Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 22 May 2024

दात दुखीच्या वेदनाही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात | दात किडल्याने दात दुखीचा त्रास उद्भवतो | दात दुखणे ही सर्वांसाठी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठी समस्या झालेली आहे | दातदुखीचे दंतचिकीत्सक उपचार | दातदुखी घरगुती उपाय | आधुनिक युगात खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे

दात दुखी

 

दातदुखी   सामान्य समस्या

दातांच्या दुखण्याकडे एक सामान्य समस्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असते. परंतु असे न करता जर तुम्हालाही ही समस्या असेल काही घरगुती उपाय आहेत, ज्यांच्यापासून दातदुखीची समस्या कायमची दूर होण्यात मदत होईल. दात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. अनेकदा लोकांकडून दातदुखीच्या समस्येला सामान्य असल्याचे सांगत त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असते. परंतु यामुळे अनेकदा गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्यावर उपाय योजना करणे आवश्‍यक आहे. दात दुखणे ही सर्वांसाठी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठी समस्या झालेली आहे. अचानक दातदुखीचा त्रास आपल्यापैकी बऱ्याच जणांना याचा अनुभव आला असेल. साधारतः दात किडल्याने दात दुखीचा त्रास उद्भवतो. आपली दैनंदिन जीवनशैली, आहार, मानसिक तणाव या सारख्या गोष्टींमुळे ही दातांच्या समस्या होतांना दिसत आहेत. दात लवकर पडण्याचे कारण, दात किडणे हे असते. दातांवर एनॅमल आणि डेन्टिन त्याचे कवर असते. त्यांची जिवाणूंमुळे निर्माण झालेल्या ऍसिड मुळे झीज होते. यालाच आपण दात किडणे म्हणतो आणि यामुळेच दात दुखी ही होते. आधुनिक युगात खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. दात हा आकार, कार्य, सौंदर्य आणि रचना यांचे एक अद्भुत संगम आहे. आरोग्याच्या आणि सौंदर्याच्या दृष्टीने दातांचे अधिक महत्व आहे. अन्नाच्या पचन कार्यासाठी दातांचा फार मोठा वाटा आहे. दात सुंदर असतील तरच हास्य देखील अधिक सुंदर असते म्हणून, दातांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. दात दुखणे अत्यंत वेदनादायी असते. दातांच्या दुखण्यामुळे डोके, जबडा आणि कानही प्रभावीत होत असतात. दात दुखीच्या वेदनाही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही लोकांसाठी ही वेदना कायमस्वरुपी ठरते. तर काही लोकांना थोड्या थोड्या वेळाने वेदना जाणवतात. दातदुखीची ही समस्या सामान्यतः दातांमध्ये घाण, बॅक्टेरिया आणि दात खराब होण्यामुळे होत असते. कधीकधी वेदना अशा वेळी होतात की डॉक्टरकडे जाणे देखील शक्य नसते. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. हे उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

दातदुखी घरगुती उपाय

मिठाचे पाणी:  दात दुखण्यासोबतच हिरड्या सुजल्या असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या कराव्यात. यामुळे दातांच्या दुखण्यापासून खूप आराम मिळेल.

लवंगाचा वापर करा:  लवंगमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे दातदुखी बरे करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. दात दुखत असल्यास लवंग पाण्यात उकळून थंड करून त्या पाण्याने गुळण्या करा. याशिवाय लवंग दातांमध्ये दाबावी किंवा कापसात लवंगाचे तेल लावून दुखणाऱ्या जागेवर ठेवावे, यातून दातांना आराम मिळेल.

पेरूची पाने:  पेरूची पाने धुवून पाण्यात टाका त्यात थोडे मीठ घाला. हे पाणी उकळून थंड झाल्यावर स्वच्छ धुवा. हे दिवसातून दोन ते तीन वेळा करा. त्यामुळे दुखत्या दातांना बराच दिलासा मिळेल.

कांदा: कांद्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुणधर्मदेखील असतात. कांदा सोलून त्याचा तुकडा दुखणाऱ्या भागावर काही काळ ठेवा. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल. हा कांद्याचा तुकडा काही वेळाने फेकून द्या.

ऑईल पुलींग: दातदुखी कमी करण्यासाठी ऑईल पुलींगदेखील उपयुक्त आहे. हे दातांमध्ये असलेले बॅक्टेरिया मारून टाकते. यासाठी नारळाचे किंवा तिळाचे तेल तोंडात घ्यावे. सुमारे 10 मिनिटे तोंडात ठेवा आणि सर्व बाजूंनी फिरवा. हे तेल सुमारे 10 मिनिटांनंतर थुंकून टाका आणि कोमट मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा.

दातदुखीचे दंतचिकीत्सक उपचार

दातदुखीचे उपचार निदानांवर अवलंबून आहेत. दातदुखी का होते आहे हे जाणून घेतल्यानंतर दंतचिकीत्सक पुढे दिलेल्या प्रक्रिया करतात:

पू काढणे: दंतचिकीत्सक प्रक्रिया करून पू ओढून काढतात आणि पाझरवतात.

पल्पलचे थेट झाकणे: पल्पलच्या वाढीसाठी चमकविणारी द्रव्ये किंवा कॅल्शियम वापरतात. सर्वसाधारणपणे आयडोफोर्म कॅल्शियम पेस्टचा वापर होतो

रूट कनाल उपचार: ही सर्वसामान्य आणि प्रसीद्ध प्रक्रीया आहे. रूट कनाल उपचार किंवा ‘आर टी सी’ मधे संक्रमीत आणि क्षतीग्रस्त थर कढतात आणि पल्पल काढल्याने तयार झालेल्या पोकळीमधे गट्टा पर्चाचे शंकू ठेवतात. मग ते भरतात आणि नंतर झाकले जातात. दंतचिकीत्सक वापरत असलेली ही जुनी व अधिक वेळा निवडली जाणारी उपचारपद्धती आहे.

दात उपटणे: दाताचे उपटणे ही उपचाराची शेवटची निवड आहे. दंतचिकीत्सकांच्या मते, दात वाचविण्यासाठी केलेल सर्व उपाय अपयशी होइपर्यंत दात उपटायचा उपचार करू नये. मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचे विशीष्ट प्रयोजन असल्याने तोंडाची स्वच्छता ठेवण्याची काळजी घ्या. गरज वाटल्यास एक किंवा अनेक दात काढायची वेळ आल्यास घाबरू नका, आधुनीक दंतचिकीत्सेच्या प्रगतीमूळे एक किंवा अनेक दात काढणे अतीशय सोपे व वेदनारहीत झाले आहे.

औषधोपचार: दातदुखी जात नसल्यास वेदनाशामक औषधी देतात, उदा. डिक्लोफेनॅक सोडियम (डिव्होन) आयब्रूफेन इत्यदी. काही घटनांमधे प्रतिजैवीके जसे अँमोक्सिसीलीन आणि ऑगमेंटीन सुद्धा निर्धारीत केले जातात.

शस्त्रक्रिया: कही प्रकरणांमधे जिंजीव्हेक्टोमी आणि जिंजीव्होप्लास्टी, झापडांची शस्त्रक्रिया, कलमांचे टाकणे करतात.

दातदुखीची कारणे

दातदुखीची अनेक कारणे आहेत. दातांत पोकळी होणे, जखमा होणे, दातांवरील आवरणांची क्षती होणे, दुखापत होणे, दातांचा चुरा होणे, दातांमधे फोड होणे, दातांमधली संवेदनशीलता वाढणे, दातांचे तुटणे, भरलेल्या ठिकाणी क्षती होणे आणि हिरड्यांचे आजार ही ती कारणे होत. तीव्र दातदुखीच्या कारणांची शहनिशा डॉक्टरांकडुन करून घ्यावी आणि तुम्ही स्वतः त्याचे निदान करू नये, हा कळकळीचा सल्ला आहे.

पल्पल (दातांवरील अतिरीक्त थर) दातदुखी

पल्पल हा उतींचा हवेसोबत किंवा लाळीसोबतच्या संपर्कामूळे होते. गंभीर झीज, क्षती, फ्रेंक्चर, किंवा दातांच्या तुटण्याने ही दातदुखी होते. पलपल दातदुखीमधे गोड, गरम, आणि थंड पदार्थांमूळे क्षणीक अतीसंवेदनशीलता येण्यापासून ते असह्य वेदनेपर्यंतच्या दातदुखीने उत्स्फुर्तपणे तीव्र थरथरण्याचे अनुभव येतात.

पेरिओडोंटल दातदुखी

पेरिओडोंटल इजा दातदुखीचे मुख्य कारण आहे, ज्यामूळे जबरदस्त आघात, कवळीचा दबाव, दोन्ही बाजुंच्या दातांसोबत अधीक संपर्क येणे होऊ शकते. इतर कारणे म्हणजे दात स्वच्छ करताना चुकीच्या पद्धतीने हाताळणे, दांतांमधले अडथळे अती प्रमणात भरणे आणि खोलात भरणे, दांतांच्या मधील रिकाम्या जागा इत्यादि. याचे परिणाम म्हणजे पल्पल संसर्ग अनुक्रमे होणे आणि नाकाच्या कवटीतील पोकळीमधे हाडांमधे असलेला संसर्ग पसरल्याने जवळच्या दातात आलेल्या सुजेचे वाढणे. पेरिडोंटल दातदुखीमधे एका पेक्षा अधीक दात समावीष्ट असल्यास दातांचे करकरा वाजणे, रात्री दातखिळी बसणे किंवा दात दाटलेले असणे ही कारणे असण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. टीएमजे मधील अपायकारक बदलांमूळे आणि हाडांतील बदलांमूळे मागच्या दातांवर अधीक दबाव येतो. टीएमजे हे टेंपोरोमँडिब्युलर सांधे आहेत खालच्या जबड्याला बाकीच्या चेहन्याशी जोडणारे हे एकमेव सांधे आहे. टीएमजे च्या दुखापतीमुळेदेखील दातदुखी होऊ शकते.

तडा गेलेले दात

दातांच्या भिन्न थरांत जसे एनॅमेल, डेंटीन किंवा पल्पलमधील भेगा दातांपर्यंत वाढल्याने ही दातदुखी होते आणि त्यप्रमाणे लक्षणे बदलतात. डेंटीन भागात असलेल्या डेंटीनल ट्युबूल द्रव्याच्या हालचालींमूळे दातदुखीची तीव्रता बदलते. जेवताना दातांवर येणाऱ्या दाबातील बदलांमूळे या द्रव्याचे हलणे सुरु होते.

सारांश

जागतिक स्तरावर दातदुखी ही मौखीक दंतचिकित्सेतील सर्वाधीक प्रमणात अढळणारी अवस्था आहे. या विशिष्ट परिस्थितीत, दात दुखणे म्हणजे काही अप्रिय भावनांचा असा अनुभव आहे जो काही उत्तेजकांमूळे सुरू होतो आणि केंद्रीय मज्जासंस्था प्रणालीतील विशिष्ट पेशींवरून प्रसारित केला जातो. यात कमी अधीक प्रमाणात अस्वस्थता, वेदना आणि यातना या संवेदना समविष्ट आहेत. दातांचे आजार, दातांतील पोकळी किंवा दातांच्या जखमांमुळे दातदुखी होऊ शकते. दातदुखीची उपचारपद्धती दोन स्तरांवर आहे, प्रथम निदान केले जाते नंतर त्या आजाराचे निवारण आणि उपचार केले जातात. दातदुखी सामान्यतः 2 ते 3 दिवसांत मौखीक स्वच्छता ठेवल्याने आणि दातांवरील आवश्यक प्रक्रीयांसोबत औषधोपचार केल्याने बरी होते.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know