Translate in Hindi / Marathi / English

Friday, 20 October 2023

मानवी शरीरावरील तिळाचे जीवनातील महत्त्व | IMPORTANCE OF MOLE ON HUMAN BODY IN LIFE | VEDIC ASTROLOGY | MELANOCYTES | SKIN | ULTRAVIOLET | HORMONES | GENETICS | PREGNANCY | PROSPERITY | DEPRESSION | STOMACH

मानवी त्वचेवर तीळ

 

मानवी शरीरावरील तिळाचे जीवनातील महत्त्व

सौंदर्यात भर घालणारे किंवा सौंदर्य खुलविणारे म्हणून शरीरावरील तिळाकडे पाहिले जाते. तीळ हे मेलानोसाइटसचे कॉन्स्नट्रेशन असते. मेलानोसाइटस या आपल्या त्वचेच्या रंगासाठी जबाबदार त्वचेच्या पेशी असतात. जेव्हा मेलानोसाइट्स समान रीतीने पसरू शकत नाहीत आणि त्याऐवजी एका समूहात वाढतात, तेव्हा तेथील त्वचेचा रंग अनेकदा बदलतो. तो टॅन, तपकिरी, काळा, गुलाबी, लाल आणि निळा अशा रंगांमध्ये दिसू शकतो. हे जन्मजातही असू शकते किंवा सूर्यप्रकाशामुळे तयार होऊ शकते.

हे मेलेनोसाइट्समुळे होतात, परंतु मेलेनोसाइट्स कोणत्या कारणामुळे तयार होतात, याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप आढळलेली नाही. असे मानले जाते की अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्ग एका उत्प्रेरक म्हणून कार्य करते, कारण अतिनील किरणे या मेलेनोसाइट्सच्या निर्मितीला चालना देतात, ज्यामुळे सूर्यप्रकाशात असताना आपल्या त्वचेचा रंग बदलतो. याव्यतिरिक्त, अनुवांशिकता देखील तीळ निर्माण होण्यामागे प्रमुख भूमिका बजावते. काही कुटुंबांमध्ये प्रत्येक सदस्याला तीळ असतात. काही संशोधनांतून असे सुचवण्यात आले आहे की लिंग-विशिष्ट जीन्स यातील फरकांसाठी जबाबदार असतात. सामान्यत: स्त्रियांच्या शरीरावर खालच्या भागात तकर पुरूषांच्या शरीरावर वरच्या भागात (मान आणिस्काल्पवर) तीळ दिसून येतात.

हार्मोन्सचा देखील मेलानोसाइट्सवर परिणाम होता. यौवनावस्था, यौवन, गर्भधारणा आणि इतर प्रमुख हार्मोनल चढउतारांदरम्यान नवीन तीळ अनेकदा शरीरावर दिसतात आणि काही वेळा गायबही होतात.

तीळ येणे नॉर्मल असते का?


तीळ येणे हे पूर्णपणे सामान्य आहेत आणि ते कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर येऊ शकतात. फिकट त्वचा असणाऱ्या लोकांच्या अंगावर तीळ येण्याची शक्यता जास्त असते. पुष्कळ मुलांचा तर तीळासह जन्म होतो आणि बालपणापासून तारुण्यापर्यंत म्हणजे वयाच्या 30व्या वर्षांपर्यंत कधीही येऊ शकतात. तीळाचा आकार आणि रंग काळानुसार बदलत राहतो.

तीळामुळे काही त्रास होऊ शकतो?

त्वचेवर वाढलेले हे तीळ धोकादायक नसतात. तथापि, एका विशिष्ट वयानंतर त्याचे अचानक दिसणे चिंताजनक असू शकते. मात्र तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात मोठा तीळ असेल, त्यामुळे वेदना होत असतील, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो

  अनेकदा महिला, मुली ब्यूटी स्पॉट म्हणून मेकअप करताना  कृत्रिम तीळ लावून घेतात. बदलत्या काळानुसार तीळ लावण्याची फॅशन आली आहे. परंतु शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरील तिळाचे वेगळे महत्व आहे. सुख, समृद्धी, आनंद, नैराश्य आदी येण्यास तिळाची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले जाते. शरीरावरील तिळाबद्दल बरेच काही सांगितले जाते. काही लोक तीळ शुभ मानतात तर काही लोक तीळमध्ये चमकणारे भाग्य शोधतात. पण, सत्य असे की प्रत्येक तीळ काहीतरी सांगते.

बरेचदा आपण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर काळ्या किंवा लाल रंगाचे ठिपके पाहतो ज्याला आपण तीळ म्हणतो. शरीरावरील तिळाचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर असलेल्या तिळाचे वेगवेगळे अर्थ आहेत. ज्याचा संबंध थेट आपल्या नशिबाशी येतो. गालावरील तीळ आपले आकर्षण बळकट करते. चेहर्‍यावर तीळ संपत्ती प्रदान करते. नाकावर तीळ असणे एखाद्या व्यक्तीला खूप शिस्तबद्ध करते. अशा लोकांच्या जीवनात संघर्ष वाढतो. नाकाच्या खाली तीळची उपस्थिती दर्शविते की त्या व्यक्तीचे बरेच प्रेमी आहेत. परंतु असे लोक कमी लोकांशी जोडलेले असतात. कपाळावरील तीळ सांगते की आपण सुरुवातीस खूप संघर्ष कराल.

हस्तरेषाशास्त्रानुसार मानवी शरीरावर असलेले सर्व तीळ अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की शरीरावर लाल तीळ असणे देखील शुभ मानले जाते. तसेच शरीराच्या इतर भागात काळे तीळ असल्याने शुभ आणि अशुभ असे वेगवेगळे परिणाम होतात. यासोबतच शरीरावरील चामखीळींचा तिळासारखा प्रभाव असतो. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेल्या तिळांचा अर्थ जाणून घेऊया.

कपाळावर तीळ

ज्या व्यक्तीच्या कपाळावर उजवीकडे आणि डावीकडे तीळ असतो, तो खूप पैसा कमावतो पण आनंदाच्या गोष्टींवर पैसे खर्च करतो. अनेक वेळा त्यांना आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. दुसरीकडे ज्या लोकांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतो ते खूप भाग्यवान असतात. नशीब अशा लोकांना मदत करते, ज्या क्षेत्रात ते प्रयत्न करतात त्यात ते यशस्वी होतात.

तळहातावर तीळ

तळहातावरच्या अंगठ्याच्या खालच्या भागाला शुक्र पर्वत म्हणतात. ज्यांच्या तळहातावर तीळ असतो, त्यांना जीवनात अपार यश मिळते. अंगठ्यावर तीळ असेल तर व्यक्तीने कितीही चांगले काम केले तरी त्याला प्रसिद्धी मिळत नाही.

ओठावरील तीळ

स्त्री-पुरुषाच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास त्यामुळे त्यांचे जोडीदाराशी प्रेमाचे नाते असते. त्यांच्यात खूप छान नातं असतं. तर विरुद्ध बाजूच्या म्हणजेच ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास, जोडीदाराशी मतभेद होतात. तर दुसरीकडे ज्या लोकांच्या खालच्या ओठांवर तीळ असतो ते खाण्यापिण्याचे शौकीन असतात. तसेच असे लोक त्यांच्या क्षेत्रात चांगले यश मिळवतात.

छातीवर तीळ

डाव्या बाजूला तीळ किंवा चामखीळ असेल तर त्या व्यक्तीचे जास्त वयानंतर लग्न होण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती जास्त कामवासनेत असतात. त्यांना हृदयविकार होण्याचीही शक्यता असते. दुसरीकडे, ज्या व्यक्तीच्या छातीच्या उजव्या बाजूला तीळ असतो, ते धनवान असतात आणि त्यांचा जोडीदारही सुंदर आणि योग्य असतो.

पोटावर तीळ

ज्या लोकांच्या पोटावर तीळ असतात ते खूप खाऊबाज असतात. जर तीळ नाभीच्या डाव्या बाजूला असेल तर त्या व्यक्तीला पोटाचा त्रास होतो. ज्यांच्या नाभीच्या खाली तीळाची खूण असते. ते लैंगिक संक्रमित आजारांना बळी पडतात.

एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या मध्यभागी तीळ असेल तर ती समृद्धी देते. जर तीळ बोटांवर असेल तर ते दुर्दैवी असते. तळपायांचा तीळ त्या व्यक्तीला नेहमीच घरापासून दूर नेतो आणि महान यश देतो. छातीवर तीळ असणे हे सूचित करते की त्या व्यक्तीस कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागतो. तीळ पोटावर असलेल्या व्यक्तीला पैसे देते, परंतु तब्येत ढासळते. तीळ वर केस असल्यास ते शुभ मानले जात नाही. तीळ गडद रंगाचा असेल तर असे मानले जाते की मोठे अडथळे येतील. हलक्या रंगाचा तीळ सकारात्मक वैशिष्ट्यांचे सूचक मानला जातो.

ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, लाल तिळाला स्वतःचे महत्त्व असते आणि ते त्यांच्या उपस्थितीनुसार परिणाम देतातलाल तीळ समृध्दी आणि दुर्दैवाचे प्रतीक आहे. जर ते तोंडावर असेल तर ते वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवनात दुर्दैव आणते. जर ते हातावर असेल तर ते आर्थिक बळ आणते. जर ती छातीवर असेल तर ती व्यक्ती परदेशात जाते. एखादी व्यक्ती आपल्या छातीवर लाल तीळ ठेवून भरपूर पैसे कमवते. जर लाल तीळ पाठीवर असेल तर सैन्यात किंवा धैर्याच्या क्षेत्रात यश देते.

शरीरावर १२ हून अधिक तीळ नको

ज्योतिषशास्त्रज्ञ विश्लेषकांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर 12 पेक्षा जास्त तीळ असू नये. शरीरावर 12 पेक्षा जास्त तीळ असतील तर अशुभ मानले जाते आणि 12 पेक्षा कमी तीळ असणे शुभ आहे. पुरुषांच्या शरीरावर उजव्या बाजूला तीळ असणे शुभ आणि फायदेशीर मानले जाते. तर स्त्रियांच्या डाव्या बाजूला तीळ शुभ आणि फायदेशीर मानली जाते. जर एखाद्या महिलेच्या छातीवर तीळ असेल तर ती भाग्यवान आहे. कपाळाच्या मध्यभागी तीळ शुद्ध प्रेमाचे लक्षण आहे. कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ एखाद्या विशिष्ट विषयावर प्रभुत्व मिळविण्याचे प्रतीक आहे.

सारांश

वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये स्थित ग्रहांचे विश्लेषण केले जाते आणि त्यांच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितले जाते. त्याचप्रमाणे सामुद्रिकशास्त्रात मानवी शरीरावर उपस्थित असलेल्या अवयवांची रचना आणि त्यावरील तीळाचे अर्थ सांगितले आहेत. सामुद्रिक शास्त्रात प्रत्येक तीळाचे स्वतःचे महत्त्व आणि फळ आहे. तीळ कुठे आहे यावर ते अवलंबून असते.

अस्वीकरण

'या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/सामग्री/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/उपदेश/श्रद्धा/धार्मिक शास्त्रांमधून गोळा करून तुमच्यासमोर सादर केली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती प्रदान करणे आहे, त्याच्या वापरकर्त्यांनी ती केवळ माहिती मानली पाहिजे. याव्यतिरिक्त, कोणत्याही वापरासाठी जबाबदारी स्वतः वापरकर्त्याची राहते




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know