प्यायचे पाणी
पिण्याचे पाणी पिण्यायोग्य स्वच्छ करण्याचे उपाय
निरोगी राहण्यासाठी
स्वच्छ
पाणी
पिणे
खूप
महत्वाचे
आहे.
दूषित
पाणी
कोणालाही
आजारी
पडण्यासाठी
पुरेसे
आहे.
यामुळेच
घरांमध्ये
पिण्याचे
पाणी
स्वच्छ
करण्यासाठी
वेगवेगळ्या
पद्धतींचा
अवलंब
केला
जातो.
सध्या
पावसाळा
सुरु
असल्याने
बऱ्याचदा
घरी
नळाचे
पाणी
दूषित
किंवा
गढूळ
येते.
असे
गढूळ
पाणी
आपल्याला
कोणत्याही
कामासाठी
वापरणे
शक्य
नसते,
पिणे
तर
अजिबातच
नाही.
याचकारणाने
हल्ली
बहुतांश
घरांमध्ये
पाणी
स्वच्छ
करण्यासाठी
आरओ
मशीनही
बसवले
जाते.
मात्र
या
आरओ
मशिनची
किंमत
सर्वांनाच
परवडणारी
नसते.
अशावेळी
काही
सोपे
घरगुती
आपल्यासाठी
फायदेशीर
ठरतात.
प्रत्येकाला
स्वच्छ
पाणी
हवे
असते.
त्यामुळे
आम्ही
तुम्हाला
पिण्याचे
पाणी
स्वच्छ
करण्याचे
सोपे
उपाय
सांगणार
आहोत.
त्यांचे
अनुसरण
करून
तुम्ही
घरातील
पाण्यातील
सर्व
जंतू
काढून
टाकू
शकाल.
घरी प्यायचे पाणी पिण्यायोग्य कसे करावे
1. उकळून: आपल्याला पूर्वापार
चालत
आलेली
पाणी
उकळून
निर्जंतुक
करण्याची
पद्धत
माहिती
असेल,
जी
आजही
खूप
प्रभावी
आहे.
पिण्याचे
पाणी
मोठ्या
भांड्यात
ठेवून
गरम
करावे.
पाणी
गरम
झाल्यावर
आणि
उकळायला
लागल्यावर
साधारण
५
मिनिटे
असेच
उकळू
द्या,
त्यानंतर
पाणी
थंड
होण्यासाठी
ठेवा.
यामुळे
पाण्यात
असलेले
सर्व
जंतू
नष्ट
होतील
आणि
पाणी
पिण्यायोग्य
होईल.
2. तुरटीचा वापर: तुरटीचा वापर हा देखील पिण्याचे पाणी शुद्ध करण्याचा स्वस्त आणि सोपा मार्ग आहे. तुरटीने पाणी स्वच्छ करण्यासाठी
प्रथम
हात
धुवा,
नंतर
तुरटी
घ्या
आणि
पाण्याच्या
प्रमाणानुसार
पाण्यात
फिरवा.
लक्षात
ठेवा
की,
जेव्हा
पाणी
हलके
पांढरे
दिसू
लागते
तेव्हा
तुरटी
फिरवणे
थांबवा.
तुरटी
कापडात
गुंडाळूनही
पाण्यात
फिरवता
येते.
त्यामुळे
पाण्यात
असलेली
घाण
तळाशी
जाऊन
पाणी
पूर्णपणे
स्वच्छ
होईल.
3. क्लोरीन: पाणी शुद्ध करण्यासाठी
क्लोरीनचा
मोठ्या
प्रमाणावर
वापर
केला
जातो.
सहसा
घरांमध्ये
येणारे
पाणी
देखील
क्लोरीनने
स्वच्छ
केले
जाते.
क्लोरीनच्या
गोळ्या
बाजारात
सहज
उपलब्ध
आहेत.
त्यांना
ओतून
पाणी
स्वच्छ
केले
जाते.
लक्षात
ठेवा
की,
क्लोरीनच्या
गोळ्या
घातल्यानंतर
अर्धा
तास
पाणी
वापरू
नका.
4. ब्लीच: पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी
देखील
ब्लीचचा
वापर
केला
जाऊ
शकतो.
मात्र
यासाठी
ब्लीचमध्ये
सोडियम
हायपोक्लोराईड
देखील
असावे.
पाणी
शुद्ध
करण्यासाठी
वापरल्या
जाणार्या ब्लीचमध्ये
सुगंध,
रंग
किंवा
इतर
कोणतीही
गोष्ट
असू
नये.
पाणी
गरम
केल्यानंतर
वापरा.
एक
लिटर
पाण्यात
ब्लीचचे
2 ते
3 थेंब
पुरेसे
आहे.
शुद्ध पाणी कसे बनवायचे?
नळाचे साधे पाणी घ्या आणि ते २० मिनिटे उकळून थंड करा. एकदा ते थंड झाल्यावर ते मातीच्या भांड्यात (मडक्यामध्ये)
ठेवा.
मडक्याचे
एक
वैशिष्ट्य
आहे,
जर
पाण्यात
जास्त
TDS असतील
तर
मडके
जास्तीचे
TDS शोषून
घेईल
आणि
जर
TDS कमी
असेल
तर
ते
पाण्याचे
TDS वाढवते.
जर
आपल्याकडचे
पाणी
खूपच
खराब
आहे
आणि
RO लावल्याशिवाय
आपल्याकडे
पर्यायच
नाही
तर
मग
काय
करायचे?
तर
RO चे
कमी
TDS असलेले
पाणी
मडक्यात
ठेवा,
आपोआप
TDS लेवल
ठीक
होऊन
जाईल.
दुसरी
समस्या
म्हणजे
ऍसिडिक
स्वरूपाचे
पाणी
RO मधून
येते
तर
त्यासाठी
उपाय
सांगितलं
गेला
आहे
कि
त्यामध्ये
लिंबाच्या
फोडी,
तुलसी
आणि
पुदिन्याची
पाने
टाकून
ठेवली
तर
मिनरल्स
ची
कमतरता
आपोआप
भरून
निघेल.
आरओ म्हणजे काय?
आरओ म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस. या प्रक्रियेमध्ये
सॉल्ट, सेंद्रिय संयुगे, सूक्ष्मजीव, व्हायरस सारखी संयुगे काढून टाकण्यासाठी प्लास्टिकच्या
मेंब्रेन मधून पाणी पाठवले जाते. हे मेंब्रेन साधारणतः तीन स्थरांचे बनलेले असते. पॉलिस्टर
बेस, पॉली सल्फोन आणि पॉली अमाईड लेयर. अशा प्रकारच्या मेंब्रेन शीट एका ट्यूबच्या
भोवती बसवल्या जातात. पाण्याच्या रेणूपेक्षा मोठे दूषित पदार्थ या मेंब्रेन मधून जाऊ
शकत नाहीत. परंतु आपल्या माहितीसाठी हे जाणून घ्या कि, पाण्यामध्ये फक्त अशुद्ध घटकच
नसतात तर त्याबरोबर आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असे मिनरल्स असतात, उदाहरणार्थ कॅल्शिअम,
मॅग्नेशिअम, फ्लोराईड, अर्सेनिक इत्यादी. कॅल्शिअम ची कमतरता असेल तर आपल्या शरीरात
हाडांचे आजार होतात. विशेषतः लहान मुलांच्यामध्ये आपण पाहतो कि काही मुलांची हाडे खूप
ठिसूळ असतात आणि लगेच मोडतात. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे विविध न्यूरोलॉजिकल आजार तसेच,
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग इ .होऊ शकतात.
बाटलीबंद मिनरल पाणी
आपल्या देशात बाटलीबंद पाण्याचे आगमन १९६९साली
झाले. भारतात सर्वप्रथम दाखल झालेल्या ख्यातनाम ब्रँडचे आता १३५ प्रकल्प असून, तीन
हजार वितरक पाच हजार ट्रकमधून हा बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करत असतात. एवढी या कंपनीची
व्याप्ती आहे. परंतु अशा बाटलीबंद पाण्यामुळे किती प्रदूषण होते, किती जीवाश्म इंधनाचे
ज्वलन होते आणि त्यामुळे प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीलादेखील प्रोत्साहन मिळते हे
सर्वसामान्यांना ज्ञात नाही. 'बाटलीबंद पाणी म्हणजे आपल्या पृथ्वीवरची अमूल्य साधनसंपदा
गटारात ओतणे' असे काही पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. पाणी वापरून झाल्यावर त्यातील ८६
टक्के बाटल्या कचराकुंडीकडे वाटचाल करतात. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण भेसूर रूप धारण
करत आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर केला तरी त्यात खूप ऊर्जा वाया जाते. नळातल्या पाण्याच्या
तुलनेत असे पाणी तीन हजार टक्के अधिक महाग पडते.
बाटलीबंद पाणी पिणे आरोग्यदायी आहे का?
भारतात पाण्याच्या
गुणवत्तेचा
आपल्या
आरोग्यावर
खूप
प्रभाव
पडत
असतो.
जर
पेयजल
प्रदूषित
असेल
तर
ते
विषासमान
होते.
सध्या
पर्यावरण
प्रदूषण
एवढे
वाढले
आहे
की,
बहुतेक
जलस्रोत
प्रदूषित
झाले
आहेत.
संपूर्ण
जग
पाणीसंकटाचा
सामना
करीत
आहे.
यामुळे
सर्वांना
शुद्ध
व
स्वच्छ
पेयजल
मिळणे
एक
आव्हान
झाले
आहे.
काही वर्षांपूर्वी
बाटलीबंद
पाणी
जगभरात
विकण्यास
सुरुवात
झाली.
ज्या
कंपन्यांनी
हे
पाणी
स्वच्छ,
शुद्ध
व
खनिजयुक्त
आहे
असे
सांगून
असे
पाणी
विकण्यास
सुरुवात
केली,
ते
खरे
मानून
लोक
हे
निर्धास्तपणे
खरेदी
करू
लागले.
बाटलीबंद पाणी खनिजयुक्त असते का? आरोग्यासाठी लाभदायक आहे का?
बाजारात मिळणारे बहुतेक बाटलीबंद पाणी पॅकेज्ड ड्रिंकिंग
वॉटर
असते.
पॅकेज्ड
ड्रिंकिंग
वॉटर
नळातून
येणारे
सामान्य
पाणी
असते
जे
फिल्टरने
गाळून
रिव्हर्स ऑस्मोसिस
ओझोन
ट्रीटमेंट
इ.
ने
साफ
करून
पॅक
करून
दिले
जाते.
याचप्रमाणे
लोकांमध्ये
आरओ
सिस्टीबाबत
समज
असतो
की,
यामुळे
अत्यंत
शुद्ध
व
स्वच्छ
पाणी
मिळते.
परंतु
खरे
तर
आरओ
सिस्टीममधून
गेलेले
पाणीही
आरोग्याची
हानी
करू
शकते.
कारण
आरओ
सिस्टीममध्ये
लावलेले
फिल्टर
काही
दिवसांनंतर
च
पाणी
सामान्य
पद्धतीने
फिल्टर
करू
लागते.
बाटलीबंद पाण्याबाबत
अमेरिकेत
झालेल्या
रिसर्चवरून
कळले
आहे
की,
बाटलीबंद
पाण्यात
प्लॅस्टिकचे
घातक
कण
मिसळलेले
राहतात.
नॅचरल
रिसोर्सेज
डिफेन्स
कौन्सिल
या
अमेरिकन
संस्थेनुसार
बाटली
बनवण्यात
ॲन्टिमनीचा
वापर
केला
जातो.
यामुळे
बाटलीबंद
पाणी
जास्त
काळ
ठेवल्यास
त्यात
ॲन्टिमनीचे
प्रमाण
मिसळले
जाते.
हे
रसायनयुक्त
पाणी
प्याल्यामुळे
वेगवेगळे
आजार
होऊ
लागतात.
भारतासह जगभरात मिळणाऱ्या
बाटलीबंद
पाण्यात
९३
टक्क्यांपर्यंत
प्लॅस्टिकचे
बारीक
कण
आढळले
आहेत.
याशिवाय
ज्या
प्लॅस्टिक
बाटल्यांत
मिनरल
वा
फिल्टर
वॉटर
विकते
त्या
पॉलीएथिलीन
टेरीथेलेटच्या
बनलेल्या असतात.
जेव्हा
तापमान
असते
तेव्हा
बाटलीत
डायऑक्सिन
खवते
आणि
हे
पाण्यात
मिसळून
शरीरात
पोहोचतात.
यामुळे
महिलांमध्ये स्तन कॅन्सरचा
धोका
वाढतो.
बाटलीबंद पाण्याने पर्यावरणाचे नुकसान
बाटलीबंद जास्त पाणी पर्यावरणाचेही नुकसान करते. पॅसिफिक इन्स्टिट्यूटनुसार अमेरिकन लोक जेवढे मिनरल वॉटर पितात, ते बनवण्यात २ कोटी बॅरल पेट्रो उत्पादन खर्च केले जाते. एक टन बाटल्यांच्या निर्मितीत तीन टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. मिनरल वॉटर बनवण्यासाठी दुप्पट पाणी खर्च करावे लागते. अर्थात एक लीटर मिनरल वॉटर बनवण्यास दोन लीटर स्वच्छ खर्च करावे लागते. याशिवाय बाटलीचे पाणी प्याल्यानंतर बाटली कोठेही फेकून देतो. जी पर्यावरणाची हानी करते. याशिवाय जगभरात जिथे कुठे या कंपन्यांनी आपला बॉटलिंग प्लांट लावला असेल, तिथे भूजल पातळी अत्यंत वेगाने खाली जाते व याचा तोटा या भागात राहणाऱ्या लोकांना सोसावा लागतो. स्पष्ट आहे की, शुद्ध व स्वच्छ पाण्याच्या नावाखाली विकले जाणारे बाटलीबंद पाणी लोक व पर्यावरण दोन्हींचे नुकसान करीत आहे.
सारांश
बाटलीबंद पाणी नळाच्या पाण्यापेक्षा शुद्ध असते हि तर केवळ लोभस फसवणूक आहे. बाटलीवरील लोभस चित्रांमुळे खरोखरच आपण बर्फाच्छादित पर्वतावरच्या झऱ्यातील पाणी पित आहोत, असे भ्रामक चित्र ग्राहकांच्या माथी जाहिरातीतून आदळले जाते. आपापल्या गाव-शहरात पुरवठा केलेले पिण्याचे पाणी किती सुरक्षित आहे, याचा अंदाज नागरिकांना नसतो. त्यांचा अशा पुरवठ्यावर विश्वासदेखील नसतो. रोगकारक सूक्ष्मजीव, रसायने यांनी दूषित केलेले पाणी पिण्यापेक्षा बाटली विकत घेतलेली बरी, ही मानसिकता नागरिकांच्या मनात निर्माण करण्यात जाहिरातबाजी यशस्वी झाली आहे. हे सारे लक्षात आल्यावर तरी आपण बाटलीबंद पाणी वापरणे कमी करायला हवे. सार्वजनिक ठिकाणी चांगल्या पिण्याच्या पाण्याची सोय असणे किंवा काचेची वा धातूची बाटली घेऊन ती पुन्हा पुन्हा भरून घेणे, हा पर्याय निश्चितपणे पर्यावरण सुधारण्यासाठी योग्य आहे.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know