थाने मानवी गुणांनी भरलेले आहेत. प्रगतिशील आणि आधुनिक अशा विचारांवर चालत असतात आणि लवकरच दुसरे लोकही यांच्याशी जोडले जातात आणि एक चांगला समाज बनविण्याचा प्रयत्नात हे लागतात. हे भरपूर लोकांचे मित्र असू शकतात. मानवी आणि परोपकारी, कुंभ राशीच्या व्यक्ती मानव जातीसाठी प्रेम आणि समाज चांगला बनविण्याच्या प्रयत्नासाठी काहीही करू शकतात. पण त्यावेळी हे शांत आणि अलिप्त होत असतात आणि भावनात्मक लगावापासून रिकामे (विलिप्त) होत असतात. हे निष्पक्ष, आधुनिक आणि व्यावहारिक असतात. यांना त्यांचे विचार, जीवन आणि गतीची स्वतंत्रता आवडत असते आणि महान अविष्काराक  किंवा तंत्री विशेषज्ञ सिद्ध होतात . प्रत्येक वेळी आपल्या बदलत्या विचारांमुले हे कधी-कधी रागीट स्वभावाचे वाटतात. वेगळे विचार असणाऱ्यांशी कुंभ राशीचे लोकं संबंध बनवू शकत नाही.

सहानुभूती,संवेदनशीलता , तत्वज्ञानी , मित्रत्व , इत्यादी अनेक गुण कुंभ राशीत जन्मलेल्या व्यक्तींना एक चांगले कौशल्य असते . हे स्वतःहूनच आपल्या विचारांमध्ये   हरविलेले असतात, ज्यामुळे इतर लोकं यांना भेटण्याचा अडचणीत अडकतात, यामुळे ते एकटे राहून जातात. सुंदरतेची प्रशंसा करणारे कुंभ राशीचे वक्ती आकर्षक होत असतात, आणि त्यांच्याविषयी जे काही आहेत ते, मनाने मऊ आणि लवचिक असायला हवे. पण त्यांची अपारंपारिक मानसिकता आणि कल्पकता नेहमी यांच्या विचित्र आणि अनपेक्षित व्यवहारांमध्ये दिसून येत असते. हे आपले ज्ञान क्षितीजाच्या विस्तार करण्याच्या प्रयत्नात असतात. यांचे विश्लेषणात्मक मन यांना विज्ञान आणि अविष्कार यांच्याविषयी आकर्षित करत असते. खरेतर हे सहज उत्तेजित नाही होत उलट, धैर्यवान आणि प्रचंड, कुंभ राशीसाठी त्यांचे मन आणि सल्ला बदलत नाही. यांना कट्टरपंथीसुद्धा म्हणता येणार नाही, प्रगतिशील दृष्टिकोन ठेवतात. कुंभ राशीत जन्मलेल्या व्यक्ती प्रतिभाशाली वैज्ञानिक आणि चिकित्सक बनू शकतात. हे आपल्या कौशल्याचे विश्लेषण चांगल्या तऱ्हेने करू शकतात आणि तासंतास एल्ले लक्ष केंद्रित करू शकतात. हे कलात्मक उपक्रमांमध्येही चांगले आहेतकायद्याचीही असे एक क्षेत्र आहे, कि ज्यामध्ये हे थोड्याफार अडचणींना सामोरे जाऊन पुढे जात असतात. खरेतर पैसे हा कधीही कुंभ राशीच्या व्यक्तीला चिंतेत टाकत. हे नेहमी निःस्वार्थी असतात आणि प्रवासात व्यस्त असतात. ज्यामुळे यांना नुकसानही होत असते.

कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांची खाजगी वेळ आणि जागा खूप आवडत असतात आणि त्यामध्ये ते कोणालाही सहज प्रवेश करू देत नाहीत. पण जेव्हा लोकं त्यांना ओळखून घेतात तेव्हा त्यांना ते आकर्षक आणि आनंदी दिसून येतात. कुंभ राशीच्या व्यक्तींसोबत प्रेम करणे म्हणजे कलात्मक आणि बौद्धिकतेला चालना देणे. हे आपल्या जीवनसाथी सोबत सर्वकाही चांगले करतात. यांचे प्रेम आणि विवाहाविषयीचा दृष्टिकोन तार्किक आणि बौद्धिक असतो. ह्रदया बरोबर मनानेही प्रेम करणे, हि एक चांगल्या नात्याची ओळख असते. हे मनमिळाऊ असतात आणि समजदारही असतात. कुंभ राशी हि राशी चक्रातील अकरावी राशी आहे. तुम्ही खूप संवेदनशील आहात, तुम्ही काही लोकांमध्ये अडकलेले असतात पण खरेतर त्यातले तुमच्या जवळचे काही मित्र असतात आणि ओळखीचे असतात. तुम्ही एक चांगले वक्ता आहेत. तुम्ही तुमच्या सारख्या लोकांमध्ये राहण्याचा आनंद घेतात. तुम्ही साधे बोलणाऱ्यांमधले आहात आणि तुम्हाला जास्त बदल आवडत नाहीत, पण जेव्हा लोक ह्या गोष्टीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात, तेव्हा तुम्ही खूप काळजी करतात. जेव्हा कोणी तुम्हाला फसवत तेव्हा जवळ-जवळ नेहमी तुम्ही त्याचा सूड घेण्याचा भयानक विचारांनी घेरून जातात. तुम्ही तुमचे खाजगी जीवन शांत ठेवण्याची इच्छा ठेवतात. तुम्ही कधी तरी तुमच्या भावनात्मक रूपात तुमच्या नातेवाईकांमध्ये जोडले जातात आणि त्याच बरोबर तुमची संवेदनशिलता आणि तुमचा ध्यासाची कमी असतांनाही तुम्ही सहभागी होत असतात. तुम्ही बुद्धिमान आणि विनोदी आहात. लोकही तुमच्याकडे आकर्षित होतात. तुम्ही एक जलद शिकणारे व्यक्ती आहात. तुम्ही उत्सुक आहात आणि तुमच्या चारही बाजूंना जे काही आहे त्यात तुम्हाला खूप आवड असते आणि खऱ्या अर्थाने तुम्ही एकाही महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

स्वामी ग्रह: युरेनस

युरेनस हा ग्रह सौर प्रणालीमध्ये एक विचित्र ग्रह म्हणून ओळखला जातो. याचा उत्तर ध्रुव सुर्याकडील बाजूस असतो आणि याचा चंद्र याच्या मागून चारही बाजूंनी फिरत असतो. ज्याप्रमाणे युरेनस त्याचा जीवनात विचित्र आणि युनिक गोष्टींचे प्रतीक आहे, हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे तुमची प्रतिभा याच्याशी जोडलेली आहे, जरी हा ग्रह अल्पकालीन आहे. युरेनस दिसणाऱ्या तणावातून अचानक मुक्त करू शकतो. खरेतर युरेनस जोतिष रूपात आपल्या जीवनात उलटे फेरे आणतो. हा आपल्याला सामाजिक अन्यायाविरुध्द लढण्यासाठी आणि अभिव्यक्तची स्वतंत्रता मिळण्यासाठी प्रोत्साहित करत असतो.

अकरावे स्थान: भविष्य

अकरावे घर हे मित्र, आशा आणि स्वप्नांचे घर म्हटले जाते. मित्र जे तुमच्या स्वप्नांना समर्थन करतील, अकरावे घर हे तुमच्या दैनंदिन जबाबदारींशी संबंधित नसेल. याशिवाय हे तुमच्या आदर्श स्थिती आणि तिथे जाण्याच्या पद्धतीच्या स्वप्नांविषयी आहे. मग ते यशस्वी होते अथवा नाहीही होत. तुमच्या स्वप्नांना जिवंत ठेवणे महत्वाचे आहे.

तत्व: वायु तत्वाचा जोतिषीय अर्थ आंदोलन आहे. वायू विचारवंताचा संकेत विचारवंत आहे आणि हे तुमच्याशीही जोडलेले आहे, तुम्ही कृतीच्या तुलनेत बुद्धीला अधिक महत्व देतात. तुमचा जन्मतः मूळ स्वभाव बोलका आहे. तुमचे मन हे लाजाळू आणि भाषेवर चांगले प्रभुत्व करणारे आहे. तुम्ही प्रकाशित आणि विनम्र होऊ शकतात पण, तुमच्या शब्दांमध्ये वादळाचा वेग असू शकतो.

शक्ती: तुम्ही दयाळू आहेत आणि मानवी उपक्रमांमध्ये आवड ठेवतात. तुमच्यामध्ये सकारात्मक गुण आहेत, कि ज्यात तुम्ही विनोदी, बुद्धिमान, काळजी करणारे, रचनात्मक आणि आत्मनिर्भर आहेत. वस्तूंना पाहण्याचा तुमचा मोकळेपणा हि पद्धत सुद्धा तुमची एक वेगळी मोठी ताकद आहे.

कमजोरी: तुम्ही बेजबाबदार आणि भावनाशील होऊ शकतात. तुम्ही नात्यांमध्ये सहभागी होऊन जातात, मग हे तुम्हाला मनापासून आवडत नसले तरीही खऱ्या जीवनात तुमच्यामध्ये अलिप्तपणाची भावना निर्माण होत असते. तुमच्यमध्ये काही नकारात्मक गुणही आहेत, ते म्हणजे तुम्ही जिद्दी, भावनाशील, उदंड आणि उदासीन आहेततुम्हाला माहिती आहे कि हे तुम्हाला सर्व दृष्टींनी तुमच्या जवळून दूर करते.

जीवनशैली: कुंभ राशीचे खानपान

कुंभ राशीच्या व्यक्तींनी रक्तसंचार प्रणाली चांगली चालण्यासाठी चांगला आहार करणे गरजेचे आहे. यांनी रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष द्यायला हवे. झिंगे , कोशिंबीर , खाऱ्या पाण्यातील मोठे मासे , शेलमासा , सागरी मासे , नासपती , निंबू , सफरचंद , कस्तुरी , मुळा , मका , अळू आणि द्राक्षे इत्यादी यांच्यासाठी उपयुक्त आहे . यांना कार्बोनेटेड पेय आणि शर्करायुक्त खाद्य पदार्थांचे सेवन टाळण्याची गरज आहे. यांना स्नॅक्सच्या रूपात जंक फूड खाण्याची सवय आहे. चांगल्या सवयीचा विकास करण्यासाठी यांनी आपल्या आजूबाजूला काजू, कंदमुळे, फळे आणि हिरव्या भाज्या यांचा नाश्त्यामध्ये समावेश करायला हवा. हे कॅफिन संबंधी हि संवेदनशील असतात. शेवटी यांनी कॉफी कडून हर्बल (वनऔषधी) चहासारखे आवड निर्माणतेचा बदल करायला पाहिजेत.

शारिरीक संरचना: कुंभ राशीचे व्यक्ती उंच आणि बारीक असतात. खरेतर त्यांचा बाकी शरीराच्या तुलनेत त्यांची मान हि लहान आणि जाड असते. यांचे नाक आकर्षक आणि टोकदार असते, त्यांचे केस काळे आणि दाट असतात. यांच्या डोळ्यात आनंदाचा भास दिसून येतो. पण यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसून येतात. यांचे हास्य अत्याधुनिक आहे आणि यांचा गालावर खाडी पडते. यांचा आवाज स्पष्ट आणि यांच्या बोलण्यात स्पष्टपणा दिसून येतो. हे कधी कधी रागीट दिसतात, हे पण केव्हा जेव्हा ते गंभीर नसतात. खरेतर यांना काही फरक पडत नाही कि हे बाहेर कसे दिसतात. याचा ते मनातून आनंद घेतात.

सवयी: एका चुकीसाठी ते स्वतंत्र होऊ शकतात, त्याचबरोबर ते जल अधिकाऱ्यांप्रमाणे दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहतात. हे दुसऱ्यांची मदत तर करतात, पण हे कुणाचीही मदत घेत नाहीत. कारण यांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची भीती वाटते. यांना हे समजून घेण्याची गरज आहे कि ते पण एक व्यक्ती आहेत आणि यांना पण काही स्थितींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे. यांच्यात कमावण्याची खूप क्षमता आहे. पण ते त्यांच्या जीवनात ह्या गोष्टीला जास्त महत्व नाही देत. हे यांच्यासाठी तणावाचे सर्वात मोठे कारण आहे.

आरोग्य: त्यांची हाडे अशक्त आहेत, आणि पडल्याने किंवा अपघाताने यांची हाडे तुटू शकतात. याच्या व्यतिरिक्त यांची मज्जासंस्था, ह्रदय, मणक्यांची हाडे आणि मुत्राशयामध्येही आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात .हे सडपातळ राहतात आणि यांची पाचक प्रणाली विविध प्रकारच्या अन्नाला अगदी सहजतेने पचवून घेत असतात. हे चिंता खूप करतात, ज्यामुळे यांना स्नायूंचे विकार होऊ शकतात. यामुळे हे ब्रेन ट्युमर, मिर्गी यासारख्या फक्त वेदना झालेल्या वेळेचा अनुभव घेत असतात. तरीही हे एका चांगल्या आरोग्यासोबत एका योग्य वयापर्यंत जगतात.

सौन्दर्य: यांचासाठी फ्लोरोसेंट हिरवा रंग चांगला आहे, कारण हे त्यांना भाग्य आणि आकर्षण दोन्ही मिळवुन देत असते. यांच्या नैसर्गिक सौन्दर्याला कोणत्याही बनावटीची गरज नाही. कदाचित हे त्यांच्या केसांची संरचना बदलविण्याची इच्छा ठेवतात. हे जवळ-जवळ सर्व प्रकारच्या पोशाखांमध्येही चांगले दिसत असतात. मग तो वेग, रेट्रो काहीही असो. हे खूप साध्या पद्धतीने पोशाख घालू इच्छितात. हे फॅशन पेक्षा आरामाला जास्त महत्व देत असतात.

मीन (PISCES)

संस्कृत नाव:-मीन

नावाचा अर्थ:- मासा.

प्रकार:- जल परिवर्तन शील.

 स्वामि ग्रह:- नेपच्यून.

 शुभ रंग:- चमकदार, गुलाबी, जांभळा, वांगी रंग, समुद्री हिरवा

शुभ वार​:- मंगळवार आणि सोमवार

मीन राशीत जन्मलेले जातक सर्व राशीचक्रात सर्वातसाधे असतात. हे राशीचिन्ह आपल्यासोबत मागील अकरा लक्षणांची वैशिष्ट्य घेऊन येते.यांचे प्रतिक चिन्ह माशांची एक जोडी असते.मीन जातक अध्यात्मिक, स्वार्थी आणि मोक्षप्राप्ती साठी आत्म्याच्या यात्रेवर लक्ष केंद्रित करतात.हे आपल्या आदर्शवादीजगात राहतात आणि बर्याच वेळा यांना कल्पना सत्य यात फरक करणे कठीण असते.यांचा अपेक्षा भंग होतो किंवा  जातो. मीन जातक नेहमी द्विधा मनस्थितीत असतात की प्रकाशाच्या शोधात जावे की अंधारात स्वतःलाझोकून द्यावे.हे दयाळू असतात पण तोपर्यंत चालू जोपर्यंत यांना त्रास दिला जात नाही.जेव्हा असे होते तेव्हा हे अत्यंत कठोर होतात.यांचे ऐकले नाही तर हे निराशेच्या गर्तेत बुडतात आणि वेळेचा अपव्यय करू लागतात, सुस्त उदासीन होतातहे आपल्या सहानुभूती पूर्ण स्वभावाने ओळखले जातात आणि इतरांना आवडतात.मीन जातक आकर्षक असतातआणि भरपूर गोष्टींबाबत निष्काळजीपणाचा दृष्टीकोन ठेवतात.यांच्यासाठी कठीण आहे पण जर यांनी एकदा नियमांचे काटेकोर पालन करणे अनुशासनाचे एका ठराविक स्तरावर पालन करण्यास सुरुवात केली तर हे सरळ होतात​. ह्या गोष्टीच पालन करणे कठीण होते यांची भूमिका पलायनवादी लपून बसण्याची असते.तर कमकुवत लोकं दारू नशिले पदार्थांच्या आहारी जाण्याची शक्यता असते​. निर्माणक्षमताअसलेले काही लोकं कला, संगीत आणि कविता यांच्या माध्यमातुन आपल्या भावना व्यक्त करतात पण यांच्यातील बर्याच जणांना कदाचितचयांच्याआजूबाजूचे लोक वैयक्तिकस्तरावर जाणून / समजून घेतात.हे शूर, स्वतंत्र पण बरेच अव्यवहारी असतात आणि काहीप्रमाणात अस्वस्थ असतात.वास्तव जीवनात काम करत असल्याने ह्या निस्वार्थी आत्म्याला अगदीं सहज अजून भ्रमित केले जाऊ शकते.अध्यात्मिक बाबी गूढ विज्ञान यांना बर्याच प्रमाणात आकर्षित करते आणि  यांच्याशी संबंधीत विषय यांच्या आवडीचे असतात. जसा की या आधीही उल्लेख केला आहे की मीन जातक आपल्या निर्माणक्षमतेचा उपयोग आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करतात आणि म्हणून जर यांनी प्रदर्शन कलेत आपले करिअर केले तर हे संवेदनशील आत्मे महान शिखरावर जाऊन पोचतात.दयाळू धर्मार्थ असल्याकारणाने गणेशलावाटतं की मीन जातक चिकित्सेच्या क्षेत्रात चांगल्याप्रकारे कामगिरी करू शकतात.भौतिकशास्त्र हे यांना यश मिळेलअसे दूसरे क्षेत्र असू शकते.पण बर्याचदा हे कंटाळतात विचलित होतात.यांना आपले लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकताअसते आपले सर्वश्रेष्ठ देण्यासाठी प्रेरित करण्याची गरज असते.हे उधार दिलेल्या पैशांच्या मागे लागत नाही कारण हे अपेक्षा करतात की ती रक्कम त्यांना स्वेच्छेने परत केली  जाईल. खूप रोमँटिक आणि भावनिक मीन राशीचे जातक बहूतेकदा इतके उदार आणि आरामात राहतात की अव्यवहारी वाटतात.जेव्हा प्रेमात हे रोमँटिक आणि खूप रचनात्मक होतात तेव्हा हे प्रेमापेक्षा जास्त प्रेम होण्याच्या विचारात असतात.यांना परिकथेप्रमाणे शेवट आवडतो. हे सुंदर चेहऱ्याकडे आकर्षित होतात. मीनरास राशीचक्रातील शेवटची रास आहे. मीन राशीच्या प्रतिक चिन्हात दोन मासे विरुद्ध दिशेने पोहतांना दिसतात.मासे बहुमुखी आहे. हे आपल्या राशीचे चिन्ह आहे म्हणून आपल्यातही भरपूर प्रमाणात लक्षण दिसून येतात​.आपण समुद्रातील शार्क माशाप्रमाणे खतरनाक असू शकतात किंवा तलावातील माशाप्रमाणे विनम्र असू शकतात.आपणास स्वतंत्र राहण्यास आवडते.समुहात असतानादेखील आपण स्वातंत्र्याला प्राधान्य देता.आपण राशीचक्रातील राशीमध्ये मोठे स्वप्न बघणाय्रांपैकी आहे. स्वतःच्याकाल्पनिक जगात राहणं पसंत करतात.आपण जीवनाकडे एका गुलाबी आभासी काचेतून बघता जिचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असू शकतो वा नसतो.जेव्हा आपला वास्तविक जीवनाशी सामना होतो तेव्हा आपण सत्याचा पूर्णपणेसामना करण्याऐवजी आपल्या काल्पनिक जगात पून्हा जाण्याचा प्रयत्न करता. आपण आळशी ,निष्क्रिय   स्वार्थी असू शकतात. जोपर्यंत आपण आपले हितसाधत नाही तोपर्यंत आपण आपल्या  मित्राच्या हिताची काळजी करत नाही आपण जगातील सर्वात हिन चारित्र्य असलेले असू शकतात जे निंदनीय आहे . आपण अगदी सहजपणेदुसऱ्या कडून प्रभावीत होऊ शकता . आपण विनम्र हृदय कोवळ्या मनाचे आहात.भाग्याहीन लोकांची मदत करण्याची इच्छा ठेवणारे आहात.

स्वामी ग्रह:- नेपच्यून ग्रह समुद्राची देवता आहे.हा ग्रह सत्याच्या विभाजनाचे प्रतिक आहे.असे मानलें जाते की पृथ्वीची निर्मिती समुद्रापासून झाली आहे आणि शेवटी ती समुद्रातच सामावणार आहे. नेपच्यून ग्रहाला धुक्याद्वारे प्रदर्शित केल जावू शकत वास्तविक धुकं आपणास सत्य बघण्यापासून रोखत याशिवाय आपणास आपल्या कल्पनांवर विश्वास ठेऊन लपलेल्या जगातून बाहेर येण्यासाठी मार्गदर्शन घ्यायला हवे.आपला मुख्य ग्रह नेपच्यून अध्यात्मिक आणि रहस्यमय आहे. हे जे काही आहे ते रहस्यमय आहे ते आपण आपल्या पंचेंद्रीयांनी जाणून घेऊ शकत नाही.

नववे स्थान:- बारावे घर मीन राशीचे आहे आणि याच्या पारंपारिक अर्थानुसार हे घर अंता बद्दल नाही तर ते पुनर्वापराबद्दल आहे. हे घर भावना, समर्पण, आणि रहस्या बद्द्ल आहे. हे एक स्थान आहे जिथे आपण आपल्या मर्यादांच्या विरोधात जाऊन बघू शकतो की आपण काय चुकीचे केले आहे आणि त्याला पूर्ववत कसे करावे.

तत्व:- जल.

योगायोग बघा की आपल्या राशीचे चिन्ह मासा आहे आणि आपण जल तत्वांतर्गत येता.ह्या तत्वांतर्गत येणारे लोक भावनिक प्रवृत्तीचे असतात.पाण्याप्रमाणेच आपण कधी भावनेच्या खोल समुद्रात जाता तर कधी उथळ असतात.आपली भावनिक स्थिती पूर्ण दिवस सारखी नसते.आपला मूड सतत बदलत असतो आणि ही आपल्या साठी खूपमोठी समस्या असते.पाण्यासारखीअसलेलीआपली प्रवृत्ती आपल्या ला स्वप्नाळू बनवते.आपण आपल्याचविचार आणि विश्वासाच्या जगात राहता कधीतरीच आपण आपल्यालादुसऱ्या च्या विचारांशी सहमत करु शकता.अद्भूत सोपे अंतर्ज्ञान आपणाससर्वात वेगळे वैशिष्ट्य प्राप्त करून देते.

शक्ति:- आपली प्रमुख ताकद आपली कल्पनाशक्ती आहे आणि म्हणूनच आपण निर्माता आहात.आपण गर्विष्ठ नसता तर आपण लवचिक असून सहजपणे परिस्थिती शी समायोजन साधून घेता.आपले अन्य गुण म्हणजे आपण दयाळू, सहीष्णू आणि प्रामाणिक आहात.

कमतरता:- आपण निष्क्रिय आणि खूप भोळे असू शकता म्हणून आपण दुसऱ्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी शोषित होता.आपले इतर दुर्गुण की आपण अत्यंत भावूक, अनिश्चयवादी, आळशी आणि पळपुटे आहात.

जीवनशैली

राशीच्या जातकांचा आहार: ह्या राशीवर जलतत्वाचे शासन असते.यांना आपल्या आहारात अशा खाद्यपदार्थांचा सामावेश करावा ज्यामुळे यांच्या रक्त, यकृत मस्तिष्क यांना फायदा होईल. यांच्यासाठी मांसाहार, पनिर, कांदा, धान्य, वाळलेले आलूबुखार, लिंबू,संत्र , सफरचंद, द्राक्ष, पालक .चांगले असते.पार्टीत जास्त खाद्यपदार्थ द्रव पदार्थ घेण्याची यांना सवय असते.ज्यावर यांनी अंकुश लावायला हवा संयम ठेवणे शिकायला हवे.सूज येण्याच्या समस्येने ग्रस्त होऊ शकतात, म्हणून यांनी सोडिअमच्या प्रमाणावर लक्ष ठेवायला हवे.यांनी आहारात मीठाचे प्रमाण कमी करावे इतर मसाले आहारात समाविष्ट करावे.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये: मीनराशीचे जास्त लोकं सरासरी उंची ते असतात.यांचे डोळे मोठे, पूर्ण दूर अंतरावर असतात. ही राशीचक्रातील एकमेव अशी रास आहे जी वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकते.यांचे डोळेमोठे पाणेदार असतात.यांची पूर्ण रचना अस्पष्ट, रहस्यमय उदार आणि शांत असते.यांचं शारीरिक वर्तन रहस्याच्या आवरणात असतं ज्याचं वर्गिकरण करणं कठीण आहे.पण एक गोष्ट निश्चित आहे की हे परोपकारी असतात.

सवयी: हे खरे, असंघटित, शिस्तबद्ध नसतात.आणि यामुळे यांच्या मनात गुंतागुंत असते.यांना दारूचं व्यसन असतं ज्यामुळे यांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात.यावर योग्य उपाय म्हणजे योगासने ध्यान आहे ज्यामुळे यांना आत्मशांती लाभते   मीन राशीच्या लोकांची ती मुख्यगरज असते.यखंना वडिलोपार्जित किंवा आकस्मिकपणे संपत्ती  मिळू शकते.पण विसराळू असल्याने हे आपले नगदी पैसे कोठेही विसरतात.कौटुंबिक मुद्दे शील्लक बिले यांच्या  तणावाचे एक मुख्य कारण असते.

स्वास्थ्य: पूर्ण राशीचक्रात मीन राशीची शरीर रचना सर्वात निर्बल असते.यांचे पाय, श्वसन रक्ताभिसरण संस्था समस्या निर्माण करू शकतात.याशिवाय हे खूप भावनिक असतात अगदी सहज पणे जंकफूडच्या आहारी जातात आपले वजन वाढवून घेतात.यांन दारू, धूम्रपान मादक पदार्थांपासून अत्यंत सावधपणे दूर राहण्याची गरज आहे.प्रत्येक मोसमी बदल यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतो.सर्वात जास्त धोका पायांना होऊ शकतो.संधिवात, रक्ताभिसरणासंबंधी समस्या होऊ शकते.कधीकधी त्रास वास्तव जीवनाशी कमी संबंध असल्याने होत असतो.

सौंदर्य: मीन राशीसाठी सौंदर्य​  हे भौतिक विचाराऐवजी  एक मानसिक विचार आहे.हे चंचल असतात. हे एक दिवस खूप चांगले वाटतात तर दूसर्या दिवशी कंटाळवाणे वाटू शकतात.यांच्यासाठी मोती धारण करणे खूप आवश्यक आहे.यांनी तेजस्वी मेकअप केला पाहिजे फीक्कट रंगाचे कपडे यांच्या व्यक्तिमत्त्वाला सुंदर दिसू शकतात.हे फॅशन ची काळजी करत नाही.जे कपडे आरामदायी आहे, जे नैसर्गिक धाग्यांनी बनलेले असतात तेच कपडे परिधान करणेयांना आवडतात.कृत्रिम धाग्यांनी बनलेले कपडे परिधान करणे आवडत नाही.यांची पसंतीचांगली असते आणि बाहेर जातांना हे नैसर्गिक पद्धतीचे कपडे योग्यरंगसंगतीने घालून निघतात.

सारांश

मकर राशीचे लोक खूप जास्त महत्त्वाकांक्षी असतात. ते खूप मेहनत घेत असल्यामुळे त्यांना लवकर यश मिळते. हे लोक खोल विचारसरणीचे असतात आणि चांगले स्पष्टवक्ते असतात. हे लोक खूप चांगले मित्र असतात आणि नेहमी मित्राच्या मदतीला धावून जातात. ते स्वभावाने खूप भावनिक असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होतो.

कुंभ राशीचे लोक आत्मविश्वासू आणि दृढनिश्चयी असतात. ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे या राशीचा स्वामी ग्रह हा शनि असतो. त्यामुळे या राशीवर शनिदेवाची विशेष कृपा असते. या राशीचे लोक कोणतेही नाते मनापासून निभावतात. त्यांचे वैवाहिक आयुष्य खूप सामान्य असते. ते खूप प्रामाणिक असतात. त्यांना मनाप्रमाणे जोडीदार मिळतो; जो त्यांना नेहमी समजून घेतो.

मीन राशीचे लोक अत्यंत दयाळू असतात. ते इतरांना नेहमी मदत करण्यासाठी तत्पर असतात. त्यांचा स्वभाव खूप शांत असल्यामुळे त्यांना जास्त बोलायला आवडत नाही. त्यांना एकटे राहायला आवडते. हे लोक स्वत:च्या दुनियेत मग्न असतात. त्यांना अनेक कला अवगत असतात. त्यांना साहित्य, कला संगीतामध्ये आवड असते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीचा खंबीरपणे सामना करतात.


कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know