स्वयंपाकघरातील फ्रीज
फ्रीजमधे काय ठेवू नये?
फ्रीज स्वयंपाकघरात असणं आवश्यक हे बरोबर
पण स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट फ्रीजमधे चांगली राहील असं नाही. काही गोष्टी फ्रीजबाहेरच
चांगल्या राहातात, सामान्य तापमानात भरपूर दिवस टिकतात आणि त्या खराब होतात त्या केवळ
फ्रीजमधे ठेवून, फ्रीजमधल्या अति थंड तापमानामुळे.
स्वयंपाकघरातील अत्यावश्यक बाब फ्रीज
एखादी गोष्ट फ्रीजमध्ये ठेवली की चिंता नाही
असं वाटतं. पण फ्रीज म्हणजे जादूची कांडी नव्हे की त्यात कितीही गोष्टी, कशाही ठेवल्या
तरी चांगल्याच राहातील? अनेक घरातील स्वयंपाकघरात फ्रीज एखाद्या कपाटासारखा वापरावा
तसा काहीही आणलं की ठेवा फ्रीजमधे असा पध्दतीने वापरला जातो. फ्रिजमध्ये अन्नपदार्थ
टिकतात हे खरं असलं तरी ही बाब सर्वच खाद्यपदार्थांबाबत एकसारखी लागू पडत नाही. महिनोमहिने
एखादा पदार्थ फ्रीजमधे पडून राहिला तर तो खराब झालेला लक्षात येतो. यावरुन कमी कालावधीसाठी
अन्नपदार्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणून फ्रीज असतो, हे लक्षात घ्यावं.
• चवीला आंबट असणारी संत्री मोसंबी सारखी फळं फ्रीजमधे ठेवू नये. फ्रीजमधील
तापमानामुळे या फळांच्या चवीची आणि पोताची हानी होते.
• फ्रीजमधे मध ठेवल्यास ते घट्ट होतं.
• फ्रीजमधे टमाटे ठेवल्यास ते बाहेरुन चांगले दिसतात पण आतून खराब झालेले,
चवीने नासलेले लक्षात येतात.
विशिष्ट काळापेक्षा शिजवलेले, न शिजवलेले
पदार्थ फ्रीजमधे ठेवल्यास त्या पदार्थांची मूळ चव, पोत आणि स्थिती बदलते तर काही पदार्थांच्या
बाबतीत ती बिघडलेली लक्षात येते. फ्रीज स्वयंपाकघरात असणं आवश्यक हे बरोबर पण स्वयंपाकघरातील
प्रत्येक गोष्ट फ्रीजमधे चांगली राहील असं नाही. काही गोष्टी फ्रीजबाहेरच चांगल्या
राहातात, सामान्य तापमानात भरपूर दिवस टिकतात आणि त्या खराब होतात त्या केवळ फ्रीजमधे
ठेवून, फ्रीजमधल्या अति थंड तापमानामुळे.
फ्रीजमधे काय ठेवू नये?
कॉफी
कॉफी पावडर व्यवस्थित राहाण्यासाठी फ्रीजच्या
अति थंड तापमानाची नाही तर कोरड्या आणि थोड्या थंड जागेची गरज असते. कॉफी ही एका हवाबंद
डब्यात नीट काढून ठेवली आणि हा डबा कोरड्या आणि जिथे जास्त उष्णता असणार नाही अशा जागी
ठेवल्यास चांगली राहाते. 'नॅशनल कॉफी असोसिएशन' च्या संदर्भानुसार कॉफीच्या बिया घरातील
सामान्य तापमानात सुरक्षित आणि चांगल्या राहतात. अति थंड, गरम आणि आर्द्र वातावरणात
कॉफी पावडर ठेवल्यास ती खराब होते.
पोळ्या
आणि ब्रेड
काही गोष्टी थंड तापमानात ठेवल्यास त्यातील
ओलावा निघून जातो आणि त्या कोरड्या होतात. पोळ्या आणि ब्रेडच्याबाबतीत ही बाब लागू
पडते. पोळ्या आणि ब्रेडमध्ये जो ओलावा असतो, आर्द्रता असते ती फ्रीजमधे टिकून रहात
नाही. पोळ्या आणि ब्रेड फ्रीजमधे ठेवल्यास ते कडक होतात. जास्तच शिळे लागतात.
काकडी
फ्रीजमध्ये
काकडी
ठेवणे
टाळा.
यामुळे
काकडीचे
वरचे
साल
खराब
होते.
काकडी
सामान्य
तापमानात
ठेवल्यास
ती
अधिक
दिवस
चांगली
व
सुरक्षित
राहते.
टमाटे
टमाटे बाहेर ठेवल्यास त्याचा स्वाद, पोत
आणि रंग छान रहातो. फ्रीजमधे टमाटे ठेवल्यास ते बाहेरुन चांगले दिसतात पण आतून खराब
झालेले, चवीने नासलेले लक्षात येतात. तसेच बाहेर ठेवलेले आणि फ्रीजमध्ये ठेवलेले टमाटे
यांच्यात गुणात्मकरित्या झालेला बदल लगेच लक्षात येतो. फ्रीजमध्ये टमाटे ठेवल्यास त्यावर
काळे डाग पडतात. ते बेचव लागतात. फ्रीजमधे ठेवलेला टमाटा चिरायला घेतल्यास फ्रीजमधील
अति थंड वातावरणाचा त्यावर परिणाम झालेला जाणवतो. ते सहज चिरले जात नाही. फ्रीजच्या
बाहेर ठेवलेला टमाट्याची साल ही पातळ राहाते, निबर होत नाही. असा टमाटा चिरताना टमाट्याच्या
सालीतला करकरीतपणा जाणवतो.
वांगे
वांगं भाजीचं असो की भरताचं ते तापमानाच्या
दृष्टीने फारच संवेदनशील असतं. वांगे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवल्यास ते चांगले
रहातात. पण फ्रीजमधे ते जर जास्त काळ ठेवले तर वांग्याचं साल सुरकुतलेलं दिसतं.
बटाटे
फ्रीजमधील
बटाट्यामुळे
कॅन्सरचा
धोका
असतो. बटाटे
फ्रीजमध्ये
ठेवण्यास
मनाई
आहे.
त्यामागील
कारण
म्हणजे
फ्रीजच्या
तापमानामुळे
बटाट्याचा
स्टार्च
तुटतो.
त्यामुळे
बटाट्याचा
गोडवा
वाढतो.
फ्रीजमध्ये
ठेवलेले
बटाटे
शिजल्यावर
त्यातून
ॲक्रिलामाइड
हे
घातक
रसायन
बाहेर
पडते.
ते
खाल्ल्याने
कॅन्सर
होण्याचा
धोका
असतो.
म्हणूनच
बटाटे
सूर्यप्रकाशापासून
वाचवून
ते
उघड्यावर,
मोकळ्या
हवेत
ठेवावेत.
कांदा
कांदा फ्रीजमधे ठेवल्यास तो नरम होतो. त्यातल्या
कडकपणा निघून जातो. फ्रीजमधे कांदे साठवल्यास ते लवकर खराब होतात. चवीवरही परिणाम होतो.
कांदा जर जास्त दिवस टिकवून ठेवायचा असेल तर तो फ्रीजच्या बाहेरच ठेवावा.
लसूण
निवडलेला लसूण हवाबंद डब्यात फ्रीजमधे ठेवला
तर तो काही काळ चांगला राहातो. पण निवडलेला लसूणही दीर्घकाळ फ्रीजमधे ठेवला तर तो चिकट
होतो. त्याला कोंब फुटतात. वास सुटतो. असा लसूण स्वयंपाकात वापरता येत नाही. निवडलेला
लसूण थोडाच काळ फ्रीजमधे चांगला राहातो. पण न निवडलेला लसूण फ्रीजमधे ठेवल्यास तो रबरासारखा
होतो. तो नीट सोलला जात नाही.
मध
मध फ्रीजमधे ठेवल्यास त्याचा पोत बिघडतो.
मधात गुठळ्या होतात. फ्रीजमधे मध ठेवल्यास ते घट्ट होतं. सामान्य तापमानात मध कितीही
काळ नीट हवाबंद डब्यात/ बाटलीत चांगलं राहातं. सामान्य तापमानात स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची
क्षमता मधात असते; मधाला फ्रीजच्या अति थंड तापमानाची गरज नसते.
पीनट बटर
पीनट बटरच्या चव आणि त्यातील आरोग्यदायी
गुणधर्मांमुळे आहारात त्याचं प्रमाण वाढलं आहे. पीनट बटर नेहमीच्या बटरप्रमाणे फ्रीजमधे
ठेवल्यास बटरची चव आणि पोत बिघडते. ते घट्ट आणि कडक होतात. पोळीवर, ब्रेडवर ते सहज
पसरवून लावता येत नाही. पसरवून लावण्याकामी येणारं पीनट बटर फ्रीजच्या बाहेर सामान्य
तापमानात ठेवावं.
जेली,
टमाटा सॉस आणि केचप
टमाट्याच्या सॉसची बाटली उघडल्यानंतर फ्रीजमधे
ठेवल्यास सॉसची मूळ चव बदलते. टमाट्याच्या सॉस आणि केचपमध्ये प्रीझर्व्हेटिव्हज असतात,
त्यामुळे ते फ्रीजबाहेरच्या सामान्य तापामानातही ते टिकून राहातं. टमाट्याच्या सॉस
आणि केचपची चव सांभाळायची असल्यास ते फ्रीजमधे ठेवू नये. सॉसमध्ये
विनेगा
आणि
प्रिझर्वेटिव्ह्जचा
वापर
केला
जातो.
हे
सॉस
खराब
होण्यापासून
वाचवण्यास
मदत
करतात.
जरी
सॉस
उघडून
ठेवला
तरी
तो
खराब
होण्याची
काळजी
करू
नका.
जॅम
आणि
जेली
देखील
फ्रीजमध्ये
ठेवू
नये.
केळं
केळी ही नेहमी पिकल्यावरच
खावीत.
उच्च
तापमान
केळी
पिकण्यास
प्रतिबंध
करते.
म्हणूनच
त्यांना
सामान्य
तापमानात
ठेवा.
त्यामुळे
केळी
सहज
पिकते.
म्हणूनच
केळी
कधीच
फ्रीजमध्ये
ठेऊ
नयेत.
ऑलिव्ह
तेल
ऑलिव्ह तेल हे फ्रीजमधे ठेवल्यास ते घट्ट
होवून त्याचा पोत बटरसारखा होतो. 'जर्नल ऑफ फूड सायन्स'ने केलेला अभ्यास सांगतो की,
ऑलिव्ह तेल फ्रीजमधे ठेवल्यास त्याचा पोत तर बिघडतोच शिवाय त्यातील अॅण्टिऑक्सिडण्टसची
हानी होते.
संत्री
- पपई
चवीला आंबट असणारी संत्री मोसंबी सारखी फळं फ्रीजमधे ठेवू नये. फ्रीजमधील तापमानामुळे या फळांच्या चवीची आणि पोताची हानी होते. संत्री जर फ्रीजमधे ठेवल्यास तिच्यातला ताजेपणा निघून जातो. ती खूपच जुनी आणि सुकल्यासारखी दिसते. तसेच संत्र्याची चवही निघून जाते. फ्रीजमधे ठेवलेल्या संत्री मोसंबी बेचव लागतात. संत्री मोसंबीची सालं ही जाड असतात. त्यामुळे संत्री - मोसंबी बाहेर टिकून राहाण्यास अडचण येत नाही. पपई ही फ्रीजमधे न ठेवता ती बाहेर कागदात ठेवावी. आणि रोज ती कागदातून काढून पहावी. फ्रीजमधे पपई ठेवल्यास ती पिकलेली नसल्यास फ्रीजमधील थंड वातावरणामुळे पिकत नाही, त्यामुळे अशा पपईची चव लागत नाही. फ्रीजमधे पिकलेली पपई ठेवल्यास तिच्यातला गोडवा कमी होवून ती बेचव लागते.
सारांश
आपला रेफ्रिजरेटर हा भाज्या आणि फळं सुरक्षित ठेवण्याचे काम करतो. तसेच ते लवकर खराब होण्यापासूनही वाचवतो. पण सर्वच फळे आणि भाज्या फ्रीजसाठी बनवलेल्या नसतात, काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होऊ शकतात. वातावरणातील उष्णता जास्त होताच भाजीपाला व इतर खाद्यपदार्थ खराब होण्याचा धोका असतो. जेव्हा फ्रीजची व्यवस्था नव्हती, तेव्हा फळे आणि भाज्या उष्णतेपासून वाचवण्यासाठी लोक थंड पाण्याचा वापर करत होते. मात्र फ्रीजची उपलब्धता आणि वीजेची उपलब्धता वाढल्यानंतर परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. अति उष्णतेमध्ये पदार्थ 4 ते 6 तासांत खराब होण्याची शक्यता असते. पण तेच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होत नाही. पण सर्व पदार्थ फ्रीजसाठी बनवलेल्या नसतात, काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होऊ शकतात.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know