नवरात्रीमधील देवीसाठीचे नैवेद्य
महाराष्ट्रातील नवरात्रीतील नऊ दिवसांचे देवीसाठीचे नऊ नैवेद्य
नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात. प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवाव, जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल. असे वाटत असते. दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्या शिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असे मानले जाते. त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणार नऊ नैवेद्य पाहणार आहोत.
माता शैलपुत्रीचे पुजन
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रुप माता शैलपुत्रीचे पुजन केले जाते. यादिवशी देवीला गायीचे शुद्ध तुप अर्पण केले जाते. यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो.
माता ब्रह्मचारिणीची पुजा
त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पुजा केली जाते. मात ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे घरातील सदस्याचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते.
माता चंद्रघंटाची पुजा
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पुजा केली जाते. यादिवशी देवी दुध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यामुळे दुःखपासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते.
माता कुष्माण्डाची पुजा
चौथ्या दिवशी माता कुष्माण्डाची पुजा केली जाते. यादिवशी देवीला मालपोह्याचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकार होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते.
माता स्कंदमातेची पुजा
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पुजा-अर्जा केली जाते. यादिवशी देवीला कळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे शरीर स्वस्थ राहते.
कात्यायनी मातेची पुजा
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रुपाची म्हणजे कात्यायनी मातेची पुजा केली जाते. देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. यामुळे उपवास करणाऱ्याची कांती तेजोमय होते.
माता कालरात्रीची पुजा
सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचे ताट जेवासहित ब्राम्हणाला दान करावे. यामुळे उपवास करणाऱ्यावर येणार संकट दूर होते.
देवी महागौरी रुपाची पुजा
अष्टमी दिवशी देवीच्या महागौरी रुपाची पुजा केली जाते. यादिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो.
देवी सिद्धिदात्रीची पुजा
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धिदात्रीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा. हा उपवास केल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते.
प्रत्येक प्रांतात स्थानिक पदार्थ अर्पण करण्याची परंपरा देखील असते.
1. खीर:
खीर अनेक प्रकारे तयार केली जाते. खीरमध्ये मनुका, बारीक चिरलेले बदाम, नारळ, काजू, पिस्ता, चारोळी, मकाणे, सुगंधासाठी वेलची, केशर आणि शेवटी तुळस घालावी. खीर अनेक देवांना अर्पित केली जाते. विशेषतः भगवान विष्णू आणि दुर्गामातेला खिरीचा नैवेद्य आवडतो. तांदूळ आणि शेवयाची खीर पसंत केली जाते.2. मालपुए:
अपूप हे एका औषधाचे नाव आहे, परंतु मालपुआला 'अपूप' असेही म्हणतात. 'अपूप' ही भारतातील सर्वात जुनी गोड मिठाई आहे, ज्याचा उल्लेख ऋग्वेदातही आहे. ऋग्वेदात घृतवंत अपुपाचे वर्णन आहे. पाणिनीच्या काळात, लग्न-मिरवणुका, तीज-सणांवर पूरण भरलेले अपूप बनवले जातात. ते आजही प्रचलित आहे. जोपर्यंत हलव्याचा प्रश्न आहे, पूर्वी त्याला 'संयाव' म्हटले जात असे. होळी आणि दीपावलीच्या दिवशी मालपुआ अनेकदा बनवले जातात. दुर्गा देवीला मालपुआ खूप आवडतो.3. गोड शिरा:
भारतीय समाजात शिर्याला खूप महत्त्व आहे. जसे रव्याचा शिरा, मैद्याचा शिरा, गाजराचा शिरा, मुगाचा शिरा, भोपळ्याचा शिरा, दुधी भोपळ्याचा शिरा इ. यातून रव्याच्या शिर्याचं नैवेद्य दाखवलं जातं. रव्याच्या शिर्यात सर्व प्रकारचे ड्राय फ्रूट्स मिसळून ते उत्तम प्रकारे बनवा आणि देवाला अर्पण करा. माता दुर्गा आणि हनुमानजींना शिर अत्यंत पसंत आहे.4. पुरण पोळी:
गूळ आणि हरभरा डाळ मिसळून पुरण पोळी बनवली जाते. ज्याप्रमाणे बट्ट्याचे पराठे तयार केले जातात त्याच प्रकारे गूळ किंवा साखर आणि शिजवलेली चण्याची डाळ याचे मिश्रण तयार करुन गोड पोळी तयार केली जाते. महाराष्ट्रात या पदार्थांची वेगळ्याने व्याख्या करण्याची गरज नाही. यात घालण्यात येणार्या वेलची पूड आणि जायफळ मुळे चव वाढते. सणासुदी आणि नवरात्रीच्या निमित्ताने ही पोळी तयार केली जाते. दुर्गा देवी पुरण पोळी अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.5. गोड बूंदी:
बेसन, वेलची आणि तुपाने तयार गोड बुंदीचा स्वाद वेगळाच असतो. नमकीन बुंदी दहीसोबत रायता तयार करण्यासाठी वापरली जाते तर गोड बुंदीचा देवीला नैवेद्य दाखवला जातो.6. घेवर:
घेवर देखील छप्पन भोग पैकी एक आहे. हे कणिक किंवा मैद्याने तयार केले जातात. हे मधमाश्यांच्या पोळ्यासारखे गोल आणि छिद्र असलेलं दिसतं आणि ही एक कुरकुरीत आणि गोड डिश आहे. कोणताही तीज किंवा सण घेवणशिवाय अपुरे मानले जातात. असे मानले जाते की दुर्गा देवीला हे खूप आवडतात. घेवर राजस्थान आणि ब्रज प्रदेशातील प्रमुख पारंपारिक गोड पदार्थ आहे.7. फळं:
फळांमध्ये डाळिंब, केळी आणि नारळ देवीला अर्पित करता येतात.8. मिठाई:
मिठाईमध्ये पिवळा पेढा आणि गुलाब जामुन अर्पित करावे.9. इतर पदार्थ: इतर पदार्थ म्हणजे तुप, मध, तीळ, काळे चणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. या व्यतिरिक्त देवीसाठी आपण केशरी भात, कढी, पुरी-भाजी, भजे, भोपळा किंवा बटाट्याची भाजी तयार करुन देखील नैवेद्य दाखवू शकता.
नवरात्रीमध्ये उपवास कसा करावा
आपल्या धार्मिक, पौराणिक ग्रंथांमध्ये उपवासाचे दाखले सापडत असले तरी उपवासाला कुठला आहार घ्यावा, याबाबतचे संदर्भ उपलब्ध नाहीत. आपल्या पौराणिक ग्रंथात सांगितले जाते की, एकभुक्त म्हणजे एकदा जेऊन केलेला उपवास होय.
सूर्यास्तानंतर नक्षत्रं दिसू लागली की भोजन करणे नक्तभोजन तसेच अहोरात्र केलेल्या उपवासाला संपूर्ण उपवास म्हटले जाते. प्राचीन ग्रंथांत एकादशी, शिवरात्र, जन्माष्टमी, रामनवमी, हरतालिका या उपवासांचे असे उल्लेख आढळत असल्याचे त्यांनी नमूद केले. उपवासाला बटाटा, बीट, साबुदाणा हे पदार्थ चालतात. पण रताळ्यासारखाच असलेले गाजर उपवासाला चालत नाही असे का?. उपवासाला काय चालतं आणि काय नाही हे कोणी ठरवलं आहे, असा प्रश्न कधीतरी तूम्हालाही पडला असेल ना. आज याच प्रश्नांची उत्तरे पाहुयात. उपवासाला रताळे चालते, पण गाजर चालत नाही. का तर म्हणे ते उलठ्या देठाचे असते. राजगिरा किंवा भगर चालते, पण तांदूळ चालत नाही. कुणाला कढीपत्ता चालतो, तर कुणी मस्तपैकी कोथिंबीरीची फोडणी साबुदाण्याला शुद्ध तुपात देतो.
उपवासाला आहार कसा करावा
उपवासाला काय आहार घ्यावा, या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख नसला तरी अंजन,गंध,पुष्प, अलंकार, दंतधावन, गात्राभ्यंग, तांबूल (विडा), दिवसा झोप, मैथुन, अक्षक्रीडा, अतिजलपान या गोष्टी वर्ज्य कराव्यात, असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळून येतो.
सारांश
नवरात्रीमध्ये भक्त देवी दुर्गाच्या उपासनेसोबत उपवास आणि पूजा करतात. तसं बघायला गेलं तर, देवीला प्रामाणिक अंतःकरणाने जो काही प्रसाद अर्पण करतो ते देवी स्वीकारते, परंतु नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्याचप्रमाणे, नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळा नैवेद्य दाखवतात.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know