माता दुर्गेच्या विविध 9 रूपांची पूजा
माता शैलपुत्री
माता शैलपुत्री ही हिमालयाची कन्या आहे. तिचा जन्म शैल म्हणजेच दगडापासून झाला, त्यामुळे तिला शैलपुत्री म्हणून ओळखले जाते. दुर्गेचे पहिले रूप 'शैलीपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.
या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.
एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे.
परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.
सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले.
आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे. मान्यतेनुसार अविवाहित मुलींनी माता शैलपुत्रीची विधिवत पूजा आणि मंत्र जप केल्यास त्यांना सुयोग्य वर प्राप्त होतो.
नवरात्रीचा पहिला दिवस आहे माता शैलपुत्रीला समर्पित, जाणून घ्या पूजा विधी
नवरात्रोत्सव २०२३: हिंदू धर्मात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाला 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या उत्सवात माता दुर्गेच्या विविध 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा पहिला दिवस हा माता शैलपुत्रीला समर्पित आहे. यादिवशी माता शैलपुत्रीची विधिवत पूजा करून घटस्थापना केली जाते. माता शैलपुत्रीला माता पार्वती, वृषारुढ असेही म्हणतात. माता शैलपुत्रीची पूजा केल्याने कीर्ती आणि संपत्ती मिळते.
माता शैलपुत्रीची पूजा कशी करावी आणि काय आहे नियम?
पौराणिक मान्यतेनुसार माता शैलपुत्री ही हिमालयाची कन्या आहे. तिचा जन्म शैल म्हणजेच दगडापासून झाला, त्यामुळे तिला शैलपुत्री म्हणून ओळखले जाते. माता शैलपुत्री बैलावर स्वार असून देवीच्या एका हातात कमळाचे फूल आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे.
पूजा विधी
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे कपडे घाला. सर्वात आधी गंगाजलाने पूजेचे ठिकाण पवित्र केल्यानंतर माता दुर्गेचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा. देवीची पूजा करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेकडे ठेवावे. कलशाची स्थापना केल्यानंतर माता शैलपुत्रीचे ध्यान करत व्रताचा संकल्प घ्यावा. दरम्यान देवीला पांढरी मिठाई, पांढरी फुले, अक्षत, सिंदूर आणि पांढरी वस्त्रे अर्पण करा. देवी समोर तुपाचा दिवा लावून कलशची पूजा करत आरती म्हणा. शक्य असल्यास, दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशती पाठ करा. यानंतर देवीला मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. सायंकाळी पुन्हा देवीची आरती करून तिचे ध्यान करावे व या मंत्राचा जप करा
मंत्र वन्दे वांछितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरम्.
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्.
पूणेन्दु निभां गौरी मूलाधार स्थितां प्रथम दुर्गा त्रिनेत्राम्॥
पटाम्बर परिधानां रत्नाकिरीटा नामालंकार भूषिता॥
प्रफुल्ल वंदना पल्लवाधरां कातंकपोलां तुंग कुचाम्.
कमनीयां लावण्यां स्नेमुखी क्षीणमध्यां नितम्बनीम् ॥
या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता.
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:
ओम् शं शैलपुत्री देव्यै: नम:
या मंत्राचा 11 वेळा जप करावा. मान्यतेनुसार अविवाहित मुलींनी या मंत्राचा जप केल्यास सुयोग्य वर प्राप्त होतो.
देवी शैलपुत्री चंद्रावर राज्य करते, सर्व भाग्य आणि समृद्धी प्रदान करते. असे मानले जाते की आदिशक्तीच्या या रूपाची पूजा केल्याने चंद्राचा कोणताही वाईट प्रभाव दूर होतो. तिचा रंग पांढरा आहे आणि शुद्धता, निर्दोषता, शांतता आणि शांतता दर्शवितो.
हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले गेले आहे. तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते, असे म्हटले जाते.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. माहिती संग्राहक याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know