Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 18 October 2023

प्रवासात गाडी लागण्याचा त्रास का होतो | NAUSEA AND VOMITING DURING TRAVEL | TOURISM | UNCOMFORTABLE | SICKNESS | VASCULAR SYSTEM | MOTION SICKNESS

प्रवासात मळमळ व उलट्या

 

प्रवासात गाडी लागण्याचा त्रास का होतो?


पर्यटन करणे हा खूप आनंददायक अनुभव असतो. पर्यटन किंवा प्रवास करायला खूप लोकांना आवडते. परंतु खूप लोकांना पर्यटन आवडत तरी प्रवास करताना खूप त्रास होतो. आपल्या मराठी भाषेत आपणगाडी लागते' असे म्हणतो. ज्या वाहनातून जायचे मग ते गाडी असो, विमान असो किंवा बोट, त्यांना ते चालू झाले की त्रास होऊ लागतो. ही लक्षणे वेगवेगळ्या प्रकारची असतात. काहींना अस्वस्थ वाटू लागते, काहींना उलट्या होऊ लागतात, काहींना घाम येऊ लागतो. सबंध जगात हा होणारा त्रास सारखाच असतो. म्हणजे सर्व जगात असा वाहनामुळे किंवा शरीर हलल्यामुळे होणारा त्रास एकाच प्रकारचा असतो. आपण मोठ्या गोल चक्रात बसतो. असा त्रास होण्याची सवय असलेल्या माणसांना या चक्रातही अस्वस्थ वाटते. यावर करायचे जे उपाय आहेत ते शास्त्रज्ञांच्या मते अर्धवट आहेत. म्हणजे १०० टक्के या उपायाने बरे वाटत नाही. गाडीने, विशेषत: बोटीने प्रवास करताना अनेकांना गाडी लागते, मळमळ, उलट्या यांचा त्रास होऊन अनेक जण हैराण होतात. ही गाडी किंवा बोट नेमकी का लागते? आपल्या ज्ञानेंद्रियांकडून मेंदूला परस्परांपासून भिन्न असलेले संदेश पोहोचतात, त्या संभ्रमातून ‘गाडी लागण्याची म्हणजे मोशन सिकनेसची प्रतिक्रिया उमटते.

गाडी का लागते?


प्रवास करताना, गाडीचा वेग किंवा बोटीचे हेलकावे यांपासून आपले डोळे अनभिज्ञ असतात; कारण आपली नजर वाहनाच्या आतील एखाद्या वस्तूवर असते. या हालचाली होत असल्याचे संदेश कानाच्या अंतर्भागातून मेंदूपर्यंत पोहोचतात. शरीरातील स्नायू आणि सांध्यांकडून मिळणारे संदेश वेगळे असतात. ज्ञानेंद्रिये परस्परांपासून भिन्न संदेश पोहोचवत असल्याने निर्माण होणारीगडबडओळखून, संभाव्य विषबाधा किंवा आजारपण यांपासून रक्षण करण्यासाठी, मेंदू पोटातील घटक बाहेर टाकण्याची आणि आराम करण्याची आज्ञा देतो. म्हणजेच, गाडी लागणे हा असामान्य, अपवादात्मक परिस्थितीला दिलेला कौशल्यपूर्ण प्रतिसाद असतो.

ह्याचं उत्तर आहे डोळे आणि कानांचा नं जमलेला ताळमेळ. ज्याला काँफ्लिटिंग सिग्नल्स थेअरी असंही म्हणतात. आता तुम्ही विचाराल डोळे आणि कानांचा कसला ताळमेळ? तर गाडी सुरु झाल्या नंतर तुम्ही आरामात पाठ टेकून बसलेला असता. तुमचे डोळे गाडीच्या आतमध्ये असलेल्या सर्व गोष्टी बघत असतात. अगदी ड्राइवरच्या सीट पासून ते बाजूला बसलेल्या माणसापार्यंत. गाडी तर चालू असते पण गाडीतल्या वस्तूंची मुव्हमेंट नसते. पण त्याच वेळी आपले कान सर्व काही ऐकत असतात. गाड्यांचा मागे जाणारा आवाज, हॉर्न आणि बरंच काही आपले कान ऐकत असतात. आणि मेंदू कडे सिग्नल्स पाठवत असतात. त्याच वेळी डोळे सुद्धा आपली माहिती, मेंदू कडे पाठवण्याचं काम करतात. आणि मग मेंदू 'गोंधळात' पडतो.

आपला मेंदू माहिती गोळा करत असतो. प्रवास करताना डोळे आणि कान वेगवेगळी माहिती देतात. डोळे म्हणतात हालचाल नाहीये. तर कान म्हणतात हालचाल आहे. ह्या दोघांचे सिग्नल बघून मेंदू कनफ्यूज होतो. आणि मग होते उलटी. पण आता प्रश्न असे आहेत की कानाला हालचाल झालीये हे कसं समजतं? आणि वेगवेगळे सिग्नल्स मिळाल्या नंतर मेंदू उलटी का करायला सांगतो? 

कानाच्या आतल्या बाजूला एक व्हेस्क्युलर सिस्टिम असते. म्हणजे या सिस्टिमच्या एका भागात लिक्विड असतं आणि दुसऱ्या भागात थोडेसे केस असतात. जेव्हा हालचाल होते तेव्हा लिक्विड हलतं आणि केसांवर आदळून केसांची पण हालचाल होते. ह्या वरून मेंदू ला हालचाल होत असल्याचं समजत.

पण मग उलटी का होते?


याचं कारण आहे न्युरो टॉक्सिन्स. न्युरो टॉक्सिन म्हणजे एक प्रकारचं विष.. जे खाण्या पिण्यात असतं. मेंदूला जेव्हा शरीरात न्युरो टॉक्सिन्स प्रवेश झाल्याचे संकेत मिळतात तेव्हा मेंदूला वाटतं की शरीरात पॉईजनची एन्ट्री झालीये. मेंदूला हे समजताच. 'लगेचच' शरीरात सूचनांचा सिग्नल जातो. पोटातलं सगळं बाहेर काढण्यासाठी प्रक्रिया मेंदूद्वारे सुरु होते. आणि तोंडाला लाळ सुटून उलटी होणार आहे, याची लक्षणे दिसून येतात.

गाडी लागण्यावरचे उपाय


गाडी लागण्यावरचे उपायही या संशोधकांनी सुचवले आहेत. परस्परविरोधी माहिती निर्माण करणाऱ्या परिस्थितीवर तोडगा काढणे, हा त्यातील पहिला उपाय. त्यासाठी एखाद्या स्थिर गोष्टीवर नजर केंद्रित करता येईल. उदाहरणार्थ, बोटीवर असल्यास, किनाऱ्यावर अथवा क्षितिजावर लक्ष केंद्रित करणे किंवा गाडीत पुढच्या आसनावर बसून खिडकीबाहेर बघणे. त्याद्वारे डोळे आणि कानाचा अंतर्भागाकडून मिळणारे संदेश परस्परांशी सुसंगत होतात. त्याशिवाय, संघर्षाला कारणीभूत ठरणारी माहिती कमी करण्याच्या दृष्टीने, कानाच्या अंतर्भागातील माहिती दाबून टाकणारी किंवा मेंदूमध्ये त्यावर होणाऱ्या प्रक्रियेत बदल करणारी औषधे उपलब्ध आहेत. या परिस्थितीचे परिणाम रोखण्याचा प्रयत्न (मळमळ थांबवणारी औषधे) हाही एक उपाय ठरू शकतो. याखेरीज वारंवार अनुभव घेतल्याने, त्याच्याशी जुळवूनही घेता येते.

तुम्हाला सतत मोशन सिकनेसचा त्रास होत असेल तर गाडीच्या पुढच्या सीटवर बसा. बोटीने प्रवास करत असाल तर मध्यभागी बसा. ट्रेनमध्ये असताना, तुमचा चेहरा नेहमी पुढच्या दिशेने ठेवा, म्हणजेच ट्रेन ज्या बाजूने जात आहे, त्याच बाजूला ठेवा.

मोशन सिकनेस टाळण्यासाठी, नेहमी ताजी हवा असलेल्या ट्रेन किंवा बसमध्ये खिडकीजवळ बसा. ताजी हवा मिळाल्याने तुम्हाला बरे वाटेल आणि उलट्या होणार नाहीत.

प्रवासादरम्यान उलट्या होत असल्यास हलके अन्न खावे. काहीही खाता प्रवासाला निघाल्याने मोशन सिकनेस अधिक होतो. हलका आणि सकस आहार मोशन सिकनेसपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहे.

प्रवासात काहीही वाचण्याचा प्रयत्न करू नका. अस्वस्थ असताना, आसनावर झोपा किंवा विश्रांती घ्या.

प्रवासादरम्यान तुम्हाला उलट्यांचा त्रास होत असेल, तर आकसाचे पान उलट्या रोखण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. आंब्याचे एक पान घेऊन त्याचा गुळगुळीत भाग पायाच्या तळव्यावर ठेवा आणि त्यावर मोजे घाला, प्रवासात उलट्यांपासून आराम मिळेल.

प्रवासापूर्वी दही आणि डाळिंबाचे सेवन केल्याने प्रवासात उलटीच्या समस्येचा त्रास होणार नाही. फक्त दही खाल्ल्याचाही तुम्हाला फायदा होईल.

जर तुम्हाला सकाळी प्रवास करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप भिजवा आणि सकाळी सेवन करा. प्रवासात उलट्या होणार नाहीत.

संशोधनानुसार लिंबाचा वास मोशन सिकनेसशी संबंधित मळमळ शांत करू शकतो.

सारांश

घराबाहेर पडल्यावर प्रवास करताना मनोमनी एक भिती तुमच्या मनात खदखदत असेल ती म्हणजे प्रवासात बस, गाडी लागली तर काय करायचे? आपण आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला यासाठी अनेक रामबाण उपाय विचारतो आणि तऱ्हेतऱ्हेचे उपाय करतोही. सर्व उपाय करूनही गाडी अथवा बस लागली तर अनेकजण अशावेळी खूप पॅनिक होतात परंतु तुम्हाला अशावेळी पॅनिक होण्याची गरज नाही. तुम्ही हा त्रास अगदी घरगुती उपाय वापरूनही निपटवू शकता.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know