Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 8 May 2024

लसूणाची आयुर्वेदिक माहिती | आयुर्वेदामध्ये सुद्धा लसणाचे महत्व सांगितले आहे | लसणात अनेक औषधी गुणधर्म | लसणाचा आहारात समावेश केल्याने असंख्य आजार दूर राहू शकता | कच्च्या लसूणमध्ये अॅलिसिन हे मुख्य पोषकतत्त्व असते | लसूण खाण्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते तर चांगले कोलेस्टेरॉल वाढते

लसूणाची आयुर्वेदिक माहिती

 

लसणात अनेक औषधी गुणधर्म

लसणात व्हिटामीन बी 1, बी 6, कॅल्शियम आणि सेलेनियम तसंच मॅगनीज हे पोषक घटक असतात. शाकाहरी असो की मांसाहारी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या बहुतांश पदार्थांमध्ये लसून आवर्जून वापरला जातो. आयुर्वेदामध्ये सुद्धा लसणाचे महत्व सांगितले आहे. लसणात अनेक औषधी गुणधर्म असल्याने अनेक आजारांवर तो गुणकारी आहे. लसणाचा आहारात समावेश केल्याने असंख्य आजार दूर राहू शकता.

लसूणमधील पोषकघटक

लसूणमध्ये मँगनीज, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, सेलेनियम, फायबर्सचे प्रमाण भरपूर असते याशिवाय त्यात सल्फर, कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह यासारखे अनेक पोषकतत्त्वही असतात. कच्च्या लसूणमध्ये अॅलिसिन हे मुख्य पोषकतत्त्व असते. अॅलिसिन घटकमुळेच लसूण औषधी गुणांचे बनते. लसूण पाकळ्या बारीक तुकडे करून थोडावेळ तशाच बाहेर ठेवल्यास त्यात अॅलिसिन हा घटक जमा होत असतो. लसूण खाण्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते तर चांगले कोलेस्टेरॉल वाढते. यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच लसूण खाल्याने टाईप2 प्रकारचा मधुमेह होण्याचा धोकासुध्दा कमी होतो. यामुळे विविध कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत होते. तसेच कच्चा लसूण खाण्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

कच्चा लसूण खाण्याचे फायदे

1) लसूण खाल्याने कोलेस्टेरॉल कमी होते: आपल्या शरीरात चांगले आणि वाईट असे दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असते. वाईट कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅक, पक्षाघात यासारखे अनेक गंभीर आजार होतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी शरीरात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असणे आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणे गरजेचे असते. लसूण खाण्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते तर चांगले कोलेस्टेरॉल वाढते. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते यासाठी दररोज दोन ते तीन लसूण पाकळ्या जरूर खाव्यात.

2) लसूण खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो: हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. हाय ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यानी आहारात लसूणचा वापर करावा त्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. दररोज दोन ते तीन कच्च्या लसूण पाकळ्या खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच धमनीकाठीन्यता (एथेरोस्क्लेरोसिस) होण्याचा धोकाही कमी होतो.

3) लसूण हृदय विकारांना दूर ठेवते: लसूण खाण्यामुळे रक्तदाब रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो याशिवाय हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. अँटी- क्लॉटिंग गुणांमुळे रक्त पातळ होऊन रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. पर्यायाने हृदयाच्या आरोग्यासाठी लसूण खाणे फायदेशीर आहे.

4) कच्चा लसूण खाण्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो: इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी झाल्याने टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. दररोज दोन ते तीन कच्च्या लसूण पाकळ्या खाल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास मदत होऊन टाईप 2 मधुमेह होण्यापासून दूर राहता येते.

5) कच्चा लसूण खाल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो: 2013 मधील संशोधनानुसार जे लोक आठवड्यातून किमान 2 वेळा कच्ची लसूण खातात त्यांना कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय फुफुसाचा कँसर, आतड्यांचा कँसर, प्रोस्टेट कँसर आणि स्वादुपिंडाचा कॅन्सरपासून लसूण खाल्याने रक्षण होते.

6) लसणामधील अँटिऑक्सिडंटमुळे अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश पासून रक्षण होते: लसणामध्ये अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण होते. यामुळे अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होऊ शकतो.

7) लसूणमुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते: रोज लसूण आहारात असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे हवामान बदलामुळे होणाऱ्या सर्दी आणि खोकला अशा आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. सर्दी आणि खोकल्यावर लसूण घालून केलेला चहा अत्यंत गुणकारी आहे.

8) लसूण हिमोग्लोबिन वाढवते: शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेचलसणात डायली-सल्फाईड असते त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते.

लसूण कसे खावे?

लसूण खाण्याचा आपल्या शरीराला उपयुक्त फायदा होण्यासाठी लसूण पाकळ्या सोलून बारीक तुकडे करून 5 ते 10 मिनिटे तशीच ठेवावीत त्यानंतर ते बारीक तुकडे खावेत. असे केल्यामुळे त्या बारीक केलेल्या लसूण तुकड्यांमध्ये ॲलिसिन हे प्रभावी घटक तयार होते. ॲलिसिन हे अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी गुणांचे असून त्यामुळे हृदयाचे विकार, हाय ब्लडप्रेशर, हाय कोलेस्टेरॉल कँसर होण्यापासून आपले रक्षण होते.

दररोज किती लसूण पाकळ्या खाव्यात?

याचे निश्चित असे प्रमाण सांगता येणार नाही. दिवसभरात 1 ते 2 कच्च्या लसूण पाकळ्या खाल्यानेही लसणाचे आरोग्यदायी फायदे होतात. त्यामुळे दररोज दोन ते तीनच कच्ची लसूण पाकळी खाऊ शकता. अधिक प्रमाणात कच्चा लसूण खाणे टाळावे. मात्र आहारात असलेली लसूण खाऊ शकता.

कच्चा लसूण खाण्याचे तोटे

लसूण खाणे सुरक्षित असून पुरेशी काळजी घेतल्यास त्यापासून शरीराला योग्य ते उपयोग होण्यास मदतच होते. लसूण खाण्यामुळे तोंडातून वाईट वास येऊ शकतो, कच्चा लसूण चावून खाताना तोंडात पोटात जळजळ होऊ शकते किंवा लसूण खाण्यामुळे जुलाबही होऊ शकतात.

लसूण कोणी खाऊ नये?

ज्यांना पोटाचे विकार, गर्ड (GERD), अतिसार, ऍलर्जी, लो-ब्लडप्रेशर यासारखा त्रास आहे त्यांनी लसूण खाऊ नये. तसेच लसूण खाण्यामुळे रक्त पातळ होत असते त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया झाल्यावर सुरवातीचे काही दिवस लसूण खाणे टाळावे.

गरोदरपणात लसूण खावीत का?

गरोदरपणात आहारातून लसूण खाऊ शकता त्यामुळे गरोदरपणात होणारा मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या समस्या नियंत्रित राहतील. मात्र प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर काही आठवडे लसूण खाणे टाळावे. कारण रक्त पातळ होऊन प्रसूतीमध्ये अतिरक्तस्त्राव (ब्लिडींग) होण्याचा धोका वाढतो. गरोदरपणात कोणता आहार घ्यावा, काय खावे, काय खाऊ नये हे जाणून घ्या.

मधुमेह रुग्ण लसूण खाऊ शकतात का?

लसूण खाण्यामुळे रक्तातील साखर एकाएकी कमी होऊ शकते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी लसूण खाताना पुरेशी काळजी घ्यावी. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार नियोजन करावे. शक्यतो मधुमेह रुग्णांनी कच्चा लसूण खाऊ नये. मात्र आहारातुन काही प्रमाणात लसूण खाऊ शकता.

लसूण किती प्रमाणात व कीती दिवस खावे?

रोज सकाळी उठल्यानंतर एक लसणाची पाकळी चावून चावून खावी आणि त्यावर दोन ग्लास कोमट पाणी पिणे. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी त्या लसणीमध्ये मधाचा वापर केला तर चांगले. त्यानंतर आहार दिवसभराचा व्यवस्थित ठेवून भरपूर पाणी पिणे. पण लसणाची रोज एक सकाळी रिकाम्या पोटी पाकळी खाऊन त्यावर दोन ग्लास गरम पाणी पिण्याने हृदयासंबंधीचे, रक्तवाहिन्यासंबंधीचे, सर्दी-पडसे यासंबंधीचे तसेच वाताचे त्रासही कमी होतात. कोलेस्ट्रॉलचा ज्यांना त्रास असेल ते कोलेस्ट्रॉलदेखील सहा महिन्यात कमी होते पण सहा महिने म्हणजे सहा गुणिले 30 याप्रमाणे 180 दिवस सतत न चुकता लसूण खाणे महत्त्वाचे आहे. त्याच सोबत योग्य आहार आणि व्यायाम असणे हे देखील गरजेचे आहे तर असे अनेक प्रकारचे फायदे लसणीचे आपण करून घेऊ शकतो.. लसूण खाण्यास सुरुवात केल्यानंतर आधी तीन महिन्यानंतर पुन्हा टेस्ट करून कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब तसेच हिमोग्लोबिन चेक करावे. फरक वाटल्यास पुढचे तीन महिने कंटिन्यू करावे.

लसणाचे लोणचे

जेवणाची चव वाढवायची असेल तर पानात जरासं लोणचं वाढलं तरी देखील बोअरींग जेवणाला चांगलीच चव येते. लोणच्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. आंब्याचे, कैरीचे, हळदीचे, लिंबूचे, गोड लोणचे, तिखट लोणचे असे वेगवेगळे प्रकार खूप जणांकडे केले जातात. तुम्ही कधी लसणीचे लोणचे खाल्ले आहे का? आरोग्यासाठी लसणीचे लोणचे फारच फायद्याचे असते. जर तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला तर तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. लसूण खाण्याचे फायदे आहेतच पण लसणीच्या लोणच्याचे फायदे जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला लसणीचे लोणचं आहारात समाविष्ट करता येईल.

घटक:

1 कप लसूण

1 टेबलस्पून बडीशेप

2 टेबलस्पून मेथीदाणे

3 टेबलस्पून मोहरी

1/2 कप तेल

1/2 टी स्पून हिंग

1 टेबलस्पून कलोंजी

2 टेबलस्पून लाल तिखट

1 टीस्पून हळद

2 टेबलस्पून लिंबाचा रस

2 टेबलस्पून विनेगर ऑप्शनल

कुकिंग सूचना:

प्रथम लसूण सोलून घ्यावा आणि मोठ्या पाकळ्यांचे दोन उभे तुकडे करून घ्यावे.

एका कढईत प्रथम बडीशेप मेथी काळी मोहरी मंद गॅस वर सावकाश भाजून घ्यावे.बदलेपर्यंत आणि मोहरी किंचित तडतडू लागेल इतपर्यंत भाजावे. नंतर गॅस बंद करावा आणि हे मिश्रण दोन ते तीन मिनिटे परतत राहावे दुसऱ्या वाडग्यात काढून घेणे.. आणि थंड झाल्यावर मिक्सर मधून जरासे जाडसर वाटून करून घेणे. बारीक वाटू नये.

आता एका कढईत तेल घालून तापवा.. आणि त्यामध्ये हिंग घाला कलौंजी घाला आणि यामध्ये लसूण घालून थोडे परतून घ्या हे सगळे मंद आचेवरच करावे नाहीतर जळून जाईल आणि या लसणाचा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावे

नंतर यामध्ये बारीक वाटलेला मसाला तिखट हळद आणि मीठ घालून लोणचे व्यवस्थित परतावे नंतर गॅस बंद करावा आणि यामध्ये लिंबाचा रस घालून व्यवस्थित ढवळावे. आणि विनेगर घालून लोणचे नीट मिक्स करावे..एक लक्षात ठेवा की लोणच्यावर एक बोट तेल तरी कायम राहिले पाहिजे म्हणजे लोणचे 1-2महिने टिकेल.

लसणाच्या पातीची ठेचा रेसिपी

लसणाच्या पातीचा ठेवचा म्हणजे उघड लसणाची पात त्यापासून बनवला. लसूण हा आरोग्य प्राणहितावह आहे तसेच माणूस तेजस्वी, दीर्घवान व दीर्घायुषी बनतो. लसुणामध्ये जीवनसत्व “बी , “सी व “ए आहे.

घटक: २०५ लसणाची पाने किंवा कप लसूण पात चिरून)

पाक मिरच्या

/ कप कोथंबीर (चिरून)

मीठ चवीने

छोटे लिंबूरस

/ टी स्पून साखर

कृती: लसूण पात निवडून स्वच धुवून चिरून घ्या. मग लसूण पात, हिरव्या मिरच्या, कोथंबीर, मीठ साखर घालून मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटुन घ्या. मग लिंबूरस घालून परत एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्या. लसणाच्या पातीचा ठेचा गरम गरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.

सारांश

लसूण प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही मध व लसूण या दोघांचे एकत्र सेवन केले तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. होय, लसूण आणि मध यांचे संयोजन आपले आरोग्य सुधारण्याचे काम करते. कारण यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. हे आपल्याला हृदयाशी संबंधित गंभीर आजारांपासून देखील वाचवू शकते. दररोज रिकाम्या पोटी लसूण आणि मध खाण्याचे कोणते फायदे आहेत लसूण आपल्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण जेवणाची चवचं फक्त वाढवत नाही तर लसूण खाण्याचे अनेक औषधी उपयोग आहेत. लसूण आरोग्यासाठी हितकारक असते. आयुर्वेदातही लसणाचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये लसूणचा वापर केला जातो. आरोग्यासाठी लसणाचे फायदे अनेक असतात.


कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know