Translate in Hindi / Marathi / English

Friday, 27 October 2023

स्वयंपाक घरातील उपयुक्त सल्ले | USEFUL TIPS IN THE KITCHEN | TECHNIQUES | SKILLS | GINGER | FREEZER | COLD | FEVER | DOSA | APPLES | VEGETABLES | GARLIC | HOUSEWIFE | SUGAR

 

50 किचन टिप्स

स्वयंपाक घरातील उपयुक्त सल्ले

स्वयंपाकघरात स्वयंपाक करणे ही एक सर्जनशील कला आहे आणि त्यासाठी विविध कौशल्ये आणि तंत्रे आवश्यक आहेत. परंतु काही सोप्या टिप्सचे अनुसरण करून, आपण आपल्या स्वयंपाकघरात अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनू शकता आणि आपल्या जेवणाचा अधिक आनंद घेऊ शकता.

1.  दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही.

2.  वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद, चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते स्वादही छान येतो.

3.  पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांची हमखास साथ येते. अशावेळी पाणी नेहमी उकळून प्यावे. तसेच अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून - वेळा घ्यावे. यामुळे लवकर आराम पडतो.

4.  कुकरची रबरी रींग फ्रिजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रिजरमधे १५ मिनिटे ठेवावी, यामुळे रींग लवकर खराब होत नाही कुकरचे प्रेशरही चांगले राहते.

5.  हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.

6.  सॅलेड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात, त्यामुळे त्या टवटवीत दिसतात.

7.  साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडीपण मऊ, मोकळी होते.

8.  पालेभाज्या, कोथिंबीर नीट निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून मग प्लॅस्टीकच्या डब्यात किंवा कॅरीबॅगेत घालून फ्रिजमधे ठेवाव्यात. प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा. यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात.

9.  बदामाची सालं काढायला एका बशीत ते बुडतील इतक्या पाण्यात मिनिटभर मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे. आधी भिजवले नसले तरी मऊ होतात आणि सालं काढता येतात.

10.            भाजी,डाळी , कडधान्ये पुलाव करताना त्यात पुदिन्याची पाने घालावी त्यामुळे त्या पदार्थाची पाचकता वाढते .

11.            शंकर पाळे कुरकुरीत होण्या साठी २वाटी मैदा असेल तर १/४ वाटी कॉर्न फ्लोअर किवा बदामाची बारीक केलेली पावडर वापरावी.

12.            इडली-डोशाचे पीठ जर पीठ नियोजित वेळेआधी फर्मेंट झाले (म्हणजे इडली/डोसा करायला अजून बराच वेळ आहे) तर त्यात मीठ घालून ढवळून घ्यावे. फ्रीजमध्ये ठेवावे.

13.            - दिवस लिंबे ताजी रहाण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावीत. वापरते वेळी फ्रिजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून मग चिरावीत.

14.            टोमॅटोचे वरचे साल काढण्यासाठी -१० मिनिटे  टोमॅटो गरम पाण्यात ठेवावा,       साल चटकन निघते. टोमॅटो जर जास्त मऊ /लिबलिबीत झाले असतील तर एका भांड्यात गार पाणी घेऊन त्यात थोडेसे मीठ टाकून त्या पाण्यात टोमॅटो रात्रभर ठेवा,सकाळी टोमॅटो टणक ताजे झालेले दिसतील

15.            डोसा क्रिस्पी होण्यासाठी भिजवताना तांदळात चमचा साबुदाने एक चमचा चण्याची डाळ घालावी, मस्त कुरकुरीत होतात आणि इडल्या साठी तांदळात थोडे मेथी दाने घालावे, छान मऊ होतात.

16.            कापून फोडी करून ठेवलेले सफरचंद काळे/तपकिरी पडू नये म्हणून ते मिठाच्या गार पाण्यात ठेवावे.

17.            साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो.

18.            पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत बनतील.

19.            कोथिंबीर च्या काड्या आणि पाला वेगळा निवडून ठेवा. काड्या चांगल्या धुवून अगदी साबुदाण्या एव्हडे त्यांचे बारीक तुकडे करून ठेवा. आणि ते एखाद्या बिन झाकणाच्या डब्यात ठेऊन फ्रीज मध्ये एक दोन दिवस ठेवा म्हणजे सुखून जातात. नंतर झाकण लावून ठेवा बरेच दिवस टिकतात, या काड्यांनाच जास्त चव आणि स्वाद असतो. बारीक कापलेल्या काड्या फोडणी मध्ये,चटणी करताना वापरा,फक्त डेकोरेशन साठी पाला बारीक चिरून वापरणे चांगले.

20.            डोसा कुरकुरीत (क्रिस्पी) होण्यासाठी डोशाचे पीठ भिजवतेवेळी तांदळात चमचा साबुदाणा एक चमचा हरभर्यामची (चण्याची) डाळ थोडेसे मेथीचे दाणे घालावेत , म्हणजे डोसे छान , मस्त कुरकुरीत होतात आणि इडल्या साठी पीठ भिजवतेवेळी तांदळात थोडे मेथीचे दाणे घालावे, म्हणजे इडल्या छान हलक्या मऊ होतात.

21.            ऍसिडिटीवर एक अगदी सोप्पा उपाय. सकाळी एक चमचा निवळी प्यायची. झाले, एका दिवसात ऍसिडिटी बरी होते. निवळी बनवण्यासाठी विड्याच्या पानाला लावायची चुन्याची ट्यूब आणून रात्री तांब्याभर पाण्यात पिळायची व ढवळून झाकून ठेवून द्यायची. सकाळी वरील थर बाजूला काढून आतील फक्त पाणी एका बाटलीत भरून ठेवायचे. हीच ती निवळी.

22.            कोणताही पूलाव किंवा मसालेभात करताना तांदुळ - तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळlचा पण दाणा वेगळा आणि मोठा होतो.

23.            घट्ट वरणात (म्हणजे शिजलेल्या डाळीच्या गोळ्यात) चिरलेला कांदा+ तिखट + मीठ + गोडा मसाला+ कोथिंबीर घालून मस्त तोंडीलावणे तयार होते. पोळी/ भाकरीबरोबर झक्कास झटपट!! यालाच गोळा-वरण म्हणतात.

24.            पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात चमचा विनेगार किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.

25.            तळणीचे मोदक करतांना पारीचे पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बहुतेकवेळा तेलात उघडली जाते आणि सारण बाहेर येते, नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो. म्हणून थोडे दुध लावल्यास कळी पक्की बंद होते. फक्त अगदी कणच दुध वापरावे.

26.            नेहेमीची कांदा टोमाटोची कोशिंबीर करताना त्या मध्ये चीज किसून घाला कोशिंबीर मस्त लागते.

27.            मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.

28.            कोथिंबीर घेताना तिची मुळे ताबडतोप कापून टाका -बरेच दा कोथिंबीर पाणी मारून टवटवीत ठेवतात आणि ती कोथिंबीर मुळच्या ठिकाणी सडलेली असते -जर मुळे कापली नाहीत तर सगळी कोथिंबीर लवकर सडून जाते.

29.            करंजी, शंकरपाळी, चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो साजूक तुपाचे मोहन वापरावे त्यामुळे पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.

30.            हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.

31.            पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी कणीक मळतांना तिच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी.

32.            डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिळसा.

33.            कधी कधी तुरीची डाळ कूकरमधेही शिजत नाही म्हणून त्यात एक चिमुटभर मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद हिंग पूड घालून कुकार मधे शिजवली तर डाळ निट शिजतेच आणि स्वादही छान येतो.

34.            गुळाच्या पोळ्या करतेवेळी पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ पारदर्शक नसाव्यात फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते. जर आतील सारण कडेपर्यंत जात आही असे झाले तर कातण्याने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात.

35.            प्लॉवर शिजवतांना त्यात दूध किंचित मीठ घालून शिजवावे म्हणजे प्लॉवर पाधारा शुभ्र तजेलदार रहातो.

36.            चकली भाजणीसाठी वापरायच्या सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात. यामुळे डाळी वाळवण्याचा वेळ वाचतो. तसेच डाळी भाजताना वेळ कमी लागतो.

37.            रस्सा भाज्या जास्त मीठ पडल्यामुळे खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा,खारटपणा कमी होतो.

38.            पुरणपोळी करणं म्हणजे गृहिणीचं कसब असतं. कणीक आणि पुरण एकसारखंच मऊ असावं. कणीक मळून झाल्यावर एका पसरट पातेल्यात घेऊन ती बोटांनी दाबून घ्यावी त्यावर भरपूर तेल ओतून झाकून ठेवावी. पोळी करताना तेलातून काढून ती चांगली तिंबून घ्यावी. हवी तशी पोळी लाटता येते आणि पुरणही बाहेर येत नाही. पुरणपोळीचं पुरण अगदी सैल (पातळ) झालं असेल तर त्यात दोन चिमूट खायचा सोडा घालून पातेलं गॅसवर ठेवून थोडं गरम करा म्हणजे ते घट्ट होईल. किंवा एका स्वच्छ जाड कापडावर काही वेळासाठी पसरून ठेवा. अगदी सोपं म्हणजे थोडं डाळीचं पीठ खमंग भाजून पुरणात मिक्सड करा. पोळी लाटताना पोळपाटावर स्वच्छ कापड टाकून त्यावर नेहमीसारखी पोळी लाटावी म्हणजे पोळपाटाला चिकटत नाही.

39.            फ्रीजर मधे बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो.

40.            पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो.

41.            ब्रेडक्रंप्स असेच बनवले तर ते मऊ होतात, त्यापेक्षा ब्रेड आधी ओव्हन मधे घालून कडक करावेत आणि मग ब्रेडक्रम्प्स बनवावेत. बाहेरच्यासारखे कुरकुरीत होतात.

42.            लसूण गरम पाण्यात थोडा वेळ भिजवा साले लवकर सुटतात.

43.            ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. लोण्याने हात बरबटट नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही.

44.            कढीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढीलिंबाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो ती बराच दिवस टिकतात.

45.            मिक्सरच्या ग्राइन्डरमधे वेलदोड्यांची पावडर करतांना कितीही फिरवला तरी बारिक होत नाही,म्हणून आख्खे वेलदोडे जरा एक चीर देऊन तुपात परतुन टम्म फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली मग ग्राइन्डरमधे फिरवले तर त्यांची पटकन बारिक पावडर होते वासही छान येतो.

46.            चकली भाजणीसाठी बिनसालाची उडीद आणि मुगडाळ वापरावी. सालासकट वापरल्यास चकल्या रंगाने काळ्या होतात आणि भाजणीचा स्वादसुद्धा चांगला लागत नाही.

47.            आलं फ्रीज मध्ये ठेवलं तरी बऱ्याचवेळा खराब होतं. ते चांगलं रहावं म्हणून त्याची माती चोळून चोळून अगदी स्वच्छ धुवून टाकावे, नंतर दिवसभर फडक्यावर पसरून सावलीत वाळवावे (अगदी कोरडे करायचे नाही) आणि झिप लॉक पिशवीत भरून फ्रीज मध्ये ठेवावे. महिनाभर सहज टिकतं.

48.            पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात.

49.            फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची . भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो.

50.            साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे.

सारांश

स्वयंपाक करणे हा एक मजेदार आणि फायद्याचा अनुभव असू शकतो. या सोप्या टिप्सचे अनुसरण करून, आपण आपल्या स्वयंपाकघरात अधिक कार्यक्षम आणि प्रभावी होऊ शकता आणि आपल्या जेवणाचा अधिक आनंद घेऊ शकता.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.



No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know