Translate in Hindi / Marathi / English

Monday, 3 June 2024

कैरीचे आरोग्यदायी फायदे | तिखट-मीठ लावलेली कैरी बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटले नाही | उन्हाळ्यात कैरीचे अनेक पदार्थ तयार केले जातात | आंब्याप्रमाणे कच्ची कैरी ही देखील आरोग्यासाठी वरदान आहे | कैरीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते | कैरी खाल्ल्यामुळे आपले दात मजबूत होतात

कैरीपेक्षा गोड आंबा

 

कैरीचे आरोग्यदायी फायदे

कैरी आंबट असल्यामुळे कैरीपेक्षा गोड आंबा खाणं अनेकांना खूप आवडतं. उन्हाळा सुरु झाला की मार्केटमध्ये कैरी येते. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून मार्केटमध्ये कैरी यायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात कैरीचे अनेक पदार्थ तयार केले जातात. या शिवाय पावसाळा येईपर्यंत मार्केटमध्ये कैरी उपलब्ध असते. कैरीचे लोणचं, चटणी, अगदी पन्ह देखील तयार केलं जातं. कैरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आंब्याप्रमाणे कच्ची कैरी ही देखील आरोग्यासाठी वरदान आहे. कैरीचे फायदे तुम्हाला माहिती पडले तर तुम्ही रोज कैरी खाणं पसंत कराल. कच्ची कैरी खायला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कैरीचं पन्ह तयार करुन किंवा त्याची चटणी करुन खाऊ शकता. कैरी खायला जरी आंबट असली तरी त्याचे शरीरासाठी फायदे खूप आहेत. कैरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजच्या कोरोनाच्या काळात आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे कैरी खूपच फायदेशीर ठरत आहे.

कैरीचे फायदे: कैरी आंबट असल्यामुळे कैरीपेक्षा गोड आंबा खाणं अनेकांना खूप आवडतं. उन्हाळा सुरु झाला की मार्केटमध्ये कैरी येते. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून मार्केटमध्ये कैरी यायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात कैरीचे अनेक पदार्थ तयार केले जातात. या शिवाय पावसाळा येईपर्यंत मार्केटमध्ये कैरी उपलब्ध असते. कैरीचे लोणचं, चटणी अगदी पन्ह देखील तयार केलं जातं. कैरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आंब्याप्रमाणे कच्ची कैरी ही देखील आरोग्यासाठी वरदान आहे. कैरीचे फायदे तुम्हाला माहिती पडले तर तुम्ही रोज कैरी खाणं पसंत कराल.

आरोग्यदायी कैरी

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कैरी आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कैरीत असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रक्ताचे विकार अथवा रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे आजार दूर होतात.

– कैरी खाल्ल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. तसंच नवीन रक्तपेशी तयार होण्यासही मदत होते.

कैरी खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, मळमळ यासारख्या सरमस्या दूर होतात.

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा स्कर्वी रोग कैरीच्या सेवनाने बरा होतो.

कैरी खाल्ल्यामुळे आपले दात मजबूत होतात. तसंच तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या दूर होते.

कैरी खाल्ल्यामुळे उष्माघात होत नाही. उष्माघाताचा त्रास असेल तर कैरीचे पन्ह पिणं खूप फायदेशी आहे.

डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी कैरीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कैरीमुळे शुगर लेवल कमी होते.

केसासाठी कैरीचे सेवन करणे चांगले आहे. कैरीमुळे केस जाड आणि चमकदार होतात.

तुमचे वजन वाढत असेल तर रोज कैरी खाण्यास सुरुवात करा. कैरीमुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

स्वच्छ रक्त: कच्च्या कैरीमध्ये असे घटक असतात जे रक्त शुद्ध करण्यासाठी खूप मदत करतात.

आंबटपणा: ज्यांना पोटात गॅसची समस्या आहे त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे पोटात गॅस होत असल्यास याचे सेवन करा.

मधुमेह: कच्चा कारवा मधुमेहावर औषधाप्रमाणे काम करतो. याचे सेवन केल्याने काही दिवसातच साखरेची पातळी कमी होते. याशिवाय शरीराला लोहाचा पुरवठा होतो.

जेव्हा उलट्या होतात: जर एखाद्याला वारंवार उलट्या होत असतील किंवा मळमळण्याची समस्या असेल तर काळ्या मीठासोबत कच्ची करी खावी. यामुळे मळमळ सारख्या समस्या दूर होतात.

सुंदर केस: याचे सेवन केल्याने केसही सुंदर होतात. होय, दाट आणि चमकदार केस मिळविण्यासाठी कच्चा कैरी खूप फायदेशीर आहे.

उन्हाळ्याच्या मौसमात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात येणारा आंबा सर्वांनाच आवडतो, पण पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. उन्हाळ्यातील हे मुख्य फळ आहे. कैरीचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. कैरीमध्ये जीवनसत्त्व -ए, सी आणि ई व्यतिरिक्त कॅल्शियम, फॉस्फरस आणि फायबर यासारखी पोषक द्रव्ये आढळतात. याशिवाय कैरीच्या सालीत असणारे पेक्टिन जुलाब, अतिसार, मूळव्याध, पेचिश, बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटी यासारख्या सामान्य पोटाच्या समस्यांच्या उपचारांमध्ये मदत करते.

एका दिवसात किती कैरी खायला हवी?

एक निरोगी व्यक्ती दररोज 100 ते 150 ग्रॅम कैरी खाऊ शकतो. तर मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले रूग्ण दररोज 10 ग्रॅम कैरीचे सेवन करू शकतात.

कैरीचे पदार्थ

आंबेडाळ:

चैत्र म्हटलं की कोवळ्या पालवीसोबतच आठवते ती आंबेडाळ आणि पन्हं.

साहित्य एक वाटी हरभरा डाळ, एक कैरी, दोन हिरव्या मिरच्या, एक चहाचा चमचा साखर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, चवीपुरतं मीठ

फोडणीसाठी: दोन टेबलस्पून तेल, चिमूटभर मोहरी, अर्धा चहाचा चमचा हिंग, दोन-तीन फोडणीच्या लाल मिरच्या, हळद, वाटीभर हरभरा डाळ दोन-तीन तास भिजत घाला. हरभरा डाळ जास्त वेळ भिजली की, पिठूळ बनते आणि हाताशी वेळ कमी आहे म्हणून गरम पाण्यात भिजवली की तिची चव जाते. त्यामुळे दोनेक तास हाताशी असल्याशिवाय या पाकृच्या वाटेला जाऊ नये.

कृती एक मध्यम आकाराची कैरी किसून घ्या. कैरीचा आंबटपणाही किंचित चाखून पाहा. त्यानुसार पाककृतीमध्ये कैरी कमी किंवा अधिक घालता येईल. आंबटपणा कमी करण्यासाठी साखरेचं प्रमाण खूप वाढवू नका, चव बदलते. मिक्सरच्या भांडय़ात जिरं, मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ घालून एकदा फिरवून घ्या. त्याच मिश्रणात पाणी पूर्णपणे निथळलेली डाळ घालून अर्धबोबडी वाटून घ्या. वाटलेलं मिश्रण एका वाडग्यात काढून घ्या. त्या मिश्रणातच आंबटपणानुसार किसलेली कैरी आणि साखर मिसळून नीट कालवून घ्या. फोडणीच्या कढईत तेल तापवून घ्या. तेल तापल्यानंतर मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडायला हवी. त्यानंतर हिंग, लाल मिरच्या आणि हळद घाला. या पदार्थात हिंग नेहमीच्या प्रमाणाहून थोडा जास्तच घालायचा असतो. फोडणी थंड झाल्यानंतर कैरी-डाळीच्या मिश्रणावर ओता. व्यवस्थित कालवून खायला घ्या. काहीजण आंबाडाळीत थोडं ओलं खोबरेदेखील किसून घालतात.

कैरीची डाळ:

साहित्य छोटी वाटी (रोजच्या इतकी) तुरीची डाळ, दोन मध्यम आकाराचे कांदे, / हिरव्या मिरच्या चवी-आवडी नुसार गूळ (लिंबा एवढा) मध्यम आकाराच्या कै-या, नारळाचा किस / वाटी आमटीचा गोडा मसाला फोडणीचे साहित्य.

कृती कांदा उभा पातळ कापून घ्यावा. मिरच्या कापतांना मोठे तुकडे करावेत. कैरी किसून घ्यावी. डाळ शिजायला ठेवतांनाच कुकरमध्ये कापलेले कांदे मिरच्या डाळीबरोबरच एकत्र शिजवून घ्याव्यात. रोजच्या इतकी डाळ शिजून झाल्यावर फोडणीला टाकावी. फोडणीत मोहरी, हिंग, मेथीचे १०/१२ दाणे टाकून फोडणी तडतडली की डाळ फोडणीला टाकावी. त्यावर चमचा हळद, आवडीनुसार गोडा मसाला, किसलेली कैरी, गूळ शेवटी ओला नारळ टाकावा. आवडी/गरजेनुसार पाणी घालावे.

तक्कू:

साहित्य एक कैरी, दोन मध्यम आकाराचे कांदे, लाल तिखट, मीठ, साखर किंवा गूळ, फोडणीसाठी दोन चमचे तेल, अर्धा चहाचा चमचा मेथ्या, तितकी मोहरी, दोन चिमूट हिंग

कृती कैरी आणि कांदे दोन्ही किसून घ्या. या किसलेल्या मिश्रणात चवीप्रमाणं मीठ, साखर/बारीक चिरलेला गूळ आणि लाल तिखट घाला आणि नीट कालवून घ्या. कालवता-कालवता चव घेऊन पाहा. आणखी खायची इच्छा होईल इतपत आंबट-गोड-तिखट चव जमायला हवी. फोडणीच्या भांडय़ात तेल तापवून मोहरी तडतडवून घ्या. मेथ्या खरपूस तळा. मेथ्या लालसर होऊ लागल्या की, हिंग घाला. फोडणी थंड झाल्यानंतर कैरी-कांद्याच्या मिश्रणावर ओता. माणसांच्या तावडीतून वाचल्यास हा तक्कू फ्रीजमध्ये दोन-चार दिवस टिकतो.

कैरीची भाजी:

साहित्य कैरीच्या फोडी-/ किलो, किसलेला गूळ- ते टेबल स्पून, अख्खे धणे- टी स्पून, लाल तिखट- ते दीड टी स्पून, लसूण पेस्ट- टी स्पून तमालपत्र-, जिरे-मोहोरी- टी स्पून, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल, सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती सर्वात प्रथम एका भांडय़ात पाणी गरम करत ठेवावे. पाणी उकळल्यानंतर त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात साधारण १० ते १५ मिनिटं उकडू द्याव्यात. कैरीच्या फोडी नीट शिजल्या की नाही हे बघण्यासाठी एक फोड पाण्यातून बाहेर काढून दाबून बघावी, मऊ शिजली असेल तर कैरीच्या फोडी एका चाळणीत काढाव्यात आणि निथळत ठेवाव्यात. कढईत तेल गरम करत ठेवावे, त्यात तमालपत्र घालावे तसेच जिरे-मोहोरी घालून चांगली तडतडू द्यावी. त्यात अख्खे धणे घालावेत यानंतर लसूण पेस्ट तसेच हळद लाल तिखट घालून नीट परतून घ्यावे. कैरीच्या उकडलेल्या फोडी घालून परतून घ्यावे. कैरीच्या फोडी नीट परतून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे परतून घ्यावे. यात किसलेला गूळ घालून नीट एकजीव करून घ्यावे. भाजीला आता थोडे पाणी सुटल्यासारखे वाटेल, भाजी पुन्हा परतून घ्यावी म्हणजे गूळ सर्व भाजीला लागेल. साधारण ते मिनिटात आच बंद करावी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हि भाजी तोंडलावणी म्हणून सव्‍‌र्ह करता येईल.

कैरीचं पन्हं:

साहित्य कैरी उकडून काढलेला गर वाटी, पाऊण वाटी गूळ किंवा साखर, अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, आवडत असल्यास - केशर काडय़ा.

कृती कै-यांचे आकार लहान-मोठे असतात म्हणून मी वाटीचं प्रमाण दिलेलं आहे. कै-या कुकरच्या भांडय़ात ठेवून उकडून घ्या. थंड झाल्यावर साल काढून आतला गर काढून घ्या. मिक्सरच्या भांडय़ात हा गर, गूळ किंवा साखर, मीठ आणि वेलची पूड घाला. चांगलं एकजीव वाटून घ्या. साधारण वाटीभर पाणी घालून परत वाटा. बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा हवं असेल तेव्हा आवश्यकतेनुसार त्यात थंड पाणी घाला आणि पन्हं तयार करापन्ह्यासाठीचं हे तयार मिश्रण फ्रीजमध्ये बराच काळ चांगलं राहतं. मला स्वत:ला मिट्ट गोड पन्हं आवडत नाही म्हणून मी साखर-गुळाचं प्रमाण कमी दिलं आहे. आवडीनुसार ते वाढवू शकता. साखर किंवा गूळ कमी वापरायचा असेल तर कमी आंबट कै-या म्हणजे तोतापरी किंवा नीलम कै-या वापरा. बदल म्हणून यात कधीतरी जिरेपूड घालून बघा.

लौंजी:

साहित्य एक मध्यम आकाराची कैरी, एक चमचा बडीशेप, कलौंजी (कांद्याचे बी, वाण्याकडं मिळतं), अर्धा चमचा मेथ्या, दोन चहाचे चमचे धणेपूड, एक चहाचा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चार चमचे साखर, दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ.

कृती कैरीचे चौकोनी तुकडे करून घ्या. कढईत तेल तापवा. त्यानंतर तेलात मेथ्या, बडीशेप, कलौंजी चांगली तडतडवून घ्या आणि कैरीचे तुकडे घालून पटापट परतून घ्या. दोनेक मिनिटांनंतर लाल तिखट, धणेपूड, साखर आणि मीठ घालून एक हलकीशी वाफ द्या. त्यानंतर अधीर्वाटी पाणी घालून साखर विरघळेपर्यंत हलवत राहा. थंड करून फ्रीजमध्ये ठेवा.

मेथांबा-कायरस:

साहित्य एक कैरी, गूळ, लाल तिखट, मीठ, जिरेपूड, एक ते दीड चमचा हळद.

फोडणीसाठी: दोन चमचे तेल, अर्धा चहाचा चमचा मेथ्या, तितकी मोहरी, दोन चिमूट हिंग

कृती कैरीचे कशाही आकाराचे थोडेसे पातळ काप करा. गूळ किसून घ्या. गुळाचं प्रमाण कैरीच्या दुप्पट असायला हवं. जाड बुडाच्या कढईत कैरीला एक वाफ येऊ द्या. मग त्यात किसलेला गूळ, लाल तिखट, जिरेपूड आणि हळद घाला. मिश्रण चांगलं शिजू द्या. नंतर फोडणीच्या भांडय़ात तेल तापवून मोहरी-जिरे तडतडवून घ्या. मग मेथ्या खरपूस तळा. मेथ्या लालसर होऊ लागल्या की, हिंग घाला. फोडणी थंड झाल्यानंतर शिजलेल्या मिश्रणावर ओता. माणसांच्या तावडीतून वाचल्यास हेही मिश्रण फ्रीजमध्ये बरेच दिवस टिकतं. या पाककृतीमध्ये कैरी-गूळ शिजवताना लागेल तसं पाणी घातलं की झाला कायरस.

कैरीचे गोड लोणचे:

साहित्य आंबट कैरी किलो, मोहरी डाळ १०० ग्रॅ. धणे ५० ग्रॅ. मेथी दाणे २५ ग्रॅ. गूळ ५०० ग्रॅम, मीठ, लाल तिखट चवीनुसार, टे. स्पू. लवंग दालचिनी जायफळ पूड, हिंग, तिळाचे तेल.

कृती कैरीच्या मध्यम फोडी करून घ्या. धणे-मेथीदाण्याची भरडपूड करा. गूळ किसून घ्या. मोहरीडाळ, धणे पूड, मेथी पूड कोरडी भाजून घ्या. हिंग पूड करा. एका परातीत लाल-तिखट, हिंग सर्व मसाले एकत्र करून त्यावर थोडा गरम तेल ओता, किसलेले गूळ मीठ टाकून एकत्र करा. कै-यांच्या फोडी घालून कालवा. वरून तेलाची झणझणीत फोडणी करून लोणच्यावर ओतून बरणीत भरून ठेवा. अधूनमधून हलवत राहा.

कैरीचा भात:

साहित्य वाटय़ा जुना तांदूळ, सुक्या लाल मिरच्या, चमचे उडीद डाळ, चमचा हरभरा डाळ, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, पाव वाटी पुदिना पान, चमचे कैरीचा कीस, कढीलिंब, कोथिंबीर, जीरे, मोहरी, हळद, साखर, हिंग, मीठ, तेल.

कृती तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत. कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवावे. त्यात जिरे-हिंग, कढीलिंब घालून फोडणी करावी. नंतर त्यात तांदूळ आणि मीठ घालून परतावं. अडीच वाटय़ा गरम पाणी घालून मऊ, मोकळा भात शिजवावा. भातामध्ये हळद घालू नये. पुदिना पान आणि थोडी कोथिंबीर एकत्र करून वाटून घ्यावी. भात मोकळा करून थंड होण्यास ठेवावा. भात थंड झाल्यावर त्यावर कैरीचा कीस, वाटलेला पुदिना आणि चवीला साखर घालावी. कढईमध्ये तीन चमचे तेलाची मोहरी, कढीलिंब, हळद, शेंगदाणे घालून फोडणी करावी. ही फोडणी भातावर घालावी. भात नीट मिसळून घ्यावा. आंबट-गोड चवीचा हा भात पुन्हा गरम करू नये. कैरीच्या दिवसात हा भात जरूर करावा.

सारांश

तिखट-मीठ लावलेली कैरी बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटले नाही, तरंच नवल. आता तर आंबासुद्धा मोठय़ा प्रमाणावर बाजारात यायला लागला आहे. उन्हाळ्यातच प्रामुख्याने मिळणा-या कैरी आणि आंब्यांचे आरोग्यासाठीही खूप फायदे आहेत. कैरीचा आंबा तयार होतो, तसे त्यात ‘अ जीवनसत्त्व तयार होते आणि तिचा रंगही बदलत जातो. या दोन्ही फळांमध्ये आपापल्या परीने आरोग्यदायी गुणधर्म आहेत. कैरी थंड प्रकृतीची असते. उन्हाळ्यात मुळातच हवामान उष्ण असल्यामुळे कैरीचे लोणचे, मुरांबा, पन्हे असे पदार्थ या दिवसांत चाखणे उत्तम. या दिवसांत घाम खूप येत असल्याने शरीरातील क्षार घामावाटे निघून जातात. स्नायू दमतात व थकवा जाणवतो. कैरीत सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्यामुळे क्षारांची परिपूर्ती होते. कैरीचे सरबत किंवा पन्हे करताना, त्यात वेलची घाला. तसेच कच्च्या कैरीचे पन्हे व लोणच्यात काळ्या मिरीची पूड जरूर घाला. कच्च्या कैरीत आंबटपणा अधिक असल्यामुळे त्यामुळे घशाचा त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मिरपूड फायदेशीर.कैरी वापरताना ती किमान दोन तास पाण्यात बुडवून ठेवावी म्हणजे त्याचा चीक निघून जाईल.  कैरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आंब्याप्रमाणे कच्ची कैरी ही देखील आरोग्यासाठी वरदान आहे. कैरीचे फायदे तुम्हाला माहिती पडले तर तुम्ही रोज कैरी खाणं पसंत कराल.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know