आरोग्यदायी न्याहारी अर्थात नाश्ता
सकस न्याहारी
न्याहारी हा सर्वात महत्वाचा आहार मानला गेला आहे. याचे कारण असे आहे की यामुळे तुमचे शरीर दिवसभर उत्साही वाटते. न्याहारी वगळू नये आणि केवळ सकस पदार्थच खावेत, असे आरोग्य तज्ज्ञांचे
म्हणणे
आहे.
मात्र,
व्यस्त
जीवनशैलीमुळे
लोक
न्याहारीसाठी
झटपट
पदार्थ
खाण्यास
प्राधान्य
देत
आहेत.
सकाळच्या
नाश्त्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत
दही: दही हे मुख्यतः उन्हाळ्यात
खाल्ले
जाते.
दह्यामध्ये
आढळणारे
प्रोबायोटिक
आरोग्याच्या
दृष्टीने
खूप
फायदेशीर
आहे.
पण
आयुर्वेदानुसार
सकाळी
सर्वात
आधी
दही
खाल्ल्याने
शरीरात
श्लेष्मा
जमा
होऊ
शकतो.
खोल तळलेले अन्न: तळलेले पदार्थही सकाळी लवकर टाळावेत. हे आतडे आरोग्यासाठी हानिकारक आहे. याशिवाय दिवसभर पचनक्रियेत समस्या होऊ शकतात.
कच्चे अन्न: न शिजवलेले अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक समस्या निर्माण होतात. सकाळी प्रथम कच्चे अन्न खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते.
शुगर ड्रिंक्स: शुगर ड्रिंक्सदेखील आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. काहीही न खाता शर्करायुक्त पेय प्यायल्याने आपल्या शरीरातील रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळेच आरोग्य तज्ज्ञही काहीही न खाता किंवा न पिता चहा-कॉफी पिण्यास मनाई करतात.
प्रक्रिया केलेले अन्न: प्रक्रिया केलेले अन्न कधीही निरोगी जीवनशैलीचा भाग असू शकत नाही. हे पदार्थ सर्व प्रकारच्या आजारांना आमंत्रण देतात. सकाळी प्रक्रिया केलेले अन्न खाण्याव्यतिरिक्त, तुम्ही ते तुमच्या रोजच्या जीवनशैलीतून काढून टाकले पाहिजे.
केक आणि मफिन्स: केक आणि मफिन हे रिफाइंड मैदापासून बनवले जातात. सकाळच्या नाश्त्यामध्ये या गोष्टी खाण्याव्यतिरिक्त आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करा.
ब्रेकफास्ट
करताना या चुका टाळा
आपल्या दिवसाची सुरूवात कशी होते यावरूनच
आपला संपूर्ण दिवस कसा जाईल हे स्पष्ट होते. जर सकाळ चांगली झाली अख्खा दिवस चांगला
जाण्याची शक्यता असते. असंच काहीसं आपल्या आरोग्याबाबतही म्हणता येऊ शकतं. विशेषत:
आपल्या ब्रेकफास्ट बद्दल असं म्हटलं जातं की त्याचा आपल्या शरीरावर सर्वात जास्त परिणाम
होतो कारण त्यानेच आपल्या दिवसाची सुरूवात होते. आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी
पुरेशी उर्जेची आवश्यकता असते, ती आपल्या ब्रेकफास्टमधूनच मिळते. त्यामुळे योग्य नाश्ता
करणे महत्वाचे ठरते. पण काही लोकं हे ब्रेकफास्ट किंवा न्याहारीमध्ये काही चुका करतात
ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. निरोगी राहण्यासाठी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा
समावेश करू नये ते जाणून घेऊया.
सकाळची सुरूवात कॅफेनने करू नका: काही लोक सकाळी उठताच चहा किंवा कॉफी पितात. मात्र ही सवय अतिशय अयोग्य आहे. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केले तर शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढू शकते ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. याशिवाय सकाळी कॉफी प्यायल्याने हार्मोनल संतुलन बिघडते आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
सकाळीच फळांचा ज्यूस पिणेही घातक: सकाळी रिकाम्या पोटी फळांचे ज्यूस पिण्याची सवयही घातक ठरू शकते. दिवसभरात तुम्ही ताज्या फळांचा रस पिऊ शकता. पण सकाळी रिकाम्या पोटी फ्रूटज्यूस पिण्याची चूक बिलकूल करू नका. कारण यामुळे शरारातील साखरेच्या पातळीचे संतुलन बिघडू शकते. ज्यूस प्यायचाच असेल तर ब्रेकफास्ट केल्यानंतर त्याचे सेवन करावे.
जंक फूड: काही लोकं सकाळी-सकाळी ब्रेकफास्टमध्ये सँडविच खातात. पण चांगले आरोग्य हवे असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये फास्ट फूड किंवा जंक फूडचे सेवन करू नका. सँडविच, पिझ्झा, बर्गर आणि सॉसेज वगैरे पदार्थ खाऊन शरीरातील फॅट्स वाढू शकतात. त्यामुळे सकाळी अशा पदार्थांचे सेवन न करणेच उत्तम ठरते.
व्हाईट ब्रेड: जगभरातील बहुतांश लोक हे सकाळी नाश्त्यामध्ये व्हाईट ब्रेडचे सेवन करत असतात. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते असे करणे अतिशय घातक ठरू शकते. खरंतर पांढरा ब्रेड हा मैद्यापासून बनतो, आणि त्याच्या जास्त सेवनामुळे तुमचे पाचनतंत्र बिघडू शकते.तसेच त्यामध्ये पोषक गुणधर्मही अतिशय कमी असतात. म्हणून तो जास्त खाऊ नये.
आरोग्यदायी नाश्ता कसा असावा
अनेक जणी सकाळी चहाबरोबर खारी अथवा बिस्किटे खातात; पण हा काही नाश्ता नव्हे. तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, साखरेचे पदार्थ, जंक फूड असे अन्न न्याहारीसाठी
खाणे
म्हणजे
अनारोग्याचे
ठरते.
रोजचा
नाश्ता
टाळल्यास
स्थूलता
निर्माण
होण्याची
शक्यता
निर्माण
होते.
मग, आरोग्यदायी
नाश्ता
कसा
असावा?
पोहे,
उपमा,
मिश्रपिठांचे
घावण,
पराठा,
राजगिरा
लाडू,
आंबोळी,
ऑम्लेट
पोळी,
उकडलेले
अंडे,
दूध
अशा
पदार्थांचा
समावेश
असल्यास
तो
पौष्टिक
नाश्ता
ठरतो.
तसेच
नाश्त्यासाठी
पदार्थ
ठरविताना
ऋतू.
काळाचासुद्धा
विचार
करावा.
नाश्त्याबरोबर
चहा,
कॉफी
किंवा
सॉफ्टड्रिंक्स
घेऊ
नये.
सकाळी न्याहारी घेतली नाही तर आपले शरीर स्वतःच ग्लुकोज तयार करण्यास सुरुवात करते आणि नंतर दिवसभरात मिळणारे अन्न हे चरबीच्या रूपात शरीर साठवण्याचा
प्रयत्न
करू
लागते.
म्हणून
सकाळी
लवकरात
लवकर
नाश्ता
करावा.
मधुमेह
असणाऱ्या
महिलांनी
तर
नाश्त्याला
उशीर
करूच
नये.
त्यांच्या
नाश्त्यामध्ये
उसळी,
भाकरी,
मेथीचा
थेपला,
दही
अशा
स्वरूपाचे
अन्नपदार्थ
असावेत.
ज्या
स्त्रियांची
दुपारच्या
जेवणाची
वेळ
निश्चित
माहीत
नसेल,
अशांनी
सकाळी
घरून
निघताना
पोळी,
भाजी,
वरण,
भात
अशाप्रकारचे
जेवण
करूनच
बाहेर
पडावे.
थोडक्यात,
नाश्ता
हा
पारंपरिकतेला
धरून
घरगुती
पौष्टिक
आणि
पोट भरणारा
असावा.
तुम्ही
सकाळी
कितीही
लवकर
उठा
आणि
कामाला
सुरुवात
करा.
सकाळचा
नाश्ता
अर्थातच
न्याहरी
जर
दमदार
आणि
आरोग्यदायी
असेल
तर
दिवसभर
उर्जा
मिळते.
त्यामुळे
ब्रेकफास्ट
करताना
अशाच
गोष्टींना
प्राधान्य
द्या,
ज्या
तुम्हाला
दिवसभर
उत्साही
ठेवतील.
अनेकदा
लोक
न्याहरीसाठी
बेकरी
प्रॉडक्ट
निवडतात.
ते
वाईट
नसले
तरी
आरोग्यदायी
असतातच
असे
नाही.
त्यामुळे
दिवसभर
तुम्हाला
साचलेपण,
कंटाळा
जाणवू
शकतो.
यासाठीच
आम्ही
येथे
काही
भारतीय
पदार्थ
सूचवत
आहोत.
जे
आपल्याला
सकाळच्या
न्याहरीसाठी
प्राधान्याने
घेता
येऊ
शकतात.
भारतीय
न्याहरीचे आरोग्यदायी पदार्थ
पोहे:पोहे हा सर्वत्र सहज उपलब्ध होणारा, पचायला हलका आणि कमी वेळात अधिक उर्जा देणारा आणि पोट भरणारा पदार्थ आहे. हा पदार्थ बनवायलाही सोपा आहे. तो बनविण्यासाठी लागणारे घटकही सहज उपलब्ध होतात. जसे की, पोहे, हळद, कांदा, तेल मोहरी. त्यामुळे झटपत बनणारा आणि आरोग्यदायी असलेला पदार्थ म्हणून आपण याकडे पाहू शकता.
उपमा: पोह्याप्रमाणेच सहज उपलब्ध होणारा आणि कमी वेळात बणणारा पदार्थ म्हणजे उपमा. उपमा हादेखील एक गुणवत्तापूर्ण पदार्थ आहे. जो कडधान्याची डाळ, रवा आणि आवश्यकतेनुसार इतर भाज्या वापरुन तयार केला जातो. खास करुन हा पदार्थ सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा कोणत्याही वेळी खाता येतो.
इडली: तुम्हाला दिवसाची सुरुवात जर हलकी आणि पौष्टीक करायची असेल तर आपण ईडली पदार्थाला नक्कीच प्राधान्य देऊ शकता. खास करुन हा पदार्थ उडीद डाळीचे पीठ, रवा यापासून बनवला जातो. सोबत नारळाची चटणी आणि सांबर यासोबत खाल्ला जातो. कमी वेळात हा पदार्थ तयार होतो. मात्र, त्यासाठी याला आदल्या दिवसापासून तयारी करावी लागते. अर्थात आपण जर हा पदार्थ बाहेरुन मागवणार असाल तर तुमच्या दिवसाची सुरुवात अतिशय उत्तम होऊ शकते.
ओट्स: ओट्स हा एक चांगला नाष्टा आहे. जो तुम्हाला भरपूर प्रथिने (प्रोटीन्स), कार्ब आणि उर्जा देऊ शकतो. आजकाल बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे ओट्स मिळतात. जे आपण मसाले आणि पिनट बटर सोबत खाऊ शकता.
अंडी: सकाळी सकाळी अंडी हा सुद्धा नाष्ट्याचा एक चांगला प्रकार आहे. ज्यामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. जो आपण पोळी बनवून किंवा थेट गरम पाण्यात उकडूनही खाऊ शकता. कमी कार्ब, गुणवत्तापूर्ण प्रोटीन्स आणि इतर आरोग्यदायी घटकांसाठी अंडी हा पर्याय अधिक सक्षम आहे.
सारांश
नाश्ता म्हणजे दिवसभराच्या तिन्ही जेवणांमधील सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक जेवण आहे, हे लक्षात घ्यावे. आपल्याकडील अनेक महिलांना भात, फोडणीची पोळी असे रात्रीचे उरलेले अन्न न्याहारीसाठी खाण्याची सवय असते. रात्रभर आपण काही खात नाही म्हणजे एकप्रकारे ब्रेक घेतो. ब्रेक घेऊन केलेला उपवास म्हणून तो ब्रेकफास्ट. अशा उपवासानंतर शरीराला पौष्टिक आणि ताज्या अन्नाची गरज असते. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला ऊर्जा, प्रथिने, मेद, खजिने, जीवनसत्त्वे अशा सर्वच पोषक तत्त्वांची गरज असते. त्यामुळे सकाळचा नाश्ता पारंपरिकतेला धरून घरी बनवलेला आणि पौष्टिक तसेच पोट भरणारा असावा.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know