Translate in Hindi / Marathi / English

Thursday, 2 May 2024

मानवी श्वसनाची माहिती | श्वास आणि श्वसन संस्था | शरीराच्या परिसरातील हवेतून ऑक्सिजन वायूचे ग्रहण करणे आणि हवेत कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे उत्सर्जन करणे या कार्यासाठी विकसित झालेल्या इंद्रिय प्रणालीस श्वसन तंत्र असे म्हणतात. नाक व तोंडापासून सुरू होणारा श्वसनमार्ग, फुप्फुसे, छातीचा पिंजरा आणि श्वसनक्रियेवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील केंद्र यांचा समावेश श्वसन तंत्रात होतो

 श्वास आणि श्वसन

 

मानवी श्वसनाची माहिती

श्वसन संस्था: शरीराच्या परिसरातील हवेतून ऑक्सिजन वायूचे ग्रहण करणे आणि हवेत कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे उत्सर्जन करणे या कार्यासाठी विकसित झालेल्या इंद्रिय प्रणालीस श्वसन तंत्र असे म्हणतात.

नाक तोंडापासून सुरू होणारा श्वसनमार्ग, फुप्फुसे, छातीचा पिंजरा आणि श्वसनक्रियेवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील केंद्र यांचा समावेश श्वसन तंत्रात होतो. श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे एवढ्यापुरतीच श्वसनाची क्रिया मर्यादित नसते. जैवरासायनिक आणि कोशिकीय (पेशींच्या) पातळीवर श्वसन ही सर्व प्राण्यांमध्ये अत्यावश्यक अशी अनेक रासायनिक प्रक्रियांची साखळी असते.

कोशिकेच्या जीवनासाठी आवश्यक अशी ऊर्जा पोषक द्रव्यांच्या चयापचयातून (शरीरात सतत घडणाऱ्या रासायनिक भौतिक घडामोडींतून) प्राप्त करून घेण्यासाठी (कार्बोहायड्रेटे, प्रथिने आणि वसा द्रव्ये यांच्या विघटनाच्या प्रक्रियेतून) ऑक्सिजनाचा वापर केला जातो. सजीवांमध्ये सात्मीकरण झालेल्या अन्नपदार्थांतून ऊर्जा मुक्त होण्याच्या प्रक्रियेला श्वसन असे म्हणतात. प्रौढ व्यक्तींमध्ये श्वसनाचा वेग प्रति मिनिटाला १४ वेळा एवढा असतो. लहान मुलांत तो प्रति मिनिटाला ४५, मोठ्या मुलांमध्ये प्रति मिनिटाला २५ एवढा असतो.

ऐच्छिकरीत्या श्वसनाचा वेग नियंत्रित केला जातो, परंतु हा वेग ठरवणारा सर्वात महत्वाचा घटक रक्तातील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण होय.

रक्तातील कार्बनडायऑकसाइड चे प्रमाण जास्त असल्यास श्वसनाचा वेग वाढतो.

मानवी शरीरात श्वसन

मानवी शरीरात श्वसन संस्थेच्या साहाय्याने ऑक्सिजनच्या सन्निघ्यात श्वसन प्रक्रिया पूर्ण होते. मानवी श्वसनसंस्था खालील अवयवांची बनलेली असते.

1) बाह्य नाकपुड्या

2) घसा

3) ग्रसनी / स्वरयंत्र

4) श्वसन नलिका

5) श्वसनी – श्वसनिका

6)  फुप्फुसे

7) वायुकोश

8) श्वासपटल

मानवी श्वसनसंस्थेची रचना:

फुप्फुसे श्वसनाचा मुख्य अवयव असून शरीरात छातीच्या पोकळीत हृदयाच्या दोन्ही बाजूस स्थित असतात.

श्वसनसंस्थेची सुरवात बाह्य नाकपुड्यांपासून होते. पुढे त्याचे रूपांतर घसा, स्वरयंत्र आणि श्वसननलिकेत होते.

श्वसन नलिकेचे रूपांतर श्वसनात होऊन ती दोन्ही फुफ्फुसांना जोडलेली असते.

फुफ्फुसांमध्ये श्वसनीचे रूपांतर अनेक लहान शाखांमध्ये होते. या सर्व लहान शाखांना श्वसनीका म्हणतात.

श्वसनिकांच्या टोकाशी फुग्यांसारखे दिसणारे वायुकोश असतात. वायुकोशामध्येच विसरण प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन आणि कार्बन डायॉकसाइड या वायूंची देवाण घेवाण होते.

वायुकोशांच्या पातळ भित्तिकांभोवती कोशिकांचे जाळे असते. फुफ्फुसात आलेल्या हवेतील ऑक्सिजन केशिकातील तांबडया पेशीतील हिमोग्लोबिन शोषून घेते तर त्याच वेळी रक्तातून कार्बन डायॉकसाईड वायुकोशात सोडला जातो. या क्रियेलाच विसरण असे म्हणतात.

हा कार्बन डायॉकसाईड वायू उच्छवासामुळे शरीराबाहेर टाकला जातो तर ऑक्सिजन वायू शरीरातील सर्व उतींकडे पोहोचवला जातो.

मानवी शरीरात ऑक्सिश्वसनाची प्रक्रिया खालील प्रमाणे दोन टप्प्यात पूर्ण होते.

१) बाह्यश्वसन / श्वासोच्छवास २) अंतःश्वसन/ पेशीय श्वसन

१) बाह्यश्वसन / श्वासोच्छवास: श्वासोच्छवास ही भौतिक प्रक्रिया आहे.

ऑक्सिजनयुक्त हवा फुफ्फुसात प्रवेश करणे तसेच कार्बन डायॉकसाईडयुक्त हवा फुफ्फुसाबाहेर टाकली जाणे या क्रियेला बाह्यश्वसन किंवा श्वासोच्छवास असे म्हणतात. श्वासोच्छवासाची क्रिया श्वास आणि उच्छवास या दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.

श्वास: ऑक्सिजनयुक्त हवा शरीरामध्ये घेण्याच्या प्रक्रियेला श्वास असे म्हणतात.

उच्छवास: कार्बन डायॉकसाईडयुक्त हवा शरीराबाहेर सोडण्याच्या प्रक्रियेला उच्छवास असे म्हणतात.

श्वासोच्छवास: यामध्ये फुफ्फुसे व फुफ्फुस धमनीतील रक्त यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बन डायॉकसाईड यांची देवाणघेवाण होते. या क्रियेला विसरण असे म्हणतात.

श्वासातील ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये वेगळा होऊन रक्तात मिसळला जातो. तर रक्तातील कार्बन डायॉकसाईड फुफ्फुसांमध्ये उच्छवासाद्वारे मिसळला जातो व त्यानंतर फुफ्फुसातून शरीराबाहेर टाकला जातो.

श्वासोच्छवासामध्ये श्वास आणि उच्छवास या प्रक्रियांमध्ये विविध वायूंची खालीलप्रमाणे देवाण -घेवाण होते.

ऑक्सिजनचे वहन: फुफ्फुसातील ऑक्सिजन रक्तात मिसळल्यानंतर त्याचा तांबडया रक्तपेशीतील हिमोग्लोबिन सोबत संयोग होऊन ऑक्सी- हिमोग्लोबिन तयार होते. हे ऑक्सी-हिमोग्लोबिन रक्ताद्वारे शरीरातील सर्व पेशींकडे पोहोचविले जाते. ऑक्सिजनच्या साहाय्याने पेशीतील ग्लुकोज या पोषद्रव्याचे ऑक्सिडीकरण होते आणि उष्णता ऊर्जा मुक्त होते. तंतूकणिकेमार्फत ही ऊर्जा ATP या रासायनिक संयुगांच्या स्वरूपात साठविली जाते.

कार्बन डायॉकसाईडचे वहन: पेशीमध्ये ऊर्जा निर्मितीनंतर तयार झालेला कार्बन डायॉकसाईड तांबडया रक्तपेशीतील हिमोग्लोबिन सोबत संयोग पावून कार्बोक्झी हिमोग्लोबिन तयार करतो. तो कार्बन डायॉकसाईड रक्ताद्वारे फुफ्फुसामध्ये आणला जातो. फुफ्फुसामध्ये विसरण क्रियेने कार्बन डायॉकसाईड वेगळा होऊन उच्छवासाद्वारे शरीराच्या बाहेर टाकला जातो.

२) अंतःश्वसन/ पेशीय श्वसन: पेषीश्वसन हि जैव-रासायनिक प्रक्रिया आहे. हि प्रक्रिया तंतूकणिकेत जैवरासायनिक प्रक्रियांच्या विविध पायऱ्यामध्ये पूर्ण होते.

ज्या प्रक्रियेमध्ये पेशीत ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते त्यास पेषीश्वसन किंवा अंतःश्वसन असे म्हणतात.

पेषीश्वसनाची क्रिया विविध सजीवांमध्ये वेगवेगळी असते परंतु त्यातील पहिली पायरी सर्व सजीवात समान असते.

वातावरण बदलातून श्वसनाचे विकार

वातावरण बदलातून हवेत गारवा वाढला की दमा तसेच श्वसनाचे विकार डोके वर काढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. वातावरण बदलातून हवेत गारवा वाढला की दमा तसेच श्वसनाचे विकार डोके वर काढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

अनेकजण व्यायामासाठी रस्त्यावर धावताना, चालताना दिसतात. पहाटेचे कोवळे ऊन स्वच्छ हवा घेण्यासाठी धावपळ सुरू असते. सकाळचे वातावरण आरोग्याला पोषक असते. पण अवकाळी पाऊस त्यात विघ्न आणतो.

अशा दिवसात तयार होणारे प्रदूषणयुक्त धुके धोकादायक आहे. अशा वातावरणात दमा, ब्रॉन्कॉयटीस आणि श्वसनासंबंधी विकार होऊ शकतात. योग्य काळजी घेतली नाही, तर दमाग्रस्तांना हृदयविकाराचा, फुफ्फुसाचा अटॅक येऊ शकतो. सर्दी, ताप, खोकला, कफ यांचाही त्रास होऊ शकतो.

श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय

बदलत्या हवामानात श्वासासंबंधी समस्या येण्याची शक्यता लक्षणीय वाढते. विशेषतः पावसाळी आणि हिवाळ्याच्या काळात फ्लू, व्हायरल, न्यूमोनिया यांसारख्या श्वसनसंस्थेशी संबंधित समस्या खूप वाढू शकतात. अशा परिस्थितीत या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. काही घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने श्वसनाच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. चला जाणून घेऊया श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय-

हळदीचे दूध

हळदीचे दूध प्यायल्याने श्वसनाच्या समस्या दूर होतात. हळदीच्या दुधात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे श्वसन प्रणाली मजबूत होते.

आले

अदरकमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामध्ये श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करण्याचा गुणधर्म असतो. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात अद्रकाचा रस नियमितपणे प्यायल्याने श्वसनसंस्था मजबूत होते.

गवती चहा

पावसाळ्यात श्वसनाचा त्रास झाल्यास हर्बल चहाचे सेवन करा. यामुळे श्वसन प्रणाली मजबूत होऊ शकते. विशेषत: दालचिनी, आले, मध आणि लिंबू घालून तयार केलेला चहा या ऋतूमध्ये तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी ठरू शकतो.

मध सेवन करा

श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी मधाचे सेवन करा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात मध आणि काळी मिरी यांचे एकत्र सेवन केल्यास सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करू शकतात.

सारांश

स्वायत्त मज्जासंस्था (एएनएस) द्वारे श्वास नियंत्रित केला जातो, मज्जासंस्थेचा एक भाग जो आपोआप किंवा आपल्या जाणीवेच्या नियंत्रणाबाहेर कार्य करतो. श्वासोच्छवासाची मनोरंजक गोष्ट अशी आहे की तुम्ही दीर्घ श्वास घेऊन, खोकला घेऊन आणि तुमचा श्वास रोखून त्यावर स्वेच्छेने प्रभाव टाकू शकता. शरीराच्या बहुतेक एएनएस नियंत्रित प्रणाली जाणीवपूर्वक 'ओव्हरराइड' कार्य करण्यास परवानगी देत ​​नाहीत. स्वयंचलित नियंत्रणासह, श्वासावर काही जाणीवपूर्वक प्रभाव पडणे ही प्रणाली राखण्याचे महत्त्व दर्शवते. हवेतून ऑक्सिजन काढण्याच्या उद्देशाने फुफ्फुसातून किंवा श्वासाद्वारे हवा आत घेतली जाते. ऑक्सिजन फुफ्फुसातील अल्व्होली नावाच्या लहान नळ्यांमधून जातो. अल्व्होली ऑक्सिजन रेणूंना रक्तप्रवाहात जाण्याची परवानगी देते. त्यानंतर ऑक्सिजनचा रेणू शरीरातील सर्व पेशींमध्ये वितरीत केला जातो. जेव्हा शरीराद्वारे ऑक्सिजनचे चयापचय होते तेव्हा कार्बन डायऑक्साइड रक्तात सोडला जातो. कार्बन डाय ऑक्साईडचा कचरा फुफ्फुसात परत नेला जातो जिथे तो पुन्हा हवेत सोडला जातो.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know