Translate in Hindi / Marathi / English

Thursday, 30 May 2024

गाढ झोप म्हणजे नेमकं काय | झोप न येणार्या लोकांनी नैसर्गिक उपाय | झोपेचे एकूण तीन प्रकार असतात | स्लो-वेव्ह स्लीप | गाढ झोपेच्या वेळी हृदय आणि श्वासोच्छवास यांसारख्या क्रिया देखील संथ गतीने होत असतात | मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी गाढ झोप आवश्यक असते | किमान आठ तासांची झोप |

गाढ झोप

 

गाढ झोप म्हणजे नेमकं काय?

गाढ झोपेबाबत आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासूनच विचार केलेला आढळतो. उपनिषदांमध्ये जागृती, स्वप्न व सुषुप्ती अशा तीन अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यापैकी 'सुषुप्ती' म्हणजे गाढ झोप. झोप ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वसामान्यपणे आठ तासांची झोप घेणे ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट असते. त्याचप्रमाणे गाढ झोप घेणे हेदेखील तितकचं महत्त्वाचं असतं. गाढ झोप घेतल्याने आपला मेंदू योग्य कार्य करण्यास सक्षम होतो, तसेच आजूबाजूच्या वातावरणाशी शरीराला जुळवून घेण्यास गाढ झोप घेणं आवश्यक असतं. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की, गाढ झोप म्हणजे नेमकं काय? आपण झोप तर दररोज घेतो, पण गाढ झोपेचा नेमका संबंध काय हे जाणून घेणे देखील तितकच महत्त्वाचे असते.

झोपेचे एकूण तीन प्रकार असतात. त्यातील गाढ झोप हा झोपेचा तिसरा प्रकार आहे. गाढ झोपेला 'स्लो-वेव्ह स्लीप' असेदेखील म्हणतात. गाढ झोपेच्या वेळी मेंदूमधील क्रिया ही संथ गतीने होत असते. या प्रक्रियेला 'डेल्हा लहरी' असे म्हणतात. गाढ झोपेच्या वेळी या लहरींची गतीही संथ होते. साधारणपणे झोपेच्या एक तास आधी गाढ झोपेचा कालावधी सुरु होते. तर जसजशी रात्र सरते तसतसं गाढ झोपेचा कालावधी हा संपत जातो. गाढ झोपेच्या वेळी हृदय आणि श्वासोच्छवास यांसारख्या क्रिया देखील संथ गतीने होत असतात. त्यामुळे या कालावधीमध्ये स्नायू देखील शिथील झालेले असतात. म्हणूनच गाढ झोपलेल्या व्यक्तीला जागं करणं हे खूप कठीण काम असते.

झोपेचे तीन प्रकार आणि चार टप्पे

झोपेचे एकूण तीन प्रकार आणि चार टप्पे असतात. 'नॉन रॅपिड आय मूव्हमेंट' या प्रकारांमधून आपण 'वन रॅपिड आय मूव्हमेंट' या प्रकारामध्ये जातो. त्यानंतर 'गाढ झोप' हा तिसरा प्रकार असतो. हा कालावधी सर्वसाधारणपणे 90 ते 120 मिनिटांचा असतो. या तीन प्रकारांमध्ये एकूण चार टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात तुमचा श्वास आणि हृदयाचे ठोके कमी होतात. तुमच्या झोपेच्या निम्मी झोप ही दुसऱ्या टप्प्यात होते. यामध्ये तुमच्या श्वासांची आणि हृदयाची गती आणखी कमी होते. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही गाढ झोपेमध्ये असता.

चौथा टप्पा हा 'आरईएम' असा असतो. आपल्याला पडणारी बहुतेक स्वप्नं ही या टप्प्यामध्ये पडतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी गाढ झोप आवश्यक असते. स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यासाठी गाढ झोप आवश्यक असते. गाढ झोपेमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. या व्यतिरिक्त पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि चांगली ठेवण्यासाठी गाढ झोप आवश्यक आहे.

करा योग्य उशीची निवड - चांगली झोप आणि उशी यांचा घनिष्ठ संबंध आहे. उशी गळा आणि डोक्याला आधार देते तसेच पाठीचा मणकाही ताठ ठेवते. जर तुम्ही पोटावर झोपत असाल तर मऊ उशीचा वापर करा. जर एका कुशीवर झोपत असाल तर मध्यम नरम उशीची निवड करा. जर तुम्ही सरळ पाठीवर झोपत असाल तर उशी थोडी कडक असावी.

योग्य आहार - झोपण्यापूर्वी जास्त जेवण करू नये. जास्त जेवल्यास शरीराचे तापमान वाढते आणि झोपही येत नाही. याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही कमी जेवण करावे. रात्रीच्या जेवणानंतर केळी खाणे चांगले राहील. केळीत ट्रिपटोफोन नावाचे अँमिनो अँसिड आढळून येते. हे आम्ल शरीरात सेरोटोनिन हार्मोनच्या उत्सर्जनासाठी सहाय्यभूत आहे. ते मेंदू आणि शरीर शांत करते. चहा-कॉफीचे सेवनही कमी करावे.

सप्लिमेंट्स घ्यावे - कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास झोपेची समस्या दूर होते. मॅग्नेशियम नैसर्गिक झोप आणणारे मिनरल मानले जाते. यामुळे तणाव कमी होण्यासही मदत मिळते. स्नायू आणि मेंदूचा तणावही कमी होतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळेसुद्धा झोपेची समस्या उद्भवते. दूध, ओट्स आणि अंजीरचे सेवन करावे.

प्रकाश कमी ठेवावा - रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाश असल्यास झोप येत नाही. खरे तर कमी प्रकाशात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनचा स्राव होतो. या हार्मोनमुळेच झोप येते. त्यामुळे रात्री झोपताना झिरो लाइट लावावा.

किमान आठ तासांची झोप

निरोगी राहण्यासाठी किमान आठ तासांची झोप आवश्यक आहे, हे तर आपल्याला माहितीच असेल. पण जर आपण किमान आठ तासांची झोप घेत नसाल तर आपल्याला कोणते नुकसान झेलावे लागतील हे तर नक्कीच माहीत नसेल.

1. आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरात काही सकारात्मक बदल होतात ज्यात आपला विकास, सुधारणा, पेशींचे आराम आणि मानसिक विकास इतर सामील आहे. परंतु पुरेसे झोप होत नसल्यामुळे हे फायदे मिळत नाही.

2. पुरेशी झोप न घेणे आपल्या मानसिक क्षमता आणि स्मरणशक्तीसाठी अत्यंत घातक असल्याचे सिद्ध होतं. आपली स्मृती कमी होत जाते, कदाचित आपल्याला विसर पडण्याचा आजार देखील होऊ शकतो.

3. ताण आणि मानसिक समस्यांचे शिकार सहसा ते लोक असतात, जे पुरेसे झोपत नाही आणि ज्यांच्या मेंदूला योग्य प्रमाणात विश्रांती मिळत नाही.

4. झोप पूर्ण होत नसल्यास शरीर आणि मेंदूला पूर्णपणे विश्रांती मिळत नाही, ज्यामुळे शारीरिक वेदना, क्रॅम्प्स सारख्या समस्या होतात. याव्यतिरिक्त, यामुळे डोके जड होणे तसेच चिडचिड होणे अशा समस्यांना सामोरा जावं लागतं.

5. आपल्या कमी झोपण्याच्या सवयींचा खराब प्रभाव आपल्या पचनतंत्रावर देखील पडतो. आपण पुरेशी झोप न घेतल्यास, पचन शक्ती कमजोर होते, ज्यामुळे आपल्याला पोटाच्या समस्या किंवा कब्ज सारख्या समस्या देखील होऊ शकतात.

अनेकदा असे होते की, रात्री उशिरापर्यंत लोक झोपत नाहीत. झोप न आल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. झोप न लागल्याने मनाला आणि शरीराला विश्रांती मिळत नाही आणि दुसऱ्या दिवशी लोक अस्वस्थ, थकलेले आणि आळशी दिसतात.

चांगल्या झोपेसाठी काही घरगुती उपाय

झोपेच्या कमतरतेमुळे लोकांना सुस्ती, अशक्तपणा, आळस आणि अस्वस्थता जाणवते. आजच्या जीवनशैलीत झोपेशी संबंधित समस्या लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे, ज्यामुळे लोकांच्या एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. ज्यांना रात्री उशीरापर्यंत सुद्धा झोप येण्याची समस्या आहे, ते काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकतात. आयुर्वेदिक औषधे, मसाले आणि घरगुती वस्तूंचा वापर चांगल्या झोपेसाठी केला जाऊ शकतो.

मसाज

जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी पायात मोहरीच्या तेलाचा मसाज करा. पायाच्या तळव्याला मसाज केल्याने ताण कमी होऊन मनाला आराम मिळतो, ज्यामुळे चांगली झोप येते.

अश्वगंधा आपल्याला चांगली झोप घेण्यास मदत करू शकते. रात्री झोपण्यापूर्वी अश्वगंधा चूर्ण कोमट दुधात मिसळून प्यायल्याने तणाव कमी होतो. हे आपल्याला लवकर आणि चांगले झोपण्यास मदत करू शकते.

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्याने मेंदूला आराम मिळतो आणि चांगली झोपही येते. ज्यांना जास्त थकव्यामुळे झोप येत नाही त्यांनी अर्धा चमचा मध कोमट दुधात मिसळून प्यावे. मधाचे दूध प्यायल्याने झोप येण्याची समस्या दूर होते. मसाज मुळे शरीर भर पसरलेली पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते. ही नर्वस सिस्टम तुमच्या शरीरात आराम निर्माण करते. ही सिस्टम सक्रिय झाल्यानंतर तीन गोष्टी घडतात. तुमच्या ह्रदयाचे ठोके कमी होतात, श्वसन गती कमी होते आणि परिणामी स्नायूंना आराम मिळतो.

मसाज मुळे एंडोर्फिन नावाचे हॉरमोन वाढते. हे हॉरमोन ताण, तनाव, नैराश्य आणि कोणत्याही प्रकारच्या वेदना कमी करण्याचे काम करते. ज्यामुळे आपोआपच शरीराला आराम मिळतो.

मसाज मुळे एकंदरच शरीरात रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे शरीरातील टेन्शन  कमी होऊन रेलॅक्सएशन प्राप्त होते.

तसेच मसाज मुळे कॉर्टिसॉल हॉरमोन ची पातळी कमी होते. जे शरीरात आणि मनात नैराश्य वाढवते.

मंत्रोच्चार

कोणत्या ही मंत्राचा जप जर तुम्ही झोपण्यापूर्वी केला तर फक्त तुम्हाला फक्त झोप लवकर येणार नाही तर झोपेची गुणवत्ता सुधारून शांत झोप लागेल. हा उपाय देखील बरीच मंडळी वापरत असतील. शिवाय मंत्राचा जप करून झोपणे याचे आध्यात्मिक महत्व देखील आहे. यामुळे याचा नक्कीच मनावर परिणाम होतो.

यासाठी तुम्ही कोणत्याही भाषेतील किंवा धर्माचा मंत्र निवडू शकता.

विशेष करून तुम्हाला स्वतःला शांत आणि सकारात्मक वाटणारा मंत्र निवडा.

मंत्रोच्चार करत असताना तुमचे पूर्ण लक्ष मंत्र किंवा मंत्राच्या शब्दांवर आणि येणाऱ्या, जाणाऱ्या श्वासावर ठेवा.

लक्ष विचलित झाल्यास पुन्हा तुमचे ध्यान मंत्रोच्चारवर आणावे.

हे करत असताना तुम्ही बॅकग्राऊंड साठी शांत असलेले म्युझिक देखील लावू शकता.

कॅमोमाइल चहा

मेंदूला आराम देण्यासाठी कॅमोमाइल चहाचे सेवन चांगले मानले जाते. कॅमोमाइलमध्ये एपिजेनिन नावाचे कंपाऊंड असते जे झोपेशी संबंधित समस्या दूर करते.

वाचन

रात्री झोपेच्या वेळेला तुम्ही पुस्तक घेऊन वाचत राहिलात तर त्यामुळे झोप लवकर येण्याची शक्यता असते. तज्ञ लोक सांगतात की हेच पुस्तक वाचायला पहिजे किंवा तेच वाचायला पाहिजे. पण मी म्हणेल की झोपेच्या वेळेला तुम्हाला जी गोष्ट वाचायला बोर होईल ते वाचा. यामुळे मन त्या वाचनात ही रमत नाही आणि बाहेर च्या वातावरणात देखील रमत नाही. याचाच परिणाम म्हणून शेवटी मन आणि इंद्रिय यांचा संयोग तुटून मेंदू विश्रांती घ्यायला लागतो आणि झोप येण्यास सुरुवात होते.

सारांश

रात्रभर तुम्ही सतत कूस बदलत राहत असाल, झोप लागत नसेल, किंवा लागलीच तर वारंवार झोपमोड होत असेल, तर अश्या वेळी झोप अपुरी राहल्याने दुसरा दिवस आळसात जातो. कोणत्याही कामाचे उत्साह वाटत नाही. रात्रभराची व्यवस्थित, गाढ झोप, शारीरिक आणि मानसिक थकवा घालविण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. जर ही विश्रांती शरीराला मिळाली, तर शरीरामध्ये काम करण्याचा उत्साह राहतो, मेंदू सचेत राहतो आणि मानसिक तणाव देखील जाणवत नाही. आजच्या धावपळीच्या युगात निद्रानाश होणार्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे काही लोक झोप येण्यासाठी गोळ्यांचा आधार घेतात. त्याचे नकारात्मक परिणाम शरीरावर होताना दिसतात. त्यासाठी रात्रभर अंथरुणावर कूस बदलूनही झोप येणार्या लोकांनी नैसर्गिक उपाय करावेत.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know