Translate in Hindi / Marathi / English

Friday, 24 May 2024

मुतखडा कसा होतो | किडनी स्टोनमुळे वेदना | अति शारीरिक श्रम किंवा व्यायाम,दीर्घकाळ आजार जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते | किडनी स्टोनमुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला तर लघवी संपूर्णपणे बाहेर न पडता अडवली जाते. त्यामुळे किडनीला सूज येते आणि वेदना निर्माण होतात

किडनी स्टोनमुळे वेदना

 

मुतखडा कसा होतो

पाणी अगदी कमी पिणे अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने मुतखडा होण्याचे प्रमाण वाढत राहते. याशिवाय अति शारीरिक श्रम किंवा व्यायाम,दीर्घकाळ आजार जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते. मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते. मुतखड्यामुळे बरेचदा वेदना होत नाहीत. विशेषतः जोपर्यंत हे स्फटिक एका जागी स्थिर असतात किंवा किडनीपासून मूत्राशयापर्यंत लघवी वाहून येणाऱ्या नलिका म्हणजेच युरेटरमध्ये अडथळा निर्माण करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामुळे त्रास जाणवत नाही. मात्र जर किडनी स्टोनमुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला तर लघवी संपूर्णपणे बाहेर न पडता अडवली जाते. त्यामुळे किडनीला सूज येते आणि वेदना निर्माण होतात.

किडनीस्टोनची लक्षणे

Ø ओटीपोटात आणि जननेंद्रियांजवळ निर्माण होणाऱ्या वेदना

Ø सतत मूत्रविसर्जन करण्याची गरज वाटत रहाणे

Ø एका वेळी कमी प्रमाणात मूत्र शरीराबाहेर टाकले जाणे

Ø छातीच्या बरगड्यांच्या खालच्या बाजूला पाठीमागे आणि दोन्ही बाजूंना तीव्र वेदना

Ø लहरींच्या स्वरूपात निर्माण होणाऱ्या आणि कमीजास्त तीव्रतेच्या वेदना

Ø मूत्रविसर्जन करताना होणाऱ्या वेदना किंवा जळजळ

Ø लघवीचा रंग गुलाबीसर लाल किंवा तपकिरी असणे

Ø लघवीला उग्र वास येणे

Ø उलट्या मळमळ

Ø जर जंतुसंसर्ग असेल तर थंडी ताप

मुतखडा होण्याची कारणे

युरिक ऍसिडची वाढती पातळी, जीवनशैलीतील घातक सवयी यामुळे किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास आता अगदी कॉमन झाला आहे. कोणत्याही वयोगातील व्यक्तीला हा त्रास जाणवू शकतो. बहुतेक वेळा लघवी गरजेपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेटेड झाल्यामुळे म्हणजेच लघवीमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे किडनी स्टोन्स होतात. विशिष्ट प्रकारचा आहार, गरजेपेक्षा जास्त वजन, काही शारीरिक विकार, एखाद्या विशिष्ट रोगावर घेतली जाणारी औषधे, तसेच सप्लीमेंट्स ही किडनी स्टोन्स होण्यामागची मुख्य कारणे आहेत.

प्रत्येक किडनी स्टोन वेगळा असतो. काही कॅल्शियम, स्ट्रुवाइट, युरिक ऍसिड आणि सिस्टिन यांनी तयार होतात. तर अप्पर युरिनरी ट्रॅक्ट बॅक्टेरिया इन्फेक्शन (यूटीआय) मुळे स्ट्रुव्हाइट स्टोन होतात, ज्यामुळे अमोनिया तयार होतो आणि लघवी कमी आम्लयुक्त बनते. हे सहज मोठे होतात. सिस्टिन एक अमीनो आम्ल आहे, ज्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रात दगड होऊ शकतात. तुम्ही कोणत्या द्रवपदार्थाचे सेवन करता यापेक्षा तुम्ही किती प्रमाणात सेवन करता हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. किडनीमध्ये क्षार जमा होऊन तयार होणारे मुतखडे शरीरातून फ्लश करण्यासाठी तुम्हाला दिवसाला ठराविक प्रमाणात पाण्याचे सेवन आवश्यक आहे. त्यात लिंबूवर्गीय किंवा अन्य पेय समाविष्ट करणे हा एक पर्याय असू शकतो पण द्रव सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. वय व वजनानुरूप पाणी प्यावे पण साधारण तीन लिटर पाणी हे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही सतत वातानुकूलित वातावरणात असाल तर दोन ते अडीच लिटर पाणी पुरेसे ठरते.

·      शरीरात पाण्याची कमतरता असणेजर शरीरामध्ये  पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात  कमतरता असेल तर खनिजे क्रिस्टल सारखे बनू लागतात.त्यामुळे शरीरात पुरेसे पाणी असणे खूप फायदेशीर आहे जेणेकरून पुरेशी लघवी तयार होईल .

·      फॅमिली हिस्टरी असेल तर८०% किडनी स्टोन हा फॅमिली हिस्टरी असेल तर होण्याची शक्यता असते. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किडनीची समस्या असल्यास किडनी स्टोन होणे शक्य आहे. आणि जर तुम्हाला सुरवातीला  किडनी स्टोन होवून गेला असेल तर उपचारानंतरही तुम्हाला तो  पुन्हा होण्याची शक्यता असते.

·      सोडियम चा कमी वापररोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी असणे महत्वाचे आहे. मीठ आपल्या किडनीला अधिक कॅल्शियम फिल्टर करते. यामुळे किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा होण्याची शक्यता अधिक  वाढते.

·      साखरेचा कमी वापरमिठाप्रमानेच आहारात साखरेचा कमी  प्रमाणात वापर करणे म्हत्व्वाचे आहे . साखरमुळे  किडनी स्टोन होण्याची शक्यता  अधिक प्रमाणांत होवू शकते  . यामुळे आहारात कमी प्रमाणात साखरेचा  वापर असावाअति साखर युक्त आहार टाळावा.

·      लठ्ठपणानॉर्मल BMI १८.२४. असतो. जर तुमचा बीएमआय ३० च्या वर असेल तर तुम्ही लठ्ठ असल्याचे सामजून येते. आणि यामुळे बर्याच आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे किडनी रिलेटेड आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला आतद्या बद्दल काही समस्या असेल तर तुमचे शरीर जास्त पाणी शोषून घेते ज्यामुळे तुम्हाला युरीन कमी होवू लागते.

·      टाइप 2 डायबिटीसयामुळे तुमची युरीन अधिक एसिडीक बनवू शकते या मुळे किडनी स्टोन वाढण्याची शक्यता असू शकते.

·      संधिरोगसंधीरोगा मध्ये सांध्यामध्ये यूरिक ऍसिडचे क्रिस्टल्स तयार होतात. यामुळे रक्तात युरिक ऍसिड चे अधिक होते.

·      हायपरपॅराथायरॉईडीझमहार्मोन्सच्या कमी जास्त पणामुळे तुमच्या रक्तात आणि युरीन मध्ये कॅल्शियमची पातळी वाढते. यामुळे सुद्धा किडनी स्टोन होण्याची शक्यता अधिक असते.

तुमची किडनी सुदृढ आहे की नाही हे कसे ओळखाल?

फक्त लघवीचा रंग पहा. गडद रंगाची लघवी असल्यास तुम्ही पाणी कमी पित आहात किंवा वॉशरूमला कमी वेळा जात आहात असा त्याचा अर्थ होतो. या दोन्ही सवयी किडनीसाठी घातक ठरू शकतात त्यामुळे तुम्ही या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, तुमच्या मूत्रातील पीएच घटक तपासा. अल्कधर्मी pH कॅल्शियम- आणि फॉस्फेट-युक्त दगडांच्या क्रिस्टलायझेशनचे प्रमाण वाढवते. व अम्लीय मूत्र pH मुळे यूरिक ऍसिड किंवा सिस्टिन दगड होतात.

किडनी स्टोन झाल्यास काय खावे?

मुतखडा असल्यास दिवसभरात पुरेसे पाणी पिणे महत्व्वाचे आहे, यामुळे लघवी वाटे शरीरातील अपायकारक घटक निघून जाण्यास नक्कीच मदत होते.  बर्याच उपयुक्त घटकांमुळे किडनी स्टोन होण्यापासून रोखता येवू शकते. मुतखडा अथवा किडनी स्टोन झाल्यास आहारात फायबरयुक्त पदार्थ अधिक असावेत. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारची फळे आहारात समाविष्ट करावीत. आहारात चाकवत भाजी, शेवग्याच्या शेंगा, कारले, मुळा, गाजर, कांदा यांचा आवर्जून समावेश करायला हवा.

मुतखड्यामुळे होणाऱ्या वेदनांवर घरगुती उपाय

चुकीची जीवन शैली, चुकीचा आहार, पाणी कमी पिणे या सारख्या कारणांनी मुतखडा उद्भवतो. आयुर्वेदानुसार, मुतखड्यामुळे खूप जास्त प्रमाणात पोटदुखी होते. पण बर्याच लोकांना पोटदुखी होत हि नाही. पोटदुखी थांबण्यासाठी, तातडीचा घरघुती उपाय करणे आवश्यक आहे म्हणून पुढील प्रमाणे घरगुती उपाय करणे आवश्यक आहे.

) अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने १५ मिनिटात मुत्ख्द्यामुळे होणारी पोटदुखी थांबते.

2) कुरडू नावाच्या वनस्पतीच्या सालीचा काढा प्यायल्याने मुतखड्यामुळे होणारी पोटदुखी थांबण्यास मदत होते.

) कडुलिंबाच्या पाल्याची चूर्ण गरम पाण्याबरोबर रोज सकाळी नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडण्यास मदत होते.

) जर खडा लहान असेल जास्त जुना नसेल तर मेंदीचे साल बारीक वाटून त्याचे चूर्ण करून घ्यावे. आणि ते चूर्ण सकाळी अर्धा चमचा गरम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने तो खडा विरघळून लघवी बरोबर निघून जान्यास नक्कीच मदत होते.

सारांश

पाणी अगदी कमी पिणे अथवा पिणे अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने मुतखडा होण्याचे प्रमाण वाढत राहते. याशिवाय अति शारीरिक श्रम किंवा अति प्रमाणात व्यायाम करणे  ,मोठा दीर्घकाळ आजार, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याची शक्यता वाढते . मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे नायडस तयार होतो आणि त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे रूपांतर मुतखड्यामध्ये होवू लागते . बहुतांश लोकांना मुतखड्यामुळे वेदना होत नाहीत. विशेषतः जोपर्यंत हे स्फटिक एका जागी स्थिर असतात किंवा किडनीपासून मूत्राशयापर्यंत लघवी वाहून येणाऱ्या नलिका म्हणजेच युरेटरमध्ये अडथळा निर्माण करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामुळे आपल्यला फारसा त्रास होत नाही. मात्र जर किडनी स्टोनमुळे / मूतखड्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला तर लघवी संपूर्णपणे बाहेर पडता अडवली जाते. त्यामुळे मोठ्या प्रामाणात  किडनीला सूज येवू लागते आणि तीव्र प्रमाणात  वेदना निर्माण होतात.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know