Translate in Hindi / Marathi / English

Monday, 22 July 2024

मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हटलं जातं | कडधान्याला मोड आणून आपण त्यामधील अम्ल गुण वाढवतो | मोड आलेल्या कडधान्य पित्तवर्धक व रक्त दुष्टी करणारे बनवतो, अगोदरच कडधान्य हे वातूळ गुणाचे असतात त्यात मोड आणल्यामुळे ते वातरक्त दुष्टीकर होतात व गाऊट सारखे सांध्यांचे आजार निर्माण करतात | सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात

सुपरफूड  प्रोटिन्स

 

मोड आलेल्या कडधान्याचे फायदे

 

मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हटलं जातं. अनेक आहार, जिम तज्ञा कडून मोड आलेले कडधान्य खाण्याचा सल्ला दिला जातो, त्यामुळे प्रोटिन्स मिळतात, पण आपण एवढे हेवी वर्क आउट किंवा व्यायाम करत आहोत का एवढे प्रोटिन्स खायला, दुसरे म्हणजे कडधान्याला मोड आणून आपण त्यामधील अम्ल गुण वाढवतो ते पित्तवर्धक रक्त दुष्टी करणारे बनवतो, अगोदरच कडधान्य हे वातूळ गुणाचे असतात त्यात मोड आणल्यामुळे ते वातरक्त दुष्टीकर होतात गाऊट सारखे सांध्यांचे आजार निर्माण करतात पचायला जड असल्यामुळे गॅसेस, पोट साफ ना होणे, पोट गच्च होणे, ऍसिडिटी निर्माण करणे असे अनेक पचनाचे आजार सुद्धा निर्माण करतात.

डाळी पचण्यासाठी त्याच्यावर संस्कार करावे लागतात

डाळ शिजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो आपण कुकर वापरून तिला लवकर शिजवतो पण त्यामुळे तिच्यावरचा अग्नि संस्कार अर्धवट होतो तिच्यामुळे शरीरात निर्माण होणारा टिकावू पणा सुद्धा कमी होतो. त्यामुळे डाळी पातेल्यातच शिजवाव्यात. डाळ शिजवताना तिचा वातूळ पणा कमी व्हावा म्हणून तिच्यामध्ये आंबट (चिंच,आमसूल ) हे टाकलेच जाते . (आंबट म्हणजे टोमॅटो नव्हे, ते पुन्हा पित्त वर्धक रक्त दुष्टीकर आहे, जिथे जिथे टोमॅटो वापरता तिथे तिथे आमसूल वापरावे ) अनेकांना वाटते ते चव येण्यासाठी असेल पण याला शास्त्रीय महत्व आहे, सर्व डाळी या वातूळ ,रुक्ष ( कोरड्या आहेत ), अगदी मूग सुद्धा त्या डाळी खाल्यामुळे शरीरातील वात वाढू नये म्हणून त्यावर अम्ल संस्कार केला जातो अम्ल हा रस वातशामक आहे त्यामुळे ती डाळ काहीशी वात शामक होते, त्याच बरोबर डाळ तयार झाल्यावर त्यावर तूप लिंबू टाकले जाते, डाळ कोरडी तर तूप स्निग्ध पुन्हा लिंबाचा अम्ल संस्कार वातूळ कमी होऊन चांगली पचण्यासाठी डाळींमधील वात वृद्धीकर गुण कमी करण्यासाठी शास्त्र कारांनी काय काय योजना केली होती कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये असालयाच हवीत. सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी. नंतर उडीद आणि हरभरा, कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असतात. मोड आलेल्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. हे शरीराला फिट ठेवतात. यातून मिळणार्या प्रोटीनमुळे हाडे मजबूत होतात. मोड काढण्यापूर्वी 100 ग्रॅम कडधान्यामध्ये क जीवनसत्व हे 2 ते 6 मिलिग्रॅम असते. हेच प्रमाण मोड काढल्यानंतर 27 ते 52 मिलिग्रॅम पर्यंत वाढू शकते. मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय प्रमाणात वाढते. यातील कर्बोदकांची पाचकता दुपटीने वाढते आणि प्रथिनांची पाचकता जवळजवळ सव्वा पटीने वाढते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदके यांचा एक समृध्द खजीना मोड आलेली कडधान्ये.

मोड आलेल्या धान्याचे आरोग्यदायी फायदे

Ø पोषक घटक: '' जीवनसत्त्व, मिनरल आणि प्रोटीनचे प्रमाण कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीराला त्याचा फायदा मिळतो.

Ø नियंत्रित वजन: मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच लठ्ठपणादेखील कमी होतो.

Ø रक्तवाढीसाठी उपयुक्त: अशक्तपणा किंवा शरीरात रक्ताची कमी असेल तर मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने हि तूट भरून निघते. त्यात आयन कॉपरचे प्रमाण जास्त असते.

Ø सुंदर त्वचा: त्वचेच्या विविध समस्यांपासून मोड आलेली कडधान्य खाल्ल्यामुळे सुटका मिळते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्यादेखील कमी होऊन त्वचा तजेलदार बनते.

Ø इतरही फायदे: मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते तसेच हृदयाचे आरोग्यदेखील चांगले राहते.

Ø मोड आलेल्या धान्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम स्तर वाढतो. हे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर काढण्यास मदत करते.

Ø मोड काढण्याच्या प्रक्रियेत टरफलामध्ये असलेले टॅनीन आणि फायटीक एसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे लोहाचे आणि चुण्याचे शोषण वाढते. याचा शरीराला चांगला फायदा होतो.

Ø मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये कडधान्य हलके होतात आणि पचायला सुलभ होतात.

Ø मोड आलेली कडधान्य सुकवून ठेवता येतात. अशा सुकविलेल्या मोडामध्ये कर्बोदकांचे आणि जीवनसत्वे मोठया प्रमाणावर वाढते.

Ø सुकविलेले मोड थोडया वेळ पाण्यात टाकून पुन्हा टवटवीत करता येतात अशी कडधान्ये प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वांनी समृध्द असतात.

मोड आलेल्या धान्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं आणि कर्बोदकं असतात. ज्यांचा दररोजच्या आहारात समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहतं. मोड आलेल्या धान्यामध्ये व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन त्वचा आणि केसांना हेल्दी ठेवते. याच्या नियमित सेवनाने शरीर उर्जावन राहते. किडनी, ग्रंथी आणि तांत्रिक तंत्राची मजबुती तसेच नवीन रक्त कोशिकांचे निर्माण करण्यातही या धान्याची मदत होते. अंकुरित गव्हामध्ये उपलब्ध असलेल तत्त्व शरीरातील अतिरिक्त वसा शोषून घेण्याचे काम करतात. मोड आलेल्या धान्यामध्ये अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन , बी, सी आढळून येते. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयरन आणि झिंक मिळते.

प्रथिनांची दैनंदिन गरज आणि कमतरतेमुळे होणारे आजार

प्रत्येक व्यक्तीसाठी प्रथिनांची गरज ही व्यक्तीच्या वजनानसार शारीरिक अवस्थेनसार निश्चित केली जाते. सर्वसाधारणपणे ग्रॅम प्रति किलो वजन पति दिवस प्रथिने प्रत्येक व्यक्तीसाठी लागतात. म्हणजेच व्यक्तीचे वजन ५० किलो असेल तर त्या व्यक्तीला दिवसभरात ५० ग्रॅम प्रथिनांची गरज असते.

लहान मले गर्भवती स्त्रिया स्तनदा मातांना यांना अधिक मात्रेत प्रथिनांची गरज असते पथिनांच्या कमतरतेमळे अनेक आजार संभवतात. कमतरतेमळे मलांची शारीरिक मानसिक वाढ खुंटते. अतिकृशता हा आजार संभवतो. या मध्ये लहान बालकांच्या हातापायांच्या काड्या झाल्यासारखे दिसून येते.

कमी वजनाचे बालक जन्माला येणे, रक्तक्षय होणे, तर प्रौढामध्ये जंतू संसर्ग, यकृत वृद्धी, जलोदर, कृशता असे आजार संभवतात.

आरोग्य चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी दररोज एक मूठभर तरी मोड आलेले कडधान्य खाल्ले पाहिजे, असे डॉक्टर आपल्याला सांगतात. कारण, मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक गुणधर्म राहत असून त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही रोगापासून दूर राहण्यास मदत होते.

अख्खे मुग किंवा मुगडाळ

अख्खे मुग किंवा मुगडाळ सर्व धान्यांमध्ये पौष्टिक समजली जाते. या डाळीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी राहत असून व्हिटॅमिन , बी, सी आणि चे प्रमाण भरपूर असते. याशिवाय मॅग्नेशियम, कॉपर, फायबर, पोटॅशियम, लोह आदी पोषकद्रव्याचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे या डाळीला स्प्राउटमध्ये अधिक महत्त्व देण्यात आले आहे. तर नियमित मोड आलेले मुग खाऊन कोणत्या दोन रोगांपासून तुमची सुटका होऊ शकते.

. उच्च रक्तदाबास प्रतिबंद: उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी मोड आलेले कडधान्यांचे सेवन करावे. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये सोडिअमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते.

. कर्करोग होण्यास प्रतिबंद: मोड आलेल्या मुगामध्ये अमिनो ॅसिड पॉलीफेनॉल्स ओलिगो सॅकेराइडचे प्रमाण असते. त्यामुळे आपल्या शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध घातला जातो.

. मोड आलेले मुग खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. शरीरातील प्रतिकारक्षमता वाढण्यास देखील मदत होते. पोटाच्या विविध समस्यांवरही मोड आलेले मुग खाणे फायदेशीर ठरते.

सारांश

मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हटलं जातं. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये असालयाच हवीत. सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी. नंतर उडीद आणि हरभरा, कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असतात. उन्हाळ्यात सगळ्यात गुणकारी ठरणारा 'हा' पदार्थ पोटाच्या समस्याही करतो दूर. मोड आलेली कडधान्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात. मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात 'क' जीवनसत्व असतं. मोड आलेलं कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो. मोड आणल्यामुळे टॅनीन आणि फायटीक अॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होतं. ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो. मोड आणल्यामुळे कडधान्य हलकं होतं आणि सहज पचतं. मोड आलेली कडधान्ये वाळवल्यानंतर त्यातल्या कर्बोदकांचं- आणि 'क' जीवनसत्वाचं प्रमाण वाढतं. मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय वाढते.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know