Translate in Hindi / Marathi / English

Sunday, 5 May 2024

जिममधील व्यायामाची शिस्त | कोणताही व्यायाम हा आपल्या शरीराला चांगलाच असतो | जिममध्ये फिटनेस साठी आवश्यक मार्गदर्शन | ट्रेनर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, चांगली जिम तुम्हाला उपकरणांमधील वैविध्य उपलब्ध करते आणि चांगल्या डाएटमुळे तुम्ही आपल्या शरीरानुसार मॅक्रोज घेत असतात

जिममधील व्यायामाची शिस्त

 

जिममध्ये फिटनेस साठी आवश्यक मार्गदर्शन

●   चांगला ट्रेनर

●   योग्य जिम

●   संतुलित डाएट

या तिन्हींच्या मदतीने तुम्ही सहजरीत्या आपले लक्ष्य मसल्स बिल्डिंग वेट लॉस प्राप्त करू शकतात. कारण यांची फिटनेस मध्ये बरोबरीची भूमिका असते. ट्रेनर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, चांगली जिम तुम्हाला उपकरणांमधील वैविध्य उपलब्ध करते आणि चांगल्या डाएटमुळे तुम्ही आपल्या शरीरानुसार मॅक्रोज घेत असतात. जर या तिन्हींपैकी एकही सुटले तर अनेकदा या कारणामुळे उशिरा रिझल्ट मिळतात. तुम्हीसुद्धा जर आपले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जिममध्ये जात असाल तर त्यापूर्वी अनेक बाबींचाी काळजी घ्यावी लागते, हे लक्षात असू द्या.

 ●   कोणती जिम निवडावी?

●   जिमसाठी काय तयारी करावी?

●   कोणते आउटफिट घालून जिमला जावे?

●   जिममध्ये कोणते नियम पाळावेत?

जिमला जाण्यासाठी योग्य वेळ

असे पाहिला गेले तर जिमला जाण्यासाठी सकाळी ही योग्य वेळ आहे. व्यायामासाठी तुम्ही सकाळी ते नंतर जिममध्ये जाऊ शकता. कारण यावेळी तुमचे शरीर पूर्णपणे ताजेतवाने असते आणि तुम्ही योग्य पद्धतीने व्यायाम करू शकता. सकाळी आपले शरीर पूर्णपणे शिथिल होते आणि आपले स्नायू अजिबात थकलेले नसतात. तुमच्या स्नायूत खूप सारी उर्जा असते. त्यामुळे व्यायाम करताना शरीराला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. यामुळे स्नायूंचा आकार देखील वाढतो. तसेच सकाळी जिम केल्याने संपूर्ण दिसत फ्रेश मूडमध्ये जातो. त्यामुळे सकाळची जिम करणे कधीही चांगले मानले जाते.

जिम सुरू करण्याआधी असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. परंतु यासोबतच तुम्ही अनेक गोष्टींबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

जिमची निवड

जिम केवळ फॅन्सी असूनच चालणार नाही. त्यांच्याकडे कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत याबाबत जाणून घेणे आणि स्वत:साठी चांगला ट्रेनर सिलेक्ट करणे जास्त गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या ट्रेनरवर समाधानी नसाल, तर अशा एखाद्या ट्रेनरचा शोध घ्या, जो तुम्हाला मसल्स बनवण्यात वा वेट लॉस यांची योग्य माहिती देऊ शकेल.

यासाठी एकच जिम पाहून निर्णय घेऊ नका की, तुम्हाला याच जिममध्ये जायचे आहे. उलट आसपासच्या वेगवेगळ्या जिममध्ये जाऊन पाहा आणि बोला. जी जिम तुम्हाला सर्वात उत्तम वाटेल तिच्यातच जा.

हायजीनकडे लक्ष द्या

एक्सरसाइज करण्यापूर्वी आणि नंतर तुम्हाला तुमच्या शरीराच्या स्वच्छतेकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज असते. जिममध्ये जाताना आपल्यासोबत एक टॉवेल जरूर ठेवा, ज्यामुळे घाम शोषून घेता येईल आणि वर्कआउटनंतर स्नान करायला विसरू नका.

असे केल्याने तुमच्यात आत्मविश्वासही येईल आणि थकवाही निघून जाईल.

वॉर्मअप जरूर करा

जेव्हा तुम्ही ट्रेनिंग सुरू करतात त्यापूर्वी तुम्ही मशीनने एक्सरसाइज करण्याच्या आधी वॉर्मअप करायला विसरू नका, जे अत्यंत आवश्यक असते. यामुळे जिम करताना होणाऱ्या इन्जुरी टळतील. जेव्हा तुमचे शरीर गरम होईल, तेव्हा त्यानंतरच मशीनवरील एक्सरसाइज करा.

वॉर्मअप केल्याने शरीरात इन्जुरीचे चान्सेस वाढतात. यामुळे कमीत कमी 15 मिनिटे वॉर्मअप करावा.

तयारीनिशीच जिममध्ये जा

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिममध्ये कुणाचेही टॉवेल आणि त्यांच्या पर्सनल वस्तूंचा वापर करू नका. जेव्हा तुम्ही जिममध्ये असाल तर टॉवेल आणि पाण्याची बॉटल आपल्या सोबत आणण्याची सवल लावून घ्या. जास्त घाम आल्याने पाण्याची कमतरता भासू नये यासाठी मधून-मधून पाणी पीत राहा.

सर्वांनाच एक्सरसाइज करण्याची संधी द्या

जिममध्ये सर्वांना इक्विपमेंट यूज करण्याची समान संधी द्या. जर तुम्हाला ट्रेडमिलवर धावणे चांगले वाटत असेल तर यामुळे ट्रेडमिलवर तासनतास धावत राहू नका, कारण जिम इक्विपमेंटचा वापर इतर लोकही करतात. इक्विपमेंटला शेअर करावे लागते, यामुळे तुमची वेळ होताच मशीन सोडून द्या आणि इतरांनाही संधी द्या. यादरम्यान तुम्ही रेस्ट घ्या आणि पुढच्या एक्सरसाइजच्या रेप्स आणि सेटची माहिती मेंदूत साठवून घ्या.

आरामदायक ड्रेस घालून जिमला जा

कम्फर्टपेक्षा जास्त जर तुम्ही स्टाइलबद्दल विचार केला तर तुम्ही जिममध्ये जास्त चांगल्या रीतीने वर्कआऊट करू शकणार नाहीत. तुमच्यासाठी तुम्ही स्टाइल आणि कम्फर्ट ड्रेसला प्राधान्य देणेच हिताचे राहील. जास्त टाइट कपड्यांमुळे तुमचे जिममध्येही हसे होऊ शकते. यामुळे तुम्ही नॉर्मल फिटिंगचे ड्रेस घालून जिममध्ये जा. खूप जास्त सैल कपडे आता आउट ऑफ फॅशन झाले आहेत.

जिममध्ये जाताना सोबत पार्टनर असेल तर उत्तमच

एखाद्याची सोबत नेहमीच चांगली असते. रिसर्चवरून हे समोर आलंय की, एखाद्या पार्टनरच्या सोबत जिममध्ये जाणे एक खूप चांगली कल्पना आहे, कारण यामुळे तुम्हाला लवकर वजन घटवण्यात मदत मिळते. मग यात तुमचा मेल या फीमेल फ्रेंडही असू शकतो.

जिम जाण्यापूर्वी करून घ्या बॉडी चेकअप

कोणीही एक्सरसाइज करण्याच्या आधी बॉडीची पूर्ण तपासणी करणे गरजेचे असते. कोणत्याही जिममध्ये जाण्यापूर्वी तुम्ही आपल्या पूर्ण बॉडीची तपासणी करून घ्या, उदा. बॉडी मास इंडेक्स (BMI). योग्य रीतीने एक्सरसाइज करण्यासाठी आपले ब्लड प्रेशर, पल्स रेट आणि हार्ट रेटची तपासणीही जरूर करून घ्या.

जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांची माहिती घ्या

जिम जाण्याच्या आधी तेथे वापरल्या जाणाऱ्या शब्दांबद्दल (उदा. - एक्सरसाइजची नावे, मशीन्सची नावे) माहिती घेतल्यानेही तुम्ही त्रासातून वाचू शकता. जेणेकरून जेव्हा तुमचा ट्रेनर जिममध्ये या शब्दांचा वापर करत असेल तर तुम्हाला त्रास होऊ नये. जिममध्ये ट्रेनरद्वारे वापरल्या जाणाऱ्या शब्दांविषयी स्वत:ला जागरूक करा.

फोनचा वापर टाळण्याचा प्रयत्न करा

वर्कआउट सेशनच्या दरम्यान आपला मोबाइल बंद करणेच योग्य असते. जर तुम्ही असे केले नाही तर कमीत कमी तो सायलेंट मोडवर ठेवा. जेणेकरून सातत्याने व्हाट्सएपचा साउंड तुमच्या मेंदूला दर 5 मिनिटांनी आपल्या फोनला चेक करण्यासाठी मजबूर करणार नाही आणि तुम्ही एकाग्रतेने एक्सरसाइज करू शकाल. आता तुम्हाला जिममध्ये जाण्यासाठी पूर्ण माहिती मिळाली आहे आणि तुम्ही पूर्णपणे आत्मविश्वासाने जिममध्ये जाऊ शकतात. आता जिममध्ये जा आणि आपले लक्ष्य प्राप्त करा.

जिममध्ये व्यायामाचा फास्ट आणि चांगला रिझल्ट मिळण्यासाठी काही वर्कआऊट टीप्स

आपल्यातला प्रत्येकजण शेपमध्ये येण्यासाठी बर्याच काळापासून सकाळी लवकर उठतो, तासन तास धावतो, घाम गाळतो, हे सगळे केले तरीही शरीराच्या ग्रोथविषयी समाधानी नसतो. असे तुमच्या बाबतीतही घडत असेल तर तुम्हाला काही महत्वाचे बदल स्वत:मध्ये करायची गरज आहे. चांगल्या रिझल्ट्साठी चांगले फिजीकल ट्रेनिंग, भरपूर मेहनत आणि सातत्य खूप गरजेचे आहे, हे केले म्हणजे तुम्ही अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. व्यायाम करताना चांगले, परिणामकारक रिझल्ट्स मिळण्यासाठी तुम्हाला काही छोट्या छोट्या टीप्स माहीत असायला हव्यात. ज्यामुळे तुमचा जिम ट्रेनिंगचा अजून चांगला परिणाम होतो.

प्रॉपर वर्कआऊट प्लॅन तयार करा

1. कॉफीने करा दिवसाची सुरुवात

आपल्या सकाळच्या वर्कआऊटआधी कॉफी पिण्यास सुरुवात करा. एक्सरसाईझ करण्याआधी कॉफी प्यायल्यामुळे शरीरामध्ये कॅफेन जाते, जे तुमच्या मज्जासंस्थेला उत्तेजित करायला मदत करते. असे केल्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते जी आपला परफॉर्मन्स वाढवायला मदत करते. वर्कआऊट करण्याच्या तासभर आधी एक कपभर कॉफी प्यायल्यामुळे तुमचा वर्कआऊट दरम्यानचा स्टॅमिना वाढवते.  

2. प्रॉपर वर्कआऊट प्लॅन तयार करा

अनेकदा लोक त्यांच्या वर्कआऊट प्लॅनकडे लक्ष देत नाहीत. जर तुम्हीही त्यांच्यापैकी असाल, तर तुमची ही सवय तुम्हाला बदलावी लागेल. एक चांगला वर्कआऊट प्लॅन चार्ट तुम्हाला कोणता एक्सरसाईझ करायचा आहे तसेच काल कोणता केला होता हे सांगायला मदत करेल. यामध्ये आपण काल कोणत्या व्यायामाचे किती सेट्स केले होते या माहितीचाही समावेश असेल. याच्या मदतीमुळे तुम्ही प्रत्येकवेळी तो एक्सरसाईझ पुन्हा करताना आपली क्षमता वाढवू शकतात. तुम्हाला एक्सरसाईझ सुरु करण्यापूर्वी आज कोणता एक्सरसाईझ करायचा आहे, कोणत्या क्रमाने करायचा आहे, यामध्ये कोणते वजन वापरायचे आहे इत्यादी गोष्टी माहीत असायला हव्यात. असे केल्यामुळे तुमचा बरचसा वेळ वाचतो. तुमचे हार्ट्बीट्स स्लो होणार नाहीत. या सगळ्यामुळे तुमच्या वर्कआऊटच्या एका ट्रेनिंग सेशनचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होईल.

3. फोन एअरप्लेन मोडवर ठेवा

आजच्या काळात फोन जीवनातील एक महत्वाचे गॅझेट बनले आहे. बिझिनेसपासून ते पर्सनल लाईफपर्यंत प्रत्येक ठिकाणी फोन आपल्यासोबत असतो. जो आपल्याला संपूर्ण जगाशी कनेक्ट करायला मदत करतो. पण जिम ही अशी जागा आहे जिथे आपण आराम करत नसतो आणि आपल्याला आपला वर्कआऊट्वर लक्ष केंद्रित करायचे असते. म्हणूनच आपण जेवढा वेळ जिममध्ये असतो तेवढा वेळ आपला फोन एअरप्लेन मोडवर ठेवा. असे केल्याने आपले लक्ष केवळ आपल्या वर्कआऊटवर केंद्रित केले जाऊ शकते. तसेच व्यायाम करताना मध्ये मध्ये फोन चेक करण्याची सवयसुद्धा मोडली जाते. यामुळे वर्कआऊट करताना आपले हार्टबीट्स सुद्धा कमी होणार नाहीत. आणि वर्कआऊटचा प्रभाव वाढेल.

4. स्ट्रेचिंग एक्सरसाइजसोबत आपला वर्कआऊट सुरु करा

अनेक लोकांना वेट लिफ्टींग करण्याआधी वॉर्म अप करणे गरजेचे वाटत नाही. पण तुम्हाला कोणतीही दुखापत होऊ नये असे वाटत असेल तर वर्कआऊट सुरु करण्याआधी स्ट्रेचिंग करावे. वॉर्म अप केल्यामुळे हळू हळू आपल्या शरीरचे तापमान आणि हार्टबीट्स वाढतात, यामुळे आपले मसल्स उघडतात आणि हेवी वर्कआऊट्साठी तयार होतात. व्यायामा आधी केलेल्या वॉर्मअप मुळे आपला स्टॅमिना वाढतो, यामुळे आपण केलेल्या प्रत्येक व्यायामाचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो.

5. मसल्सचा विचार करा  

वर्कआऊट करताना ज्या मसल्सला तुम्ही टार्गेट करता आहात त्यांचा विचार करा, त्या स्पेसिफिक मसल्सवर दबाव जाणवायला हवा तसेच यामध्ये होणार्‍या बदलांची नोंद करा. यामुळे तुम्ही करत असलेल्या प्रत्येक हालचालीशी, व्यायामाशी मनाने जोडले जाल.

ज्याप्रमाणे इतर कोणत्याही कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही त्या कामाशी मनाने जोडले जातात, तसेच एक्सरसाईझ करतानाही तुम्ही मनाने जोडले गेले पाहीजे. यामुळे तुम्ही करत असलेल्या एक्सरसाईझच्या रेप्सची क्षमता वाढेल तसेच तुमचे वजन चांगलेच कमी होईल. तुमच्या वजनाचा आणि व्यायामाचा समतोल साधता येईल. तसेच व्यायाम व्यवस्थित होतो आहे की नाही हेसुद्धा तुम्हाला कळत राहील.

जर तुम्ही एक्सरसाईझ करताना तुमचे संपूर्ण लक्ष मसल्सवर केंद्रित केले तर यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल.

6.असा एक्सरसाईझ निवडावा जो करताना तुम्हाला मजा येईल

व्यायाम केल्यामुळे चांगला रिझल्ट मिळण्यासाठी असा वर्कआऊट प्लॅन निवडा जो केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या प्लॅनमध्ये असेच एक्सरसाईझ अ‍ॅड करा जे करताना तुम्हाला मजा येईल, जे स्वाभाविकपणे तुम्हाला पुन्हा व्यायाम करण्याची प्रेरणा देतील.

जर तुमच्या शरीराला अनुकूल असा तुम्ही एक्सरसाईझ करत नसाल तर तुम्ही करत असलेले कष्ट, शरीरावर घेत असलेली मेहनत हे सगळे निष्फळ ठरते. चांगला वर्कआऊट तुमच्या शरीरासोबतच मूड, स्वभाव तसेच तुमचे व्यक्तिमत्व या सगळ्यावर परिणाम करतात. अशामध्ये जर तुमच्या मूडनुसार व्यायाम केला नाही तर याचा तुमच्या जीवनाच्या इतर गोष्टींवर प्रभाव पडतो. बरेच लोक हेवी वेटलिफ्टींग करणे पसंत करतात. तर अनेकांना योगासने करायला आवडतात. काही लोक कार्डियो एक्सरसाईझ करताना घाम गाळणे पसंत करतात तर काही लोक बॉडी वेट एक्सरसाईझ करणे पसंत करतात. हे सगळे करताना तुम्हाला कोणता व्यायाम केल्याने आनंद मिळतो हे ओळखले पाहीजे.

7. पुरेशी झोप घ्या

जसे संतुलित आहार आपल्या वर्कआऊट्चा परिणाम कैक पटीने वाढू शकतो तसेच चांगली आणि शांत झोप जिमिंग रिझल्टसाठी खूप चांगली आहे. वर्कआऊटच्या दरम्यान शरीर ज्या पद्धतीने थकते, त्याला पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यासाठी चांगली झोप मदत करु शकते.

अनेक लोक वेळेअभावी किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे पुरेशी झोप नाहीत. पुरेशी झोप चांगल्या शरीरासाठी खूप गरजेची असते आणि शरीराला पुन्हा व्यायामासाठी तयार करते.

सारांश

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण आपले आरोग्य निरोगी रहावे, याकरता प्रयत्न करत असतात. अनेक जण व्यायाम, योगा, झुंबा, सायकलिंग, स्विमिंग आणि जिम करता जात असतात. आपल्या बिझी शेड्युलमधील थोडासा वेळ ते आपल्या आरोग्यासाठी देतात. याकरता मिळेल त्या वेळेत ते जिमला जातात. जिमला कोणत्या वेळेत जाणे योग्य असते. किंवा कोणत्या वेळेत जिमला जावे. सकाळी जावे की सायंकाळी जावे. जिमला कधी जाणे योग्य असते. जीम बद्दल बर्याच अफवा पसरवल्या जातात त्यांच्याकडे लक्ष देऊ नये .कोणताही व्यायाम हा आपल्या शरीराला चांगलाच असतो आणि कोणतीही गोष्ट अति केली तर ती घातक असते, जीमला जाऊन फक्त तब्बेत किती दिवसात होते या तब्बेती पेक्षा इतर बरेच फायदे आहेत त्याचा देखील जीमला जाऊन आनंद घ्यावा.


कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know