Translate in Hindi / Marathi / English

Friday, 3 May 2024

जरा हसुया

 जरा हसुया

एक छोटसं गाव एका वायरमनने एका अडाणी मुलीवर प्रेम केलं...

त्याने तिला एक लव्ह लेटर दिलं आणि त्या येडीनं तिच्या बापाला दिलं आणि म्हणाली.... आबा लाइट बिल आलं.

~ अपने हाथ में मोबाइल हो तो खाना खाने में 1 घंटा लगता है |

वही अगर अपना मोबाइल किसी दूसरे के हाथ में हो तो सिर्फ 5 मिनट लगते हैं.

~ दोन झुरळं आयसीयूमध्ये शेजारी शेजारी अॅडमिट झाली.

पहिलं झुरळ: काय? कशामुळं? हीट की चप्पल?

दुसरं झुरळ: नाही रे! या बायका आपल्याला बघितल्यावर इतक्या किंचाळतात, की मलाच हॉर्ट अॅटॅक आला!

~ एक खरमरीत पुणेरी पाटी

'आपण कदाचित आम्हाला ओळखत असाल; पण आमचा कुत्रा आपणास ओळखेलच याची खात्री देता येत नाही, म्हणून सावधान!'

~ दारावरची पाटी

'बेलसाठी लागणाऱ्या विजेचे पैसे आम्ही भरतो. बेल एकदाच वाजवा. '

~ बाबा: तीन ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा.

रिंकू: तुमच्यावेळी तीन ऋतू होते. बाबा, आमच्या काळात अवकाळी हा एक ऋतू आहे.

~ नवरा: अगं, मी इथं पाच हजारांचं बंडल ठेवलं होतं. लाल रबर लावलं होतं.

बायको: हे घ्या लाल रबर, जीव चाललाय नुसता त्याच्यासाठी....

~ बाई: हे बघ सखू, नीट काम करत जा तू. त्या मिसेस जोशींचं काम का बरं सोडलं?

सखू: हे बघा आधीच्या बाईनं तुमचं का सोडलं, हे विचारलं का मी तुम्हाला?

~ मला लहानपणापासूनच लोकांना मदत करायला खूप आवडतं. आत्ताच एका लहान मुलाला वेफर्सचं पाकीट संपवायला मदत केली. अजूनही त्याचे आनंदश्रू थांबत नाहीयेत.....

~ मास्तर: सांग, शून्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे का?

मुलगा: आहे ना...

मास्तर: कोणती सांग?

मुलगा: टिंब?

~ मुलगा: तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील? की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील?

मुलगी: तुटलेल्या चपलेने मार खाशील की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील?

~ कोणीतरी खरंच म्हणून गेलंय की, आयुष्य फक्त दिवसाचं आहे. शनिवार आणि रविवार, आणि हा गोष्ट आपल्याला सोमवारी पटते.

~ आई: पिंटू, लवकर अंघोळ करून घे, नाहीतर परीक्षा बुडेल!

पिंटू: आई, बादलीभर पाण्यात परीक्षा कशी काय बुडेल ? आईने बादलीतच बुडवून बुडवून हाणला.

~ गुरुजी: गण्या, मी तुला कानफटीत मारली याचा भविष्यकाळ सांग बघू?

गण्या: जेवणाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होणार!

~ पुण्यातल्या एका फ्री वाय-फाय नेटवर्कचा पासवर्ड. "घे भिकारड्या".

~ गर्लफ्रेंड: प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन. बॉयफ्रेंड का? गर्लफ्रेंड: बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन आणि नापास झालीस, तर लग्न लावून देईन.

~ हवा की लहर बनकर तू मेरी खिडकी खटखटा! में बंद कमरे में, तुफान समेटे बैठा हूं.....

भावार्थ इथे कवी मैत्रीणीला सांगतोय आत्ता मिस कॉल देऊ नकोस माझी मुलं बाजूला बसली आहेत.

~ कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकिलाला विचारले महाभारत आणि रामायणमध्ये काय फरक आहे ?

वकिलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..... महाभारत मध्ये जमिनी बद्दल वाद होता (सिव्हील केस) तर रामायण मध्ये अपहरणची (क्रिमिनल) केस होती.

हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला, तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते.... हरणाचं वस्त्र बनवण्यावरून झाले ते रामायण आणि वस्त्राचं हरण करण्यावरून झाले ते महाभारत.

~ मुलगा: प्रिये, सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो ती एक देवाची सुंदर कलाकृती असते तो अंधारावर मिळवलेला विजय असतो जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते..... मुलीचा रिप्लाय: अरे, माझाच मेसेज मला कट कॉपी पेस्ट करून पाठवला आहेस.

~ सर: या कंपनीत काम करण्यासाठी पेशन्सची गरज आहे. तुमच्या मते संयम म्हणजे काय? मुलाखतकार: सर, संयम म्हणजे वाय-फाय बंद पडून पुन्हा सुरू होईपर्यंत कपडे फाडावेसे वाटणे, आदळआपट करणे म्हणजे संयम.

~ सासू जावयाला रोज फोन करून विचारते, माझे फूल काय करतेय ? एक दिवस जावयाने कंटाळून सांगितले, आता सत्तर किलोचा फ्लॉवर झाला आहे, किती दिवस माझे फूलमाझे फूल करणार?

~ विवाहित पुरुषांची जाडी वाढण्याचे कारण हेच असते की, आधी बाहेर मित्रांसोबत पार्टी झोडायची आणि घरी परतल्यानंतर बायकोच्या भीतीने पुन्हा जेवायचे.

~ स्वतःच्या घरी भोपळा, दोडका, कारलं खाणारेही एखाद्या लग्नात जाऊन अनेक जण जेवणाला अशी नावे ठेवतात की, त्यांच्या घरी जणू संजीव कपूरच स्वयंपाक करतो.

~ आई: मला हे लाडू बनवताना किती कष्ट पडले, याची तुला जाणीव आहे का?

मुलगा: आई, मला हे लाडू खाताना किती कष्ट पडले, याची तू कल्पनासुद्धा करू शकत नाही.

~ मुलगी: मला ना श्रीमंत मुलाशी लग्न करायचं आहे.... अरे कुठं चाललास?

मुलगा: मोबाइलचं चार्जिंग संपलय, नवीन मोबाइल आणायला चाललोय.

~ पाकिस्तानच्या शेजारी आपला महाराष्ट्र पाहिजे होता.... बांध सरकवू सरकवू अख्खा पाकिस्तान ताब्यात घेतला असता.

~ तुम्हाला म्हणून मी माझा एक बोलका अनुभव सांगतो मंडळी….. आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त हूं हूं करत असते. त्याला काहीच ऐकू येत नसते.

~ तू गेल्यानंतर वेळ तर एकदम थांबूनच गेली होती.... नंतर बघितलं तेव्हा समजलं, घड्याळातला सेल संपला होता.

~ अॅरेंज मॅरेजचेही काही फायदे आहेतच की...कधी-कधी अशा मुलीशी लग्न होतं जिला सात जन्म मिळूनदेखील पटवणं शक्य नसतं.

~ चाळीचा पेपरवाला रोजच्या पेपरची हेडलाईन ओरडून सांगत घरोघरी रोज पेपर टाकायचा. आज सकाळी अचानक मगनने त्याच्या कानफटात मारली. घडलेलं एवढंच की......मगनचा कशातच जम बसतं नव्हता. बायकोच्या शिवणकामावर कसंतरी घरं चाललंय. काहीतरी कारणावरून भांडून ती कालच माहेरी अहमदाबादला गेलेली. आणि पेपरवाला आज सकाळी सकाळी चाळभर बोंबलत फिरत होता... अजून एक प्रकल्प गुजरातला गेला हो…….

~ नवरा: मी काय काय सांभाळू ऑफिस सांभाळू, का तुम्हाला सांभाळू का आईवडिलांना सांभाळू का घर सांभाळू?

बायको: (आरामात) तू फक्त स्वत:ची जीभ सांभाळ, सर्व ठीक होईल

~ तब्बल पाच वर्षांतून एकदाच येणारा योग! बायकोबरोबर असतांना देखील आपले मत नोंदविता येते! मिळालेल्या संधीचे सोने करा

~ ती: तू रोज लेट का झोपतोस?

तो: मी वाट बघत असतो.

ती: कोणाची?

तो: बॅटरी लो होण्याची.

~ राजू: पप्पा, बुलेट घेऊन द्या ना.

वडील: ते बघ, ती शेजारची ललिता बसने जाते.

राजू: तेच तर बघवत नाही ना.

~ जन्म आणि मृत्यू देवाच्या हातात आहे. माणसाच्या हातात तर फक्त मोबाइल आहे.

~ सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की, कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेवू नका. आत्ताच आमचा मित्र उन्हातान्हाचा उगाचच किलोमीटर जाऊन आला!

~ कथा चालू होती...

कथाकार म्हणाला, मी तीन प्रकारच्या लोकांना सर्वात दुर्दैवी मानतो. नवीन कपडे असताना जुने कपडे घालणारा पहिला.

दुसरे, ज्याच्या घरात गव्हाचे डबे भरलेले असतात तो उपाशी राहतो.

असे बोलून कथाकार शांत झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. भक्तांनी विचारले, आता तिसऱ्या दुर्दैवी व्यक्तीबद्दल सांगा, प्रभु……

मग कथाकार भरल्या गळ्याने म्हणाला, तिसरा माणूस तो आहे जो पैसा असूनही बायकोच्या भीतीने पिऊ शकत नाही! हे ऐकून सर्वच भक्त रडू लागले!

~ पहिला मित्र: काय रे, काय चाललंय गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी... आयुष्यात?

दुसरा मित्र: आयुष्य हो स्टेटस टाकण्यात, दुसऱ्याचे स्टेटस वाचण्यात आणि आपलं टाकलेलं स्टेटस किती जणांनी पाहिलं हे चेक करण्यातच चाललं आहे.

~ आईचा हात की-बोर्डवरच्या F5 बटणासारखा असतो जेव्हा पण कानाखाली पडते एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं.

~ शाळेत आपण ज्या मुलीवर लाइन मारायचो, तिला सरांनी काही प्रश्न विचारला, तर अख्खा वर्ग आपल्याकडे पाहायचा.

~ आई, आज्जी, गर्लफ्रेंड आणि बायकोनंतर गालावरून मायेनं हात फिरवणारा एकच व्यक्ती.... सलूनवाला.

~ जगात सगळ्यात जास्त निष्ठावंत कोण असेल, तर लठ्ठपणा. एकदा आला की जाता जात नाही.

~ विद्यार्थी: सर, प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेत काहीही लिहिलं नसलं तरी चालेल; पण माझी अशी विनंती आहे की ज्याप्रमाणे माझ्या बाबांचा "एक्सिट पोल" मध्ये विजयच होतो, तसा माझा प्रगती पुस्तकावर विजयच करा. सरांनी बेदम मारला.

~ आजोबा नातवाला

आजोबा: बाळा, नेहमी खरे बोलावे कधीही खोटे बोलू नये.

नातू: आजोबा तुमच्या मुलाला म्हणजे बाबांना हे तुम्ही नाही का सांगितलं?

आजोबा: का रे काय झालं?

नातू: ते दरवेळी मला इकडे ये नाही मारतस असं म्हणतात आणि बेदम ठोकून काढतात, एक नंबरचे खोटारडे आहेत.

~ वाह! क्या शेर मारेलाय....

मेरे दोस्त तुम भी लिखा करो शायरी, तुम्हारा भी मेरी तरह नाम हो जायेगा, जब तुम पर भी पड़ेंगे अंडे और टमाटर, तो शाम की सब्जी का इंतजाम हो जायेगा.

~ रस्त्यावरची चटकदार पाणीपुरी खाऊन झाल्यावर पाणीपुरीवाला शेवटी एक नाही, तर दोन मसालापुरी देतो त्याला म्हणतात आनंद. शहाण्यांनो, जरा विचार करा!

~ सध्या आंबेदेखील स्वत:हूनच खाली पडत आहेत. कारण त्यांना माहिती झालंय, की लगोरी, दगड मारणारे झाडावर चढून आंबे काढणारं बालपण आज मोबाइलमध्ये गुरफटलं आहे.

~ जीवनमंत्र

आज १०-१२ सेल्फी घेतल्यावर जाणवलं, की मनाच्या सुंदरतेपुढे सर्वकाही व्यर्थ आहे. म्हणून सगळ्या सेल्फी डिलीट केल्या. फक्त मनाचं सौंदर्य सोशल मीडियावर कसं टाकायचं, हा प्रश्न पडला.

~ शिक्षक: अरे मोरू, लाज नाही का वाटत, अरे १०० पैकी १० गुण मिळाले आहेत तुला, नापास झाला आहेस तू!

मोरू: अहो सर, मी तर पेपरमध्ये पिक्चरचं गाणं लिहिलं होतं; मग हे १० मार्क आले कुठून?

~ आई मुलाचा अभ्यास घेत असते.

आई: काळ ओळखा असा प्रश्न आहे, मी उपाशी आहे. कोणता काळ आहे सांग बंडू?

बंडू: दुष्काळ.

~ दुपारच्या झोपेतून उठल्यानंतर १०-१५ मिनिटं तर हेच समजायला जातात की, नक्की सकाळ झाली आहे की, संध्याकाळ ?

~ जीवनात कायम हसत-खेळत राहा.... कोणाला कळलंच नाही पाहिजे की, तुमचं पण लग्न झालंय.

~ वर्षानुवर्ष डीपी बदलणारे जेव्हा दररोज डीपी बदलतात, तेव्हा समजून जायचं...भाऊला, कोणी तरी नवीन 'जेवलीस का' भेटली आहे.

~ जगातील एक असत्य: नातेवाईक घरी आल्यावर म्हटलं जातं....

'तुम्ही घरी आल्यानं बरं वाटलं. '

~ मुंबई लोकल ट्रेन

नागरिक: साहेब, माझे पाकीट आणि मोबाइल चोरीला गेला.

पोलीस: तुझं लक्ष कुठं होतं?

नागरिक: मी गाडीचे पायदान आणि फलाटामधील अंतरावर लक्ष देत होतो.

~ मित्रांनो, जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं दिसायचं असेल, तर हिवाळ्यात रेनकोट घालून फिरा.

चहाच्या कपांमधून सगळे कप फुटल्यावर एक कप मात्र तसाच राहतो. त्या कप बनवणाऱ्या कंपनीला सांगा जरा की, सगळ्या कपांमध्ये एकच मटेरियल वापरत जा म्हणावं.

~ गण्या: अगं ये म्हातारे, तिकडं तुझा नवरा वारला अन् तू इथं भाकरीचा तुकडा मोडतीयेस? लोकं काय म्हणतील?

म्हातारी: अरं दोन घास गिळू दे की, बघ मग रडून कसला राडा करते ते!

~ विमानतळावर ती व्यक्ती खूप वेळची मला रोखून पाहात होती. कारण फक्त इतकच होतं, की मी जेव्हा सामोसा घ्यायला गेले तर दोन सामोशांची किंमत २४० रुपये होती. त्यावर मी त्याला म्हटलं, पोटात गेल्यावर हे सामोसेदेखील उडतात की काय?

~ आजच्या पिढीचे एकच म्हणणं आहे 'नको सूर्य तारे... फुलांचे पसारे... जिथे मी बसावे तिथे नेटवर्क असावे. '

~ बायकांचे प्रकार

भविष्यवाचक बायको: येत्या सात जन्मात माझ्यासारखी बायको मिळणार नाही.

इतिहासवाचक बायको मला माहीत आहे, तुमचे खानदान कसे आहे ते!

धार्मिक बायको: माझ्यासारखी बायको मिळाली, म्हणून देवाचे आभार

माना.

गोंधळी बायको: तू माणूस आहेस की पायजमा यापैकी तुमची बायको कशी आहे ते तुम्हीच पाहा.

~ तुम्ही समोरच्याला कधीही कमी लेखू नका. ते तुमच्यापेक्षा जास्त येडं असू शकतं.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.


No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know