Translate in Hindi / Marathi / English

Monday, 2 October 2023

झोप घेण्याची शास्तशुद्ध स्थिती | आदर्श निद्रा | A RESTFUL STATE OF SLEEP | IDEAL SLEEP | LIFESTYLE | BAD HABITS | AYURVEDA | PROSPERITY | HAPPINESS

झोप घेण्याची शास्तशुद्ध स्थिती

 

आदर्श निद्रा

या निद्रा सर्वभूतानां माता चैव पितामहः ।

सर्वाङ्गस्य विश्रामः सः सर्वरोगप्रणाशनः ॥

हा श्लोक आदर्श झोपण्याच्या आसनाचे वर्णन करतो ज्यामध्ये संपूर्ण शरीर विश्रांती घेते आणि जे सर्व रोगांपासून मुक्त असते. यात झोपेची तुलना आई आणि वडिलांशी केली जात आहे, कारण ती शरीर आणि मनाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे.

लाईफस्टाईलमधील अनेक चूकीच्या सवयीमुळे आजकाल अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. झोप ही शरीराला सक्रीय करते आणि दिवसा आपले शरीर जी उर्जा गमावते ती पुन्हा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केवळ झोपेमुळेच शक्य होते.रात्रीच्या झोपेसाठी संस्कृतमध्ये 'भुतधात्री' असा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे 'संपूर्ण चराचराची माता'. ज्या प्रकारे आई आपल्या बाळाचे पालन पोषण करते त्या प्रमाणे ही सृष्टी आपल्याला निद्रा काळात विश्रांती देऊन एक प्रकारे पोषणच करीत असते.म्हणूनच रात्री गाढ झोप घेणे आणि ही झोप पुरेशी असणे खूप गरजेचे आहे. झोप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतू ती योग्य स्थितीत योग्य दिशेत घेणेही तितकेच आवश्यक आहे.

चला तर मग पाहूया कस झोपाव या संबंधित काही नियम:

झोपण्यासाठी योग्य दिशा:


Ø पूर्व दिशेला डोके करून झोपणे आयुर्वेदामध्ये खूप चांगले समजले गेले आहे. जर तुम्हाला स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम असले तर तुम्ही नक्कीच पूर्व दिशेला डोके करून झोपायला हवे. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल असे जाणकार सांगतात. पूर्व दिशेला डोके करून झोपल्याने एकाग्रता सुधारते, चांगली गाढ शांत झोप लागते आणि मेंदू तल्लख होतो.

Ø पश्चिमेला डोके करून झोपण्यास सुद्धा आयुर्वेद मनाई करते. पश्चिम दिशेला डोके करून झोपल्यास रात्री गाढ झोप लागत नाही. वास्तूशास्त्र म्हणते की या दिशेला डोके करून झोपल्यास वाईट स्वप्ने पडू शकतात आणि त्यामुळे रात्रभर तुम्ही झोपेत तळमळत राहू शकता. शास्त्रामध्ये सुद्धा पश्चिम दिशेला तोंड करून झोपणे अशुभ मानले जाते.

Ø पश्चिम किंवा उत्तर या दिशांना डोके करून झोपल्यास आयुष्याचा ह्रास होतो, असे विष्णु आणि वामन पुराणांत सांगितले आहे.

Ø दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने खूप गाढ आणि सुखाची झोप लागते असे आयुर्वेद सांगते. दक्षिणेकडे ऋणात्मक आवेश असते आणि तुमचे डोके हे धनात्मक रूपाने अवेषित असते आणि म्हणून तुमचे डोके आणि दिशा यांच्या मध्ये एक सामंजस्यपूर्ण आकर्षण निर्माण होते. दक्षिणेकडे डोके करून झोपल्याने शरीरात स्वास्थ, सुख आणि समृद्धी यांना वाढवणारी उर्जा निर्माण होते.

Ø आयुर्वेदात स्पष्ट सांगितले आहे की उत्तर दिशेला डोके करून कधीच झोपू नये अन्यथा शरीरावर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात.आयुर्वेदामध्ये असे समजले जाते की या दिशेला वाहणारी चुंबकीय धारा तुमच्या डोक्यात प्रवेश करू शकते आणि रक्ताभिसरण क्रियेला (Blood circulation) प्रभावित करते. यासोबतच डोक्याला डिस्टर्ब करण्याचे काम करते. या दिशेने डोके करून झोपल्यास सकाळी उठल्यावर उर्जावान वाटत नाही.

Ø वास्तुशास्त्रानुसार ही दक्षिण दिशेसह पूर्व दिशेला डोके करून झोपणे शुभ मानले जाते. पूर्वेला डोके करून झोपल्यास देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. सूर्योदयाची हीच दिशा असल्याने ती जीवनदायी मानली गेली आहे.

कोणत्या कुशीवर झोपल्यास काय फायदे तोटे होतात:


आपण कोणत्या बाजूला चेहरा करून किंवा कोणत्या स्थितीत झोपणे योग्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया रात्री झोपताना कोणत्या बाजूने झोपणे (Best Sleeping Position) चांगले आहे जेणेकरून अन्न पचन नीट होईल आणि आपले शरीरही निरोगी राहील. झोपण्याची पद्धत चुकीची असेल तर आपले शरीर त्याला विपरित प्रतिसाद देते. याचे कारण म्हणजे, बाहेरून आपले शरीर डाव्या उजव्या बाजूला सारखेच दिसत असले तरी ते आतल्या बाजूने सारखे नसते. हृदय, पोट, मूत्राशय आणखी काही अवयव शरीरात डाव्या बाजूला असतात. आपले हृदय, पचनक्रिया मेंदू कसा काम करेल, हे ठरवण्यामध्ये आपल्या झोपण्याच्या दिशेची (डावी की उजवी) भूमिका महत्त्वाची असते.

डाव्या कुशीवर का झोपावे?

Ø जर तुम्ही डाव्या बाजूला तोंड करून म्हणजेच डाव्या कुशीवर (Sleeping on Left Side) झोपत असाल तर ही बाजू सर्वोत्तम मानली जाते. कारण असे केल्याने शरीराला आरामही मिळतो आणि अनेक फायदेही होतात.

Ø डाव्या कुशीवर का झोपावे, यामागेही शास्त्रीय कारण आहे. आपल्या नाकातून जो श्वास बाहेर येतो आणि आत जातो, याला आवाज म्हणतात. नाकाच्या डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि सोडण्याच्या प्रक्रियेला चंद्र स्वर म्हणतात. तर उजव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि सोडण्याला सूर्य स्वर म्हणतात. सूर्य स्वर हा आपल्या शरीरात उष्णता उपन्न करतो. यामुळे जेवणाचे पचन होण्यास मदत होते. तसेच हृदयावर दबाव जाणवत नाही. यामुळे ते सुरळीत कार्य करते. परिणामी हृदय निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय डाव्या कुशीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे शास्त्रात डाव्या अंगावर झोपण्यास सांगितले जाते.

Ø पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर  आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणार्यांनी अवश्य डाव्या कुशीवर झोपावे.

Ø डाव्या कुशीवर झोपल्याने ह्रदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. हृद्याला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर आहे डाव्या कुशीवर झोपल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना ब्लडप्रेशरची पातळी कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

Ø डाव्या कुशीवर  झोपल तर याने शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.

Ø डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील ऍसिडी वर जाता खाली येतं, ज्याने ऍसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.

Ø घोरण्याची सवय तुम्हांला त्रासदायक आणि तुमच्या आजुबाजूच्या लोकांना नाहक त्रासदायक ठरू शकते. पाठीवर झोपण्याच्या सवयीमुळेही घोरण्याची सवय वाढते. डाव्या बाजूला झोपल्याने घोरण्याचा त्रास आटोक्यात राहू शकतो

Ø दम्याचा त्रास होत असेल, तर डाव्या कुशीवर झोपावे. त्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि देहातील उष्णता वाढून श्वसनमार्गातील कफाचे कण वितळून दम्याचा त्रास न्यून होतो. त्यामुळे शांत झोप लागते.

Ø गरोदर स्त्रिया - डाव्या कुशीवर झोपल्याने पाठीवर आणि कंबरेवर दाब कमी पडतो. यामुळे गर्भाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. बाळाच्या विकासासाठी गरोदर स्त्रियांनी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.डाव्या कुशीवर झोपल्याचे बाळाला पण खुप फायदे आहेत.रक्त प्रवाह सुरळीत चालते.आणि बाळ जास्त हालचाल करते.

Ø बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.

Ø अन्न पचत नसेल, तर जेवल्यावर डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या बाजूला जठराचा भाग अधिक असल्यामुळे, डाव्या कुशीवर झोपल्यामुळे जठराला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होऊन अन्नपचन होण्यास साहाय्य मिळते. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला झोपल्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि जठराग्नी चांगला प्रज्वलित होतो. त्यामुळे अन्नपचन चांगल्या प्रकारे होते आणि लवकर अन् शांत झोप लागते. 

Ø डाव्या कुशीवर झोपल्या मुळे सांधे आणि पाठदुखी तसेच तीव्र वेदना यासारख्या अनेक आरोग्य समस्या कमी होण्यास मदत होते.

उजव्या कुशीवर का झोपू नये?

उजव्या कुशीवर वळून झोपणे टाळले पाहिजे. याला राइट लॅटरल पोझिशन म्हणतात, मात्र त्यावर झोपू नये. जेव्हा आपण उजव्या कुशीवर वळून झोपतो, तेव्हा फूड पाइपचा खालचा भाग किंवा पोटाचा वरचा भाग, ज्याला GE जंक्शन म्हटले जाते. तिथे अन्न एकत्रित होते. ते वरच्या बाजूस येऊ शकते. उजव्या कुशीवर वळून झोपल्यामुळे अन्न, पाणी किंवा हवा वर येऊ शकते. आणि आपण झोपेत असताना ते आपल्या नाकातून अथवा तोडांतून बाहेर येऊ शकते. अथवा त्याचे काही कण फुप्फुसांमध्येही जमा होऊ शकतात. हे न्यूमोनियासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे साधारणत: उजव्या कुशीवर वळून झोपणे टाळले पाहिजे.आरोग्याच्या समस्या आटोक्यात ठेवायच्या असतील योग्य दिशेला झोपावे, उजव्या बाजूवर झोपणं टाळाव म्हणजे शांत झोप लागून आरोग्य ही उत्तम राहील हे वरील पोस्ट वरून आपल्याला एव्हाना समजले असेल अशी आशा करतो.

कृपया याची नोंद घ्या: 

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहेविषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहेसंकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००खात्री देऊ शकत नाहीवाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.



No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know