डिंक घरगुती औषध
डिंकाचे औषधी गुणधर्म
डिंका मधे खुप पोस्टिक व औषधी गुणधर्म असतात. डिंक म्हणजे झाडाचा चिक किंवा पाणी असते. ते खोड़ातून बाहेर आले म्हणजे वाळून डिंक तयार होतो. एवढे मोठे झाड एकसंघ, मज़बूतीने बांधून ठेवन्याचे
काम
गोंद,
डिंक
करीत
असतो.
म्हणून
बाळान्तिनिला
डिंकाचे
लाडू
देण्याची
पद्धत
आहे.
त्यामुळे
शरीरात
शक्ति,
मजबूती
येते.
शरीराची
झीज
व
जखम
भरून
काढण्याचे
काम
डिंक
करतो.
आमच्या
भागात
हिवाळयात
घरोघरी
डिंका
चे
लाडू
बनवून
खात
असतात.
त्यामुळे
प्रतिकार
शक्ति
वाढते.
बलदायी,
मजबूत
शरीर
यष्टि
बनते.
व
स्नायु
ना
बळकटी
येते.
खूप
वेगवेगळ्या
प्रकारच्या
झाडांचा
डिंक
असतो.प्रत्येक झाडाचे गुणधर्म त्या त्या झाड़ाच्या डिंकात आलेले असतात. उदा.खैर,धामोडी, साग,पळस,बोरी,बाभळी, कडूंनिम्ब
या
झाडांच्या
डिंका
मधे
खुप
औषधी
गुणधर्म
असतात.
डिंक
हा
पदार्थ
सर्वांच्या
परिचयाचा
आहे.
झाडांचा,
विशेषतः
जी
संस्कृतमध्ये
क्षीरीवृक्ष
म्हणून
म्हटलेली
झाडे
आहेत,
त्यांचा
आतील
चीक
बाहेर
वाहतो
व
वाळून
झाडास
चिकटून
राहतो.
तो
डिंक
होय.
बाभळ,
वड,
पिंपळ,
खैर
वगैरे
झाडातून
डिंक
फार
येतो.
त्याचे
पिवळे
खडे
असतात.
हा
डिंक
थंड
पाण्यात
टाकला
असता
विरघळतो
व
विरघळल्यानंतर
ते
सबंध
डिंकाचे
पाणी
चिकट
होते.
डिंक
हा
एक
मोठे
घरगुती
औषध
आहे.
वायूचा खोकला: कफावर उपयुक्त वायूचा सुका खोकला असला, खोकून खोकून घसा पिंजला, आवाज बसला, यावेळी डिंकाचे लहान लहान खडे तोंडात धरावे, त्याने वायूचा खोकला लवकर थांबतो व कफही सुटतो.
गनोरियावर: प्रमेह अलीकडे ज्यास पू प्रमेह असे म्हणतात किंवा इंग्रजीत ज्यास गनोरिया असे म्हणतात तो डिंकाच्या
पिचकारीने
ताबडतोब
थांबतो.
डिंकाचे
पाणी करून,
त्याची
पिचकारी
दिवसातून
दोन
वेळा
घेतली
असता
लघवीच्या
इंद्रियातील
व्रण
बरा
होऊन,
पू
थांबतो
व
आगही
थांबते.
तोंड आल्यावर:
तोंड
आले
असताही
डिंकाच्या
पाण्याच्या
वरचेवर
गुळण्या
कराव्यात,
तोंड
बरे
होते.
आलेल्या
तोंडास
डिंक
दुधात
उगाळून
लावला
असता
त्यानेही
तोंड
बरे
होते.
शक्तीवर्धक: शक्तीसाठी
डिंक
अमृत
आहे.
शरीरातील
कोणताही
भाग
ढिला
झाला
असता
डिंक
पोटात
द्यावा.
ढिलेपणा
तेव्हाच
कमी
होतो.
डिंकाची
बारीक
पूड
करून
ती
डिंकाची
पूड
दर
वेळेला
1।।
ते
3 ग्रॅम,
50 मि.लि. दुधातून दिवसातून चार वेळ घ्यावी. अवयवांचा ढिलेपणा मोडतो.
अवयवांना ताकद येण्यासाठी
शरीर
निर्बल
होऊन
पायात
जोर
नसेल,
हातपाय
कापत
असतील,
कमरेत
जोर
नसून
बसवत
नसेल
तर
या
सर्वांवर
डिंक
पोटात
घेतल्यावर
त्वरित
बरे
वाटते.
खोकला व ताप: खोकला व ताप बरा होण्यासाठी ताप, त्यात होणारा खोकला डिंकाने ताबडतोब कमी होतो. डिंकाची पूड दुधात घालून जरा वेळ ठेवून त्यात थोडी साखर घालून घ्यावी, खोकला थांबतो व शक्ती वाढते.
अशक्तपणावर रामबाण: डिंकात एक न विरघळणारी
जात
आहे.
तिला
कथल्या
गोंद
असे
म्हणतात.
कथल्या
गोंद
आणून
साफ
करून
10 ग्रॅम
रात्री
पाण्यात
भिजत
ठेवावा.
सकाळी
तो
फुगून
वाटीभर
होतो.
त्यात
दूध
आणि
साखर
घालून
अशक्त
माणसाने
प्यावे,
शक्ती
येते
व
खोकला
कमी
होतो.
क्षयरोगावर उपयुक्त: क्षयरोग्यास
डिंक
देतात.
सन
1854 सालापासून
सन
1857 सालापर्यंत
संशोधक
न्यू
बोअर
या
शास्त्रज्ञाने
हेस
मिजिअर
यांच्या
सहाय्याने
डिंकाचे
संशोधन
केले.
त्यांत
त्यांना
कॅल्शियम
सॉल्ट
व
कॅल्शियम
कार्बोनेट
सॉल्ट,
कॅल्शियम
पोटेशियम
सॉल्ट
व
कॅल्शियम
मॅग्नेशियम
सॉल्ट
आढळून
आले.
डिंक
हा
पौष्टिक
आहे.
सांधेदुखीवर:
शरीरास
घट्टपणा
येण्यासाठी
डिंकाचा
वरून
उपयोग
करतात.
चांगला
भिजलेला
डिंक
कमजोर
किंवा
निखळलेल्या
सांध्यांना
लावून
वर
कापूस
बसवितात.
त्याने
सांधा
घट्ट
होतो
व
बरे
वाटते.
भाजल्याने
आग
होत
असेल
तेव्हा
भाजले
असता
कोंबड्याच्या
अंड्यातील
बलक
व
डिंक
भाजलेल्या
जागी
लावला
असता
आग
होत
नाही.
बरे
वाटते.
शरीरावरील डाग घालवण्यासाठी:
शरीरावर
कोणाच्याही
कारणाने
पडलेले
डाग,
डिंक
पाण्यात
उगाळून
वरचेवर
लावीत
गेल्याने
नाहीसे
होतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी:
वाढावी
यासाठी
रोगप्रतिकारक
शक्ती
वाढावी
यासाठी
शक्तीसाठी
डिंकाचे
पौष्टिक
लाडू
करतात
ते
असे,
डिंकाचे
लाडू
चांगला
डिंक
घेऊन
जाडसर
कुटावा.
तो
बारीक
तारेच्या
चाळणीने
चाळावा
म्हणजे
बारीक
डिंक
गळून
जाईल.
चाळणीत
राहिलेले
डिंकाचे
बारीक
खडे
मोजून
घ्यावे.
जितका
डिंक
तितकेच
तूप
घेऊन
ते
चांगले
खरपूस
तळावे.
डिंकाचे
बारीक
खडे
तळले
असता
फुगून
लाह्यासारखे
दिसतात.
ते
बुंदी
काढण्याच्या
लोखंडाच्या
झाऱ्यावर
4 तास
निथळत
ठेवावे.
तूप
निथळून
डिंकाच्या
लाह्या
चांगल्या
सुकल्यावर,
त्या
पितळेच्या
खलबत्त्यात
किंवा
दगडाच्या
पाट्यावर
हलक्या
जातीने
बारीक
कराव्यात.
डिंकाच्या
इतकीच
साखर
घेऊन,
डिंक
जात्याच
गोड
आहे
म्हणून
तितकीच
घ्यावी.
त्याचा
तीन
तारी
चांगला
पाक
करावा.
तो
पाक
खाली
उतरण्याच्या
वेळी,
त्यात
डिंकाचा
विसावा
भाग
केशर
व
डिंकाचा
सहावा
भाग
कस्तुरी
घालावी
व
सुंठ,
मिरे,
पिंपळी,
दालचिनी,
वेलदोडे,
लवंग,
तालिमखाना,
जायफळ,
मोचरस,
अश्वगंध,
गोखरू,
सळी,
चंदन
व
कृष्णागरू
ही
पंधरा
औषधे
मिळून
डिंकाचा
आठवा
भाग
कुटून
वस्त्रगाळ
केलेले
चूर्ण
घ्यावे.
हे
सर्व
साखरेच्या
तीन
तारी
केलेल्या
पाकात
टाकावे
व
त्यातच
तळून
पुन्हा
बारीक
केलेला
डिंक
टाकावा.
चमच्याने
नीट
ढवळावे.
नंतर
मिश्रण
घट्ट
होऊ
देऊन
लाडू
वळावा.
बाळंतपणात
पौष्टिक
लहान
लहान
सुपारी
एवढाले
लाडू
बांधून
अग्नीचे
बल
पाहून
खावे.
काही
जण
साखरेचा
पाक
तयार
झाला
असता,
त्यात
वेलची
व
डिंक
घालून
लाडू
करतात.
औषधी
जिन्नस
घालीत
नाहीत.
काही
जण
खोबरे
चांगले
किसून
त्याच्यामध्ये
खसखस
घालून,
खरपूस
भाजून
खोबरे
आणि
खसखस
मिळून
डिंकाइतके
घेऊन,
दुप्पट
साखरेत
तीन
तारी
पाक
करून
डिंकाचे
लाडू
करतात.
बाळंतिण
बायकांना
बाळंतपणात
डिंकाचे
लाडू
खायला
देण्याची
परंपरा
आहे.
त्यात
खोबऱ्याचे
बारीक
तुकडे,
खारकांचे
थोडे
तुकडे,
बेदाणे,
खसखस
वगैरे
घालून
लाडू
करतात.
डिंकाचा उपयोग
चरबीचा पर्याय म्हणून
अनहेल्दी फॅट अर्थात चरबीला हेल्दी फॅटच्या पर्यायांमध्ये
बदलण्याचे
प्रयत्न
अनेक
वर्षांपासून
फूड
इंडस्ट्रीमध्ये
केले
जात
आहेत.
डिंक
कटिरा
हा
असाच
एक
उत्तम
पर्याय
आहे,
जो
अनेक
पॅकेज्ड
करण्यात
आलेल्या
खाद्यपदार्थांमध्ये
यशस्वी
ठरला
आहे.
त्याच्या
चिकट
प्रभावामुळे
तो
एक
चांगला
बंधनकारक
घटक
बनतो
आणि
अन्नपदार्थ
देखील
पूर्वीपेक्षा
कितीतरी
पटींनी
अधिक
आरोग्यदायी
बनतात.
सूक्ष्मजीवांच्या विरोधात
बर्याच संशोधनांमध्ये
असे
आढळून
आले
आहे
की,
डिंक
बॅक्टेरिआ
आणि
इतर
सूक्ष्मजीवांच्या
विरोधात
अतिशय
प्रभावी
आहे.
जिवाणूंच्या
प्रभावापासून
अन्नपदार्थांचे
संरक्षण
करण्यासाठी
डिंक
कटिराचा
वापर
केला
जातो.
सध्या
जगभरातील
अनेक
प्रयोगशाळांमध्ये
डिंक
कटिरा
औषधांच्या
रुपात
वापरण्यासंदर्भात
संशोधन
सुरू
आहे.
मधुमेहासाठी औषध म्हणून वाहकाच्या रुपात
शरीरामध्ये
इन्सुलीन
वाहून
नेणाऱ्या
कॅप्सूल
बनवण्यासाठी
डिंक
कटिरा
वापरता
येतो.
मधुमेहाच्या
रुग्णांसाठी
ज्यांना
इंजेक्शनद्वारे
इन्सुलीन
घ्यावे
लागते,
त्यांच्यासाठी
हा
एक
उत्तम
मौखिक
पर्याय
आहे.
डिंकाचा
असलेला
चिकट
आणि
चिवट
गुणधर्म
त्याला
एक
चांगला
वाहक
बनवते.
या
विषयावर
सध्या
संशोधन
सुरू
असून
पुढील
काही
वर्षांमध्ये
वैद्यकीय
शास्त्राची
ही
एक
अद्भुत
प्रगती
ठरू
शकते.
खाद्यपदार्थ घट्ट करणारा एजंट म्हणून
विविध खाद्यपदार्थांमधील
स्निग्धता
वाढवण्यासाठी
डिंक
कटिरा
हा
एक
उत्तम
पर्याय
आहे.
खाद्यपदार्थ
गरम
केल्यानंतर
ते
उष्णता
आणि
अॅसिडीटी यामध्ये ही स्थिर राहते. बाजारात उपलब्ध असलेल्या सॅलेड ड्रेसिंग्स,
लोणचे,
केचअप,
मेयॉनीज
इत्यादींसाठी
हा
एक
चांगला
ऑप्शन
आहे.
त्याचे
अँटी ऑक्सिडंट गुणधर्म
खाद्यपदार्थ
अधिक
काळ
टिकतात
आणि
त्यांना
अधिक
काळ
फ्रेश
ठेवण्यास
मदत
करते.
मासिक
पाळी नियमित करण्यासाठी
जर स्त्रियांची
मासिक
पाळी
नियमित
येत
नसेल
तर
डिंक
कटिरा
आणि
पिठी
साखर
एकत्र
बारीक
करून
2 चमचे
दुधात
मिसळून
प्यायल्यास
फायदा
होतो.
या
व्यतिरिक्त
तुम्ही
डिंकाचे
लाडूही
बनवू
शकता
आणि
ते
खाऊ
शकता.
एवढेच
नाही
तर
बाळ
झाल्यानंतर
डिंकाचे
लाडू
खाल्ल्याने
अशक्तपणा
आणि
मासिक
पाळीचा
त्रासही
दूर
होण्यास
मदत
होते.
वजन कमी करण्यात सहाय्यक
डिंक कटिरा हा आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यात मदत करते. यासोबतच आपल्या शरीरातील चयापचयाची
क्रिया
वाढवण्यात
डिंक
कटिरा
मदत
करते.
यामध्ये
फायबरचे
प्रमाण
जास्त
असते.
शिवाय,
हे
पोट
आणि
पचनसंस्था
सुधारण्यासाठी
देखील
आवर्जून
वापरले
जाते.
या
डिंकाच्या
नियमित
सेवनाने
शरीरावर
जमा
होणारी
अतिरिक्त
चरबी
देखील
कमी
होते.
टॉन्सिल्सच्या त्रासापासून आराम मिळतो
काही जणांना टॉन्सिल्सची
समस्या
नेहमी
जाणवते.
हिवाळ्यात
हा
त्रास
आणखी
वाढतो.
डिंक
कटिराच्या
सेवनाने
तुम्हाला
टॉन्सिल्सच्या
त्रासापासून
आराम
मिळतो.
यामध्ये
कोथिंबीरीचा
रस
मिसळून
नियमितपणे
गळ्याजवळ
आणि
घशावर
लावल्याने
टॉन्सिल्सच्या
वेदनांपासून
आराम
मिळतो.
या
व्यतिरिक्त
सुमारे
10 ते
20 ग्रॅम
डिंक
कटिरा
पाण्यात
भिजवा.
त्यानंतर
तो
चांगला
फुगल्यानंतर
त्यात
साखर
मिसळून
सकाळ-संध्याकाळ
प्या.
यामुळे
तुम्हाला
टॉन्सिल्सच्या
त्रासापासून
आराम
मिळतो.
तोंडात येणाऱ्या फोडांपासून मुक्ती मिळते
अनेकांना उष्णतेचा त्रास असतो. या उष्णतेमुळे
तोंडात फोड येणे, अल्सर किंवा सूज येणे आदी समस्या निर्माण होतात. यामुळे तुम्हाला
असह्य वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी डिंक कटिराची बारीक केलेली पेस्ट बनवून
घ्या. ही पेस्ट त्या फोडांवर लावा. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच तोंडात येणाऱ्या
फोडांपासून मुक्ती मिळेल.
सारांश
डिंक म्हणजे झाडाचा चिक किंवा पाणी. ते झाडाच्या खोडातून बाहेर येतं आणि ते वाळवून त्यापासून डिंक तयार केला जातो. पण, हा डिंक नेमका कसा तयार होतो, याविषयी प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते, झाडास जखम झाल्यास जखमी भागाचे संसर्गापासून संरक्षण व्हावे म्हणून झाडातून एक प्रकारचा निःस्राव होतो. तर काही शास्त्रज्ञ असं म्हणतात की, जखमी भागातील कोशिकांचा (पेशींचा) सूक्ष्मजंतू व कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) यांच्यामुळे ऱ्हास होतो व त्यामुळे डिंक तयार होतो. असंही दिसून आलं आहे की, प्रतिकूल परिस्थितीत जसं की अती उष्ण किंवा अती कोरड्या हवामानात जखमी झाडापासून जास्त डिंक मिळतो.डिंक मध्य पूर्व गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमधील काही भागांमध्ये आढळतो.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know